अभ्यास ९
दृश्य साधनांचा योग्य वापर
उत्पत्ति १५:५
सारांश: तुम्ही शिकवत असलेला महत्त्वाचा मुद्दा आणखी स्पष्ट व लक्षात राहायला सोपा करण्याकरता दृश्य साधनांचा वापर करा.
हे कसं कराल:
तुमची शिकवण्याची पद्धत प्रभावी करण्यासाठी दृश्य साधनांचा उपयोग करा. बारीक-सारीक नव्हे तर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जोर देण्यासाठी चित्रं, आकृती, नकाशे, समयरेषा किंवा इतर दृश्य साधनांचा उपयोग करा. श्रोत्यांना तुम्ही वापरलेलं दृश्य साधनच नव्हे, तर तुम्ही जो मुद्दा शिकवला होता तोही लक्षात राहिला पाहिजे.
दृश्य साधन श्रोत्यांना नीट दिसत आहे याची खातरी करा.