अभ्यासासाठी टीप
शिका आणि सांगा
बायबलमधून नवीन गोष्टी शिकून घेतल्यामुळे आपल्याला खूप आनंद होतो. पण जेव्हा आपण शिकलेल्या नवीन गोष्टी इतरांना सांगतो, तेव्हा आपल्याला आणखी आनंद होतो. नीतिवचनं ११:२५ म्हणतं: “जो दुसऱ्यांची तहान भागवतो, त्याचीही तहान भागवली जाईल.”
आपण जेव्हा शिकलेल्या नवीन गोष्टी इतरांना सांगतो, तेव्हा ते मुद्दे आपल्या सहज लक्षात राहतात आणि त्याबद्दलची आपली समजही वाढते. तसंच, त्या गोष्टींचा इतरांना फायदा होत असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी त्यांना सांगायला आनंद होतो.—प्रे. कार्यं २०:३५.
हे करून पाहा: येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला शिकायला मिळालेली गोष्ट इतरांना सांगायची संधी शोधा. तुम्ही ती तुमच्या कुटुंबातल्या सदस्याला, मंडळीतल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला, कामावरच्या सोबत्याला, वर्गसोबत्याला, शेजाऱ्याला किंवा प्रचारात भेटणाऱ्या व्यक्तीला सांगू शकता. ती माहिती तुमच्या शब्दांत, सोप्या पद्धतीने आणि स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा: शिकलेल्या नवीन गोष्टी इतरांना सांगण्यामागचा तुमचा हेतू त्यांच्यावर छाप पाडण्याचा नाही, तर त्यांना प्रोत्साहन देण्याचा असावा.—१ करिंथ. ८:१.