वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १/१ पृ. २६-३०
  • ८० वर्षांच्या एकत्रीकरणाचा आनंदी कळस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८० वर्षांच्या एकत्रीकरणाचा आनंदी कळस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • सत्याचा प्रकाश भारतात येतो
  • अडथळे असतानाही फलप्राप्ती
  • पुष्कळ भाषेतील प्रकाशने
  • ८० वर्षांची फलप्राप्ती
  • सहा वर्षांचे काम
  • अंतिम परिणाम
  • खास घटना
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १/१ पृ. २६-३०

८० वर्षांच्या एकत्रीकरणाचा आनंदी कळस

भारत! संस्कृति, धर्म, प्रथा व वातावरणाच्या विविधतेने बहरलेला देश. हा देश पुष्कळांना वेगळाच व गूढ वाटतो तरीपण त्याला भेट देणाऱ्‍या प्रत्येकाला त्याचे विस्मयकारक समुद्रकिनारे विस्मित व मोहीत करतात.

७७ कोटी ५० लाख लोकवस्तीच्या वसाहतीने भरलेल्या या उपखंडात महाराष्ट्र राज्याच्या पश्‍चिम घाटाच्या उंचावर वसलेल्या लोणावळा या छोट्या गावात यहोवा देवावर प्रीती करणारे एका खास समारंभात मशगूल झाले होते. तो दिवस रविवार, जानेवारी २०, १९८५ हा होता.

मुंबई या दाट वस्तीच्या शहरापासून ७० मैल (११० कि.मी.) अंतरावर असलेल्या या डोंगरावरील स्थानकावर खासपणे वर उल्लेखिलेल्या दिवशी एवढे विचार का निमग्न झाले होते बरे? याचे उत्तर आम्हाला भारतामध्ये यहोवाच्या मोलवान चीजवस्तुंचे—त्याच्या लोकांचे—जे ८० वर्षांच्या कालावधीत एकत्रीकरण झाले त्यात सापडते. ते या देशातील केवळ ७ हजारांपेक्षा अधिकांनाच नव्हे तर देवाच्या लोकांच्या जगव्याप्त संघटनेला आनंददायक वृत्त आहे.

तथापि या अभूतपूर्व अशा खास प्रसंगाची अधिक रसिकता वाटावी या आधी आपण गेल्या आठ दशकात सत्याचा पाया कसा स्तंभित होऊ शकला त्याची त्रोटक स्वरूपाची माहिती विचारात घेऊ या.

सत्याचा प्रकाश भारतात येतो

१९०५ मध्ये एस. पी. दवे या भारतीय विज्ञानशास्त्र विद्यार्थ्याने अमेरिकेला भेट दिली. तेथे असताना ते वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे त्यावेळेचे अध्यक्ष सी.टी.रसेल यांच्या एका पवित्र शास्त्र व्याख्यानाला गेले. दवे यांना सत्याबद्दल खूप आस्था वाटली आणि ते जेव्हा भारतात मद्रास या पूर्व किनाऱ्‍यालगत असणाऱ्‍या त्यांच्या गावी परतले तेव्हा त्यांनी ४० पवित्र शास्त्राचे अभ्यास गट तयार केले.

याच सुमाराला आणखी एक भारतीय तरूण त्रेकत्व तत्व व तान्ह्‌या बाळाच्या बाप्तिस्म्याबद्दल त्याला वाटणाऱ्‍या प्रश्‍नांविषयीची उत्तरे शोधीत होता. तो तरूण मुलगा ए.जे. जोसेफ त्यावेळी चर्च ऑफ इंग्लंडचा सदस्य होता. त्याला रसेल यांनी लिहिलेल्या ॲट–वन–मेंट बिट्‌वीन गॉड ॲण्ड मॅन या पुस्तकाची एक प्रत टपालाने मिळाली. या प्रकाशनाने जोसेफला यहोवाच्या सर्वश्रेष्ठतेविषयीचे सत्य समजावले. जोसेफ, त्याचे वडील आणि एक चुलत भाऊ लगेच पवित्र शास्त्रीय सत्याचा प्रसार त्या भातशेती पिकवणाऱ्‍या व नारळीच्या बागा असणाऱ्‍या प्रदेशात, सध्याच्या केरळमध्ये करू लागले. १९१२ मध्ये बंधू रसेल यांच्या भारतामध्ये घडलेल्या भेटीत जोसेफ पूर्ण वेळेचे राज्य घोषक झाले. १९२४ मध्ये त्यांनी एकट्यानीच भारतभर ३,६०० मैलांचा (५,८०० कि.मी) प्रवास करून पुष्कळ लोकांना व्याख्यानाद्वारे सत्य ऐकवले. बंधू जोसेफ १९६४ साली त्यांचा मृत्यु होईपर्यंत आवेशी कार्यकर्ते होते.

वॉचटावर संस्थेचे दुसरे अध्यक्ष जे.एफ. रदरफोर्ड यांनी १९२६ मध्ये इंग्लंडला भेट दिली. तेथे असताना त्यांनी एडविन स्किनर या कोलपोरचर (पूर्ण वेळेच्या कार्यकर्त्याना) विचारले: “तुम्हाला भारतात जायला कसे वाटेल?” कोणतीही हेळसांड न करता बंधू स्किनर यांनी प्रतिसाद दिला: “मी केव्हा जावे अशी तुमची इच्छा आहे?” अगदी तीन आठवड्यातच यांची व त्यांचा सोबती अशा दोघांची भारताला रवानगी झाली!

यानंतरच्या पन्‍नास वर्षांमध्ये एडविन स्किनर यांनी शाखा सेवक याअर्थी काम केले. आरंभाला भारत, सिलोन, पर्शिया, अफगाणिस्तान आणि बर्मा ही क्षेत्रे त्यांच्या देखरेखीखाली होती. त्यांनी भारतातील बहुतेक प्रवास लोहमार्गाने केला, आपल्या सोबत्याबरोबर कार्यालयीन जबाबदाऱ्‍या तसेच प्रवास व प्रचार कार्य या कामाची अदलाबदल करवून घेतली. नंतर त्यांनी एक “हाऊस कार” घेतली आणि ज्या क्षेत्रात लोहमार्ग उपलब्ध नव्हता त्या क्षेत्रात पोहोचण्यासाठी या मोटारीचा वापर केला. आता ९१ वर्षांचे वय झाले असले तरी बंधू स्किनर हे अद्याप भारतातील शाखा दप्तरात उत्साही कर्मचारी व सुवार्तेचे उल्लेखनीय घोषक या अर्थी कार्य करीत आहेत.

१९४७ मध्ये वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडचे प्रशिक्षित भारतात येऊ लागले. यापैकीचे एक रिचर्ड कॉटरील आहेत जे अद्याप ३८ वर्षांनंतर क्रियाशील आहेत. आता शासकीय धोरणामुळे काही काळापासून भारतात नव्या विदेशी मिशनऱ्‍यांना प्रवेश निषेध आहे. तरीपण १७ बंधू–भगिनी ३० वर्षांच्या सरासरी सुवार्तिक कार्याआधारे या देशात विश्‍वासूपणे सेवा करीत आहेत.

भारतातील बांधवांनीही मोठी आध्यात्मिक प्रगती साध्य केली, आणि आता पुष्कळ जण खास पायनियर्स व फिरते देखरेखे या अर्थी लायक बनले आहेत. १९८३ मध्ये वॉचटावर शाळेचे १० आठवड्यांच्या शिक्षणक्रमाचे दोन वर्ग शाखा दप्तरी घेण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या ४६ खास पायनियरांना भारतातील एकत्रीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने उभ्या ठाकलेल्या गरजांशी चांगल्या प्रकाराने सामना करण्याविषयीचे प्रोत्साहन व तयारी केली गेली. नवनव्या जागी कार्याचा प्रसार नेण्यामध्ये हे साधन ठरले आहेत.

अडथळे असतानाही फलप्राप्ती

भारतातील विविध स्वरूपाची क्षेत्रे—मोठी व गर्दीची शहरे, वेगवेगळ्‌या स्थितीत राहणाऱ्‍या वसाहती. जन्मापासून मृत्युपर्यंत माणसाच्या जीवनावर ताबा राखणारी मुळावलेली धर्मरूढी—या गोष्टींद्वारे अनेक आव्हाने प्रस्तुत होत असली तरी एकत्रीकरण हे चालूच आहे. भारतातील लाखो जनसमूहात मानवजातीच्या समस्यावरील उपायांचा शोध घेणारे व देवाबद्दल अधिक खोल समजावणूक प्राप्त करून घेण्याची इच्छा असणारेही आहेत.

दादू हा त्यापैकी एक आहे. दादू तरूण असताना त्याला याचे नेहमीच कोडे वाटे की वेगवेगळे लोक वेगवेगळ्‌या देवांची भक्‍ति कशी करतात. त्याने पवित्र शास्त्र वाचावयास आरंभ केला पण त्याला बहुतेक ते समजू शकले नाही. त्यानंतर तो हिन्दूंच्या देवळात जाऊ लागला व त्या धर्माची पुस्तके वाचण्यास त्याने आरंभ केला.

“कृष्ण हा प्रभू सर्व धर्मांचे नियंत्रण करीत आहे आणि तो गळयात जी माळ घालतो त्यातील प्रत्येक मणी एकेका धर्माचे प्रतिनिधित्व करतो.” असे दादू आठवून सांगतो. “मी विचार केला की जर हे असे आहे तर मग वेगवेगळया धर्मांत द्वेष का असावा आणि त्यामुळे रक्‍तपात का घडावा?” नंतर दादूने मुस्लीम धर्माचा शोध धरला तेव्हा त्याला असे सांगितले गेले की त्याला त्याच्या कित्येक मृत पूर्वजांचा संपर्क आहे. पण जेव्हा दादूने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर आपल्या पत्नीसह पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला तेव्हा त्याला कळले की जगातील या पुष्कळ धर्माचा उगम कोठून आहे आणि ज्या चांगल्या आत्म्यांशी त्याचे दळणवळण आहे असे म्हटले गेले ते सर्व लबाड दुरात्मे आहेत. “आम्ही खरोखर यहोवाचे आभार मानतो कारण त्याने आम्हास असे ज्ञान पुरविले ज्यामुळे आमची त्यांच्या तावडीतून मुक्‍तता झाली,” असे दादू म्हणतो. सध्या तो व त्याची बायको पूर्ण वेळेचे उपाध्याय आहेत.

सात वर्षाआधी एका मातेने यहोवाच्या साक्षीदारांकडून पवित्र शास्त्र व त्यावर आधारलेले एक प्रकाशन घेतले होते. ती व तिचे कुटुंब अशा क्षेत्रात स्थलांतरीत झाले होते जेथे कोणी साक्षीदार नव्हता तरी तिने स्वतःच पवित्र शास्त्राचा अभ्यास जारी ठेवला. आता अलिकडेच जेव्हा साक्षीदारांची भेट झाली तेव्हा तिने म्हटले: “पवित्र शास्त्रातून जे सत्य मी शिकू शकले ते इतक्या साऱ्‍या वर्षांमध्ये मला विसरता आले नाही. माझ्या पूर्वीच्या भक्‍तिपद्धतीकडे परत वळणे मला शक्यच झाले नाही.”

पुष्कळ भाषेतील प्रकाशने

भारतात पंधरा प्रमुख भाषा बोलल्या जातात व त्यात नऊ भाषांची स्वतंत्र अक्षरवळणे आहेत. या सर्व भाषांत आध्यात्मिक अन्‍न देणे खरेच आव्हानात्मक ठरले आहे. अगदी आरंभालाच म्हणजे १९१२ मध्ये बंधू रसेल यांनी पवित्र शास्त्रावरील पुस्तिकांचे हिन्दुस्तानी, गुजराथी, मल्याळम, मराठी, तेलगू आणि तामिळ या भाषांत भाषांतरीत करण्याची व्यवस्था केली होती. यात काही काळाने इतर आणखी भाषा समाविष्ठ झाल्या, या साहित्याचे मुद्रण बाहेरील देशात होऊन ते भारतात पाठविले जाई, १९६०च्या आरंभाला सरकारी आज्ञेनुसार कोणत्याही भारतीय भाषेतील प्रकाशनांना आयात करण्याची बंदी घातली गेली.

शाखा दप्तराला स्वतःची छपाई करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या शक्यता नव्हती त्यामुळे संस्थेने व्यापारी मुद्रकांसोबत करार केला. विशिष्ट पायनियरांना निवडून त्यांच्या स्थानिक क्षेत्रात प्रकाशन मुद्रणाची काळजी कशी घ्यावी याची तालीम दिली गेली. सध्या भारतात ११ वेगवेगळया ठिकाणी १६ भाषेत पवित्र शास्त्र साहित्याचे मुद्रण होत आहे यात द वॉचटावर मासिकाच्या ९ भाषेतील आवृत्त्याही समाविष्ठ आहेत. आता लवकरच मेप्स (संस्थेची बहुभाषीय इलेक्ट्रॉनिक फोटो मुद्रण व्यवस्था) यंत्रणा सुरु होत असल्यामुळे प्रकाशनांचे मुद्रण व आराखडा तयार केला जाईल व त्यामुळे पुष्कळ पायनियरांना एकत्रीकरणाच्या कामास अधिक वेळ देण्यासाठी मोकळे होता येईल.

८० वर्षांची फलप्राप्ती

पृथ्वीवरील लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक असणाऱ्‍या भारत या राष्ट्रात आणखी खूप कार्य व्हावयाचे बाकी आहे. आतापर्यंत सुवार्तेच्या प्रचाराकरवी केवळ ६.६ टक्के लोकसंख्येचाच संपर्क येऊ शकला. इतर राष्टांच्या तुलनेत भारतातील यहोवाच्या लोकांची वाढ मंद आहे. १,००० प्रचारकांचे शिखर ओलांडण्यास ५३ वर्षे लागली. तथापि, सुवार्तिक व स्थानिक बंधूंनी त्यांच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणेच कार्य करण्यात सातत्य व सहनशीलता दाखविली आहे. (यशया ६०:२२) आता गेल्या वर्षापेक्षा १० टक्के वाढीचा उच्चांक पाहून आम्हाला आनंद होत आहे. सध्या देशातील ३४० मंडळ्‌या व गट यातून ७,४१० प्रचारकांचा अहवाल प्राप्त होत आहे.

अशा या वाढीमुळे शाखा दप्तराच्या विस्ताराच्या खूणेचा संकेत मिळाला. आता पावेतो मुंबईत जे भारताचे शाखा दप्तर होते त्याचा विस्तार होणे अशक्य दिसले. या शहरात जागा मिळणे दुर्मिळ व मोठे खर्चिक होते. मुंबईच्या हवामानाचा प्रकार माणसाचे आयुष्यमान दहा वर्षांनी कमी करू शकतो असे म्हटले गेले. अशाप्रकारे १९७८ मध्ये लोणावळा या डोंगरी इलाख्यात एक जागा मिळाली. ही मुंबईच्या दक्षिण दिशेकडे असून येथे रस्ता व लोहमार्ग एकमेकांना भिडतात. २,००० फूट (६१० मीटर) उंचीवर असलेल्या या शहरात हवेचे कमी प्रदुषण आढळते.

सहा वर्षांचे काम

सुरुवातीच्या कामात भिंत बांधण्याचे समाविष्ठ होते व कित्येक ठिकाणी त्याची उंची १५ फूट होती. यामुळे जमिनीचे संरक्षण व डोंगर उतारावरील शेजारील लोकांच्या जमिनीची धूप टिकवून ठेवण्यास मदत झाली. बरेच खाचखळगे भरून काढावे लागले आणि जमीनीखाली अर्धवट वाढ झालेल्या जागा स्वच्छ कराव्या लागल्या ज्यात नाग व त्यासारख्या विषारी सापांचाहि सामना करून त्यांना हटवावे लागले. तात्पुरती राहण्याची जागा व कार्यालय उभे करावे याकरता तेथील उभ्या असणाऱ्‍या बंगल्याचे व इतर इमारतींचे नुतनीकरण करावे लागले.

व्यापारी कंत्राटदारांना काम सुपुर्द केले गेले तरीपण लायक बांधवांनी इमारतीच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्यात चांगले निरिक्षण केले. व शिवाय इतरांनीही वेळोवेळी हवी असणारी मदत देऊ केली. मिळकतीच्या आत रस्ता तयार करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने म्हटले की हे काम सहा महिन्यांनी घ्यावे कारण रस्त्याच्या कठीण पृष्ठभागावर सिंचन करण्यासाठी पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकत नव्हता. पण काम वेळेनुरूप व्हावे म्हणून जेव्हा सबंध शाखा कुटुंबियांनी दररोज सायंकाळी बादल्या भरभरून पाणी आणून ते तयार होणाऱ्‍या रस्त्यावर टाकले तेव्हा ते दृश्‍य बघण्यास किती विलोभनीय वाटत होते!

जमीन समतोल करणाऱ्‍या किंवा मातीचा ढीग दुसरीकडे नेऊन टाकणाऱ्‍या बुलडोझरचा आवाज येथे कधीच ऐकू आला नाही कारण भारतात बहुतेक कामे हातांनीच होतात. अशाप्रकारे काम सावकाश होत मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंतचे काम पूर्ण झाले. अगदी याच वेळेला सिमेंटचा भयकर तुटवडा जाणू लागला. पण हे आनंदाचे होते की वॉचटावर संस्थेच्या कोरिया येथील शाखेने १०,००० पोती सिमेंटची व्यवस्था केली ज्यामुळे योजिलेला सबंध प्रकल्प पूर्ण होऊ शकला. याप्रकारे १९८४ मध्ये शाखा दप्तराची नवी सुंदर वास्तु पुर्णपणे उभी राहिली—यहोवाच्या स्तुतीसाठी.

अंतिम परिणाम

संस्थेच्या ४.६ एकर (१.९ हेक्टर) जमिनीवर आता आठ इमारती उभ्या आहेत. शिवाय उतरणीवर केळी, आंबे, अंजीर व पपई यांची झाडे आणि फुलझाडे व झुडपे आहेत.

शाखेच्या इमारतीत दोन मजले व तळघर आहे. या तळघरात वाहने ठेवण्याची सोय व धुलाई केन्द्र आहे. खालच्या मजल्यावरील कारखान्याच्या जागेत तीन छोटी छपाई यंत्रे, तसेच कागद कापणी, जुपणी आणि शिलाई यंत्रे आहेत. याच मजल्यावर मेप्स कॉम्प्युटरची खोली असून प्रकाशनांचे गुदाम आहे. येथूनच प्रकाशनाची स्थानिकरित्या निर्मिती होते व ते ५६ इतर देशांना पाठविण्यात येते. दुसऱ्‍या मजल्यावर कार्यालये, ग्रंथालय व निवासी जागा आहेत.

नवे राज्य सभागृह मालकी हक्काच्या जमिनीवर समोरच्या कोपऱ्‍यावर आहे. कोपऱ्‍यावर साग लाकडाचे तावदान असणारे व्यासपीठ २५० बैठकीच्या सभागृहापुढे सामोरे आहे. नजीकच्या नूतनीकरण झालेल्या इमारतीत राहण्याची जागा, स्वयंपाक गृह आणि ३१ लोकांचे शाखा कुटुंब जेवू शकेल अशा जेवणाच्या खोलीची सोय आहे. यात मोकळी जागाहि शिल्लक आहे जी पुढील वाढीच्या गरजेसाठी ठेवलेली आहे.

खास घटना

तर यहोवाच्या मोलवान गोष्टींच्या ८० वर्षांच्या एकत्रीकरणानंतर जानेवारीतील त्या सुंदर दिवशी भारताच्या नव्या शाखा सोयीच्या वास्तुचे समर्पण झाले.

समर्पण कार्यक्रमात त्या ८० वर्षांच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला. इमारत बांधणीच्या कामातील लक्षवेधी अनुभव सांगण्यात आले. गुंटर कुन्झ या झोन देखरेख्यांनी आपल्या समर्पणाच्या भाषणात हे निरिक्षिले की यहोवाच्या लोकांनी गत पाच वर्षात जगव्याप्तपणे ३० टक्कयांची वाढ अनुभवली. पण त्यांना हे सांगण्यास आनंद वाटला की भारताने ३४ टक्के वाढ करून विक्रम नोंदविला. त्यांनी श्रोत्यांना स्मरण दिले की परिश्रम घेतल्यास भारताला आणखी पुढे जात राहता येईल.

यहोवाच्या आशीर्वादाचे प्रतीक पाहून सर्व उपस्थितांना भारावल्यासारखे झाले. भारतातील बांधवांचा परिश्रमाने काम करण्याचा निर्धार बनला आहे याकरवी आणखी पुष्कळ जणांना देवराज्याच्या सुवार्तेस प्रतिसाद देता यावा म्हणून मदत मिळू शकेल.

[२७ पानांवरील चित्रं]

एडविन स्किनर (उजवीकडून दूसरे) “हाऊस कार” सोबत

[२९ पानांवरील चित्रं]

मुंबईच्या दक्षिणेकडे असणारे नवे शाखा दप्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा