वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 मार्च पृ. २-७
  • शिकवण्याचं कौशल्य वाढवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिकवण्याचं कौशल्य वाढवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काळजी असल्याचं दाखवा
  • बायबलमधून शिकवा
  • यहोवाकडे लक्ष वेधा
  • शिकवण्याचं कौशल्य वाढवत राहा
  • बायबल विद्यार्थ्यांना सत्याची बाजू घ्यायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • योग्य मनोवृत्ती असलेल्यांना लवकरात लवकर मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 मार्च पृ. २-७

४-१० मे, २०२६

गीत ५३ करू या तयारी प्रचाराची!

शिकवण्याचं कौशल्य वाढवा

“वचनाची घोषणा कर . . . पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना.”—२ तीम. ४:२.

या लेखात:

आपण कोणत्या तीन मार्गांनी आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवू शकतो ते पाहा.

१. आपण कोणतं कौशल्य वाढवणं गरजेचंय, आणि का? (२ तीमथ्य ४:२) (चित्रसुद्धा पाहा.)

येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “लोकांना शिष्य करा . . . आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” (मत्त. २८:१९, २०) याचा अर्थ, येशूने सगळ्याच ख्रिश्‍चनांना शिकवण्याची आज्ञा दिली आहे. हे खरंय, की यहोवा “योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना त्याच्या जवळ आणतो. आणि स्वर्गदूत आपल्याला अशा लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतात. (प्रे. कार्यं १३:४८; योहा. ६:४४; प्रकटी. १४:६) असं असलं तरी, आपण इतरांना शिकवण्याची आपली जबाबदारी पार पाडणंही खूप गरजेचंय. प्रेषित पौल आणि बर्णबाचं उदाहरण घ्या. इकुन्यातल्या सभास्थानात शिकवत असताना “ते इतक्या प्रभावीपणे बोलले, की पुष्कळ यहुदी आणि ग्रीक लोकांनी विश्‍वास स्वीकारला.” (प्रे. कार्यं १४:१) पौल आणि बर्णबाने आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवलं असेल यात काही शंका नाही. (२ तीमथ्य ४:२ वाचा.) खरंतर, सगळ्याच ख्रिश्‍चनांनी हे कौशल्य वाढवणं खूप महत्त्वाचंय.

पौल सभास्थानात आत्मविश्‍वासाने बोलतोय आणि लोक त्याचं लक्ष देऊन ऐकत आहेत. तसंच, बर्णबा आनंदाने पौलकडे पाहतोय.

शिकवण्याचं कौशल्य वाढवण्याच्या बाबतीत आपण येशूकडून आणि प्रेषित पौल आणि बर्णबासारख्या त्याच्या शिष्यांकडून खूप काही शिकू शकतो (परिच्छेद १ पाहा)


२. कोणत्या कारणांमुळे काही ख्रिश्‍चनांना वाटू शकतं की ते शिकवण्याचं कौशल्य वाढवू शकत नाहीत?

२ काहींना वाटू शकतं, की त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना शिकवण्याचं कौशल्य वाढवता येणार नाही. बायबल काळातल्या काही लोकांनाही असंच वाटायचं. (निर्ग. ४:१०; यिर्म. १:६) ज्यांच्याकडे बायबल अभ्यास नाहीत किंवा ज्यांना प्रचारात चांगले अनुभव आले नाहीत त्यांना वाटू शकतं, की त्यांना चांगल्या प्रकारे शिकवता येत नाही. पण प्रत्येक व्यक्‍ती आनंदाचा संदेश चांगल्या प्रकारे ऐकून घेईलच असं नाही. तसंच, लोक आपला संदेश ऐकतील की नाही, हे फक्‍त आपल्या शिकवण्याच्या कौशल्यावरच अवलंबून नसतं. आधी पाहिल्याप्रमाणे यहोवा आणि स्वर्गदूत आपल्याला योग्य मनोवृत्तीच्या लोकांना शोधायला मदत करतात. पण तरीसुद्धा, आपण शक्य तितक्या चांगल्या प्रकारे इतरांना आनंदाचा संदेश सांगितला पाहिजे. आपण कोणत्या तीन मार्गांनी असं करू शकतो याबद्दलच आपण या लेखात पाहणार आहोत.

काळजी असल्याचं दाखवा

३. लोकांना येशूकडून शिकून घ्यायला का आवडायचं?

३ बायबलमध्ये असं म्हटलंय, “माणसाच्या मनात काय आहे हे [येशू] ओळखू शकत होता.” (योहा. २:२५) येशू लोकांचे विचार आणि हेतू समजू शकत होता. त्यांना कशाची गरज आहे हे माहीत असल्यामुळे तो त्याच विषयावर त्यांच्याशी बोलायचा. त्या काळात धर्मगुरूंनी लोकांवर बरेच नियम लादून त्यांचं जगणं मुश्‍कील केलं होतं. यामुळे लोकांना चांगल्या मार्गदर्शनाची आणि सांत्वनाची गरज आहे हे येशूला माहीत होतं. (मत्त. ९:३६; २३:४) आणि येशू त्याच्या डोंगरावरच्या उपदेशात याच गोष्टींबद्दल बोलला. लोकांना ज्या गोष्टींची चिंता असायची त्यांबद्दलच येशू बोलायचा म्हणून त्यांना त्याच्याकडून शिकून घ्यायला खूप आवडायचं.

४. आपल्याला लोकांची काळजी असल्याचं आपण कसं दाखवू शखतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

४ लोकांना कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपण समजून घेतो, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतो. सैतानाच्या दुष्ट जगात सगळ्यांनाच काही न्‌ काही समस्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला लोकांना मदत करणं सोपं जाईल. विचार करा, तुम्ही राहता त्या ठिकाणी असं काही घडलंय का, ज्यामुळे लोक खूप चिंतेत आहेत? मुलं शाळेत जातात तेव्हा आईवडिलांना त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते का? लोकांना नोकरी मिळवणं कठीण जातंय का? या गोष्टींचा विचार केल्यामुळे लोकांना या ‘कठीण काळात’ किती समस्यांचा सामना करावा लोगतोय हे आपल्याला समजतं. तसंच, त्यांना बायबलमध्ये दिलेल्या आशेची किती गरज आहे हेही आपल्याला जाणवतं.—२ तीम. ३:१; यश. ६५:१३, १४.

कोलाज: एक बहीण तिच्या क्षेत्रातल्या लोकांचा काळजीपूर्वक विचार करून प्रचाराची तयारी करत आहे. १. एक माणूस एका स्त्रीला आणि तिच्या लहान मुलाला धमकावतोय. आणि त्या स्त्रीने तिच्या मुलाला कुशीत घेतलंय. २. एक तरुण स्त्री सिगारेट ओढत आहे. ३. एक डॉक्टर एका वयस्कर स्त्रीला तिची तब्येत खालावत असल्याचं सांगतोय.

विद्यार्थ्यांची परिस्थिती समजून घ्यायला आणि तुम्हाला त्यांची काळजी आहे हे दाखवायला शिका (परिच्छेद ४ पाहा)


५. येशू त्याच्या काळातल्या धर्मगुरूंपेक्षा वेगळा कसा होता? (मत्तय ११:२८-३०)

५ येशूला लोकांची किती काळजी होती, हे लोकांना त्याच्या वागण्या-बोलण्यावरून समजायचं. त्या काळचे धर्मगुरू स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि लोकांशी वाईट वागायचे. पण येशू त्यांच्यापेक्षा खूप वेगळा होता. (मत्त. २३:१३; योहा. ७:४९) तो लोकांशी दयेने आणि आदराने वागायचा. तो “प्रेमळ आणि नम्र” होता. यामुळेच तो एक चांगला शिक्षक बनू शकला. (मत्तय ११:२८-३० वाचा.) येशूसारखंच, आपणही इतरांशी दयेने आणि आदराने वागलं पाहिजे.

६. आपल्याशी वाईट वागणाऱ्‍यांशी आपण दयेने आणि आदराने कसं वागू शकतो?

६ काही लोक कदाचित आपला संदेश ऐकून घेणार नाहीत. तर काही जण आपल्यावर चीडतीलसुद्धा. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? येशूने आपल्याला सांगितलं, की आपण अशांशी बदल्यात वाईट वागू नये. तसंच, त्याने आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन ‘द्वेष करणाऱ्‍यांचं भलं करायला, शाप देणाऱ्‍यांना आशीर्वाद द्यायला आणि अपमान करणाऱ्‍यांसाठी प्रार्थना करायला’ सांगितलं. (लूक ६:२७, २८) लोक आपल्याशी वाईट का वागत आहेत याच्या कारणांकडे आपण लक्ष दिलं तर त्यांच्याशी दयेने वागणं आपल्याला सोपं जाईल. हे खरंय, की काही जणांना खरंच आपला संदेश आवडत नाही. पण काही जणांना कदाचित कुटुंबात काही समस्या असतील किंवा एखाद्या गोष्टीची चिंता असेल म्हणून ते आपला संदेश ऐकत नसतील. तसंच, कदाचित आपण त्यांच्या घरी अशा वेळी गेलो असू जेव्हा ते दुःखी असतील आणि बोलण्याच्या मनःस्थितीत नसतील. परिस्थिती काहीही असो आपलं “बोलणं नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्यासारखं असावं, म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे [आपल्याला] समजेल.” (कलस्सै. ४:६) आपण लोकांच्या भावना आणि गरजा समजून घेतल्या तर लोक आपल्याशी वाईट वागले तरी त्यांच्याशी चांगलं वागायला आणि चांगले शिक्षक बनायला आपल्याला मदत होईल.

बायबलमधून शिकवा

७. येशूने इतरांना शिकवताना देवाच्या वचनावर अवलंबून असल्याचं कसं दाखवलं? (योहान ७:१४-१६)

७ येशूने लोकांना आपल्या मनाच्या गोष्टी शिकवल्या नाहीत. उलट, त्याने नेहमी देवाच्या वचनाचा वापर केला. वचनातल्या गोष्टी ते त्यांच्या जीवनात कशा लागू करू शकतात हे त्याने त्यांना शिकवलं. तसंच, त्याची शिकवण्याची पद्धत सोपी होती. त्यामुळे लोक चांगल्या प्रकारे समजू शकत होते आणि शिकलेले धडे लक्षात ठेवू शकत होते. बायबलमध्ये म्हटलंय, की येशूची “शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क झाले, कारण तो शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्‍तीसारखा त्यांना शिकवत होता.” (मार्क १:२२; “शास्त्रियों की तरह नहीं,” वरची हिंदी स्टडी नोट पाहा.) येशूच्या काळातले शास्त्री लोकांना त्या काळच्या प्रसिद्ध धर्मगुरूंच्या शिकवणी शिकवायचे. पण येशू मात्र शास्त्रवचनांतून लोकांना शिकवायचा. जरा विचार करा, पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात त्याच्या पित्यासोबत होता. त्याच्याकडे अफाट ज्ञान होतं. म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी तो त्याच्या ज्ञानाचा वापर करू शकला असता. पण त्याने तसं केलं का? अजिबात नाही. उलट, तो नेहमी देवाच्या इच्छेबद्दल लोकांना शिकवायचा आणि शास्त्रवचनांवर अवलंबून राहायचा. (योहान ७:१४-१६ वाचा.) खरंच, येशूने शिकवण्याच्या बाबतीत आपल्यासमोर किती चांगलं उदाहरण मांडलंय!

८. प्रेषित पेत्रने येशूचं अनुकरण कसं केलं?

८ येशूचे शिष्यसुद्धा इतरांना शिकवताना देवाच्या वचनाचा वापर करायचे. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्रने दिलेल्या भाषणाचा विचार करा. पेत्र जास्त शिकलेला नव्हता. तरीसुद्धा त्याने शास्त्रवचनांचा वापर करून लोकांना येशूबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या समजावून सांगितल्या. (प्रे. कार्यं २:१४-३७) याचा काय परिणाम झाला? “ज्यांनी त्याचा संदेश आनंदाने स्वीकारला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी जवळजवळ ३,००० जणांची त्यांच्यात भर पडली.”—प्रे. कार्यं २:४१.

९. आपण शिकवताना बायबलचा वापर का केला पाहिजे?

९ फक्‍त बायबलमध्येच लोकांचं जीवन बदलण्याची ताकद आहे. (इब्री ४:१२) म्हणून, आपण शिकवताना नेहमी बायबलचा वापर केला पाहिजे. आपल्याला आपल्या विचारांची नाही, तर “वचनाची घोषणा” करायची आहे. (२ तीम. ४:२) नीतिवचनं २:६ मध्ये म्हटलंय: “यहोवा स्वतः बुद्धी देतो; ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.” आपण जेव्हा बायबलमधून शिकवतो तेव्हा आपण खरंतर यहोवाला बोलू देत असतो. (मला. २:७) बायबलमधले सल्ले कोणत्याही माणसाच्या सल्ल्यांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत हे लोकांना कळावं अशी आपली इच्छा आहे. तसंच, बायबल देवाचं वचन आहे आणि त्यांतले सल्ले लागू केल्यामुळे आपण आपल्या निर्माणकर्त्याला खूश करू शकतो आणि स्वतःही एक आनंदी जीवन जगू शकतो हेही लोकांना कळावं अशी आपली इच्छा आहे.—२ तीम. ३:१६, १७.

१०. आपण विद्यार्थ्याचं लक्ष बायबलकडे कसं वेधू शकतो?

१० बायबल अभ्यास घ्यायची तयारी करत असताना विद्यार्थ्याचं लक्ष बायबलकडे कसं वळवता येईल याचा विचार करा. हे खरंय, की चित्रांमुळे आणि व्हिडिओमुळे बायबलमधल्या गोष्टी समजणं सोपं जातं. पण आपल्या विद्यार्थ्याला हे समजलं पाहिजे, की आपला मुख्य हेतू बायबलचा अभ्यास करणं आहे. म्हणून बायबल अभ्यास करताना, विद्यार्थ्याला मुख्य मुद्दा समजावण्यासाठी वचनांचा वापर करा आणि त्यातून तो काय शिकू शकतो यावर त्याला विचार करायला लावा. तसंच, चित्रांचा आणि व्हिडिओचा वापर करताना त्यांतून कोणती बायबल तत्त्वं शिकायला मिळतात याकडे त्याचं लक्ष वेधा. असं करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त बोलायची किंवा पुस्तकात दिलेली सगळी वचनं वाचायची गरज नाही. उलट, वाचलेल्या प्रत्येक वचनाचा अर्थ समजून घ्यायला विद्यर्थ्याला पुरेसा वेळ द्या. मग असं करण्यासाठी तुम्हाला ते वचन पुन्हा वाचावं लागलं तरी तसं करा. तुम्ही जेव्हा असं कराल, तेव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकाचा, चित्राचा किंवा व्हिडिओचा नाही तर बायबलचा अभ्यास घेत असाल.—१ करिंथ. २:१३.

११-१२. (क) आपण बायबल विद्यार्थ्यांशी सहनशीलतेने कसं वागू शकतो? (प्रेषितांची कार्यं १७:१-४) (चित्रसुद्धा पाहा.) (ख) बायबलबद्दल जास्त माहिती नसलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो?

११ जर बायबल विद्यार्थ्याला एखादा मुद्दा समजणं किंवा त्यावर विश्‍वास ठेवणं कठीण जात असेल तर काय? लक्षात असू द्या, की आपल्याला ‘पूर्ण सहनशीलतेने वचनाची घोषणा’ करायची आहे. सगळेच विद्यार्थी एकसारखी प्रगती करत नाहीत, काहींना शिकलेल्या गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. पौलने जेव्हा थेस्सलनीकामधल्या यहुद्यांना शिकवलं, तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी लगेच समजल्या नाहीत. शास्त्रवचनांमध्ये काय सांगितलं आहे हे पौलला त्यांना वारंवार सांगावं लागलं.—प्रेषितांची कार्यं १७:१-४ वाचा.

१२ आपण जेव्हा विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारतो, तेव्हा आपण त्याला उत्तर द्यायला वेळ दिला पाहिजे. कदाचित आपल्याला खूप बोलायचा मोह होऊ शकतो. पण अशा वेळी आपण तो मोह आवरला पाहिजे. असं करूनसुद्धा आपण सहनशीलता दाखवतो. जेव्हा विद्यार्थी बोलत असतो तेव्हा आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि तो कशा प्रकारे विचार करतो हे समजून घेतलं पाहिजे. मग यहोवा कसा विचार करतो हे समजून घ्यायला आपण विद्यार्थ्यासोबत काही वचनं वाचू शकतो आणि त्यांवर चर्चा करू शकतो. पण काहींना बायबलबद्दल काहीच माहीत नसेल. अशा वेळी आपण त्यांना बायबलची छापील प्रत दाखवू शकतो. तसंच, आपण त्यांना नवे जग भाषांतर च्या सुरूवातीला असलेला “देवाच्या वचनाबद्दल थोडी माहिती” हा विषय दाखवू शकतो. त्यावरून त्यांना समजेल, की बायबलमध्ये कितीतरी विषयांवर माहिती मिळू शकते. याचं एक उदाहरण देण्यासाठी आपण त्यांना प्रश्‍न १५ दाखवू शकतो. त्या खाली दिलेली काही वचनं वाचल्यावर विद्यार्थ्याला समजेल, की आनंदी राहण्यासाठी बायबलमध्ये किती चांगली माहिती मिळते. थोडक्यात, बायबल किती मौल्यवान आहे हे जेव्हा आपण विद्यार्थ्याला दाखवतो, तेव्हा त्याला शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करायला आणि आणखी शिकून घ्यायला मदत होते.

मागच्या चित्रात दाखवलेली प्रचाराची तयारी करणारी बहीण, सिगारेट ओढत असलेल्या त्या तरुण स्त्रीचा बायबल अभ्यास घेत आहे. ती स्त्री बोलत असताना बहीण लक्ष देऊन ऐकत आहे.

एक कुशल शिक्षक जास्त बोलणारा नाही तर लक्ष देऊन ऐकणारा असतो (परिच्छेद ११-१२ पाहा)


यहोवाकडे लक्ष वेधा

१३. शिकवताना आपण विद्यार्थ्याचं लक्ष कोणाकडे वेधलं पाहिजे? उदाहरण द्या.

१३ विद्यार्थ्याने यहोवाला जाणून घ्यावं आणि त्याच्यासोबत मैत्री करावी हेच आपलं ध्येयं असतं. (याको. ४:८) एका उदाहरणाचा विचार करा. जेव्हा आपण अंधारात एखाद्याला रस्ता दाखवतो, तेव्हा आपण टॉर्चचा प्रकाश कुठे पाडतो? स्वतःवर की रस्त्यावर? नक्कीच रस्त्यावर. त्याच प्रकारे बायबल अभ्यास घेताना आपण विद्यार्थ्याचं लक्ष स्वतःकडे नाही, तर यहोवाकडे वेधलं पाहिजे.

१४. आपण विद्यार्थ्याला यहोवाला खूश करायला कशी मदत करू शकतो?

१४ तुमच्या विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला शिकवा. असं केल्यामुळे त्यांना नेहमी यहोवाला खूश करावसं वाटेल. (नीति. २७:११) विद्यार्थ्याने चांगल्या गोष्टी फक्‍त यहोवाचा साक्षीदार बनायला नाही, तर यहोवाला खूश करायला केल्या पाहिजेत हे आपण त्याला शिकवलं पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? जर विद्यार्थ्याला एखादी चुकीची सवय सोडणं कठीण जात असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता: “यहोवाला ही गोष्ट का आवडत नाही? जर ती गोष्ट आपल्या आवडीची असेल तरी यहोवा आपल्याला ती का सोडायला सांगतो? यावरून यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्याचं कसं कळतं?” आपण आपल्या विद्यार्थ्याला यहोवाबद्दल जितकं जास्त विचार करायला लावू तितकं जास्त यहोवा किती प्रेमळ देव आहे हे त्याला समजेल. आणि यामुळे त्याला यहोवाला मनापासून खूश करावसं वाटेल.

शिकवण्याचं कौशल्य वाढवत राहा

१५. आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवायला काय करू शकतो?

१५ आपण बायबल अभ्यास कसा घेतो आणि आपण आपलं कौशल्य आणखी कसं वाढवू शकतो, हे समजायला यहोवाकडे मदत मागा. (१ योहा. ५:१४) मग यहोवा पुरवत असलेली मदत स्वीकारा. हे आपण कसं करू शकतो? सभांमधून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाचा आपण पूर्ण फायदा घेऊ शकतो. तसंच, शिकवण्यात कुशल असलेल्या भाऊबहिणींना आपण आपल्या बायबल अभ्यासाला घेऊन जाऊ शकतो. आणि आपल्याला कुठे सुधार करायची गरज आहे हे त्यांना विचारू शकतो. आपण हे लक्षात ठेवू शकतो, की आपल्याला जरी एखादा विषय खूप चांगल्या प्रकारे माहीत असला, तरी आपल्या विद्यार्थ्याला तो माहीत नाही. म्हणून आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवलं पाहिजे आणि त्या माहितीचा त्याला किती फायदा होऊ शकतो हे सांगितलं पाहिजे. असं केल्यामुळे विद्यार्थ्याला यहोवाशी मैत्री करता येईल आणि खरा आनंद मिळवता येईल.—स्तो. १:१-३.

१६. शिकवण्याचं कौशल्य वाढवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

१६ दुसऱ्‍यांना यहोवाबद्दल शिकवल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि हे काम आपल्याला नवीन जगातसुद्धा करायचंय. म्हणून आपण आतापासूनच शिकवण्याचं आपलं कौशल्य वाढवलं पाहिजे. तर चला, आनंदाचा संदेश सांगत असताना आपण नेहमी लोकांबद्दल काळजी असल्याचं दाखवू या, शिकवताना बायबलचा वापर करू या आणि विद्यार्थ्याचं लक्ष यहोवाकडे वेधू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण लोकांबद्दल काळजी असल्याचं कसं दाखवू शकतो?

  • शिकवताना बायबलचा वापर कसा करू शकतो?

  • विद्यार्थ्याचं लक्ष यहोवाकडे कसं वेधू शकतो?

गीत ६५ प्रगती करू या!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा