तरुण लोक विचारतात . . .
मी वाचन का केले पाहिजे?
“वाचन करण्यासाठी धीराची गरज असते; माझ्यात धीर नाही. त्यापेक्षा मी टीव्ही पाहेन.”—मार्गारिटा, १३, रशिया.
“माझ्यासमोर दोन गोष्टी ठेवण्यात आल्या, एखाद्या पुस्तकाचं वाचन आणि बास्केटबॉल खेळ तर मी खेळ निवडेन.”—ऑस्कर, १९, अमेरिका.
वरील वाक्ये वाचण्यासाठी जर तुम्ही वेळ काढला असेल तर तुम्हाला कदाचित जाणवेल की वाचन, ही एक महत्त्वपूर्ण कला आहे जी शिकून घेतली पाहिजे. पण तुम्हाला कदाचित एखाद्या पुस्तकाचे अथवा मासिकाचेसुद्धा वाचन करणे औषध घेण्याप्रमाणे वाटेल: तुम्हाला माहीत आहे, की औषध हे तुमच्यासाठी चांगले आहे तरीपण तुम्हाला ते घ्यावेसे वाटत नाही.
सावध राहाने! ११ राष्ट्रांतील युवकांच्या मुलाखती घेऊन, वाचनाच्या समस्येविषयी व लाभांविषयी त्यांना काय म्हणायचे आहे हे माहीत करून घेतले. त्यांनी मांडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
तुम्हाला वाचन इतके कठीण का वाटते?
“मला वाचन करायला वेळ कुठं मिळतो.”—सेमसिहॉन, १९, जर्मनी.
“वाचन करायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं. मी जरा आळशी आहे.”—एझकेअल, १९, फिलिपिन्स.
“मला कंटाळवाणे विषय वाचायला कुणी बळजबरी केलेली मुळीच आवडत नाही.”—ख्रिश्चन, १५, इंग्लंड.
“पुस्तक जर बारीक असेल तर कदाचित मी वाचेन. पण पुस्तक जर जाड असेल तर ते पाहूनच मला भीती वाटते.”—एरिको, १८, जपान.
“माझं खूप सहज लक्ष भरकटतं. मी लक्ष एकाग्र करू शकत नाही.”—फ्रॅन्सिस्को, १३, दक्षिण आफ्रिका.
ख्रिस्ती तरुणांना बायबलचे वाचन करण्याचे उत्तेजन दिले जाते. (स्तोत्र १:१-३) तुम्हाला ते कठीण वाटते का? का कठीण वाटते?
“बायबल इतकं मोठ्ठं पुस्तक आहे! मला वाटतं, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ते वाचून पूर्ण करू शकणार नाही.”—ॲना, १३, रशिया.
“यबलचे काही भाग समजायला जरा अवघड आहेत आणि इतके मनोरंजकही नाहीत.”—जेझरील, ११, भारत.
“मी नियमित बायबल वाचू शकत नाही कारण माझं वेळापत्रक अगदी बिघडलेलं आहे.”—एल्सा, १९, इंग्लंड.
“मला बायबल वाचन करणं कठीण वाटतं, कारण माझा बहुतेक वेळ, काम आणि शाळेच्या अभ्यासातच जातो.”—सुरीसादाय, १४, मेक्सिको.
“बायबल वाचायला मला वेळ मिळत नाही कारण, माझे छंद पूर्ण करण्यात मी जो वेळ घालवतो, तो मी कमी करू शकलेलो नाहीए.”—शो, १४, जपान.
होय, बायबल वाचन कठीण असू शकते. पण बायबलचे वाचन केल्याने काही फायदा होणार आहे का? तुम्हाला फायदा झाला आहे का?
“वाचन केल्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे, आणि आता मी लोकांबरोबर अधिक आत्मविश्वासाने बोलू शकते.”—मोनिशा, १४, भारत.
“वाचन केल्यामुळे माझं मन शांत होतं; चिंतांवर विचार करायचं मी सोडून देते.”—ॲलीसन, १७, ऑस्ट्रेलिया.
“बायबलचे वाचन करताना, मी जिथं जिथं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊ शकते, म्हणजे कल्पना करू शकते.”—डुआन, १९, दक्षिण आफ्रिका.
“वाचन करत असल्यामुळे, मी स्वतः संशोधन करू शकते; इतर जे सांगतात त्यावरच मला अवलंबून राहावे लागत नाही.”—अबीहू, १६, मेक्सिको.
कशामुळे तुम्ही बायबलचे वाचन करण्यात रस घेऊ लागला?
“लहानपणापासून माझ्या आईबाबांनी मला मोठ्यानं वाचन करण्याचं उत्तेजन दिलं.”—तान्या, १८, भारत.
“वाचन करताना, कल्पना करायची, ज्या कार्याविषयी वाचत आहोत ते डोळ्यांपुढे उभे करायचे, असं माझे आईबाबा म्हणायचे.”—डॅन्यल, १८, इंग्लंड.
“माझे वडील म्हणायचे, तुला जी पुस्तकं जास्त आवडतात, जसे की स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, ती वाचायला सुरुवात कर. आता मला बायबलचं वाचन करण्यात आनंद वाटतो, ओझ्यासारखं वाटत नाही.”—शॅरेन, १६, दक्षिण आफ्रिका.
“मी चार वर्षांची झाले तेव्हा आईबाबांनी मला एक टेबल आणि एक पुस्तकं ठेवायचं कपाट दिलं; या पुस्तकाच्या कपाटात, माझा जन्म झाल्यापासून त्यांनी माझ्यासाठी जी पुस्तकं गोळा केली होती, ती सर्व पुस्तकं होती.”—अरी, १४, जपान.
तुमच्या मते, बायबलचे वाचन करणे महत्त्वपूर्ण का आहे?
“लोक, बायबलबद्दल अशा अनेक गोष्टी मानतात ज्या खऱ्या नाहीत. त्यामुळे, बायबलमध्ये या सर्व गोष्टी अशाच आहेत की नाहीत, हे तुम्ही स्वतः पडताळून पाहू शकता.” (प्रेषितांची कृत्ये १७:११)—मॅथ्यू, १५, अमेरिका.
“बायबल वाचताना पुष्कळ मनन केले पाहिजे. पण बायबल वाचनामुळे मी जेव्हा इतरांना माझ्या विश्वासांविषयी सांगतो तेव्हा मी स्वतःला आत्मविश्वासानं व्यक्त करू शकतो आणि स्पष्ट बोलू शकतो.” (१ तीमथ्य ४:१३)—जेन, १९, इंग्लंड.
“मी जेव्हा बायबल वाचतो तेव्हा जणू काय यहोवाच माझ्याबरोबर बोलतोय, असं मला वाटतं. कधीकधी तर त्यातल्या काही गोष्टी माझ्या भावनांना स्पर्श करतात.” (इब्री लोकांस ४:१२)—ओबेदाया, १५, भारत.
“मला बायबलचं वाचन आवडू लागलं आहे कारण त्यातून मला समजतं, की यहोवा माझ्याविषयी काय विचार करतो आणि उपयुक्त सल्ला मिळतो.” (यशया ४८:१७, १८)—विकटोरिया, १४, रशिया.
बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने वाचण्यासाठी तुम्हाला केव्हा वेळ मिळतो?
“मी एक वेळापत्रक बनवलं आहे. मी दररोज सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी यबलचा एक अध्याय वाचते.”—लाईस, १७, ब्राझील.
“मी शाळेला जाताना ट्रेनमध्ये प्रवास करतो तेव्हा बायबल आणि इतर ख्रिस्ती प्रकाशने वाचतो. गेल्या चार वर्षांपासून माझा हा नित्यक्रम आहे.”—ताईची, १९, जपान.
“मी रोज रात्री झोपायच्या आधी थोडंसं बायबल वाचते.”—मरिया, १५, रशिया.
“मी रोज टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांपैकी कोणत्याही एकाची चार पाने वाचते. यामुळे दुसरं नवीन मासिक येण्याआधी माझं संपूर्ण मासिक वाचून होतं.”—एरिको, १८, जपान.
“मी दररोज सकाळी शाळेला जायच्या आधी बायबल वाचतो.”—जेम्स, १७, इंग्लंड.
वरील भाष्यावरून दिसून येते, की वाचन केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुमच्या ज्ञानभंडारात भर पडू शकते. बायबल व बायबल आधारित प्रकाशनांचे तसेच या मासिकाचे वाचन केल्यामुळे तुम्हाला “देवाजवळ” येण्यास मदत मिळू शकते. (याकोब ४:८) तेव्हा, वाचन करणे तुम्हाला कठीण वाटत असले तरीसुद्धा वाचन करण्याचे सोडून देऊ नका! (g ५/०६)
विचार करा
◼ तुम्ही देवाचे वचन का वाचले पाहिजे?
◼ तुम्ही बायबल आणि बायबल प्रकाशने वाचण्यासाठी कशाप्रकारे ‘वेळ खंडून घेऊ’ अर्थात वेळ विकत घेऊ शकता?—इफिसकर ५:१५, १६, पं.र.भा. समास.
[२२ पानांवरील चौकट]
संबंध जोडा
तुम्ही जे वाचता त्याचा, स्वतःविषयी आणि तुमच्या परिसराविषयी तुम्हाला आधीपासून जे माहीत आहे त्याच्याशी संबंध जोडा. पुढील प्रश्ने स्वतःला विचारा:
▪ पूर्वी वाचलेल्या माहितीशी मी वाचत असलेल्या माहितीत वर्णन केलेली परिस्थिती किंवा समस्या आणि आधी दुसऱ्या एखाद्या पुस्तकात, मासिकात किंवा कथांमध्ये वाचलेली माहिती यांत साम्यता आहे का? मी वाचत असलेल्या माहितीतल्या लोकांचे स्वभावगुण, आधी ज्या लोकांविषयी वाचले होते त्यांच्यासारखेच आहेत का?
▪ स्वतःशी मी वाचत असलेली माहिती, माझ्या परिस्थितीला, माझ्या संस्कृतीला आणि माझ्या समस्यांशी कशी जुळते? मला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किंवा माझे जीवन आणखी चांगले बनवण्यासाठी मी या माहितीचा उपयोग करू शकतो का?
▪ आजूबाजूच्या परिसराशी ही माहिती मला, निसर्ग, परिसर, विविध संस्कृती किंवा समाजातील समस्या यांविषयी काय शिकवते? निर्माणकर्त्याविषयी मी या माहितीतून काय शिकतो?