गीत २६ (२१२)
यहोवाला धन्यवाद
१. आभार याहला देऊ प्रतिदिन.
देतसे प्रकाश मौल्यवान.
दिलास प्रार्थनेचा बहुमान,
चिंता तुजपाशी ये घेऊन.
२. आभार याहला त्याच्या पुत्रासाठी.
अधोलोक नि मृत्यू, तो जिंकी.
तुझी इच्छा करण्या दे मार्गदर्शन,
देसी हात करण्या व्रत पूर्ण.
३. आभार याहला या बंधुत्वासाठी.
सत्शील मिळती तेथे साथी.
देसी आम्हा तव शक्ती सक्रीय,
मार्गस्थास आत्मा करी साह्य.
४. आभार याहला आम्हा दे बहुमान.
नामप्रचार करण्या महान.
जगाची दुःखे झणी मिटतील,
आशीष ‘राज्या’चे टिकतील.