वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 जुलै पृ. १४-१९
  • मोहात पडू नये म्हणून सावध राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोहात पडू नये म्हणून सावध राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्या परिस्थितींमध्ये आपण सावध असलं पाहिजे?
  • आपण सावध कसं राहू शकतो?
  • नेहमी सावध राहा
  • सावध राहिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद
  • तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कसा कराल मोहाचा सामना?
    सावध राहा!—२०१५
  • बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 जुलै पृ. १४-१९

अभ्यास लेख २९

गीत १२७ यहोवाला हवं तसं मी बनेन!

मोहात पडू नये म्हणून सावध राहा

“मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.”​—मत्त. २६:४१.

या लेखात:

पाप आणि पाप करायला प्रवृत्त करणाऱ्‍या गोष्टी टाळणं का गरजेचंय हे समजून घ्या.

१-२. (क) येशूने त्याच्या शिष्यांना कोणता इशारा दिला? (ख) येशूचे शिष्य त्याला सोडून का गेले? (चित्रंसुद्धा पाहा.)

“मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”a (मत्त. २६:४१ख) या शब्दांवरून येशूने दाखवून दिलं की त्याला आपल्या अपरिपूर्ण स्थितीची जाणीव आहे. तसंच, त्याच्या या शब्दांमध्ये एक ताकीदही आहे. ती म्हणजे, आपल्या हातून कधीच पाप घडणार नाही असा आत्मविश्‍वास आपण कधीच बाळगू नये. येशूने हे शब्द म्हटले त्याच्या काही तासांआधी शिष्यांनी वचन दिलं होतं की ते त्याला कधीच सोडून जाणार नाही. (मत्त. २६:३५) त्यांना योग्य तेच करायचं होतं, पण कठीण परिस्थिती आल्यावर ते किती सहजासहजी कमजोर पडतील हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. म्हणून येशूने त्यांना ताकीद दिली: “मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.”​—मत्त. २६:४१क.

२ मग जेव्हा येशूला अटक करण्यात आली, तेव्हा ते त्याच्यासोबत राहिले की पळून जायच्या मोहाला बळी पडले? दुःखाची गोष्ट म्हणजे येशूचे शिष्य सावध राहायला चुकले. ते जे बोलले त्याच्या अगदी उलट त्यांनी केलं. ते त्याला सोडून पळून गेले.​—मत्त. २६:५६.

कोलाज: येशू आणि त्याचे प्रेषित रात्रीच्या वेळी गेथशेमाने बागेत आहेत. १. येशू त्याच्या प्रेषितांशी बोलतोय. २. प्रेषित झोपतात. ३. येशूला अटक करण्यात येते, तेव्हा प्रेषित पळून जातात.

येशूने आपल्या शिष्यांना सावध राहून मोहापासून स्वतःचं रक्षण करायला सांगितलं होतं. पण ते त्याला सोडून गेले (परिच्छेद १-२ पाहा)


३. (क) यहोवाला एकनिष्ठ राहायचं असेल, तर आपल्या हातून कधीच चूक होणार नाही असा आत्मविश्‍वास आपण का बाळगू नये? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

३ आपल्या हातून कोणतंच पाप घडणार नाही, असा आपण विचार करू नये. हे खरंय की आपण यहोवाला खूश करण्याचा निश्‍चय केलाय, पण आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपण मोहाला सहज बळी पडू शकतो. (रोम. ५:१२; ७:२१-२३) आपल्यासमोर अचानक अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जेव्हा चुकीची गोष्ट बरोबर आहे असं आपल्याला वाटेल. पण यहोवा आणि त्याचा मुलगा येशू यांना जर एकनिष्ठ राहायचं असेल तर पाप करायच्या मोहापासून सावध राहा या येशूच्या सल्ल्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि हा लेख आपल्याला तसं करायला मदत करेल. सगळ्यात आधी आपण कोणत्या परिस्थितींमध्ये  सावध असलं पाहिजे यावर चर्चा करू या. मग मोहापासून कसं  सावध राहू शकतो यावर चर्चा करू या. आणि शेवटी आपण नेहमी  सावध कसं राहू शकतो ते पाहू या.

कोणत्या परिस्थितींमध्ये आपण सावध असलं पाहिजे?

४-५. म्हणावं तितकं गंभीर नसलेल्या पापाबद्दलही आपण सावध का असलं पाहिजे?

४ काही पापं म्हणावी तितकी गंभीर नसतील, पण त्यामुळेसुद्धा यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर होऊ शकतं. इतकंच काय तर यामुळे आपण गंभीर पापं करायलासुद्धा प्रवृत्त होऊ शकतो.

५ आपल्या सगळ्यांनाच पाप करायच्या मोहाचा सामना करावा लागू शकतो. पण आपल्या प्रत्येकामध्ये कोणती न कोणती कमजोर कडी असते. म्हणून काही गोष्टींमुळे खासकरून आपल्याला चुकीची गोष्ट करायचा मोह होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती अनैतिक लैंगिक कृत्याच्या मोहाचा सामना करत असेल. दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीचा हस्तमैथून किंवा पोर्नोग्राफी पाहणं यांसारख्या अशुद्ध गोष्टी करण्याकडे जास्त कल असेल. किंवा कदाचित काहींना माणसांची भीती, स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची ओढ किंवा तापट स्वभाव यांसारख्या गोष्टींसोबत झगडावं लागत असेल. आणि याकोबनेसुद्धा म्हटलं, की “प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे  ओढला जाऊन भुलवला जातो तेव्हा परीक्षेत पडतो.”​—याको. १:१४.

६. आपण कोणत्या बाबतीत प्रामाणिक असलं पाहिजे?

६ तुम्ही  कोणत्या बाबतीत मोहाला सहज बळी पडू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? स्वतःच्या कमतरतांना नाकारून किंवा माझ्या हातून काहीच चुकीचं होणार नाही असा विचार करून आपण स्वतःला फसवत असतो. (१ योहा. १:८) पौलने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं की “ज्यांच्याकडे देवाने ठरवलेल्या पात्रता आहेत” ते जर सावध राहिले नाहीत तर ते मोहाला बळी पडू शकतात. (गलती. ६:१) म्हणून आपण स्वतःसोबत प्रामाणिक असलं पाहिजे आणि ज्या कमतरतांमुळे आपण मोहाला बळी पडू शकतो त्या मान्य केल्या पाहिजेत.—२ करिंथ. १३:५.

७. आपण कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे? समजावून सांगा.

७ आपण कोणत्या बाबतीत मोहाला सहज बळी पडू शकतो हे एकदा आपल्याला कळलं, तर मग काय? त्याबाबतीत या मोहांचा सामना करण्यासाठी स्वतःला बळकट करा. उदाहरणार्थ, बायबल काळात, शहराच्या भिंतींचा सगळ्यात असुरक्षित भाग म्हणजे त्यांची फाटकं होती. आणि म्हणून त्या फाटकांवर जबरदस्त पहारा असायचा. त्याचप्रमाणे आपणसुद्धा सहज मोहाला बळी पडू अशा परिस्थितींकडे खास लक्ष दिलं पाहिजे.—१ करिंथ. ९:२७.

आपण सावध कसं राहू शकतो?

८-९. नीतिवचनांच्या ७ व्या अध्यायात सांगितलेला तरुण गंभीर पाप करायचं कसं टाळू शकला असता? (नीतिवचनं ७:८, ९, १३, १४, २१)

८ आपण सावध राहून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो? याबद्दल नीतिवचनांतल्या ७ व्या अध्यायात सांगितलेल्या तरुणाकडून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष देऊ या. त्याने एका वाईट चालीच्या स्त्रीसोबत अनैतिक लैंगिक काम केलं. २२ व्या वचनात म्हटलंय, तो “अचानक” त्या स्त्रीच्या मागे जाऊ लागला. पण आधीच्या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने आधी अशी काही पावलं उचलली होती, ज्यांमुळे खरंतर तो हळूहळू  पाप करायला प्रवृत्त झाला होता.

९ मग तो पाप करायला कशामुळे प्रवृत्त झाला होता? सगळ्यात आधी तो संध्याकाळच्या वेळी “[अनैतिक स्त्रीच्या] घराजवळच्या रस्त्यावरून गेला.” मग तो सरळ तिच्या घराच्या दिशेने चालू लागला. (नीतिवचनं ७:८, ९ वाचा.) त्यानंतर, त्याने त्या स्त्रीला पाहिलं, पण तरी तो मागे वळला नाही. उलट त्याने तिला त्याचं चुंबन घेऊ दिलं आणि आपण वाईट व्यक्‍ती नाही असं भासवण्यासाठी ती त्याला शांती-अर्पणं दिल्याबद्दल जे काही सांगत होती ते तो ऐकत राहिला. (नीतिवचनं ७:१३, १४, २१ वाचा.) जर त्या तरुणाने पाप करायला प्रवृत्त करणारे सगळे धोके टाळले असते, तर तो स्वतःचं मोहांपासून आणि पापापासून संरक्षण करू शकला असता.

१०. आज एखाद्या व्यक्‍तीकडून नीतिवचनांतल्या तरुणासारखीच चूक कशी होऊ शकते?

१० यहोवाच्या कुठल्याही उपासकाच्या हातून काय घडू शकतं, हे शलमोनने लिहिलेल्या या अहवालातून आपल्याला कळतं. तो कदाचित एखाद्या गंभीर पापात पडू शकतो. आणि त्याला वाटेल, की हे सगळं त्याच्याकडून “अचानक” झालं. किंवा तो म्हणेल की हे माझ्याकडून “नकळत घडलं.” पण तरी प्रत्यक्षात काय घडलं याचा जर त्याने विचार केला तर त्याला कदाचित कळेल, की त्याने काही चुकीची पावलं उचलल्यामुळे त्याच्या हातून असं घडलं. यात वाईट संगत, चुकीचं मनोरंजन किंवा ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी अयोग्य असलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष किंवा इंटरनेटवरून पुन्हा-पुन्हा भेट देणं यांसारख्या गोष्टी असतील. यासोबतच त्याने प्रार्थना करणं, बायबल वाचणं, सभांना जाणं, प्रचार करणं हेसुद्धा कदाचित थांबवलं असेल. नीतिवचनांत सांगितलेल्या त्या तरुणाप्रमाणे हे पाप त्याच्या हातून नक्कीच “अचानक” घडलं नसेल.

११. आपल्या हातून पाप घडू नये म्हणून आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

११ यातून आपण काय शिकतो? आपण पाप आणि पापाला प्रवृत्त  करणाऱ्‍या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजेत. त्या तरुण आणि अनैतिक स्त्रीबद्दल सांगितल्यानंतर शलमोन हाच मुद्दा मांडतो. त्या स्त्रीबद्दल सांगताना तो म्हणतो: “तिच्या वाटांकडे  वाहवत जाऊ नकोस.” (नीति. ७:२५) त्याने त्या वाईट चालीच्या स्त्रीबद्दल असंही म्हटलं: “तिच्यापासून लांबच राहा;  तिच्या घराच्या फाटकाजवळही जाऊ नकोस.”  (नीति. ५:३, ८) हो, पापाकडे नेणाऱ्‍या परिस्थितींपासून दूर राहून आपण स्वतःला पाप करण्यापासून वाचवू शकतो.b यात कदाचित अशा गोष्टी टाळणंसुद्धा येऊ शकतं ज्या सहसा एका ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी अयोग्य नसतील, पण त्यामुळे एखादी व्यक्‍ती मोहात पडू शकते किंवा तिच्या हातून पाप होऊ शकतं.​—मत्त. ५:२९, ३०.

१२. ईयोबने कोणता निश्‍चय केला होता आणि त्यामुळे त्याला मोहांपासून सावध राहून स्वतःचं रक्षण करायला कशी मदत झाली? (ईयोब ३१:१)

१२ मोहात पाडणाऱ्‍या परिस्थितींपासून दूर राहण्यासाठी आपणसुद्धा ईयोबसारखाच पक्का निश्‍चय केला पाहिजे. त्याने कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही असा “आपल्या डोळ्यांसोबत करार” केला होता. (ईयोब ३१:१ वाचा.) यामुळे तो व्यभिचार करण्यापासून दूर राहिला. म्हणून आपणही मोहात पाडणाऱ्‍या कोणत्याही परिस्थितीला टाळण्याचा निश्‍चय केला पाहिजे.

१३. आपण आपल्या विचारांचं संरक्षण का केलं पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)

१३ आपण आपल्या विचारांचंसुद्धा रक्षण केलं पाहिजे. (निर्ग. २०:१७) काही जणांना वाटतं की ‘एखाद्या वाईट गोष्टीची कल्पना करत राहण्यात काय वाईट आहे? कारण ती गोष्ट आपण प्रत्यक्षात तर करत नाही.’ पण असा विचार करणं चुकीचं आहे. जी व्यक्‍ती चुकीच्या गोष्टींवर विचार करत राहते ती तिच्या इच्छा तीव्र करत असते. एका अर्थाने ती व्यक्‍ती स्वतःसाठी एक असा मोह तयार करत असते, जिचा तिला आता प्रतिकार करावा लागेल. हे खरं आहे, की आपल्या मनात कधीकधी चुकीचे विचार येऊ शकतात, पण ते लगेच काढून टाकणं आणि चांगल्या गोष्टींवर विचार करणं महत्त्वाचंय. जर असं केलं तर चुकीच्या विचारांना एका तीव्र इच्छेमध्ये रूपांतर होण्यापासून आपण रोखू शकतो. कारण अशा तीव्र इच्छांचा आपल्याला नंतर सामना करणं कठीण होईल. आणि त्यामुळे आपल्या हातून गंभीर पापसुद्धा होऊ शकतं.​—फिलिप्पै. ४:८; कलस्सै. ३:२; याको. १:१३-१५.

कोलाज: १. एक भाऊ रात्री टिव्ही पाहतोय. २. तो कामावर असलेल्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतोय. ३. तो आणि ती स्त्री बारमध्ये ड्रिंक घेत आहेत.

मोहात पाडेल अशी कोणतीही गोष्ट आपण टाळली पाहिजे (परिच्छेद १३ पाहा)


१४. मोहापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो?

१४ मोहापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? आपल्याला याची पक्की खातरी असली पाहिजे की जर आपण यहोवाचे नियम पाळले तर आपला नेहमीच फायदा होईल. कधीकधी आपले विचार आणि इच्छा देवाच्या इच्छेनुसार असाव्यात म्हणून आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. पण शेवटी आपल्याला जी मनाची शांती अनुभवायला मिळेल त्यामुळे आपल्या मेहनतीचं चीज होईल.

१५. मोहापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी योग्य ते करत राहायची इच्छा वाढवल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

१५ आपण योग्य ते करत राहायची इच्छा आपल्यामध्ये वाढवत राहिली पाहिजे. आपण जर “वाइटाचा द्वेष” करायला आणि “चांगल्यावर प्रेम” करायला शिकलो, तर योग्य ते करायचा आणि आपल्याला पापात पाडतील अशा परिस्थितींना टाळायचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल. (आमो. ५:१५) तसंच योग्य ते करत राहायची इच्छा वाढवल्यामुळे मोहात पाडतील अशा परिस्थितींमध्ये जरी आपण सापडलो तरी खंबीर राहायचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल; मग या परिस्थिती आपल्यावर अचानक आल्या असतील किंवा टाळता येत नसतील तरी.

१६. आध्यात्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला सावध राहायला कशी मदत होईल? (चित्रंसुद्धा पाहा.)

१६ योग्य ते करत राहण्याची इच्छा आपण आपल्या मनात कशी वाढवू शकतो? आपण आध्यात्मिक गोष्टीत व्यस्त राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत राहिलं पाहिजे. ख्रिस्ती सभांमध्ये किंवा प्रचारकार्यात आपण असतो, तेव्हा सहजासहजी चुकीचं करायचा मोह आपल्याला होणार नाही. उलट यहोवाला खूश करायची इच्छा आपल्या मनात असेल. (मत्त. २८:१९, २०; इब्री १०:२४, २५) बायबल वाचून, त्याचा अभ्यास करून, त्यावर मनन करून, आपण चांगल्या गोष्टींवरचं प्रेम आणि वाईट गोष्टींबद्दलची घृणा आणखी वाढवत असतो. (यहो. १:८; स्तो. १:२, ३; ११९:९७, १०१) येशूने त्याच्या शिष्यांना काय म्हटलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. त्याने म्हटलं: “मोहात पडू नये म्हणून . . . प्रार्थना करत राहा.” (मत्त. २६:४१) जेव्हा आपण आपल्या पित्याबरोबर प्रार्थनेत वेळ घालवतो, तेव्हा आपण त्याच्या मदतीचा फायदा करून घेत असतो आणि त्याला खूश करायचा निर्धार आणखी पक्का करत असतो.​—याको. ४:८.

आध्यात्मिक गोष्टी नियमितपणे करत राहिल्यामुळे मोहाचा सामना करण्यासाठी लागणारं बळ आपल्याला मिळेल (परिच्छेद १६ पाहा) c


नेहमी सावध राहा

१७. पेत्र बऱ्‍याच वेळा कोणत्या गोष्टीला बळी पडला?

१७ आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपल्यात अशा काही प्रवृत्ती असतील, ज्यांच्यावर आपण पूर्णपणे मात केली असेल. पण अशाही काही प्रवृत्ती असतील ज्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला खूप काळ झगडावं लागू शकतं. प्रेषित पेत्रचं उदाहरण घ्या. तोसुद्धा माणसाच्या भीतीला बळी पडला होता. (मत्त. २६:६९-७५) नंतर त्याने न्यायसभेसमोर धैर्याने साक्ष देऊन त्याच्या भीतीवर मात केली असं वाटलं. (प्रे. कार्यं ५:२७-२९) पण त्याच्या काही वर्षांनंतर “सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे” त्याने विदेशांबरोबर जेवायचं तात्पुरतं थांबवलं. (गलती. २:११, १२) पेत्रची भीती पूर्णपणे गेली नव्हती. कदाचित पेत्रला त्याच्या या भीतीवर कधीच पूर्णपणे मात करता आली नसेल.

१८. काही वाईट सवयींच्या बाबतीत काय होऊ शकतं?

१८ आपल्यावरसुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते. कशी? आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपण त्या कमतरतेवर मात केली. पण त्या कमतरतेमुळे आपण पुन्हा मोहात पडू शकतो. उदाहरणार्थ, एक भाऊ म्हणतो: “मी पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीवर दहा वर्षांपासून मात करायचा प्रयत्न करत होतो. मला याची खातरी पटली होती की मी त्या सवयीवर पूर्णपणे मात केली आहे. पण ही कमतरता माझ्या मनात एका भयानक प्राण्यासारखी दबा धरून बसली होती आणि हल्ला करायची योग्य संधी कधी मिळते याची वाट पाहत होती.” पण चांगली गोष्ट म्हणजे त्याने हार मानली नाही. त्याला याची जाणीव झाली की त्याला दररोज त्या मोहाचा सामना करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील. आणि कदाचित या जगात त्याला आयुष्यभर तसं करावं लागेल. त्याच्या पत्नीच्या आणि वडिलांच्या मदतीने त्याने पोर्नोग्राफीच्या सवयीवर मात करण्यासाठी कडक पावलं उचलली.

१९. ज्या कमतरतांवर आपण पूर्णपणे मात केलेली नाही त्यांचा सामना आपण कसा करू शकतो?

१९ ज्या कमतरतांवर आपण अजून पूर्णपणे मात केलेली नाही, त्यांमुळे आपल्या हातून एखादं गंभीर पाप होणार नाही म्हणून आपण काय करू शकतो? यासाठी आपण मोहांचा प्रतिकार करायला, “जागे राहा” या येशूने दिलेल्या सल्ल्याचं पालन करू शकतो. आपण मोहात पडणार नाही असं जरी तुम्हाला वाटलं, तरी मोहात पाडणाऱ्‍या परिस्थितींना टाळायचा प्रयत्न करत राहा. (१ करिंथ. १०:१२) ज्या गोष्टींमुळे तुम्हाला असं करायला यश मिळालंय, त्या गोष्टी करत राहा. नीतिवचनं २८:१४ म्हणतं: “नेहमी  सावध राहणारा माणूस सुखी असतो.”​—२ पेत्र ३:१४.

सावध राहिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

२०-२१. (क) मोहाचा सामना केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील? (ख) आपण आपली जबाबदारी पार पाडली तर यहोवा आपल्यासाठी काय करेल? (२ करिंथकर ४:७)

२० आपण याची खातरी ठेवू शकतो, की मोहापासून सावध राहण्यासाठी आपण जी मेहनत घेतोय ती कधीच वाया जाणार नाही. “पापाचं क्षणिक सुख” कितीही असलं तरी यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगल्यामुळे मिळणारा आनंद हा त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. (इब्री ११:२५; स्तो. १९:८) कारण आपल्याला यहोवाच्या मार्गांप्रमाणेच जगण्यासाठी बनवण्यात आलंय. (उत्प. १:२७) आपण जर असं केलं, तर आपल्याला शुद्ध विवेकाने जगता येईल आणि कायमच्या जीवनाचा आशीर्वाद मिळेल.​—१ तीम. ६:१२; २ तीम. १:३; यहू. २०, २१.

२१ हे खरंय, की “शरीर दुर्बळ आहे.” पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण लाचार आहोत. कारण आपल्याला लागणारी ताकद पुरवायला यहोवा नेहमी तयार आहे. (२ करिंथकर ४:७ वाचा.) पण लक्षात घ्या, की देव पुरवत असलेलं सामर्थ्य हे असाधारण  आहे. पण जे साधारण सामर्थ्य आहे, ते वापरायची जबाबदारी आपली  आहे. हे सामर्थ्य म्हणजे आपण मोहाचा सामना करण्यासाठी दररोज करत असलेले प्रयत्न. आपण जर आपली जबाबदारी पार पाडली, तर आपण खातरी ठेवू शकतो की आपल्याला गरज असलेली ताकद पुरवण्यासाठी आपण केलेल्या प्रार्थनांचं उत्तर जरूर देईल. (१ करिंथ. १०:१३) खरंच, यहोवाच्या मदतीने आपण मोहांचा प्रतिकार नक्कीच करू शकतो.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण कोणत्या परिस्थितींमध्ये सावध असलं पाहिजे?

  • आपण मोहापासून सावध कसं राहू शकतो?

  • आपण नेहमी सावध का असलं पाहिजे?

गीत ४७ सांगा याहाला सारं

a शब्दांचा अर्थ: मत्तय २६:४१ मध्ये “मन” असं जे म्हटलंय, ती एक अशी प्रेरणा आहे, ज्यामुळे एखादी गोष्ट करायला आपण प्रवृत्त होतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्यात विशिष्ट भावना निर्माण होतात. आणि “शरीर” हा शब्द आपल्या अपरिपूर्ण पापी स्थितीला सूचित करण्यासाठी वापरला आहे. आपल्या मनात कदाचित योग्य ते करायची इच्छा असेल. पण आपण जर सावध नसलो, तर आपण मोहाला बळी पडू आणि बायबल ज्याला चुकीचं म्हणतं ते करून बसू.

b ज्या व्यक्‍तीच्या हातून गंभीर पाप घडलंय, ती कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातला धडा ५७ मुद्दे १-३ आणि नोव्हेंबर २०२० च्या टेहळणी बुरूज अंकात पान २७-२९ वर असलेल्या “नेहमी पुढे पाहत राहा” या लेखातले परिच्छेद १२-१७ पाहू शकते.

c चित्राचं वर्णन: एक भाऊ सकाळी दैनिक वचन वाचतो, दुपारच्या सुट्टीत बायबल वाचतो आणि संध्याकाळी आठवड्यादरम्यानच्या सभेला उपस्थित राहतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा