वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास २ पृ. ५
  • रोजच्या बोलण्याची शैली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रोजच्या बोलण्याची शैली
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • खातरीने बोला
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रेम व सहानुभूती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास २ पृ. ५

अभ्यास २

रोजच्या बोलण्याची शैली

उल्लेखीत शास्त्रवचन

२ करिंथकर २:१७

सारांश: आपण एरवी जसं बोलतो तसं आणि प्रामाणिकपणे बोला. यावरून, तुम्ही बोलत असलेल्या विषयाबद्दल आणि लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे समोरच्याला समजलं पाहिजे.

हे कसं कराल:

  • प्रार्थना करून चांगली तयारी करा. बोलत असताना स्वतःवर नाही तर संदेशावर लक्ष केंद्रित करायला मदत मिळावी म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला जे मुख्य मुद्दे सांगायचे आहेत ते आधी तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजेत. छापलेल्या माहितीमधील शब्द न्‌ शब्द वाचून दाखवण्याऐवजी स्वतःच्या शब्दांत ते सांगा.

    व्यावहारिक सूचना

    तुम्ही बायबलमधून किंवा एखाद्या प्रकाशनातून काही वाचून दाखवणार असाल, तर आधीच तो भाग चांगल्या प्रकारे वाचा. यामुळे तुम्ही तो न अडखळता स्पष्टपणे वाचू शकाल. तुम्ही दुसऱ्‍याचे शब्द वाचून दाखवणार असाल तर त्यात भावना ओतून वाचा, पण तुमचं वाचन नाटकी वाटणार नाही याची खबरदारी घ्या.

  • मनापासून बोला. श्रोत्यांनी तुमचा संदेश का ऐकला पाहिजे याचा विचार करा. त्यांच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. तुम्ही जसं उभं राहता, तुमचे हावभाव व चेहऱ्‍यावरील भाव यांवरून तुमचं बोलणं प्रामाणिक व मैत्रीपूर्ण आहे हे दिसून येईल.

    व्यावहारिक सूचना

    रोजच्या शैलीत बोलण्याचा अर्थ हा होत नाही, की आपण कसंही बोललं पाहिजे. तुमच्या बोलण्यात आदर दिसला पाहिजे. बोलताना स्पष्ट बोला व योग्य व्याकरणाचा उपयोग करा.

  • ऐकणाऱ्‍यांकडे बघून बोला. समोरच्या व्यक्‍तीच्या नजरेला नजर भिडवून बोलणं जर चुकीचं समजलं जात नसेल तर तशा प्रकारे बोला. मंडळीत भाषण देताना सर्व श्रोत्यांवर नजर फिरवण्याऐवजी, एका वेळी श्रोत्यांमध्ये बसलेल्या कोणा एकाकडेच बघून बोला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा