वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ३८ पृ. १७०-१७५
  • त्यांनी “आगीची शक्‍ती निकामी केली”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी “आगीची शक्‍ती निकामी केली”
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • त्याने स्वतःला अशुद्ध होऊ दिलं नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ३८ पृ. १७०-१७५

३८ तीन इब्री तरुण

ते धगधगत्या आगीलाही घाबरले नाहीत

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या या तीन तरुणांना जेव्हा अचानक परीक्षेला तोंड द्यावं लागलं, तेव्हा दानीएल आपल्यासोबत असता तर किती बरं झालं असतं, असं त्यांना नक्कीच वाटलं असेल. शेवटी तो त्यांचा चांगला मित्र होता आणि देवावर त्याचा जबरदस्त विश्‍वास होता. पण आता या तीन तरुणांचा, म्हणजे बाबेलच्या लोकांनी ज्यांना शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो अशी नावं दिली होती त्यांचा जीव धोक्यात होता तेव्हा दानीएल त्याच्यासोबत नव्हता.

त्याचं असं झालं, की नबुखद्‌नेस्सर राजाने एक भलीमोठी मूर्ती उभी केली होती. ती जवळपास नऊ मजली बिल्डींगइतकी उंच होती आणि तिची जाडी जवळपास ९ फूट (जवळजवळ ३ मी.) इतकी होती. या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी राजाने एक भव्य समारंभ आयोजित केला होता. आणि त्यासाठी त्याच्या सगळ्या अधिकाऱ्‍यांना उपस्थित राहायला सांगितलं होतं. त्यामुळे या तीन इब्री तरुणांनासुद्धा राजाची आज्ञा पाळून तिथे उपस्थित राहावं लागणार होतं.

घोषणा करणारा राजाच्या आज्ञा घोषित करू लागला, तेव्हा संपूर्ण जमाव शांतपणे ते ऐकत होता. त्याने म्हटलं, की सगळ्यात आधी संगीत वाजवलं जाईल. कदाचित देशभक्‍तीची भावना उत्तेजित करण्यासाठी हे केलं जाणार होतं. मग संगीत वाद्यांचा आवाज ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी ‘मूर्तीला दंडवत घालून तिची उपासना करायची होती.’ मग आता हे तीन तरुण काय करणार होते? कारण मूर्तिपूजा न करण्याबद्दल यहोवाने दिलेली आज्ञा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होती.—निर्ग. २०:४, ५.

लोकांच्या एका मोठ्या जमावासमोर जिवावर बेतेल अशी परीक्षा त्यांच्यावर आली. त्यांच्यावर मूर्तीची उपासना करायचा दबाव टाकण्यात आला

संगीत वाद्यं वाजवण्यात आली. आणि हा इशारा मिळताच लोक मूर्तीची उपासना करण्यासाठी जमिनीवर वाकून दंडवत घालू लागले. पण हे तीन तरुण मात्र तसेच उभे राहिले. साहजिकच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. मग या संधीचा फायदा घेऊन काही खास्दी लोकांनी या तीन यहुदी तरुणांवर आरोप केले आणि राजाकडे जाऊन त्यांची निंदा केली. ते राजाला म्हणाले: ‘महाराज, यांनी तुमचा अनादर केलाय. ते तुमच्या देवांची सेवा करत नाहीत, आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासनाही करत नाहीत.’ हे ऐकून राजाच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्यांनी खरंच तसं केलंय का ते तपासण्यासाठी राजाने त्यांना आपल्यासमोर आणायचा हुकूम दिला. पण त्यांनी काही बोलायच्या आतच राजाने त्यांना धमकावलं. तो त्यांना म्हणाला, की मी तुम्हाला आणखी एक संधी देतो आणि या वेळी जर तुम्ही आज्ञेप्रमाणे केलं नाही, तर “तुम्हाला लगेच धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जाईल.” त्याने त्यांना असंही धमकावलं की कोणताही देव तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

नबुखद्‌नेस्सर राजाने उभ्या केलेल्या एका सोन्याच्या एका भव्य मूर्तीला लोकांचा मोठा जमाव दंडवत घातल असताना हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या निडरपणे उभे आहेत. तीन शस्त्रधारी सैनिक त्यांच्या दिशेने येत आहेत.

पण हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांच्यापैकी कोणीही जराही डगमगला नाही. उलट ते राजाला म्हणाले: “हे राजा! . . . ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला त्या भट्टीतून आणि तुमच्या हातून वाचवू शकतो. आणि त्याने जरी आम्हाला वाचवलं नाही, तरी हे राजा! एवढं मात्र नक्की, की आम्ही तुमच्या देवांची आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासना करणार नाही.” हे ऐकून राजा आणखीनच संतापला आणि त्याने आगीची भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवायचा हुकूम दिला. मग त्या तिघांना बांधून त्या भट्टीत टाकण्यात आलं. भट्टी इतकी तापली होती, की जी माणसं या तीन इब्री तरुणांना तिथे घेऊन गेली तीच आगीच्या ज्वालांनी जळून मेली!

पण मग नबुखद्‌नेस्सर राजाला असं काहीतरी दिसलं ज्यामुळे त्याचा थरकापच उडाला! त्याने पाहिलं, की आगीच्या ज्वालांमध्ये तीन नाही तर चार माणसं होती. ती चार माणसं आगीत मोकळी फिरत होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्या केसालाही धक्का लागला नव्हता! चौथ्या माणसाबद्दल राजा चकीत होऊन म्हणाला, की तो तर “देवपुत्रासारखा दिसतोय.” मग नबुखद्‌नेस्सर भट्टीच्या दाराजवळ गेला आणि त्याने त्या तीन तरुणांना हाक मारून आगीतून बाहेर यायला सांगितलं.

तीन इब्री तरुण चकीत होऊन आगीच्या भट्टीत उभे आहेत. त्यांच्यासमोर यहोवाचा स्वर्गदूत उभा आहे आणि भट्टीच्या बाहेरून नबुखद्‌नेस्सर आणि त्याचे रक्षक आ वासून त्यांच्याकडे पाहत आहेत.

ते तीन तरुण आगीतून बाहेर आले तेव्हा लोकांना कसं वाटलं असेल याची कल्पना करा. ते आ वासून पाहतच राहिले असतील! कारण त्या तरुणांच्या शरीरावर आगीचा काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्यावरचा एक केसही जळाला नव्हता, त्यांच्या अंगावरचे कपडे जसेच्या तसे होते, आणि त्यांच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता. शिवाय ते आता मोकळे होते, बांधलेले नव्हते. हे पाहून महान नबुखद्‌नेस्सर राजा अवाक होऊन बघतच राहिला! खऱ्‍या देवाची आज्ञा मानणाऱ्‍या या तीन इब्री तरुणांची त्याने प्रशंसा केली. तो म्हणाला की “त्यांनी आपल्या देवावर भरवसा ठेवला. त्यांनी राजाची आज्ञा पाळली नाही. त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्‍या कोणत्याही देवाची सेवा किंवा उपासना करण्यापेक्षा, ते मरायला तयार झाले.”

त्या घमेंडी सम्राटाने असा आदेश दिला, की त्याच्या साम्राज्यातला जो कोणी यहोवाच्या विरोधात बोलेल, त्याला मारून टाकलं जाईल. तसंच, त्याने या तीन तरुणांना बाबेल प्रांतात आणखी मोठं पद दिलं. पण यहोवाने जे केले ते यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं. त्याने त्यांना आपल्या आठवणीत ठेवलं आणि तो त्यांना कधीच विसरला नाही. उदाहरणार्थ, पुढे बऱ्‍याच शतकांनंतर यहोवाने प्रेषित पौलला असं लिहायची प्रेरणा दिली, की त्यांच्या जबरदस्त विश्‍वासाने त्यांनी “आगीची शक्‍ती निकामी केली.” हे लिहिताना पौलच्या मनात नक्कीच हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या हे तीन धाडसी तरुण असतील.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • दानीएल ३:१-३०

  • इब्री लोकांना ११:३३, ३४

चर्चेसाठी:

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांनी कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. उत्खननात सापडलेल्या गोष्टींवरून कसं कळतं, की दानीएलच्या तिसऱ्‍या अध्यायात दिलेला अहवाल खरा आहे? (टेहळणी बुरूज२३.०७ ३१) १

    © The Trustees of the British Museum. Licensed under CC BY-NC-SA 4.0. Source. Modifications: Box added

    चित्र १: नबुखद्‌नेस्सर राजाचं नाव असलेली एक वीट

  2. २. तीन इब्री तरुणांना बाबेलच्या लोकांनी जी नावं दिली होती त्यांचा काय अर्थ असावा? (डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ३ ¶१४-wcgr)

  3. ३. नबुखद्‌नेस्सर खूप धार्मिक होता हे कशावरून कळतं? (डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ५ ¶३-wcgr) २

    नबुखद्‌नेस्सर राजा आपल्या राजमहालाच्या छतावर उभा आहे आणि दूरवर त्याने स्वतः बांधलेल्या झिगुरातकडे अभिमानाने पाहत आहे.

    चित्र २: नबुखद्‌नेस्सरने बाबेलमधल्या बऱ्‍याच देवी-देवतांसाठी मंदिर बांधली आणि त्यांची दुरुस्ती केली

  4. ४. नबुखद्‌नेस्सर राजाच्या आज्ञेवरून जे लोक एकत्र आले होते ते ‘सर्व राष्ट्रांतले आणि वेगवेगळी भाषा बोलणारे लोक’ होते आणि त्यांचे स्वतःचे देव होते. तरीसुद्धा ते नबुखद्‌नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीची उपासना करायला तयार का झाले असतील? (दानी. ३:७; डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ५ ¶१०-wcgr)

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • खाण्यापिण्याच्या गोष्टींवरून जेव्हा तीन इब्री तरुणांची परीक्षा झाली आणि नंतर त्यांचा जीव धोक्यात होता तेव्हाही ते यहोवाला विश्‍वासू राहिले. यावरून छोट्या वाटणाऱ्‍या गोष्टींमध्येसुद्धा यहोवाला विश्‍वासू राहण्याबद्दल आपण काय शिकतो? (लूक १६:१०) ३

    कोलाज: अशा तीन परिस्थिती, ज्यांत आपण छोट्या वाटणाऱ्‍या गोष्टींमध्येही विश्‍वासू असल्याचं दाखवू शकतो. या परिस्थिती पुढच्या चित्रांमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. एक बहीण आपल्या विश्‍वासाला शोभेल अशा कपड्यांची ऑनलाईन खरेदी करत आहे. तिच्या लॅपटॉपच्या शेजारी फॅशनची काही मासिकं आहेत. एक भाऊ सकाळी ७:२९ ला कामावर येतो. त्याच्याबरोबरचे इतर जण आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहत आहेत. एक बहीण कार चालवण्याआधी सीट बेल्ट लावत आहे.

    चित्र ३

  • आपला छळ होतो तेव्हा तीन इब्री तरुणांनी दाखवलेल्या या गुणांच्या बाबतीत आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो? (दानी. ३:१६-१८)

    • नम्र असणं

    • आदर दाखवणं

    • एकनिष्ठ राहणं

  • आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही या तीन तरुणांच्या धैर्याचं अनुकरण करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?

आणखी शिका

राष्ट्रभक्‍तीच्या एखाद्या कार्यक्रमात एक ख्रिस्ती व्यक्‍ती आदराने वागण्यासोबतच तटस्थ कशी राहू शकते?

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तटस्थ राहा (४:२५)

हा अहवाल डोळ्यांसमोर उभा करा आणि त्यातून आणखी काय शिकायला मिळतं याचा विचार करा.

“धगधगत्या आगीच्या भट्टीतून वाचवण्यात आलं” (वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”-wcgr)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा