वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 नोव्हेंबर पृ. ३०
  • अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी मदत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी मदत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • स्त्रियांची सुरक्षा​—याबद्दल देवाला काय वाटतं?
    आणखी विषय
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
    जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 नोव्हेंबर पृ. ३०
एक बहीण एका स्त्रीला “स्त्रियांची सुरक्षा—याबद्दल देवाला काय वाटतं?” या लेखाची प्रत देत आहे.

अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी मदत

“जगभरात लाखो स्त्रियांचं आणि मुलींचं शोषण केलं जातं आणि त्यांना वाईट वागणूक दिली जाते. तुम्हालाही कधी याचा सामना करावा लागलाय का? तुम्हाला हे जाणून खूप बरं वाटेल, की तुम्ही सुरक्षित राहावं असं देवाला वाटतं. पण त्याला तसं का वाटतं? आणि स्त्रियांना वाईट वागणूक दिली जाते त्याबद्दल तो काय करेल हे जाणून घ्या.”

या शब्दांनी jw.org वर असलेल्या “स्त्रियांची सुरक्षा—याबद्दल देवाला काय वाटतं?” या लेखाची सुरुवात होते. या लेखाच्या शेवटी एक लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो लेख डाऊनलोड करू शकता. मग तुम्ही तो लेख प्रिंट करून त्याची एक पत्रिका बनवू शकता. अमेरिकेत राहणाऱ्‍या स्टेसी नावाच्या बहिणीला असं केल्यामुळे चांगला अनुभव आला. ती म्हणते: “मी त्या लेखाच्या काही प्रती प्रिंट केल्या. मग मी एका बहिणीसोबत आमच्या प्रचार क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या शिबिरात (ज्या स्त्रिया बेघर आहेत आणि ज्यांच्यावर अत्याचार होतो त्यांना इथे काही काळसाठी आश्रय दिला जातो) त्या प्रती घेऊन गेले.”

तिथे काम करणाऱ्‍या एका स्त्रीने आपल्या बहिणींना विचारलं, की त्या शिबिरात राहणाऱ्‍या इतर स्त्रियांना देण्यासाठीही तिला काही पत्रिका मिळतील का. याचा परिणाम म्हणजे, आणखी ४० पत्रिका आणि ३० संपर्क कार्ड वाटण्यात आले. पुढच्या भेटीत, शिबिराच्या मॅनेजरने बहिणींना त्या शिबिरात राहणाऱ्‍या स्त्रियांना बायबल अभ्यास कसा चालवला जातो हे दाखवायची विनंती केली.

स्टेसीला आणि आणखी दोन बहिणींना दुसऱ्‍या एका शिबिरातही असेच चांगले अनुभव आले. तिथे त्यांनी त्या पत्रिकेच्या पाच प्रती दिल्या आणि आणखी प्रतींचीही त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. तिथल्या एका कर्मचाऱ्‍याने म्हटलं: “आम्हाला याची खूप गरज आहे. इथे राहणाऱ्‍या स्त्रियांना याचा खरंच फायदा होईल.” पुढच्या भेटीत, बायबल अभ्यास कसा चालवला जातो हे पाहायला बऱ्‍याच जणी जमल्या आणि त्यांच्यातल्या दोघींनी तर आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेला यायची इच्छाही व्यक्‍त केली.

स्टेसी म्हणते: “या लेखामुळे स्त्रियांना इतका फायदा झाला हे पाहून खरंच खूप छान वाटलं. अत्याचार झालेल्या स्त्रियांना या लेखाच्या प्रिंटेड प्रती देऊन राज्याचा संदेश सांगणं एक अनोखा मार्ग आहे. या लेखामुळे स्त्रियांना किती आनंद झाला हे पाहणं आमच्यासाठी खूप खास होतं. या स्त्रियांना आनंदाचा संदेश सांगत राहायचा आम्ही निश्‍चय केलाय आणि यहोवा आमच्या मेहनतीवर कसा आशीर्वाद देईल हे पाहायला आम्ही उत्सुक आहोत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा