आपले वातावरण कसे बचावले जाईल
मानव स्वेच्छेने आभाळाला दूषित करत राहण्याचे सोडून देतील का? अशाप्रकारे आपले वातावरण बचावले जाईल का?
नाही. आपले मौल्यवान वातावरण वाचवणे हे प्रदूषणविरोधी अपेक्षांच्या मानवी मान्यतेवर अवलंबून नाही. त्याउलट, सर्वश्रेष्ठ अधिकार असणाऱ्याच्या मध्यस्थीने, केवळ एक स्वच्छ वातावरणच नव्हे, तर एक स्वच्छ पृथ्वी देखील आणील.
निर्माणकर्त्याने पृथ्वीला आणि त्यावरील जीवनाला ज्या अद्भुतरीतीने रचले आहे त्यावरून त्याला त्यांची काळजी असल्याचे दिसून येते. त्याने, तिला युगानुयुग व सर्वकाळासाठी टिकून राहावयास बनवले आहे.—स्तोत्र १०४:५, २४.
देखभालीसाठी तरतूदी
उदाहरणार्थ, वातावरण अशाप्रकारे निर्माण करण्यात आले होते की ते स्वतःला दुरुस्त आणि स्वच्छ करते. वरील वातावरणातील ओझोनचा विचार करा. ओझोनचा पडदा, पृथ्वीवरील मानवांसाठी प्राणघातक असणाऱ्या अतिनील उत्सर्जनाला शोषून घेण्यासाठी अतिकल्पकतेने रचण्यात आला होता. त्याचवेळी, तो पृथ्वीवरील जीवनाला आवश्यक असणाऱ्या सुरक्षित प्रकाशाला पार होऊ देतो.
आपण आधी शिकलो की, वरील वातावरणात वाहवत जाणाऱ्या मानव-निर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे ओझोनच्या पडद्याचे अतिशय नुकसान केले जात आहे. ओझोनचा संरक्षक पडदा पुन्हा कसा भरून काढण्यात येईल? आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ते स्वतःला दुरुस्त करू शकते अशाप्रकारे निर्माणकर्त्याने त्याला रचले आहे. होय, वरील वातावरणात ओझोन सतत निर्माण होत असतो—खरे म्हणजे, ओझोन ज्या किरणांना गाळतो त्याच धोकेदायक किरणांनी तो निर्माण होतो! अशाप्रकारे, मनुष्याचे प्रदूषण वेगाने ओझोनचा नाश करते त्याचवेळी काही प्रमाणात ओझोनला पुन्हा भरून काढले जाते.
हवेचे ५०,००० खरब टन पेक्षा अधिक प्रमाण आहे त्या खालील वातावरणातही हीच परिस्थिती आहे. नैसर्गिक चक्र या हवेतील दूषित गोष्टींना उल्लेखनीय मार्गांनी साफ करतात. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया असे विवेचन मांडते: “वारा दूषित करणाऱ्या गोष्टींना पांगवतो आणि पाऊस व हिमवर्षाव त्यांना धुऊन जमीनीत घालवतात.”
स्पष्टतः, मानवांनी हवा दूषित करण्याचे थांबवले किंवा अशा प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आळा घातला तर मग, लवकरच सगळीकडील हवा शुद्ध आणि सुगंधित होईल. तरीसुद्धा, वरील संदर्भ या समस्येची ओळख देऊन असे समजावतो: “पुष्कळ भागांमध्ये, हवामानातील परिस्थिती नाश करू शकेल त्याहून अधिक वेगाने या दूषित करणाऱ्या गोष्टी हवेत सोडण्यात येतात.”
तर मग, मनुष्याचे स्वार्थाने वातावरण दूषित करणे हे केव्हा थांबवले जाईल?
हाताशी असलेली शुद्ध पृथ्वी
देवाने स्वतः मध्यस्थी केल्यावरच प्रदूषण थांबवले जाईल. बायबल भाकीत करते की, तो ‘पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करील.’ (प्रकटीकरण ११:१८) तो लोभिष्ट मानवांना नेहमीसाठी या सुंदर पृथ्वीला आणि जीवनाच्या गरजा भागवणाऱ्या तिच्या वातावरणाला दूषित करत राहण्यास अनुमती देणार नाही. तो अभिवचन देतो: “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची [यहोवा, NW] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.”—स्तोत्र ३७:९.
सर्व दुष्कर्म्यांचा उच्छेद कसा केला जाईल? ते देवाच्या स्वर्गीय सरकाराद्वारे, त्याच्या राज्याद्वारे केले जाईल. ते मानवांच्या अपरिपूर्ण सरकारांची जागा घेईल. बायबल अभिवचन देते: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) येशूने त्याच्या अनुयायांना, देवाच्या राज्य सरकाराविषयीच, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” अशी प्रार्थना करण्यास शिकवले.—मत्तय ६:१०.
मानवांवर देवाच्या राज्याने सत्ता चालवावी आणि अशाप्रकारे त्यांनी एका प्रदूषित नसलेल्या वातावरणात जीवनाचा आनंद उपभोगावा अशी आपल्या पृथ्वीसाठी देवाची इच्छा आहे. यास्तव, ‘पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी’ तो निश्चित आहे. (प्रकटीकरण ११:१८) ते सुटकेचे किती मोठे कृत्य असेल!
स्वार्थी मानवांनी पृथ्वीवर ढिगारा करून ठेवलेल्या प्रदूषणरहित पृथ्वीवर राहण्याची कल्पना करा! त्यावेळी आपले मौल्यवान वातावरण एका हितकारक स्थितीत पूर्ववत केले जाईल. “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या,” या बायबलच्या अभिवचनाची पूर्तता झाल्यावर हे घडेल.—प्रकटीकरण २१:३, ४; २ पेत्र ३:१३.
देव अभिवचन देत असलेल्या धार्मिक नवीन जगात बचावून जाण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? देवाने ज्याला आपला प्रतिनिधी या नात्याने पृथ्वीवर पाठवले त्याच्याबद्दल शिकण्याची आणि त्याच्या शिकवणींचे अनुकरण करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. (योहान ३:१६; ७:२९) याच येशू ख्रिस्ताने देवाला प्रार्थनेत असे म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३. (g94 12/22)
[१० पानांवरील चित्र]
एक शुद्ध, प्रदूषणरहित नंदनवनमय पृथ्वी हाताशी आहे