यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवा
“ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील.”—स्तोत्र ९:१०.
१. आपल्या आधुनिक दिवसांमध्येही आपण यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा का ठेवू शकतो?
या आधुनिक जगात, देव आणि त्याचे वचन बायबल यावर भरवसा ठेवण्याचे आमंत्रण अव्यावहारिक आणि अयथार्थ वाटेल. तरीदेखील, देवाचे ज्ञान दीर्घ कालापासून सत्य आणि व्यावहारिक शाबीत झाले आहे. पुरुष आणि स्त्रीचा निर्माता विवाह आणि कुटुंबाचा जनक आहे आणि तो इतरांपेक्षा अधिक आपल्या गरजा जाणतो. ज्याप्रमाणे मानवाच्या मूलभूत गरजा बदललेल्या नाहीत त्याचप्रकारे त्या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग देखील जसेच्या तसेच राहिले आहेत. परंतु, अनेक शतकांआधी लिहून ठेवलेला बायबलचा सल्ला अजूनही जीवनामध्ये यश मिळवण्याकरता व समस्या सोडवण्याकरता सर्वोत्तम मार्गदर्शन पुरवतो. तो सल्ला अनुसरल्याने—या सुसभ्य, वैज्ञानिक जगात राहात असताना देखील पुष्कळ आनंद मिळू शकतो!
२. (अ) देवाच्या आज्ञापालनाने यहोवाच्या लोकांच्या जीवनामध्ये कोणते चांगले प्रतिफळ उत्पन्न झाले आहेत? (ब) यहोवाची आणि त्याच्या वचनाची आज्ञा मानणाऱ्यांसाठी तो आणखी कोणती प्रतिज्ञा करतो?
२ यहोवावर भरवसा ठेवल्याने व बायबलच्या तत्त्वांना लागू केल्याने दररोज व्यावहारिक फायदे प्राप्त होतात. याचा पुरावा संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवनामध्ये दिसून येतो ज्यांच्यात बायबलचा सल्ला लागू करण्याची खात्री आणि धैर्य आहे. त्यांच्यासाठी निर्माता आणि त्याच्या वचनावरील भरवसा उचित शाबीत झाला आहे. (स्तोत्र ९:९, १०) देवाची आज्ञा पाळल्याने ते, स्वच्छता, प्रामाणिकपणा, मेहनतीपणा, जीवनाचा आणि इतरांच्या मालमत्तेचा आदर करणे तसेच खाण्यापिण्यात नेमस्त या सर्व गोष्टींच्या बाबतीत ते उत्तम लोक झाले आहेत. त्यामुळे कौटुंबिक वर्तुळात योग्य प्रकारची प्रीती आणि प्रशिक्षण—आदरातिथ्य करणारे, सहनशील, दयाळू आणि क्षमाशील होण्यास—तसेच आणखी इतर गोष्टींविषयीचे प्रशिक्षण मिळते. ते मोठ्या प्रमाणात, राग, द्वेष, खून, मत्सर, भय, आळस, गर्व, खोटेपणा, लबाडी, स्वैरवर्तन आणि अनैतिकता यांची वाईट फळे टाळू शकले आहेत. (स्तोत्र ३२:१०) पण देव, त्याचे नियम पाळणाऱ्यांसाठी आनंदी परिणाम मिळतील या अभिवचनापेक्षा अधिक काही करतो. ख्रिस्ती मार्ग अनुसरणाऱ्यांना, “सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने . . . आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही,” असे येशू म्हणाला.—मार्क १०:२९, ३०.
जगिक ज्ञानावर भरवसा ठेवण्याचे टाळा
३. यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवत असताना ख्रिश्चनांना काही वेळा कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?
३ अपरिपूर्ण मानवांची एक समस्या आहे व ती म्हणजे, देव जे अपेक्षितो त्याला क्षुल्लक समजण्याकडे किंवा विसरून जाण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनाच सर्वात उत्तमप्रकारे माहीत आहे किंवा या जगाच्या विद्यावंत वर्गाकडून येणारे ज्ञान देवाच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ, अधिक अद्ययावत आहे असा ते सहजपणे विचार करू लागतात. या जगामध्ये राहत असताना त्यामधील लोकांप्रमाणे देवाच्या सेवकांमध्येही अशी मनोवृत्ती वाढू शकते. म्हणूनच, आपला स्वर्गीय पिता त्याचा सल्ला ऐकण्यासाठी जे प्रेमळ आमंत्रण देतो त्यामध्ये योग्य इशारा देखील देतो: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर [यहोवा, NW] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.”—नीतिसूत्रे ३:१, २, ५-७.
४. या “जगाचे ज्ञान” किती प्रमाणात व्यापक आहे व ते “देवाच्या दृष्टीने मूर्खपण” का आहे?
४ या जगाचे ज्ञान विपुलतेत आणि अनेक उगमांकडून उपलब्ध आहे. शिकण्यासाठी पुष्कळ संस्था आहेत व “ग्रंथरचनेला काही अंत नाही.” (उपदेशक १२:१२) आता संगणक दुनियेतील माहितीचा तथाकथित सुपरहायवे, बहुतेककरून कोणत्याही विषयावर अमर्यादित आधारसामग्री देण्याची प्रतिज्ञा करतो. पण इतके ज्ञान उपलब्ध झाल्याने जग अधिक हुशार होत नाही किंवा जगाच्या समस्या सुटत नाहीत. उलट, जगाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत जात आहे. तेव्हा, “ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे,” असे बायबल आपल्याला सांगते ते समजण्याजोगे आहे.—१ करिंथकर ३:१९, २०.
५. ‘जगाच्या ज्ञानाविरुद्ध’ बायबल कोणते इशारे देते?
५ शेवटल्या दिवसांच्या या अंतिम भागात, आद्य फसवणारा दियाबल सैतान, बायबलच्या सत्यतेवरील विश्वास धोक्यात आणण्याच्या प्रयत्नात लबाडींच्या लाटांची सुरवात करील केवळ याचीच आपण अपेक्षा करू शकतो. उच्च समीक्षकांनी, बायबलचा खरेपणा आणि विश्वसनीयतेला आव्हान करणाऱ्या परिकल्पनीय पुस्तकांची प्रचुर मात्रा निर्माण केली आहे. पौलाने त्याच्या सहख्रिश्चनाला इशारा दिला: “हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत.” (१ तीमथ्य ६:२०, २१) बायबल पुढे अशी ताकीद देते: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:८.
शंका करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध लढा
६. शंकेने अंतःकरणामध्ये मूळ पकडण्याआधी जागृततेची आवश्यकता का आहे?
६ दियाबलाचा आणखी एक कावेबाज डावपेच म्हणजे मनामध्ये शंकेचे बीज पेरणे. तो नेहमी पाहत असतो की आपला विश्वास कधी कमी होईल जेणेकरून तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. मनामध्ये शंका बाळगणाऱ्या व्यक्तीने याची आठवण करावी की अशा शंकेच्या मागे अशी व्यक्ती आहे जिने हव्वेला म्हटले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” भुरळ पाडणाऱ्याने तिच्या मनात एकदा शंकेचे बीज पेरल्यावर तिला खोटे सांगण्याचे पुढचे पाऊल होते आणि यावर तिने विश्वास ठेवला. (उत्पत्ति ३:१, ४, ५) हव्वेचा विश्वास शंकेमुळे ज्याप्रमाणे नष्ट झाला त्याप्रमाणे आपल्या विश्वासाचे होऊ नये म्हणून आपण जागृत असले पाहिजे. यहोवा, त्याचे वचन व त्याची संघटना यांच्याविषयीच्या शंकेची एक जरी ठिणगी तुमच्या अंतःकरणात पेटली असेल, तरी तुमच्या विश्वासाची राखरांगोळी होण्याआधीच तिला पूर्णपणे विझवण्यासाठी त्वरित पावले उचला.—पडताळा १ करिंथकर १०:१२.
७. शंकेला काढून टाकण्यासाठी काय केले जाऊ शकते?
७ काय केले जाऊ शकते? पुन्हा एकदा उत्तर हेच आहे, की यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवणे. “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.” (याकोब १:५, ६; २ पेत्र ३:१७, १८) यासाठी यहोवाकडे कळकळीने प्रार्थना करणे हे पहिले पाऊल आहे. (स्तोत्र ६२:८) मग, मंडळीतील प्रेमळ पर्यवेक्षकांकडून मदत मागण्यास कचरू नका. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; याकोब ५:१४, १५; यहूदा २२) तुमच्या मनात शंका येण्याचे कारण काय आहे, कदाचित गर्व किंवा तुमच्या चुकीच्या विचारसरणीमुळे तुमच्या मनात शंका येतात का ते शोधून काढण्यासाठी ते तुमची मदत करतील.
८. धर्मत्यागी भावनेची बहुधा कशी सुरवात होते व त्यावर काय उपाय आहे?
८ धर्मत्यागी कल्पनांना ऐकल्याने किंवा वाचल्याने वा जगीक तत्त्वज्ञानामुळे घातक शंका निर्माण झाल्या आहेत का? बायबल सुज्ञतेने सल्ला देते: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य २:१५-१७) एक गोष्ट आस्थेची आहे, की धर्मत्यागाला बळी पडलेले सुरवातीला यहोवाच्या संस्थेमध्ये त्यांना कसे वागवले जात होते याबद्दल कुरकूर करून चुकीच्या मार्गावर जाऊ लागले. (यहूदा १६) विश्वासाच्या चुकांना शोधून काढणे नंतर आले. शरीराच्या एखाद्या अवयवावर कोथ झाल्यावर शल्यचिकित्सक ज्याप्रमाणे तो अवयव काढून टाकण्यासाठी तातडीने कार्य करतात त्याचप्रमाणे, कुरकूर करण्याच्या, ख्रिस्ती मंडळीमध्ये ज्याप्रकारे कार्यहालचाली केल्या जातात त्यांच्याबद्दल नाराज होण्याच्या प्रवृत्तीला लवकरात लवकर मनातून उपटून टाका. (कलस्सैकर ३:१३, १४) अशा शंकांना खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही गोष्टीला काढून टाका.—मार्क ९:४३.
९. कशाप्रकारे एक चांगला ईश्वरशासित नित्यक्रम आपला विश्वास निरोगी ठेवण्यास मदत करील?
९ यहोवा आणि त्याच्या संघटनेशी जडून राहा. “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत,” असे दृढनिश्चयाने म्हणणाऱ्या पेत्राचे निष्ठेने अनुकरण करा. (योहान ६:५२, ६०, ६६-६८) ‘दुष्टाचे सगळे जळते बाण विझविता यावेत’ म्हणून तुमचा विश्वास दृढ, मोठ्या ढालीसारखा ठेवण्यासाठी यहोवाच्या वचनाच्या अभ्यासाकरता चांगला आराखडा बनवा. (इफिसकर ६:१६) ख्रिस्ती सेवेमध्ये इतरांना प्रेमळपणे देवाच्या राज्याचा संदेश सांगण्यात सक्रिय राहा. यहोवाने तुम्हाला कशा प्रकारे आशीर्वादित केले आहे त्यावर रोज गुणग्राहकतेने मनन करा. तुमच्याकडे सत्याचे ज्ञान आहे यासाठी नेहमी आभारी असा. या सर्व गोष्टी ख्रिस्ती नित्यक्रमाने केल्यास तुम्हाला आनंदी, सहनशील आणि शंकेपासून दूर राहण्यास मदत मिळेल.—स्तोत्र ४०:४; फिलिप्पैकर ३:१५, १६; इब्रीयांस ६:१०-१२.
विवाहामध्ये यहोवाचे मार्गदर्शन अनुसरणे
१०. ख्रिस्ती विवाहामध्ये मार्गदर्शनासाठी यहोवाकडे पाहणे विशेष महत्त्वाचे का आहे?
१० वैवाहिक जोडपे म्हणून एकत्र राहण्याकरता पुरुष आणि स्त्रीची व्यवस्था केल्यानंतर, यहोवाने केवळ पृथ्वीला आरामशीर व्यापून टाकण्याचे उद्देशिले नाही तर त्यांचा आनंद वाढवण्याचे देखील उद्देशिले. परंतु, पाप आणि अपरिपूर्णतेने वैवाहिक नातेसंबंधात गंभीर समस्या आणल्या आहेत. ख्रिस्ती यापासून बचावलेले नाहीत, कारण तेही अपरिपूर्ण आहेत व आधुनिक जीवनातील दबावांचा अनुभव घेतात. तरीदेखील, यहोवा आणि त्याच्या वचनावर ख्रिस्ती जण जितका भरवसा ठेवतात तितकेच त्यांना विवाहात आणि मुलांचे संगोपन करण्यात चांगले यश मिळू शकते. जगीक रूढी आणि वर्तणुकींसाठी ख्रिस्ती विवाहात काहीच स्थान नाही. देवाचे वचन आपल्याला आर्जवते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.”—इब्रीयांस १३:४.
११. वैवाहिक समस्या सोडवताना दोन्ही सोबत्यांनी काय ओळखले पाहिजे?
११ बायबलच्या सल्ल्यानुसार पूर्ण झालेल्या विवाहात प्रीतीचे, वचनबद्धतेचे आणि सुरक्षिततेचे वातावरण असते. पती आणि पत्नी दोघेही मस्तकपदाच्या तत्त्वाला समजून त्याचा आदर करतात. बायबलच्या समस्यांना लागू करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बहुधा समस्या येतात. रखडत चाललेली एखादी समस्या सोडवताना, दोन्ही सोबत्यांनी, वास्तविक समस्या कोणती आहे यावर लक्ष केंद्रित करून समस्येच्या लक्षणांना हाताळण्याऐवजी समस्येच्या कारणांना हाताळणे महत्त्वाचे आहे. अलीकडच्या चर्चांमुळे जर थोडाफार किंवा काहीच वाद झाला नसल्यास, ते जोडपे एखाद्या प्रेमळ पर्यवेक्षकाकडून निःपक्षपाती मदतीची विचारणा करू शकते.
१२. (अ) विवाहातील कोणत्या सामान्य समस्यांवर बायबल सल्ला पुरवते? (ब) दोन्ही सोबत्यांनी यहोवाच्या मार्गानुसार सर्व काही करण्याची आवश्यकता का आहे?
१२ दळणवळण, एकमेकांच्या भावनांचा आदर, मस्तकपदाचा आदर किंवा निर्णय कसे घेतले जातात याविषयीची समस्या आहे का? मुलांच्या संगोपनाविषयी किंवा लैगिंक गरजांविषयी समतोलपणा दाखवण्याबद्दल समस्या आहे का? किंवा, कुटुंबाचा अर्थसंकल्प, मनोरंजन, सहवास, पत्नीने नोकरी करण्याविषयी किंवा तुम्ही कोठे राहावे त्याबद्दलची समस्या आहे का? समस्या कोणतीही असो, बायबल प्रत्यक्ष नियमांद्वारे किंवा तत्त्वांद्वारे अप्रत्यक्षपणे व्यावहारिक सल्ला देते. (मत्तय १९:४, ५, ९; १ करिंथकर ७:१-४०; इफिसकर ५:२१-२३, २८-३३; ६:१-४; कलस्सैकर ३:१८-२१; तीत २:४, ५; १ पेत्र ३:१-७) दोन्ही सोबती स्वार्थी मागण्या करण्यापासून परावृत्त होऊन त्यांच्या विवाहामध्ये पूर्णपणे प्रीतीचा प्रयोग करू देतात तेव्हा मोठा आनंद होतो. दोन्ही वैवाहिक सोबत्यांनी आवश्यक ते बदल करण्यासाठी व यहोवाच्या मार्गानुसार सर्व काही करण्यासाठी तीव्र इच्छा दर्शवली पाहिजे. “जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य.”—नीतिसूत्रे १६:२०.
युवकांनो—देवाच्या वचनाचे ऐका
१३. ख्रिस्ती तरुणांसाठी यहोवा आणि त्याच्या वचनावर दृढ विश्वासासह वाढणे इतके सोपे का नाही?
१३ हे दुष्ट जग ख्रिस्ती युवकांच्या भोवती असताना विश्वासात मजबूत असे वाढत जाणे त्यांच्यासाठी इतके सोपे नाही. त्याचे एक कारण म्हणजे, “सगळे जग त्या दुष्टाला,” दियाबल सैतानाला “वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) वाईट गोष्टी चांगल्या असल्याप्रमाणे दाखवण्यात पटाईत असलेल्या या दुष्ट शत्रूचे हल्ले युवकांवर होत असतात. मीपणाची मनोवृत्ती, स्वार्थी ध्येये, अनैतिक आणि क्रूर गोष्टींबद्दलची ओढ व सुखविलासाचा असामान्य पाठलाग—या सर्व गोष्टी बायबलमध्ये ज्याचे ‘आज्ञा मोडणाऱ्या लोकांत कार्य करणारा आत्मा’ असे वर्णन केले आहे तो, एकाच, वर्चस्वी विचारसरणीखाली येतो. (इफिसकर २:१-३) सैतानाने अतिशय धूर्तपणे शालेय पाठ्यपुस्तके, उपलब्ध असलेले बहुतेक संगीत, क्रीडा आणि मनोरंजनाचे इतर प्रकार यांमध्ये या ‘आत्म्याला’ प्रवृत्त केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना यहोवावर आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवून वाढत राहण्यास मदत करून अशा प्रभावांचा प्रतिकार करण्यास जागृत असले पाहिजे.
१४. तरुण जन कशाप्रकारे ‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळू’ शकतात?
१४ पौलाने त्याचा तरुण सोबती तीमथ्य याला पित्यासमान सल्ला दिला: “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांति ह्यांच्या पाठीस लाग.” (२ तीमथ्य २:२२) ‘तरुणपणाच्या सर्वच वासना’ वाईट नसल्या, तरी तरुणांनी त्यांच्यापासून ‘दूर पळाले’ पाहिजे म्हणजेच, त्यांनी या गोष्टींमध्ये इतके व्यग्र होऊ नये की त्यांना ईश्वरी गोष्टींचा पाठलाग करण्यासाठी फार कमी वेळ किंवा वेळच राहणार नाही. शरीरसौष्ठव, क्रीडा, संगीत, करमणूक, छंद आणि पर्यटन हे सर्व चुकीचे नसले तरी, जीवनामध्ये या सर्वात प्रमुख गोष्टी झाल्या तर त्या पाश ठरू शकतात. निरर्थक संभाषण, आळशीपणे भटकत राहणे, लैंगिकतेमध्ये असामान्य आवड, रिकामटेकडे बसून कंटाळा येऊ देणे आणि तुमचे पालक तुम्हाला समजू शकत नाहीत याविषयी कुरकूर करत राहणे यापासून पूर्णपणे अलिप्त राहा.
१५. तरुणांना दुहेरी जीवन जगण्यास हातभार लावील अशा कोणत्या गोष्टी घरातील एकांतवासात घडू शकतात?
१५ तुम्ही घरात एकांतात असता, तेव्हा देखील तुम्हा तरुणांसाठी कदाचित धोका दडून बसलेला असेल. अनैतिक किंवा हिंसात्मक टी. व्ही कार्यक्रम आणि व्हिडिओ पाहत राहिल्यास, वाईट गोष्टी करण्याची इच्छा बिंबवली जाऊ शकते. (याकोब १:१४, १५) बायबल सल्ला देते: “अहो परमेश्वरावर [यहोवा] प्रीति करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा.” (स्तोत्र ९७:१०; ११५:११) यहोवाला दुहेरी जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे लोक माहीत होतात. (नीतिसूत्रे १५:३) ख्रिस्ती युवकांनो, तुमच्या खोलीत सर्वत्र नजर टाका. खेळ किंवा संगीताच्या दुनियेतील अनैतिक तारकांचे चित्र भिंतींवर तुम्ही टांगले आहेत, की चांगल्या गोष्टींचे स्मरण करून देणाऱ्या हितकारक गोष्टी तुम्ही प्रदर्शित केल्या आहेत? (स्तोत्र १०१:३) तुमच्या कपाटात विनयशील कपडे आहेत की काही कपडे या जगाची वस्त्रपद्धत प्रतिबिंबित करणारे आहेत? वाईट गोष्टी काय आहेत याची केवळ झलक पाहण्यासाठी तुम्ही मोहात पडला तर दियाबल धूर्त मार्गांनी तुम्हाला जाळ्यात अडकवू शकतो. बायबल सुज्ञपणे सल्ला देते: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
१६. एखाद्या युवकाच्या नजरेत महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व व्यक्तींनी त्याचा अभिमान बाळगावा यासाठी बायबलचा सल्ला त्याची कशी मदत करू शकतो?
१६ बायबल तुम्हाला तुमच्या सहवासाविषयी देखील दक्ष असण्यास सांगते. (१ करिंथकर १५:३३) तुमचे सोबती यहोवाचे भय धरणारे असले पाहिजेत. समवयस्कांच्या दबावाला बळी पडू नका. (स्तोत्र ५६:११; नीतिसूत्रे २९:२५) तुमच्या देवभोळ्या पालकांच्या अधीन राहा. (नीतिसूत्रे ६:२०-२२; इफिसकर ६:१-३) मार्गदर्शन आणि उत्तेजनासाठी वडिलांकडे जा. (यशया ३२:१,२) तुमचे मन आणि लक्ष आध्यात्मिक मूल्यांवर व ध्येयांवर ठेवा. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी व मंडळीच्या कार्यांमध्ये भाग घेण्यासाठी संधी पाहा. स्वतःच्या हातांनी काही करण्यास शिका. विश्वासात दृढ आणि निरोगी व्हा, मग तुम्ही कोणीतरी—यहोवाच्या नवीन जगात जीवनास पात्र असलेला कोणीतरी आहात हे शाबीत करून द्याल! आपल्या स्वर्गीय पित्याला तुमचा अभिमान वाटेल, तुमचे पार्थिव पालक तुमच्यामुळे आनंदी होतील आणि तुमचे ख्रिस्ती बंधू आणि भगिनी तुमच्यामुळे उत्तेजित होतील. हेच तर महत्त्वाचे आहे!—नीतिसूत्रे ४:१, २, ७, ८.
१७. यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवणाऱ्यांना कोणते लाभ प्राप्त होतात?
१७ पद्यात स्तोत्रकर्त्याला हे शब्द लिहिण्यास प्रेरणा झाली: “परमेश्वर देव . . . जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य!” (स्तोत्र ८४:११, १२) होय, यहोवा आणि त्याचे वचन बायबल यावर भरवसा ठेवणाऱ्यांना निराशा आणि अपयश नव्हे तर आनंद आणि यश मिळेल.—२ तीमथ्य ३:१४, १६, १७.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ ख्रिश्चनांनी ‘या जगाच्या ज्ञानावर’ त्यांचा विश्वास का ठेवू नये?
◻ एखाद्याच्या मनात शंका येत असल्यास काय केले पाहिजे?
◻ यहोवाच्या मार्गाने सर्वकाही केल्याने कशाप्रकारे विवाहामध्ये यश आणि आनंद मिळतो?
◻ बायबल कशाप्रकारे तरुणांना ‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळण्यास’ मदत करते?
[२३ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती यहोवा आणि त्याच्या वचनाकडे वळतात तर, “जगाचे ज्ञान” मूर्खपण आहे असा विचार करून ते त्याला धिक्कारतात
[२५ पानांवरील चित्रं]
यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवणाऱ्या कुटुंबांना चांगले यश आणि आनंद मिळतो