वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 मार्च पृ. ३२
  • बनायासारखं धाडसी आणि एकनिष्ठ असा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बनायासारखं धाडसी आणि एकनिष्ठ असा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • सर्वकाळसाठी संदेश असलेला व्हिडिओ
    आमची राज्य सेवा—२००५
  • “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • सादोकसारखं धाडसी बना!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 मार्च पृ. ३२

बायबलमधल्या लोकांकडून शिका

बनायासारखं धाडसी आणि एकनिष्ठ असा

बनाया हा दावीद आणि शलमोन राजाच्या काळात जगला. तो एक धाडसी योद्धा होता. तो याजकाचा मुलगा होता. याजकांना सहसा हत्यारं वापरायची गरज पडायची नाही. पण बनाया यहोवाच्या वतीने युद्धांत लढला आणि तो खूप शूर होता. त्याने एकदा कोरड्या हौदात उतरून एका सिंहाला मारून टाकलं. तसंच त्याने एकदा एका धिप्पाड माणसालाही मारून टाकलं. दावीदचा त्याच्यावर इतका विश्‍वास होता, की त्याने त्याला त्याच्या अंगरक्षकांवर नेमलं.—२ शमु. २३:२०-२३.

अबशालोम आणि अदोनियाहने दावीद राजाविरुद्ध बंड केलं तेव्हा बनाया दावीदला एकनिष्ठ राहिला. (२ शमु. ८:१८; १५:१८; १ राजे १:८) दावीद म्हातारा झाला तरी बनायाने त्याची साथ सोडली नाही. दावीदने आपला मुलगा शलमोन याला राजा बनवायला त्याच्याकडे मदत मागितली तेव्हा त्याने तसं केलं. (१ राजे १:३२-४०) इतर जण कसेही वागले तरी बनाया मात्र यहोवाला आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना एकनिष्ठ राहिला.

आपला शत्रू सैतानसुद्धा खूप शक्‍तिशाली आहे. म्हणून त्याच्याशी आणि त्याच्या साथीदारांशी लढायला आपल्याला धाडसाची गरज आहे. तसंच, आपण यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे जगायचा निशश्‍चयसुद्धा केला पाहिजे. (इफिस. ६:११; १ पेत्र ५:८, ९) इतर जण यहोवाला सोडून गेले तरी आपण नेहमी त्याला एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि याची खातरी ठेवली पाहिजे, की तो आपल्याला नक्की आशीर्वाद देईल.—२ शमु. २२:२६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा