सर्वकाळसाठी संदेश असलेला व्हिडिओ
दावीद—त्याने देवावर भरवसा ठेवला? (इंग्रजी) या व्हिडिओचा मुख्य मुद्दा काय आहे? हाच की, दावीदाप्रमाणे आपणही यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. (स्तो. ९१:२) दावीदाच्या जीवनातील मुख्य घटनांचे चित्रण पाहिल्यावर मुलांना व प्रौढांना, त्याने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास मदत होईल. (स्तो. ३१:१४) आपल्याला आणखी लाभ मिळावा म्हणून, या डिव्हिडीमध्ये, “व्हिडिओ कोडे” आणि अनेक “अभ्यास उपक्रम” आहेत.
व्हिडिओ पाहा आणि नंतर कोडे स्वतःच सोडवा: (१) यहोवाने उत्तम राजा का निवडला? (१ शमु. १५:१०, ११, १६:१) (२) यहोवाने दावीदाच्या इतर भावांना का निवडले नाही? (१ शमु. १६:६, ७) (३) शौलाला दावीदाचे वीणा वाजवणे का आवडत होते? (१ शमु. १६:१४-२३) (४) गल्याथ कोण होता? ((१ शमु. १७:४-१०) (५) दावीद गल्याथाबरोबर का लढू इच्छित होता? (१ शमु. १७:२३, २४, ३६, ३७) (६) योनाथान कोण होता? (१ शमु. १४:१) (७) शौल दावीदाचा कडवा शत्रू केव्हा बनला? (१ शमु. १८:२५-२९) (८) दावीदाने शौलाला का ठार मारले नाही? (१ शमु. २६:७-११) (९) शौल कसा मरण पावला? (१ शमु. ३१:१-६) (१०) योनाथानाचा मृत्यू झाला तेव्हा दावीदाची काय प्रतिक्रिया होती? (२ शमु. १:११, १२) (११) यहोवाने दावीदाला काय वचन दिले? (२ शमु. ७:१२, १३, १६) (१२) दावीदाने कोणते गंभीर पाप केले? (२ शमु. ११:१-५, १४-१७) (१३) आपण केलेल्या पापाबद्दल आपल्याला मनापासून पश्चात्ताप झाला आहे, हे दावीदाने कसे दाखवून दिले? (स्तो. ५१) (१४) शलमोनाला लहानपणापासून दावीदाने कोणते धडे दिले? (१ राजे २:१-४; १ इति. २२:६-१३; २८:९, १०) (१५) येशूच्या शासनाचा दावीद, योनाथान आणि तुम्हाला कसा फायदा होईल?—यश. ११:६-९; योहा. ११:२५, २६.
आता जरा या गोष्टीचा विचार करा: दावीदाप्रमाणे व्यक्तिशः तुम्ही देवावर भरवसा असल्याचे कसे दाखवू शकता?
पालकांनो, आपल्या मुलांच्या मनावर, दावीदाप्रमाणे देवावर भरवसा ठेवण्याचे चिरकाल महत्त्व बिंबवा.—स्तो. ५६:११.