वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 नोव्हेंबर पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • दोन विक्राळ श्‍वापदांबरोबर लढत देणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 नोव्हेंबर पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

यहोवा लवकरच राष्ट्रांच्या मनात कोणता “विचार” घालणार आहे?

मोठ्या संकटाच्या सुरुवातीला काय होईल याबद्दल प्रकटीकरण १७:१६, १७ मध्ये असं म्हटलंय: “दहा शिंगं आणि तू पाहिलेला जंगली पशू हे वेश्‍येचा तिरस्कार करतील. ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील. कारण, देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं; हो, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपलं राज्य जंगली पशूला देण्याद्वारे त्यांचा जो एकच विचार आहे तो पूर्ण करावा, असं देवाने त्यांच्या मनात घातलं.” राष्ट्रं खोट्या धर्माचा नाश करतील हा “विचार” यहोवा त्यांच्या मनात घालेल असं आपल्या प्रकाशनांमध्ये आधी सांगण्यात आलं होतं.

पण आपली ही समज सुधारण्याची गरज आहे. यहोवा राष्ट्रांच्या मनात जो “विचार” घालणार आहे तो म्हणजे, राष्ट्रांनी “आपलं राज्य जंगली पशूला” द्यावं. ही भविष्यवाणी कशी पूर्ण होईल हे समजण्यासाठी आपण काही प्रश्‍नांवर विचार करू या.

या भविष्यवाणीतली महत्त्वाची पात्रं कोणती आहेत? ‘वेश्‍येला’ “मोठी बाबेल” सुद्धा म्हणण्यात आलंय. ती खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला सूचित करते. ‘गडद लाल रंगाचा जंगली पशू’ संयुक्‍त राष्ट्राला सूचित करतो. या संघटनेचा उद्देश जगात शांती टिकवून ठेवणं आहे. १९१९ मध्ये ही संघटना स्थापित करण्यात आली तेव्हा तिला ‘राष्ट्र संघ’ म्हटलं जायचं. (प्रकटी. १७:३-५) “दहा शिंगं” म्हणजे, जंगली पशूला साथ देणारी सरकारं.

वेश्‍येचा आणि गडद लाल रंगाच्या जंगली पशूचा एकमेकांशी काय संबंध आहे? वेश्‍या जंगली पशूवर बसलेली आहे. ती त्या पशूला पाठिंबा देते आणि त्याच्यावर नियंत्रण करते.

वेश्‍येचं काय होईल? जंगली पशू आणि त्याला साथ देणारी दहा शिंगं, “वेश्‍येचा तिरस्कार करतील.” म्हणून ते तिची मालमत्ता लुटतील आणि तिचा दुष्टपणा उघडकीस आणतील. असं करून तिचा पूर्णपणे नाश करायचा यहोवाचा उद्देश ते पूर्ण करतील. (प्रकटी. १७:१; १८:८) अशा प्रकारे सगळ्या खोट्या धार्मिक संघटनांचा अंत होईल. पण, हे होण्याआधी मानवी सरकारांच्या इतिहासात आतापर्यंत झाली नाही अशी एक गोष्ट यहोवा राष्ट्रांना करायला लावेल.

यहोवा राष्ट्रांना काय करायला लावेल? यहोवा दहा शिंगांच्या म्हणजेच राष्ट्रांच्या मनात “आपला विचार” घालेल. तो विचार काय असेल? राष्ट्रांनी “जंगली पशूला [संयुक्‍त राष्ट्राला] आपलं सामर्थ्य आणि अधिकार” द्यावा हा तो विचार असेल. (प्रकटी. १७:१३) मग याचा अर्थ असा होतो का, की मानवी सरकारं आपलं सामर्थ्य आणि अधिकार जंगली पशूच्या हाती सोपवण्याचा स्वतःहून विचार करतील? नाही. तर यहोवा त्यांना तसं करायला लावेल हे आपल्याला भविष्यवाणीतून दिसून येतं. (नीति. २१:१; यशया ४४:२८ सोबत तुलना करा.) हा बदल हळूहळू घडून येणार नाही, तर अचानक होईल. मग जंगली पशू आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा आणि सामर्थ्याचा वापर करून यहोवाच्या इच्छेप्रमाणे सगळ्या खोट्या धार्मिक संघटनेंचा कायमचा नाश करून टाकेल.

आपण कशाची अपेक्षा करू शकतो? आपण अशी अपेक्षा करू नये, की मानवी सरकारं हळूहळू संयुक्‍त राष्ट्राला आधीपेक्षा जास्त पाठिंबा देत असल्याचं आपल्याला बातम्यांमध्ये ऐकायला मिळेल. उलट, राष्ट्रांनी त्यांचं सामर्थ्य जंगली पशूच्या हाती द्यावं हा विचार यहोवा अचानक त्यांच्या मनात घालेल. आणि असं जेव्हा घडून येईल तेव्हा मोठं संकट सुरू होणारच आहे हे आपल्याला समजेल. तोपर्यंत आपण “जागं आणि सावध” राहू या, कारण अचानक होणारे हे बदल आपण लवकरच पाहणार आहोत!—१ थेस्सलनी. ५:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा