वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १३ पृ. १६
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभावी प्रस्तावना
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १३ पृ. १६

अभ्यास १३

व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

उल्लेखीत शास्त्रचन

नीतिसूत्रे ३:२१

सारांश: श्रोत्यांना हे समजायला मदत करा, की तुम्ही सांगत असलेल्या विषयाचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो. आणि ते आपल्या जीवनात शिकत असलेल्या गोष्टींचं पालन कसं करू शकतात तेही त्यांना दाखवा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांचा विचार करा. तुम्ही सांगत असलेली माहिती त्यांनी का ऐकली पाहिजे यावर विचार करा. आणि त्यांना कोणत्या माहितीचा जास्त फायदा होऊ शकतो यावरही विचार करा.

  • श्रोत्यांनी काय केलं पाहिजे हे तुमच्या संपूर्ण सादरतेत सांगत राहा. तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हापासूनच श्रोत्यांना ‘ही माहिती माझ्यासाठीच आहे,’ असं वाटलं पाहिजे. आणि मग प्रत्येक मुख्य मुद्दा समजावून सांगताना तो कसा लागू करायचा ते दाखवा. लागू करण्यासाठी विशिष्ट मुद्दे सांगा.

    व्यावहारिक सूचना

    बायबलमधील तत्त्वांचं पालन कसं करायचं ते प्रेमळपणे सांगा. त्यांना नेमकं कसं वाटतं हे तुम्हाला समजतंय अशा पद्धतीने बोला. त्यांना दोषी वाटेल असं बोलण्याऐवजी, यहोवावरील त्यांचं प्रेम आणि विश्‍वास वाढवा. ते योग्य निर्णय घेतील आणि दिलेला सल्ला लागू करतील अशी खातरी व्यक्‍त करा.

सेवेत

प्रचाराला जाण्याआधी ठळक बातम्या कोणत्या आहेत आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या विषयांवर बोलायला आवडेल यावर विचार करा. पण घरमालकासमोर असताना तुम्हाला विषय बदलावा लागला तर व्यावहारिक रीत्या लगेच विषय बदला. समोरच्या व्यक्‍तीला कोणत्या चिंता आहेत, तिला कोणत्या गोष्टीत आवड आहे हे माहीत करून घेण्यासाठी व्यवहारकुशलतेने प्रश्‍नांचा उपयोग करा. आणि मग त्याचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐका व त्यानुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा