आपले वातावरण बिघडवले जाते तेव्हा
सन १९७१ मध्ये, अपोलो १४ मध्ये बसून चंद्रावर जात असताना एडगर मिचेल यांनी पृथ्वीला पाहिल्यावर असे म्हटले: “ती चमकणाऱ्या निळसर पांढऱ्या रत्नासारखी दिसते.” परंतु, आज एखादा मनुष्य अंतराळातून काय पाहील?
विशिष्ट चष्म्याद्वारे, पृथ्वीच्या वातावरणातील अदृश्य वायू पाहावयास मिळाले तर त्याला एक वेगळेच चित्र दिसेल. इंडिया टुडे या नियतकालिकेत राज चेंगप्पा यांनी लिहिले: “त्यास अन्टार्क्टिंका आणि उत्तर अमेरिकेवरील ओझोनच्या संरक्षक पडद्याला मोठमोठाली छिद्रे पडलेली दिसतील. चकाकणाऱ्या निळसर पांढऱ्या रत्नाऐवजी त्याला कार्बन आणि सल्फर डायऑक्साइडने वेष्टिणाऱ्या काळसर ढगांनी भरलेली फिकी, घाणेरडी पृथ्वी दृष्टीस पडेल.”
आपल्या वरील वातावरणातील ओझोनच्या संरक्षक पडद्याला कशामुळे छिद्रे पडली आहेत? वातावरणातील प्रदूषण घडवणाऱ्या पदार्थांची वाढ इतकी धोकेदायक आहे का?
ओझोनचा नाश कसा केला जात आहे
सुमारे ६० वर्षांआधी, शास्त्रज्ञांनी एका सुरक्षित थंडी निर्माण करणाऱ्या वायुचा शोध लावल्याचे घोषित केले. विषारी असणाऱ्या आणि घाण वास सोडणाऱ्या इतर थंडी निर्माण करणाऱ्या वायुंची बदली तो करू शकत होता. ते नवीन रसायन एक कार्बन, दोन क्लोरिन आणि दोन फ्लोरिनचे अणू (CC12F2) असणाऱ्या रेणूंनी बनलेले होते. हे व अशाचप्रकारच्या मानव-निर्मित रसायनांना क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs) म्हटले जाते.
१९७० च्या दशकाच्या सुरवातीला, सीएफसीसच्या उत्पादनाची वाढ एका भव्य जागतिक उद्योगात झाली होती. त्यांचा उपयोग केवळ रेफ्रिजरेटर्समध्येच नव्हे, तर फवारा मारण्याचे एरोसोल डबे, वातानुकूल, निर्मलकारक आणि फास्ट-फूड डब्यांचे उत्पादन तसेच इतर प्लॅस्टिक फोम वस्तूंमध्येही केला जात होता.
तथापि, सप्टेंबर १९७४ मध्ये शरवुड रोलन्ड आणि मॉरीयो मोलीना या दोन शास्त्रज्ञांनी असे स्पष्टीकरण दिले की, सीएफसीस हळूहळू वर स्ट्रॅटोसस्पीयरमध्ये जातात व तेथे कालांतराने ते त्यांच्यातील क्लोरिन सोडतात. शास्त्रज्ञांनी अनुमान काढले की, क्लोरिनचा प्रत्येक अणू हजारो ओझोनच्या रेणूंचा नाश करू शकतो. परंतु, वरील वातावरणात ओझोनचा नाश सगळीकडे समांतरतेत होण्याऐवजी ध्रुवांवरील वातावरणात हा नाश अधिक झाला आहे.
१९७९ नंतरच्या प्रत्येक वसंत ऋतुत अन्टार्क्टिंकवर मोठ्या प्रमाणात ओझोन नाहीसा होऊन नंतर पुन्हा आढळला आहे. ऋतुंप्रमाणे ओझोनमध्ये होणाऱ्या या घटाला ओझोनचे छिद्र असे संबोधले जाते. त्याशिवाय, अलीकडील वर्षात हे तथाकथित छिद्र अधिक मोठे होत चालले आहे आणि अधिक काळापर्यंत टिकत आहे. सन १९९२ मध्ये—उत्तर अमेरिकेपेक्षा मोठे असलेले, उपग्रहावरील मोजमापाने नोंद करण्यासारखे ओझोनचे एक छिद्र प्रकट केले आणि त्यात पुरेसा ओझोन उरलेला नव्हता. फुग्याच्या मोजमापांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट प्रकट केली आहे. ते नोंद करण्यात आलेले सर्वात कमी प्रमाण आहे.
त्यादरम्यान, पृथ्वीच्या इतर भागावरील वातावरणातही ओझोनची पातळी घटत चालली आहे. नवीन शास्त्रज्ञ (इंग्रजी) हे नियतकालिक असा अहवाल देते की, ‘अलीकडील मोजमाप, १९९२ मध्ये उत्तरेकडील युरोप, रशिया आणि कॅनडा यांचा समावेश करणाऱ्या ५० आणि ६० अंश उत्तरेच्या विषुववृत्तामधील ओझोनच्या संहतीचे असाधारणतः कमी प्रमाण असल्याचे दाखवतात. ओझोनची पातळी साधारण पातळीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी होती. ३५ वर्षांच्या सतत निरीक्षणामधील ही सर्वात कमी पातळी होती.’
वैज्ञानिक अमेरिकन (इंग्रजी) हे नियतकालिक असे सांगते की, “क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे परिणामित होणाऱ्या ओझोनच्या नुकसानाविषयीचे सर्वात भयानक अनुमान देखील कमीच लेखण्यात आले आहेत. . . . आणि तरीदेखील त्या वेळी, पुरेसा वैज्ञानिक पुरावा नसल्याच्या आधारावर सरकार आणि उद्योगातील सामर्थ्यवान लोकांच्या मतांनी नियमांचा तीव्रतेने विरोध केला.”
अनुमानाप्रमाणे दोन कोटी टन सीएफसीस आधीच वातावरणात सोडण्यात आले आहेत. सीएफसीसना स्ट्रॅटोसस्पीयरमध्ये पोहंचण्यासाठी पुष्कळ वर्षे लागत असल्यामुळे, त्यांचे लाखो टन अद्यापही ते नुकसान करतात त्यावरील वातावरणात पोहंचलेले नाहीत. तथापि, सीएफसीस ओझोन-नाशक क्लोरिनचा एकमात्र उगम नाहीत. लोकप्रिय विज्ञान नियतकालिक असा अहवाल देते, “एखादे यान पाठवले जाते त्या प्रत्येक वेळी सुमारे ७५ टन क्लोरिन ओझोनच्या थरामध्ये सोडला जातो असा अनुमान नासा [NASA] काढतो.”
कोणते परिणाम?
वरील वातावरणात ओझोनचे कमी प्रमाण असण्याचे परिणाम अद्याप पूर्णपणे समजलेले नाहीत. तथापि, पृथ्वीवर येणाऱ्या हानीकारक अतिनील UV (किरणांची) संख्या वाढत आहे व त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण देखील अधिक होत आहे. पृथ्वी (इंग्रजी) हे नियतकालिक असा अहवाल देते, “मागील दशकात, उत्तर गोलार्धावर परिणाम करणाऱ्या हानीकारक UV किरणांचा वार्षिक डोस सुमारे ५ टक्क्यांनी वाढला.”
UV किरणांमध्ये केवळ १ टक्का वाढ, त्वचेच्या कर्करोगात २ ते ३ टक्क्यांची वाढ करण्यास कारणीभूत ठरू शकते असा अनुमान काढला जातो. गेटअवे हे आफ्रिकन नियतकालिक सांगते: “दर वर्षी दक्षिण आफ्रिकेत त्वचेच्या कर्करोगाच्या ८,००० पेक्षा अधिक नवीन केसेस असतात . . . आमच्याकडे ओझेनची सर्वात कमी पातळी आहे आणि त्वचेच्या कर्करोगाचे सर्वात जास्त प्रमाण आहे (यातील संबंध हा योगायोग नव्हे).”
वरील वातावरणातील ओझोनचा नाश झाल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढेल असे रोलन्ड आणि मॉलीना या शास्त्रज्ञांनी बऱ्याच वर्षांआधी प्रतिपादित केले होते. त्यांनी अमेरिकेत एरोसोलमधील सीएफसीसच्या वापरावर तत्काळ बंदी आणावी अशी शिफारस केली होती. हा धोका ओळखून, जानेवारी १९९६ पर्यंत सीएफसीसचे उत्पादन थांबवण्यासाठी पुष्कळ रा सहमत झाले आहेत. तथापि, या दरम्यान, सीएफसीसचा वापर पृथ्वीवरील जीवनाला धोका देतच राहतो.
आपले जिवंत जग (इंग्रजी) हे नियतकालिक अहवाल देते की, अन्टार्क्टिंकावरील ओझोनच्या प्रमाणात घट झाल्यामुळे, “पूर्वी शंका केली जात होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात सागरामध्ये, अतिनील उत्सर्जनाला खोलवर शिरण्यास वाव दिला गेला आहे. . . . यामुळे, सागरी अन्नसाखळीचे मूळ असणाऱ्या एकपेशीय प्राण्यांच्या उत्पादनात बरीच मोठी घट झाली आहे.” प्रयोगांद्वारे असे देखील निष्पन्न झाले आहे की, UV किरणांमधील वाढ पुष्कळ पीकांचे उत्पन्न कमी करते. या गोष्टीमुळे जागतिक अन्न पुरवठ्याला धोका संभवतो.
अर्थात, सीएफसीसचा वापर संभवतः नाशकारक आहे. तरीही, आपल्या वातावरणावर इतर पुष्कळ प्रदूषण घडवणाऱ्या गोष्टींचा भडिमार केला जात आहे. त्यातील एक म्हणजे, वातावरणातील एक वायू होय. तो अल्पांशात पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यावश्यक आहे.
प्रदूषणाचा परिणाम
मानव एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले व वातावरणात अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइडची भर घालू लागले. त्यावेळी या अल्पांश वायुचे प्रमाण, प्रती दहा लाखाला २८५ भाग इतके होते. परंतु, मनुष्याच्या वाढत्या अश्मी इंधनाच्या उपयोगामुळे, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण प्रती दहा लाखाला ३५० भागापेक्षाही अधिक झाले आहे. वातावरणात असणारा हा उष्णता अडवणारा वायू अधिक वाढल्यामुळे, याचा परिणाम काय झाला आहे?
पुष्कळजण विश्वास करतात की, कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच पृथ्वीचे तापमान वाढले आहे. तथापि, इतर संशोधक म्हणतात की, विशेषतः सूर्यात बदल झाल्यामुळे—अलीकडील काळात सूर्य अधिक उर्जा उत्पन्न करत असल्यामुळे—जागतिक उष्णता परिणामित झाली आहे.
परिस्थिती कोणतीही असली, तरी १९ व्या शतकाच्या मध्यात अहवाल ठेवण्यास सुरवात केल्यापासून १९८० चे दशक सर्वात उष्ण होते. दक्षिण आफ्रिकेचे वृत्तपत्र द स्टार असा अहवाल देते, “ही उष्ण होण्याची प्रक्रिया या शतकात देखील उतरली आहे. नोंद केलेल्यांपैकी १९९० हे सर्वात उष्ण वर्ष होते, १९९१ हे तिसरे उष्ण वर्ष होते आणि . . . १४० वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या तापमानाच्या अहवालांमध्ये १९९२ हे दहावे उष्ण वर्ष होते.” गेल्या दोन वर्षांत झालेली थोडीशी घट १९९१ मध्ये माउंट पिनेटूबोचा स्फोट झाल्यावर वातावरणात फेकल्या गेलेल्या धुळीमुळे झाली आहे.
पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे भवितव्यात होणाऱ्या परिणामांबद्दल अतिशय संतापी वादविवाद होतात. परंतु, जागतिक उष्णतेने आधीच कठीण असणारे म्हणजेच हवामानाचा अंदाज सांगण्याचे काम अधिक गुंतागुंतीचे बनवले आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. नवीन शास्त्रज्ञ अशी नोंद करते की, “जागतिक उष्णता हवामानात बदल करत असल्यामुळे” चुकीचे अनुमान देण्याची “अधिककरून शक्यता असू शकते.”
पुष्कळ विमा कंपन्यांना भय वाटते की, जागतिक उष्णतेमुळे त्यांच्या विमापत्रांना काहीच नफा मिळणार नाही. द इकॉनॉमीस्ट मान्य करते की, “दुर्दैवांच्या पूराचा सामना करावा लागत असून काही पुनर्विमाकार नैसर्गिक आपत्तींची जबाबदारी घेण्याचे कमी करत आहेत. इतरजण संपूर्णतः बाजार सोडून देण्याबद्दल बोलत आहेत. . . . त्यांना अनिश्चिततेची भीती वाटते.”
नोंद केलेल्या सर्वात उष्ण वर्षी, म्हणजेच १९९० मध्ये, आर्क्टिंकच्या हिमखंडाचा एक मोठा तुकडा अभूतपूर्व प्रमाणात अलिप्त झाला. यामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत शेकडो पोलर बेअर रँगेल बेटावर निराधार झाले. बीबीसी वनजीवन (इंग्रजी) हे नियतकालिक असा इशारा देते, “जागतिक उष्णतेमुळे या परिस्थिती नियमितपणे घडू लागतील.”
सन १९९२ मध्ये एका आफ्रिकन वृत्तपत्राने असा अहवाल दिला, “अन्टार्क्टिंकापासून उत्तरेकडे वाहवत जाणाऱ्या आणि दक्षिण अटलांटिकमधील जहाजांना धोका देणाऱ्या हिमगिरींच्या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाल्याचा आरोप हवामान तज्ज्ञ जागतिक उष्णतेला देतात.” पृथ्वी नियतकालिकेच्या जानेवारी १९९३ च्या अंकानुसार, दक्षिणेकडील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून दूर समुद्रसपाटी हळूहळू वाढते ती, काही अंशी पाणी गरम झाल्यामुळे होते.
दुर्दैवाने, मानव धक्कादायक प्रमाणात वातावरणामध्ये विषारी वायू भरत आहेत. पृथ्वीचा अहवाल ३ (इंग्रजी) हे पुस्तक सांगते, “वातावरण संरक्षण संस्थेच्या १९८९ च्या एका अहवालानुसार असा अनुमान काढण्यात आला की, दर वर्षी ९,००,००० पेक्षा अधिक टन विषारी रसायने हवेत सोडली जातात.” हा आकडा कमी अंदाज देत असल्याचे समजले जाते कारण त्यामध्ये लाखो मोटार गाड्यांमधून निघणाऱ्या धुराचा समावेश नाही.
पुष्कळ इतर औद्यागिक राष्ट्रांमधूनही हवेतील प्रदूषणाचे धक्कादायक अहवाल मिळतात. विशेषतः, पूर्वीय युरोपातील देशांमध्ये कम्युनिस्ट सत्तेच्या दशकांमधील अनियंत्रित हवेच्या प्रदूषणाची अलीकडील आविष्करणे अधिक भयानक ठरली आहेत.
कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन बाहेर सोडणारे पृथ्वीवरील वृक्ष, विषारी वायुच्या बळींपैकी आहेत. नवीन शास्त्रज्ञ याने अहवाल दिला: “कृषी मंत्री . . . यांच्यानुसार जर्मनीतील वृक्षांची वाढ अधिक अस्वास्थ्यपूर्ण आहे. [ते म्हणाले] की, हवेतील प्रदूषण हे जंगलाच्या ढासळणाऱ्या आरोग्याचे एक प्रमुख कारण राहिले आहे.”
दक्षिण आफ्रिकेच्या ट्रन्सवाल हायवेल्डमध्येही परिस्थिती यासारखीच आहे. पुन्हा पृथ्वीकडे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात जेम्स क्लार्क अहवाल देतात, “ॲसिड पावसाची पहिली चिन्हे आता पूर्वीय ट्रन्सवालमध्ये आढळत आहेत. तेथे, पाइन वृक्षाची पाने गर्द हिरव्या रंगापासून फिक्या पिवळसर तपकिरी रंगात बदलत आहेत.”
असे अहवाल जगभरातून येतात. कोणतेही राष्ट्र त्यापासून मुक्त नाही. औद्योगिक राष्ट्रांची धुराडे आकाशात उंच असून, ते शेजारील देशांना आपले प्रदूषण निर्यात करतात. मानवाचा लोभिष्ट औद्योगिक विकास आशेची प्रेरणा देत नाही.
तथापि, आशावादासाठी कारण आहे. आपले मौल्यवान वातावरण नष्ट होण्यापासून बचावले जाऊ शकते याची खात्री आपल्याला असू शकते. हे कसे साध्य होईल याबद्दल पुढील लेखात शिका. (g94 12/22)
[७ पानांवरील चित्र]
वरील वातावरणात ओझोनचा नाश झाल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे
[९ पानांवरील चित्र]
अशा प्रदूषणाचे परिणाम काय आहेत?