वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 ऑक्टोबर पृ. १२-१७
  • यहोवाला एकनिष्ठ राहणारे लोक आनंदी असतात!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला एकनिष्ठ राहणारे लोक आनंदी असतात!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्यासाठी एक उदाहरण
  • ‘वरिष्ठ अधिकारी’
  • ‘सर्वश्रेष्ठ अधिकारी’
  • शेवटचं युद्ध
  • नेहमी एकनिष्ठ राहा
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांबद्दल ख्रिश्‍चनांचा दृष्टीकोण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही तुमची सचोटी जपाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपली सचोटी कायम का राखावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देव आणि कैसर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 ऑक्टोबर पृ. १२-१७

अभ्यास लेख ४२

यहोवाला एकनिष्ठ राहणारे लोक आनंदी असतात!

“जे निर्दोष मार्गाने [म्हणजे एकनिष्ठेने] चालतात; जे यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे वागतात, ते सुखी आहेत!”​—स्तो. ११९:१.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांशa

हसऱ्‍या चेहऱ्‍याने आपल्याकडे पाहत असलेले भाऊबहीण, ज्यांपैकी काही जणांना आधी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं तर काही जण अजूनही जेलमध्ये आहेत.

यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला एकनिष्ठ राहिल्यामुळे ज्यांना जेलमध्ये टाकण्यात आलंय किंवा जे अजूनही जेलमध्ये आहेत असे काही भाऊबहीण (परिच्छेद १-२ पाहा)

१-२. (क) जगातल्या सरकारांनी यहोवाच्या लोकांविरुद्ध काय केलंय, पण तरी यहोवाचे लोक काय करतात? (ख) छळ होत असतानाही आपण आनंदी का राहू शकतो? (पहिल्या पानावरचं चित्रसुद्धा पाहा.)

आज ३० पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या कामावर निर्बंध लावण्यात आले आहेत किंवा बंदी घालण्यात आली आहे. यांपैकी काही देशांमध्ये तर अधिकाऱ्‍यांनी भाऊबहिणींना जेलमध्येसुद्धा टाकलंय. जेलमध्ये टाकण्यासारखा त्यांनी असा कोणता गुन्हा केलाय? यहोवाच्या नजरेत तर त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही. त्यांना फक्‍त या कारणासाठी जेलमध्ये टाकण्यात आलंय, कारण ते बायबल वाचून त्याचा अभ्यास करतात, इतरांना आपल्या विश्‍वासाबद्दल सांगतात आणि आपल्या भाऊबहिणींसोबत सभांना जातात. तसंच, या भाऊबहिणींनी कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये कोणाचीही बाजू न घेण्याचं निवडलंय. पण अतिशय तीव्र विरोध होऊनसुद्धा देवाच्या या विश्‍वासू सेवकांचा विश्‍वास डगमगलेला नाही आणि त्यांनी आपली एकनिष्ठाb सोडलेली नाही. शिवाय, या गोष्टीचा त्यांना खूप आनंदही आहे!

२ अशा धैर्यवान भाऊबहिणींची चित्रं तुम्ही नक्कीच पाहिली असतील. त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसणारा आनंद तुम्हाला नक्कीच जाणवला असेल. ते यासाठी आनंदी आहेत, कारण त्यांनी जी एकनिष्ठा दाखवली आहे त्याबद्दल यहोवा त्यांच्यावर खूश आहे, हे त्यांना माहीत आहे. (१ इति. २९:१७ख) येशूने म्हटलं: “नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत . . . हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा, कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.”​—मत्त. ५:१०-१२.

आपल्यासाठी एक उदाहरण

कोलाज: १. यहुद्यांच्या न्यायसभेसमोर बोलत असलेले प्रेषित पेत्र आणि योहान. २. एक भाऊ न्यायालयात बोलत आहे.

पेत्र आणि योहानसारखंच आज बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना कोर्टात आपल्या विश्‍वासाबद्दल बोलावं लागतं (परिच्छेद ३-४ पाहा)

३. प्रे. कार्यं ४:१९, २० मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेषितांचा छळ झाला तेव्हा त्यांनी काय केलं आणि का?

३ येशूबद्दल साक्ष देत असल्यामुळे पहिल्या शतकात प्रेषितांचा छळ करण्यात आला. आणि आज आपल्या भाऊबहिणींनाही अशाच छळाचा सामना करावा लागत आहे. यहुद्यांच्या न्यायसभेने प्रेषितांना असं बजावून सांगितलं होतं, की “त्यांनी येशूच्या नावाने काहीच बोलू किंवा शिकवू नये.” (प्रे. कार्यं ४:१८; ५:२७, २८, ४०) मग प्रेषितांनी काय केलं? (प्रे. कार्यं ४:१९, २० वाचा.) प्रेषितांना माहीत होतं, की या अधिकाऱ्‍यांपेक्षाही ज्याला मोठा अधिकार आहे, त्याने त्यांना ख्रिस्ताबद्दल ‘प्रचार करायची आणि पूर्ण साक्ष द्यायची’ आज्ञा दिली आहे. (प्रे. कार्यं १०:४२) म्हणून प्रेषितांच्या वतीने बोलताना पेत्र आणि योहान यांनी धैर्याने त्यांना सांगितलं, की ते त्यांच्याऐवजी देवाची आज्ञा पाळतील आणि ते येशूबद्दल बोलायचं थांबवणार नाहीत. ते एका अर्थाने त्यांना असं म्हणत होतं: ‘देवाच्या आज्ञेपेक्षा तुमची आज्ञा पाळणं जास्त महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतंय का?’

४. प्रे. कार्यं ५:२७-२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेषितांनी खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी कोणतं चांगलं उदाहरण मांडलं आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

४ प्रेषितांनी जे चांगलं उदाहरण मांडलं, त्याचं आजपर्यंत खरे ख्रिस्ती अनुकरण करत आहेत. त्यांनी “माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळली” आहे. (प्रे. कार्यं ५:२७-२९ वाचा.) प्रेषितांच्या एकनिष्ठेबद्दल त्यांना फटके मारण्यात आले. पण तरी “येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.” आणि ते लगेच आनंदाचा संदेश सांगू लागले!​—प्रे. कार्यं ५:४०-४२.

५. आपल्यासमोर कोणते प्रश्‍न उभे राहू शकतात?

५ विरोध होत असताना प्रेषितांनी जे केलं, त्यावरून आपल्या मनात काही प्रश्‍न येऊ शकतात. जसं की, प्रेषितांनी माणसांची आज्ञा पाळण्यापेक्षा देवाची आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतला. मग त्यांचा हा निर्णय ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असा,’ या बायबलमधल्या आज्ञेच्या विरोधात होता का? (रोम. १३:१) तसंच, प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन” असणं आणि त्याच वेळी आपला सर्वोच्च अधिकारी म्हणून यहोवाला एकनिष्ठ राहणं आपल्याला शक्य आहे का?​—तीत ३:१.

‘वरिष्ठ अधिकारी’

६. (क) रोमकर १३:१ मध्ये सांगितलेले ‘वरिष्ठ अधिकारी’ कोण आहेत आणि आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे? (ख) त्यांच्या अधिकाराबद्दल काय म्हणता येईल?

६ रोमकर १३:१ वाचा. या वचनात ‘वरिष्ठ अधिकारी’ हे शब्द अशा लोकांना उद्देशून वापरण्यात आले आहेत ज्यांना इतरांवर अधिकार आहे. ख्रिश्‍चनांनी या अधिकाऱ्‍यांच्या अधीन असलं पाहिजे. ते न्याय आणि सुव्यवस्था राखतात आणि काही वेळा यहोवाच्या साक्षीदारांचं संरक्षणसुद्धा करतात. (प्रकटी. १२:१६) म्हणून आपण त्यांना कर दिला पाहिजे आणि त्यांच्या अधीन राहून त्यांना आदर दिला पाहिजे अशी आज्ञा बायबल आपल्याला देतं. (रोम. १३:७) पण यहोवाने दिलेल्या अनुमतीमुळेच जगातल्या सरकारांचा आपल्यावर अधिकार आहे. येशूला जेव्हा रोमी राज्यपाल पंतय पिलात याच्यासमोर आणण्यात आलं, तेव्हा त्याने ही गोष्ट स्पष्ट केली. पिलातने जेव्हा येशूला म्हटलं, की तुझी सुटका करायचा किंवा तुला दंड द्यायचा अधिकार माझ्याजवळ आहे, तेव्हा येशूने म्हटलं: “देवाने तुम्हाला अधिकार दिला नसता, तर तुमचा माझ्यावर काहीच अधिकार नसता.” (योहा. १९:११) आजसुद्धा पिलातप्रमाणेच सगळ्या राजकीय अधिकाऱ्‍यांचा आणि मानवी शासकांचा अधिकार मर्यादित आहे.

७. कोणत्या गोष्टींच्या बाबतीत आपण अधिकाऱ्‍यांचं ऐकलं नाही पाहिजे आणि या अधिकाऱ्‍यांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

७ मानवी सरकारं जेव्हा असे कायदे आणि नियम बनवतात जे यहोवाच्या तत्त्वांच्या विरोधात जात नाहीत तेव्हा खरे ख्रिस्ती त्यांचं पालन करतात. पण कधीकधी ही मानवी सरकारं आपल्याला असं काहीतरी करायला सांगतील जे देवाच्या नियमांच्या विरोधात असेल. जसं की, ते कदाचित तरुणांना शस्त्र देऊन देशासाठी लढायला सांगतील.c किंवा देवाने जे करायला सांगितलंय, ते करण्यापासून ते आपल्याला अडवतील. जसं की, ते कदाचित बायबल आणि आपल्या प्रकाशनांवर बंदी घालतील आणि प्रचारकार्य आणि उपासना करण्यापासून आपल्याला रोखतील. अशा वेळी मात्र आपण त्यांची आज्ञा मानली नाही पाहिजे. जेव्हा ही सरकारं आपल्या अधिकाराचा गैरवापर करून येशूच्या अनुयायांचा छळ करतात, तेव्हा त्यांना देवाला जाब द्यावा लागेल. कारण यहोवाची त्यांच्यावर नजर आहे.​—उप. ५:८.

८. यहोवा आणि ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांमध्ये’ काय फरक आहे?

८ “वरिष्ठ” या शब्दाचा अर्थ “मोठा, चांगला किंवा उच्च पदावरचा” असा होतो. पण याचा अर्थ “सर्वोत्तम, सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात वरचा अधिकार असलेला” असा होत नाही. त्यासाठी आपण “सर्वश्रेष्ठ” किंवा “सर्वोच्च” असे शब्द वापरतो. मानवी सरकारांना जरी ‘वरिष्ठ अधिकारी’, असं म्हणण्यात आलं असलं, तरी असा एक अधिकारी आहे, जो यांच्यापेक्षाही वरच्या पदावर किंवा सर्वोच्च पदावर आहे. बायबलमध्ये बऱ्‍याच वेळा यहोवाला “सर्वश्रेष्ठ” किंवा “सर्वोच्च” असं म्हटलं आहे.​—दानी. ७:१८, २२, २५, २७.

‘सर्वश्रेष्ठ अधिकारी’

९. दानीएल संदेष्ट्याने दृष्टान्तात काय पाहिलं?

९ दानीएलला असे काही दृष्टान्त दिसले, ज्यात त्याने स्पष्टपणे पाहिलं, की इतर सर्व अधिकाऱ्‍यांपेक्षा यहोवाचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. सुरवातीला त्याने चार हिंस्र प्राणी पाहिले, जे प्राचीन काळातल्या आणि आजच्या काळातल्या महाशक्‍तींना सूचित करत होते. त्या महाशक्‍ती म्हणजे बाबेल, मेद व पर्शिया, ग्रीस, रोम आणि त्यातून निघालेली आजच्या काळातली अँग्लो-अमेरिका ही महासत्ता. (दानी. ७:१-३, १७) मग दानीएलने पाहिलं, की स्वर्गात यहोवा न्याय करण्यासाठी राजासनावर बसला आहे. (दानी. ७:९, १०) पुढे या विश्‍वासू संदेष्ट्याने जी गोष्ट पाहिली ती आजच्या शासनकर्त्यांसाठी एक इशाराच आहे.

१०. दानीएल ७:१३, १४, २७ या वचनांप्रमाणे पृथ्वीवरचा सगळा अधिकार यहोवा कोणाला देतो आणि यावरून त्याच्याबद्दल काय सिद्ध होतं?

१० दानीएल ७:१३, १४, २७ वाचा. दानीएल पुढे पाहतो, की यहोवा मानवी सरकारांची सर्व सत्ता आणि अधिकार काढून घेतो. आणि तो अशांना देतो ज्यांना तो मिळाला पाहिजे आणि जे जास्त शक्‍तिशाली आहेत. ते कोण आहेत? त्यांच्यापैकी एक आहे “मनुष्याच्या मुलासारखा” असलेला येशू ख्रिस्त आहे, आणि दुसरे, “सर्वश्रेष्ठ देवाचे पवित्र जन,” म्हणजे १,४४,००० जण आहेत. ते “सदासर्वकाळासाठी” राज्य करतील. (दानी. ७:१८) खरंच असं करण्याचा अधिकार फक्‍त यहोवालाच आहे. यावरून हेच सिद्ध होतं, की तोच “सर्वश्रेष्ठ” आहे.

११. दानीएलने लिहिलेल्या कोणत्या गोष्टीवरून दिसून येतं, की यहोवाच सर्वोच्च अधिकारी आहे?

११ दृष्टान्तात दानीएलने जे काही पाहिलं, ते त्याने आधी लिहिलेल्या गोष्टींशीही जुळणारं होतं. त्याने म्हटलं होतं: “[स्वर्गाचा देव] राजांना राजासनावर बसवतो आणि त्यांना राजासनावरून काढूनही टाकतो.” त्याने पुढे असेही म्हटलं: “सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे. तसंच आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.” (दानी. २:१९-२१; ४:१७) पण यहोवाने शासनकर्त्यांचा अधिकार काढून घेतला किंवा त्यांना तो दिला असं कधी झालंय का? हो नक्कीच!

बेलशस्सर राजा आणि त्यांच्यासोबतचे लोक भिंतीवर लिहिलेल्या शब्दांकडे आश्‍चर्यचकित होऊन पाहत आहेत.

यहोवाने बेलशस्सरचं राज्य काढून घेतलं आणि ते मेद आणि पर्शियाला दिलं (परिच्छेद १२ पाहा)

१२. यहोवाने प्राचीन काळात राजांना त्यांच्या राजासनावरून काढून टाकलं, याचं एक उदाहरण द्या. (चित्र पाहा.)

१२ ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांवर’ आपला अधिकार असल्याचं यहोवाने अनेकदा स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. याची तीन उदाहरणं लक्षात घ्या. इजिप्तच्या फारो राजाने यहोवाच्या लोकांना गुलाम बनवलं होतं, आणि वारंवार विनंती करूनही त्याने त्यांना जाऊ दिलं नाही. पण यहोवाने त्यांची सुटका केली आणि तांबड्या समुद्रात फारोचा नाश केला. (निर्ग. १४:२६-२८; स्तो. १३६:१५) तसंच, एकदा बाबेलच्या बेलशस्सर राजाने खूप मोठी मेजवानी ठेवली आणि त्याने ‘स्वर्गाच्या देवाविरुद्ध जाऊन स्वतःचा गौरव केला.’ इतकंच नाही, तर यहोवाची स्तुती करण्याऐवजी त्याने ‘सोन्याच्या आणि चांदीच्या’ दैवतांची स्तुती केली. (दानी. ५:२२, २३) पण देवाने त्या गर्विष्ठ माणसाला नमवलं. “त्याच रात्री” बेलशस्सरला मारून टाकण्यात आलं आणि त्याचं राज्य मेद आणि पर्शियाला देण्यात आलं. (दानी. ५:२८, ३०, ३१) शिवाय, पॅलेस्टाईनचा राजा हेरोद अग्रिप्पा पहिला, याने प्रेषित याकोबला मारून टाकलं आणि नंतर प्रेषित पेत्रलाही मारून टाकण्याच्या उद्देशाने त्याला तुरुंगात टाकलं. पण यहोवाने हेरोदचा कट उधळला. कारण “यहोवाच्या दूताने त्याला मारलं,” आणि तो किडे पडून मेला.​—प्रे. कार्यं १२:१-५, २१-२३.

१३. यहोवाने शासनकर्त्यांच्या अख्ख्या समूहाचासुद्धा पूर्णपणे नाश केला याचं एक उदाहरण द्या.

१३ यहोवा शासनकर्त्यांच्या अख्ख्या समूहापेक्षाही श्रेष्ठ आहे, हेसुद्धा त्याने दाखवून दिलंय. उदाहरणार्थ, यहोवा इस्राएली लोकांच्या वतीने लढला आणि त्याने त्यांना कनानच्या ३१ राजांच्या समूहाचा नाश करायला आणि वचन दिलेल्या देशाचे मोठमोठे प्रदेश काबीज करायला मदत केली. (यहो. ११:४-६, २०; १२:१, ७, २४) इतकंच नाही, तर यहोवाने बेन-हदाद राजाचा आणि त्याच्यासोबत सिरीयाच्या ३२ राजांचा पूर्णपणे नाश करायलाही इस्राएली लोकांना मदत केली.​—१ राजे २०:१, २६-२९.

१४-१५. (क) यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराबद्दल नबुखद्‌नेस्सर राजाने आणि दारयावेश राजाने काय म्हटलं? (ख) स्तोत्रकर्त्याने यहोवा आणि त्याच्या राष्ट्राबद्दल काय म्हटलं?

१४ यहोवाने बऱ्‍याच वेळा हे सिद्ध केलंय की तोच सर्वोच्च अधिकारी आहे. एकदा बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर यहोवाचा गौरव करण्याऐवजी ‘स्वतःच्या ऐश्‍वर्याची, शक्‍तीची आणि सामर्थ्याची’ बढाई मारू लागला. तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा दिली आणि तो वेडा झाला. मग काही काळाने तो बरा झाला तेव्हा त्याने “सर्वोच्च देवाची स्तुती केली” आणि हे मान्य केलं, की “[यहोवाचं] शासन सर्वकाळाचं आहे.” पुढे तो असं म्हणाला, की “कोणीही त्याला अडवू शकत नाही.” (दानी. ४:३०, ३३-३५) तसंच, जेव्हा दानीएलच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली आणि यहोवाने त्याला सिंहाच्या गुहेतून वाचवलं तेव्हा दारयावेश राजाने असं फर्मान काढलं: “लोकांनी दानीएलच्या देवाचं भय बाळगावं आणि त्याचा आदर करावा. कारण तो जिवंत देव आहे आणि त्याचं अस्तित्व सदासर्वकाळाचं आहे. त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही आणि त्याचं शासन कायम टिकून राहील.”​—दानी. ६:७-१०, १९-२२, २६, २७, तळटीप.

१५ स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “यहोवाने राष्ट्रांच्या योजना निष्फळ केल्या आहेत; त्याने त्यांचे संकल्प धुळीला मिळवले आहेत. ज्या राष्ट्राचा देव यहोवा आहे; ज्या लोकांना त्याने आपली संपत्ती म्हणून निवडलंय, ते सुखी आहेत!” (स्तो. ३३:१०, १२) खरंच यहोवाला एकनिष्ठ राहण्याचं हे किती चांगलं कारण आहे!

शेवटचं युद्ध

पांढऱ्‍या घोड्यांवर स्वार असलेलं आणि पृथ्वीवर शस्त्रास्त्र घेतलेल्या लोकांवर आक्रमण करत असलेलं यहोवाचं स्वर्गातलं सैन्य.

यहोवाच्या स्वर्गातल्या सैन्यासमोर राष्ट्रांच्या समूहाचा काहीच टिकाव लागणार नाही (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६. आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो आणि का? (चित्र पाहा.)

१६ यहोवाने प्राचीन काळात काय केलं होतं, हे तर आपण वाचलं. पण भविष्याबद्दल काय? आपण ही खातरी बाळगू शकतो, की येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना नक्की वाचवेल. (मत्त. २४:२१; दानी. १२:१) जगभरातल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर जेव्हा मागोगचा गोग, म्हणजे राष्ट्रांचा समूह क्रूर हल्ला करेल, तेव्हा हे घडेल. राष्ट्रांच्या या समूहात संयुक्‍त राष्ट्र संघाचे सगळे १९३ सदस्य जरी असले, तरी सर्वोच्च देवासमोर आणि त्याच्या स्वर्गातल्या सैन्यासमोर त्यांचा काहीच टिकाव लागणार नाही. यहोवा वचन देतो: “मी पुष्कळ राष्ट्रांसमोर स्वतःचा गौरव करीन, स्वतःला पवित्र करीन, आणि त्यांना दाखवून देईन की मी कोण आहे. तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.”​—यहे. ३८:१४-१६, २३; स्तो. ४६:१०.

१७. पृथ्वीवरच्या राजांचं आणि यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍या लोकांचं भविष्यात काय होईल असं बायबल सांगतं?

१७ मागोगचा गोग यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा हर्मगिदोनाच्या युद्धाची सुरुवात होईल. तेव्हा यहोवा ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांचा’ नाश करून टाकेल. (प्रकटी. १६:१४, १६; १९:१९-२१) पण “फक्‍त सरळ मनाचे लोक पृथ्वीवर राहतील आणि जे निर्दोष आहेत तेच तिच्यावर टिकून राहतील.”​—नीति. २:२१, तळटीप.

नेहमी एकनिष्ठ राहा

१८. बरेच ख्रिस्ती भाऊबहीण काय करायला तयार झाले आहेत आणि का? (दानीएल ३:२८)

१८ आजपर्यंत यहोवाच्या अनेक विश्‍वासू सेवकांनी आपलं स्वातंत्र्यच नाही, तर आपला जीवसुद्धा धोक्यात घातला आहे. कारण यहोवावर त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि तोच सर्वोच्च अधिकारी आहे आणि त्यालाच आपल्यावर राज्य करायचा अधिकार आहे, असं ते मानतात. ते त्या तीन इब्री तरुणांसारखे आहेत, जे यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आगीच्या भट्टीतसुद्धा जायला तयार झाले.​—दानीएल ३:२८ वाचा.

१९. यहोवा कोणत्या आधारावर आपल्या लोकांचा न्याय करेल आणि त्यासाठी आपण आत्ता काय केलं पाहिजे?

१९ यहोवाला एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल स्तोत्रकर्ता दावीदने लिहिलं: “यहोवा लोकांबद्दल आपला निर्णय सुनावेल. हे यहोवा, माझं नीतिमत्त्व आणि माझा खरेपणा पाहून माझा न्याय कर.” (स्तो. ७:८) दावीदने असंही म्हटलं: “खरेपणा आणि सरळपणा माझं रक्षण करोत.” (स्तो. २५:२१) जगण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, काहीही झालं तरी यहोवाला शेवटपर्यंत विश्‍वासू राहणं आणि प्रत्येक परिस्थितीत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवणं. आपण जर त्याला एकनिष्ठ राहिलो, तर आपल्यालासुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटेल. त्याने म्हटलं: “जे निर्दोष मार्गाने [म्हणजे एकनिष्ठेने] चालतात; जे यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे वागतात, ते सुखी आहेत!”​—स्तो. ११९:१, तळटीप.

तुमचं उत्तर काय असेल?

  • प्रेषितांनी आपल्यासाठी चांगलं उदाहरण कसं मांडलं?

  • आपण केव्हा ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या’ अधीन राहिलं पाहिजे आणि केव्हा नाही?

  • यहोवाच “सर्वोच्च” अधिकारी आहे हे त्याने कसं सिद्ध केलंय?

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

a बायबल ख्रिश्‍चनांना वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या म्हणजे या जगातल्या सरकारांच्या अधीन राहायला सांगतं. पण काही सरकारं यहोवाचा आणि त्याच्या सेवकांचा उघडपणे विरोध करतात. मग आपण या मानवी अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहूनसुद्धा यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो?

b शब्दाचा अर्थ: यहोवाला एकनिष्ठ राहणं म्हणजे परीक्षा होत असतानासुद्धा त्याला विश्‍वासू राहणं आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देणं.

c याच अंकातला “प्राचीन इस्राएलमधले लोक युद्ध लढले, मग आज आपण का नाही?” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा