अध्याय ८
देव दुःखाला अनुमती का देतो?
१, २. मानवी दुःखाबद्दल लोकांच्या सहसा कशा प्रतिक्रिया दिसतात?
अरिष्टे येतात व त्यामुळे मालमत्तेचे नुकसान होते, लोकांचे जीव जातात तेव्हा या भयंकर गोष्टी का घडतात हे बहुतेकांना कळत नाही. इतरांना त्यांचे प्रमाण, क्रुरता, भरमसाट गुन्हेगारी व हिंसाचार यामुळे त्रास होतो. तुम्हाला देखील याचे नवल वाटले असावे की, ‘देव दुःखाला अनुमती का देतो?’
२ पुष्कळांना या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी देवावरचा त्यांचा विश्वास गमावला आहे. त्याला मानवजातीबद्दल रस नाही असे त्यांना वाटते. दुःख हे जीवनाचाच एक भाग आहे असे समजणारे, याद्वारे बरेच दुःखित होतात आणि मानवी समाजातील सर्व दुःखांचा ठपका देवावर ठेवतात. तुम्हालाही असेच वाटत असल्यास, बायबलने या प्रकरणासंबंधाने केलेल्या विधानाबद्दल जाणून घेण्याची नक्कीच आस्था वाटेल.
दुःख देवाकडून नाही
३, ४. वाईट गोष्टी व दुःख यहोवाकडून नाही याची आपल्याला खात्री का होऊ शकते?
३ बायबल याची हमी देते की, आपल्या सभोवताली आढळणारे दुःख यहोवा देवाने आणलेले नाही. उदाहरणार्थ, ख्रिस्ती शिष्य याकोब याने लिहिले: “कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात घातले,’ असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही; आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.” (याकोब १:१३) हे असे आहे तर, मानवजातीला पछाडून टाकणारा विविध त्रास त्याने घडवून आणला नसावा हे नक्की. लोकांनी स्वर्गातील जीवनाला पात्र ठरावे याकरता तो त्यांच्यावर विश्वास, सहनशीलता किंवा शक्ती याबद्दलच्या परीक्षा आणत नाही. शिवाय तो लोकांना, कल्पित पूर्वजन्मातील वाईट कृत्यांबद्दल त्रास देखील देत नाही.—रोमकर ६:७.
४ याशिवाय, देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या नावात जी भयंकर कृत्ये आचरण्यात आली त्यांना या दोहोंपैकी कोणाची संमती होती असे बायबलमध्ये कोठेच दर्शवले नाही. जे त्यांची सेवा करण्याचा दावा करतात, पण फसवेगिरी व बनवाबनवी, हत्या व लुटालुट यात भाग घेतात आणि लोकांवर दुःख आणण्याजोगी इतर बरीच कामे करतात अशांसोबत देव आणि ख्रिस्ताचे काहीही कर्तव्य नाही. खरे म्हणजे, “दुर्जनांचा मार्ग परमेश्वराला वीट आणितो.” देव “दुर्जनांपासून दूर राहतो.”—नीतिसूत्रे १५:९, २९.
५. यहोवाचे काही गुण कोणते आहेत आणि त्याला त्याच्या निर्मितीबद्दल कसे वाटते?
५ बायबल यहोवाचे वर्णन करताना तो, “फार कनवाळू व दयाळू आहे,” असे म्हणते. (याकोब ५:११) ते जाहीर करते की, “परमेश्वराला न्याय प्रिय आहे.” (स्तोत्र ३७:२८; यशया ६१:८) तो काही खुनशी नाही. तो त्याच्या प्राणिमात्रांची दयाळूपणे काळजी घेतो आणि त्यांच्या कल्याणासाठी जे सर्वोत्तम आहे ते सर्व त्यांना पुरवतो. (प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७) पृथ्वीवर जीवनाच्या सुरवातीपासून यहोवाने हेच केलेले आहे.
परिपूर्ण सुरवात
६. मानवजातीच्या आरंभाच्या इतिहासामधील परिस्थितींचा काही दंतकथा कसा अप्रत्यक्ष उल्लेख करतात?
६ वेदना व दुःख पाहण्याचा व अनुभवण्याचा आम्हा सर्वांनाच सराव झालेला आहे. त्यामुळे दुःखाविना एखाद्या काळाची कल्पना करणे कठीण वाटेल; तथापि, मानवी इतिहासाच्या आरंभाला अगदी असेच होते. काही देशाच्या दंतकथांसुद्धा अशा या आनंदी सुरवातीबद्दलची समांतरता दाखवतात. ग्रीक दंतकथेमध्ये ‘मानवाच्या पाच युगांपैकी’ पहिल्या युगाला “सुवर्ण युग” म्हटलेले आहे. त्यामध्ये लोक कष्ट, वेदना आणि वृद्धापकाळाच्या विकृती यापासून मुक्त असणाऱ्या आनंदी जीवनाचा आस्वाद घेत होते. चिनी लोक म्हणतात की, दंतकथेतील पिवळा सम्राट (व्हांग-डी) याच्या काळी लोक शांतीत राहात होते, त्यांचे हवामान परिस्थितीशी व जंगली श्वापदे यांच्यासोबत सख्य होते. मानवजातीच्या इतिहासाच्या आरंभाला आनंद व परिपूर्णतेचा काळ होता हे पर्शियन, इजिप्तशीयन, तिबेटी, पेरूमधील आणि मेक्सिकोमधील लोकांच्या दंतकथा सांगतात.
७. देवाने पृथ्वी व मानवजातीची निर्मिती का केली?
७ राष्ट्रांतील दंतकथा ह्या मानवी इतिहासाचे सर्वात जुने लिखाण, बायबल, याचे केवळ पडसाद आहेत. ते आम्हाला सांगते की, देवाने पहिल्या मानवी जोडीला, आदाम व हव्वेला, एदेन बाग म्हटलेल्या परादीसमध्ये ठेवले; त्यांना आज्ञा दिली: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२८) आपल्या पहिल्या पालकांनी पूर्णत्व अनुभवले होते आणि सबंध पृथ्वी परादीस झालेली व ती परिपूर्ण मानवी कुटुंबांनी भरून गेलेली आणि दीर्घकालीन शांती व आनंदाचा आस्वाद घेत असलेली पाहण्याचे भवितव्य त्यांच्यापुढे होते. देवाचा पृथ्वी व मानवजात निर्माण करण्यामागील हाच उद्देश होता.—यशया ४५:१८.
द्वेषपूर्ण आव्हान
८. आदाम व हव्वा यांनी कोणती आज्ञा मानावी अशी अपेक्षा बाळगण्यात आली होती, पण काय घडले?
८ देवाच्या मर्जीत राहाण्यासाठी आदाम व हव्वेला “बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” खाण्यापासून दूर राहायचे होते. (उत्पत्ति २:१६, १७) त्यांनी देवाची आज्ञा मानली असती तर मानवी जीवनाला विद्रुप करणारे दुःख दिसलेच नसते. त्यांनी यहोवा देवाबद्दल आपली प्रीती आणि त्याच्याबद्दल वाटणारी निष्ठा त्याची आज्ञा मानून दाखवली असती. (१ योहान ५:३) पण आपल्याला ६ व्या अध्यायात शिकायला मिळाल्याप्रमाणे हे सर्व याप्रमाणे घडले नाही. सैतानाच्या आर्जवामुळे हव्वेने त्या झाडाचे फळ काढून खाल्ले. नंतर, आदाम देखील ते मना केलेले फळ खाण्यात सामील झाला.
९. यहोवाचा समावेश असणारा कोणता वादविषय सैतानाने सामोरा आणला?
९ जे घडले त्यामागील गंभीरता तुम्हाला दिसते का? येथे सैतान यहोवाच्या परात्पर या पदावर हल्ला करीत होता. “तुम्ही खरोखर मरणार नाही,” असे म्हणण्याद्वारे, दियाबल “तू खास मरशील,” या देवाच्या विधानाचे खंडण करीत होता. सैतानाच्या त्यापुढील शब्दांनी असे भासवले की, यहोवा आदाम व हव्वेला देवासारखे बनण्याच्या शक्यतेपासून अजाण ठेवू इच्छित होता व बरे व वाईट ठरवण्यामध्ये त्याची काही गरज नाही. या कारणामुळे, सैतानाच्या आव्हानाने यहोवाचा सार्वभौम सत्ताधारी असण्याचा हक्क व वैधपणा याबद्दल प्रश्न उपस्थित केला.—उत्पत्ति २:१७; ३:१-६.
१०. सैतानाने मानवांबद्दल काय अप्रत्यक्षपणे सुचवले?
१० दियाबल सैतानाने आणखी असे अप्रत्यक्षपणे सुचवले की, देवाचे आज्ञापालन करणे जोपर्यंत आपल्या लाभाचे आहे तोपर्यंत लोक यहोवाला आज्ञाधारक राहतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे येथे त्याने मानवाची सचोटी देखील प्रश्नार्थक बनवली. सैतानाने दाव्याने म्हटले की, कोणीही माणूस देवाला स्वेच्छेने निष्ठावंत राहू शकणार नाही. सैतानाचा हा द्वेषपूर्ण दावा बायबलमधील ईयोबाच्या वृत्तान्तात अगदी स्पष्टपणे प्रकट होतो. ईयोब हा यहोवाचा विश्वासू सेवक होता व त्याला सा. यु. पूर्व १६०० च्या आधी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. तुम्ही ईयोबाच्या पुस्तकातील पहिल्या दोन अध्यायांचे वाचन केल्यास तुम्हाला मानवी दुःखाचे कारण व देवाने त्याला का अनुमती दिली त्याबद्दलची समज मिळू शकते.
११. ईयोब कशाप्रकारचा गृहस्थ होता, पण सैतानाने त्याच्यावर कोणता आरोप केला?
११ ‘सात्विक व निर्दोष’ असणारा ईयोब सैतानाच्या हल्ल्यामध्ये आला. प्रथम, सैतानाने “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो?” असा प्रश्न करून ईयोबावर वाईट हेतूंचा ठपका ठेवला. त्यानंतर, यहोवाने ईयोबाला संरक्षण व आशीर्वाद देऊन त्याची सचोटी विकत घेतली असा आरोप करून सैतानाने देव व ईयोब या दोघांची अगदी धूर्तपणे नालस्ती केली. आता सैतानाने यहोवाला आव्हान केले: “तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—ईयोब १:८-११.
१२. (अ) देवाने सैतानाला ईयोबाची परीक्षा घेण्याकरता अनुमती दिली तरच कोणत्या प्रश्नांना उत्तरे मिळणार होती? (ब) ईयोबाच्या परीक्षेचा कोणता परिणाम घडला?
१२ देवापासून सर्व चांगले मिळाले म्हणून ईयोब यहोवाची सेवा करीत होता का? ईयोबाची सत्त्वनिष्ठा परीक्षेत टिकून राहू शकेल का? आणि यहोवाला आपल्या सेवकांवर परीक्षा येऊ देण्याची परवानगी देण्याइतका पुरेसा आत्मविश्वास होता का? यहोवाने सैतानाला अत्यंत कठीण परीक्षा घेऊ देण्याची मुभा दिल्यास या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळणार होती. ईयोबाच्या पुस्तकात वर्णिण्यात आलेली आणि देवाने मुभा दिलेल्या परीक्षेमध्ये ईयोबाने दाखवलेल्या विश्वासू मार्गाक्रमणामुळे यहोवाची नीतीमत्ता आणि मानवाची सत्त्वनिष्ठा यांचा पूर्ण स्वरूपाचा विजय झाल्याचे सिद्ध झाले.—ईयोब ४२:१, २, १२.
१३. एदेनमध्ये व ईयोबाच्या बाबतीत जे घडले त्यामध्ये आम्ही कसे गोवलेलो आहोत?
१३ तथापि, एदेन बागेत आणि ईयोबाच्या बाबतीत जे घडले त्याची खोल अर्थसूचकता आहे. सैतानाने सामोऱ्या आणलेल्या वादविषयात आज आम्हासहित सर्व मानवजातीचा समावेश आहे. देवाच्या नावाची निंदा करण्यात आली होती आणि त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले होते. देवाकडील निर्मिती, मानव, याच्याही सरळतेबद्दल प्रश्न उभा केला गेला. या वादविषयांचे निरसन होण्यास हवे होते.
वादविषयांना कसे मिटवावे
१४. द्वेषपूर्ण आव्हानाला सामोरे जाताना आरोप ठेवण्यात आलेली व्यक्ती काय करू शकते?
१४ आपण एक उदाहरण घेऊ या. समजा, तुम्ही प्रेमळ पालक आहात, तुम्हाला मुले आहेत आणि तुमचे कुटुंब आनंदी आहे. समजा, तुमच्या शेजाऱ्याने तुम्ही वाईट पालक आहात असा आरोप लावून लबाड्या पसरवल्या. तुमच्या मुलांची तुम्हावर प्रीती नसून ती केवळ दुसरा चांगला पर्याय नाही म्हणून तुम्हासोबत राहात आहेत आणि कोणीतरी त्यांना घराबाहेर पडण्याचा एखादा मार्ग दाखवल्यास ते तुम्हाला सोडून जातील असे या शेजाऱ्याने म्हटले तर काय? ‘काय ही थट्टा!’ असेच तुम्ही म्हणाल. ते खरे, पण ते तुम्हाला कसे सिद्ध करता येईल? काही पालकांना राग येऊन ते नाही ते करून बसतील. पण हा हिंसाचारी प्रतिसाद इतर समस्या तर निर्माण करीलच, पण तो त्या लबाड्यांना अधिक आधार देईल. त्यामुळे, अशा समस्येचे निरसन करण्याचा समाधानकारक मार्ग म्हणजे एकतर त्या निंदकाला त्याचा दावा सिद्ध करून दाखवण्यास लावणे आणि तुमच्या मुलांना, ती तुम्हावर जिवापाड प्रेम करीत आहेत ही साक्ष देण्यास लावणे हा होय.
१५. सैतानाच्या आव्हानाशी यहोवाने कसल्या प्रकारचा व्यवहार राखणे पसंद केले?
१५ यहोवा प्रेमळ पालकासारखा आहे. आदाम व हव्वा यांना मुलांसारखे समजता येईल आणि सैतान त्या लबाड शेजाऱ्याच्या भूमिकेत अगदी बरोबर बसतो. देवाने सैतान आणि आदाम व हव्वा यांना लगेच नष्ट केले नाही, तर या अपराध्यांना काही काळ जगू देण्याची अनुमती दिली. यामुळे आमच्या पहिल्या पालकांना मानवी कुटुंब प्रस्थापण्याची आणि दियाबलाला त्याचा दावा खरा करून दाखवण्याची मुभा दिली गेली व याद्वारे वादविषय निकालात काढला जाऊ शकत होता. तथापि, देवाला आधीपासून हे माहीत होते की, काही लोक त्याला निष्ठावंत राहतील आणि त्याद्वारे ते सैतानाला लबाड ठरवतील. जे यहोवावर प्रेम करतात अशांना तो आशीर्वाद देतो व त्यांची मदत करतो याबद्दल आम्ही केवढे कृतज्ञ आहोत!—२ इतिहास १६:९; नीतिसूत्रे १५:३.
काय सिद्ध झाले?
१६. हे जग सैतानाला वश कसे झाले?
१६ मानवजातीवर वर्चस्व राखून आपल्या योजना साध्य करण्यासाठी सैतानाला मानवी इतिहासातील जवळजवळ सर्व काळात आपला हात मोकळेपणाने वापरता येत होता. इतर अनेक गोष्टींमध्ये, त्याने राजकारणी सत्ताधिशांवर आपला जम बसवला आणि यहोवापेक्षा सैतानाला धूर्तपणे भक्ती देणाऱ्या धर्मांना विकसित केले. अशाप्रकारे, दियाबल “या युगाचा देव” बनला; त्याला “या जगाचा अधिकारी” असे देखील म्हणण्यात आले. (२ करिंथकर ४:४; योहान १२:३१) खरेच, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) मग, याचा अर्थ, सर्व मानवजातीला यहोवा देवापासून दूर नेईन हा दावा सैतानाने खरा करून दाखवला, असा आहे का? मुळीच नाही! सैतानाला अस्तित्वात राहण्याची मुभा दिली असली तरी यहोवा आपला संकल्प पुरा करीत राहिला. तर मग, बायबल, देवाने दुष्टाईला दिलेल्या अनुमतीबद्दल काय प्रकट करते?
१७. दुष्टाई व दुःखाच्या कारणांबद्दल आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?
१७ दुष्टाई व दु:ख यांना यहोवा कारणीभूत नाही. सैतान हा या जगाचा अधिपती व या व्यवस्थीकरणाचा देव असल्यामुळे तो व त्याचे समर्थक मानवी समाजातील सध्याच्या सर्व परिस्थितींबद्दल तसेच मानवजातीने जी दैन्यावस्था सहन केली आहे त्याबद्दल जबाबदार आहेत. ह्या त्रासाला देव जबाबदार आहे असे कोणीही योग्यपणाने म्हणू शकत नाही.—रोमकर ९:१४.
१८. यहोवाने दुष्टाई व दुःख यांना दिलेल्या अनुमतीने, देवापासून स्वतंत्र होण्याच्या कल्पनेच्या बाबतीत काय सिद्ध केले?
१८ यहोवाने दुष्टाई व दुःख यांना दिलेल्या अनुमतीने देवापासून स्वतंत्र होण्यामुळे चांगले जग आणता आले नाही हे सिद्ध करून दाखवले. इतिहास एकामागोमाग एका विपत्तीने ग्रासलेला आहे हे अमान्य करता येणार नाही. याचे कारण हे की, लोकांनी स्वतःचा स्वैराचारी मार्ग अनुसरण्याची निवड केली व त्यांनी देवाचे वचन व त्याची इच्छा यांना कोणत्याही प्रकारे खरा आदर दाखवला नाही. यहोवाच्या प्राचीन लोकांनी व त्यांच्या नेत्यांनी अविश्वासू बनून ‘आपला मार्ग’ अनुसरला व देवाचे वचन धिक्कारले तेव्हा परिणाम मोठे घातक बनले. देवाने त्याच्या यिर्मया संदेष्ट्याद्वारे त्यांना म्हटले: “शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारितात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार?” (यिर्मया ८:५, ६, ९) यहोवाच्या दर्जांचे अनुकरण करण्यात अपयशी झाल्यामुळे सर्वसाधारण मानवजात ही जणू सुकाणू नसलेल्या व वादळी समुद्रात हेलकावे खाणाऱ्या जहाजाप्रमाणे बनली आहे.
१९. सैतान सर्व लोकांना देवाविरुद्ध बहकवू शकत नाही याचा कोणता पुरावा आहे?
१९ देवाने दुष्टाई व दुःख यांना दिलेल्या अनुमतीने हे देखील सिद्ध केले की, सैतानाला सर्व मानवजातीला यहोवापासून दूर करण्यामध्ये यश मिळालेले नाही. कितीही मोहपाश आले व कितीही विपत्ती आल्या तरी देवाला विश्वासू राहणारे कोणी ना कोणी होतेच असे इतिहास दाखवतो. शतकांच्या कालावधीत, यहोवाने त्याच्या सेवकांखातर स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन केले आणि त्याचे नाव सबंध पृथ्वीवर घोषित करण्यात आले. (निर्गम ९:१६; १ शमुवेल १२:२२) इब्रीयांस पत्रामध्ये ११ व्या अध्यायात हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम व मोशेसहित विश्वासू जनांची एक यादीच दिलेली आहे. इब्रीयांस १२:१ यांना ‘साक्षीरूपी मेघ’ असे म्हणते. ते यहोवावरील अटळ विश्वासाची उदाहरणे होत. आधुनिक काळात सुद्धा अनेकांनी देवास अतूट सत्त्वनिष्ठा दाखवावी म्हणून आपले जीवन दिले. त्यांचा विश्वास व प्रेम याद्वारे यांनी हे निर्णायकपणे सिद्ध केले की, सैतान सर्व लोकांना देवाविरुद्ध बहकवू शकत नाही.
२०. यहोवाने दुष्टता व दुःख यांना चालू राहण्याची मुभा देण्याद्वारे देव व मानवजातीबद्दल काय सिद्ध झाले?
२० शेवटी, यहोवाने दुष्टता व दुःख यांना दिलेल्या अनुमतीने मानवजातीच्या चिरकालिक आशीर्वाद व आनंदाकरता केवळ निर्माणकर्ता, यहोवालाच तिच्यावर आधिपत्य गाजवण्याची शक्ती व हक्क आहे याचा पुरावा दिला. शतकानुशतके मानवजातीने वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारांचा प्रयत्न करून पाहिला. पण काय परिणाम दिसला? आज राष्ट्रांना भेडसावत असलेल्या गुंतागुंतीच्या समस्या व अडचणी बायबलने स्पष्टपणे उल्लेखिलेल्या गोष्टींचा उघड व भरपूर प्रमाणातील पुरावा आहे की, “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) यहोवाच केवळ आमच्या सुटकेकरता धावून येऊ शकतो आणि त्याचा मूळ उद्देश पूर्ण करू शकतो. हे तो कसे व केव्हा करणार?
२१. सैतानाला काय केले जाईल व ते करण्याकरता कोणाला वापरण्यात येईल?
२१ सैतानाच्या योजनेला आदाम व हव्वा बळी पडल्यानंतर लगेच देवाने तारणाच्या माध्यमाबद्दलचा स्वतःचा संकल्प जाहीर केला. यहोवाने सैतानाबद्दल हे घोषित केले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टांच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) त्या घोषणेने सैतानाला त्याची दुष्ट कृत्ये सर्वकाळाकरता आचरण्याची मुभा मिळणार नाही अशी हमी दिली. मशीही राज्याचा राजा व वचनदत्त संतान, येशू ख्रिस्त, ‘सैतानाचे डोके फोडील.’ होय, येशू बंडखोर सैतानाला “लवकरच” चिरडून टाकील!—रोमकर १६:२०.
तुम्ही काय कराल?
२२. (अ) तुम्ही कोणत्या प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे? (ब) देवाला विश्वासू राहणाऱ्यांवर सैतान आपला क्रोध व्यक्त करीत असला तरी त्यांना कशाची खात्री बाळगता येईल?
२२ संबंधित वादविषयांची समज मिळाल्यामुळे आता तुम्ही कोणाच्या बाजूला उभे राहाल? तुम्ही यहोवाचे निष्ठावंत समर्थक आहात हे आपल्या कृतींद्वारे सिद्ध करणार का? सैतानाला स्वतःचा काळ थोडा आहे हे माहीत असल्यामुळे तो, देवास सत्त्वनिष्ठा दाखवण्याची इच्छा धरणाऱ्यांवर आपला क्रोध व्यक्त करण्यासाठी होता होईल ते सर्वकाही करील. (प्रकटीकरण १२:१२) परंतु, तुम्ही मदतीकरता देवाकडे पाहू शकता, कारण “भक्तिमान् लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) तुम्ही सहन करू शकता त्यापेक्षा अधिक परीक्षा तो तुम्हावर येऊ देणार नाही आणि तो तुम्हाला असा मार्ग तयार करून देईल की ज्यामुळे तुम्हाला त्या परीक्षेला सहन करता येईल.—१ करिंथकर १०:१३.
२३. आम्ही कशाकडे आत्मविश्वासाने पाहू शकतो?
२३ यास्तव, आपण, राजा येशू ख्रिस्त, सैतान व त्याच्या अनुयायांविरुद्ध कृती आचरील त्या काळाकडे आत्मविश्वासाने बघू या. (प्रकटीकरण २०:१-३) मानवजातीने अनुभवलेला सर्व अनर्थ व गोंधळाला जबाबदार असणाऱ्या सर्वांना येशू काढून टाकील. तोपर्यंत, दुःखाचा एक खास यातनामय प्रकार, आमच्या प्रियजनांना मृत्यूमध्ये गमावणे हा आहे. त्यांचे काय होते याबद्दल पुढील अध्यायात वाचा.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
यहोवा मानवी दुःख देत नाही हे आम्हाला कसे कळते?
सैतानाने एदेनात निर्माण केलेले व ईयोबाच्या काळात स्पष्ट झालेले कोणकोणते वादविषय होते?
देवाने दुःखाला दिलेल्या अनुमतीने काय सिद्ध केले?