वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 जुलै पृ. ३१
  • तुम्हाला माहीत होतं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होतं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 जुलै पृ. ३१
याजक मंदिराच्या वेदीवर प्राण्यांची बलिदानं अर्पण करत आहेत.

तुम्हाला माहीत होतं का?

यरुशलेममधले याजक वेदीवर बलिदान दिल्यावर प्राण्यांच्या रक्‍ताचं काय करायचे?

प्राचीन इस्राएलमधले याजक दरवर्षी मंदिराच्या वेदीवर हजारो प्राण्यांचं बलिदान द्यायचे. पहिल्या शतकातले यहुदी इतिहासकार जोसिफस यांनी सांगितल्याप्रमाणे वल्हांडणाच्या दिवशी २,५०,००० पेक्षा जास्त कोकरांचं बलिदान दिलं जायचं. त्यामुळे साहजिकच बरंच रक्‍त वाहिलं जायचं. (लेवी. १:१०, ११; गण. २८:१६, १९) मग या रक्‍ताचं काय व्हायचं?

पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी हेरोदने बांधलेल्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात उत्खनन केलं. तेव्हा त्यांना तिथे गटारं सापडली. ती गटारं इ.स. ७० मध्ये मंदिराचा नाश होईपर्यंत वापरली जात होती. असं दिसतं की मंदिरात दिल्या जाणाऱ्‍या प्राण्यांच्या बलिदानांचं रक्‍त या गटारांमधून बाहेर सोडलं जायचं. आणि ही गटारं फक्‍त यासाठीच वापरली जायची.

या गटारांबद्दल दोन गोष्टींचा विचार करा:

  • वेदीखाली असलेली छिद्रं: वेदीच्या तळाला असलेल्या गटारांबद्दलचं वर्णन तिसऱ्‍या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मिशना नावाच्या पुस्तकातही आहे. या पुस्तकात यहुदी नियमांबद्दल आणि परंपरांबद्दल सांगण्यात आलंय. त्यात लिहिलंय: “वेदीच्या दक्षिण-पश्‍चिम कोपऱ्‍याला दोन छिद्रं होती. . . . वेदीच्या दक्षिण आणि पश्‍चिम भागातून आलेलं रक्‍त आणि वेदी साफ केलेलं पाणी या छिद्रांतून बाहेर पडायचं. मग हे सगळं गटारांतून किद्रोन खोऱ्‍यात सोडलं जायचं.”

    पुरातत्वशास्त्रज्ञ मान्य करतात की रक्‍त वाहू देण्यासाठी प्राचीन काळात ‘छिद्रांचा’ वापर केला जायचा. द कॅमब्रिज हिस्ट्री ऑफ जुडाइजम या पुस्तकातून अशा प्रकारच्या गटारांचा वापर होत असल्याची खातरी मिळते. या पुस्तकात म्हटलंय: “मंदिरात दिल्या जाणाऱ्‍या प्राण्यांच्या रक्‍तासोबत मिसळलेलं पाणी बाहेर सोडण्यासाठी कदाचित या गटारांचा वापर होत असावा.”

  • भरपूर पाणी पुरवठा: वेदी आणि गटार स्वच्छ ठेवण्यासाठी याजकांना भरपूर पाणी लागायचं. हे महत्त्वाचं काम करायला याजकांना शहरातून सतत भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा मिळायचा. हे पाणी त्यांना पाटांतून, जलवाहिन्यांतून, विहिरींतून आणि तलावांतून पुरवलं जायचं. जोसफ पॅट्रिक हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणतात: “अशा प्रकारचा पाणी पुरवठा, तसंच स्वच्छता राखण्यासाठी आणि घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी असलेली व्यवस्था त्या काळात दुसऱ्‍या कोणत्याच मंदिरात नव्हती.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा