गीत २७ (२२१)
तरुणांनो, त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा!
१. बाल शमुवेल शिलोस गेला.
करण्या ईशसेवा तेथे वाढला.
इस्राएलात संदेष्टा जाहला.
हो नासोरी गौरव दे नामाला.
एलीचे पुत्र द्वाड अती होते.
बाळास भ्रष्ट करतील काते?
विश्वासू तो आधीनता शिकला.
राजी न यहोवास सोडण्याला.
२. युवा तीमथ्यही वडील झाला.
बाळपणा पासुन जाणी शास्त्राला.
शिकल्या गोष्टी आचरल्या त्याने.
एकनिष्ठ राही यत्ने नेमा निर्विवाद जाहली.
संधी पौलासह जाने.
मंडळीत ख्याती इतकी भली,
शिफारसण्या यात्रेला,
त्याच्या सेवेने लाभ सर्वां झाला.
३. युवतींनो आठवा बालिका ती.
देवनिष्ठा तिची उत्तम मोती.
बंदी होऊन राही निष्ठा अबाधित.
आवेश करी तिचा प्रोत्साहित.
नामानभार्येला सांगे येऊन,
यहोवाचा संदेष्टा आणी गुण.
सेनाधीश देई ध्यान त्यावर.
बालिकेमुळे त्या आशीष थोर.
४. युवक युवतींनो देतो उत्तेजन.
नमुने सत्य करा अनुकरण.
या समयी मोठी जबाबदारी.
निरोप्याची याह निवड करी.
याहचे दास करती प्रीति न्याया,
त्यांच्यासह तुम्ही रणांगणी या.
द्या इशारा प्रशंसा त्याची वर्णा.
प्रतिफळात भाग अंतास घ्या.