वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. ८-९
  • २ | बदला घेऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ | बदला घेऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलची शिकवण:
  • याचा काय अर्थ होतो:
  • तुम्ही काय करू शकता:
  • सूड घेणे उचित आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • भाग ७ ची प्रस्तावना
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. ८-९
दोन व्यक्‍ती झाडावर समोरासमोर बसले आहेत. ते रागात आहेत. आणि ज्या फांदीवर ते बसलेत तीच फांदी ते कापत आहेत.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

२ | बदला घेऊ नका

बायबलची शिकवण:

“वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका, तर सगळ्यांच्या दृष्टीने जे चांगलं ते करण्याकडे लक्ष द्या. . . . सूड [म्हणजे बदला] घेऊ नका, . . . कारण असं लिहिलं आहे: ‘“सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,” असं यहोवा म्हणतो.’”​—रोमकर १२:१७-१९.

याचा काय अर्थ होतो:

आपल्यासोबत कोणी वाईट करतं तेव्हा राग येणं साहजिकच आहे. पण अशा वेळीही आपण बदला घेऊ नये. कारण बदला घेतलेलं देवाला आवडत नाही. त्याची इच्छा आहे, की आपण सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडाव्यात. कारण वेळ आल्यावर तो सगळं काही ठीक करेल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल.​—स्तोत्र ३७:७, १०.

तुम्ही काय करू शकता:

बदला घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते, आणि द्वेषाचं चक्र चालूच राहतं. म्हणून, तुमचं कोणी वाईट केलं तरी बदला घेऊ नका. रागावर ताबा मिळवा आणि शांतीने परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करा. जे झालं आहे ते कधीकधी मागे सोडून देण्यातच आपलं भलं असतं. (नीतिवचन १९:११) पण काही वेळा तुम्हाला समस्या सोडवायला पावलं उचलावी लागतील. उदाहरणार्थ, जेव्हा चोरी होते किंवा दुसरा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा तुम्हाला कदाचित पोलिस स्टेशनमध्ये किंवा अधिकाऱ्‍यांकडे तक्रार करावी लागेल.

बदला घेतल्यामुळे स्वतःचंच नुकसान होतं

पण समजा, तुम्ही शांतीने परिस्थिती हाताळायचा खूप प्रयत्न करूनसुद्धा समस्या सुटली नाही तर काय? किंवा तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नसेल तर काय? तरीसुद्धा बदला घेऊ नका. कारण बदला घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणून द्वेषाचं चक्र तिथेच थांबवा. देव सगळ्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवेल यावर भरवसा ठेवा. बायबल म्हणतं: ‘यहोवावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.’​—स्तोत्र ३७:३-५.

अनुभव​—एड्रियन

यांनी बदला घेण्याच्या भावनेवर मात केली

एड्रियन.

एड्रियन १३-१४ वर्षांचे असताना गुंड बनले आणि मारामाऱ्‍या करू लागले. कोणी त्यांना काही केलं तर ते लगेच त्याचा बदला घ्यायचे. ते म्हणतात: “मी खूप मारामाऱ्‍या करायचो आणि त्या भांडणांत गोळीबारही व्हायचा. अनेक वेळा मी रक्‍तबंबाळ व्हायचो आणि मी मेलोय असं समजून दुसऱ्‍या गँगमधले गुंड निघून जायचे.”

एड्रियन जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी बायबल अभ्यास सुरू केला. ते म्हणतात: “जसजसं मी बायबल अभ्यास करत गेलो, तसतसं मला जाणवलं की मला स्वतःत खूप बदल करायची गरजए.” एड्रियन यांना आपल्या मनातून द्वेष काढून टाकायची आणि गुंडगिरी सोडायची गरज होती. त्यांना बायबलमधल्या रोमकर १२:१७-१९ या वचनांतून सूड का घेऊ नये हे शिकायला मिळालं. या वचनाचा त्यांना खूप फायदा झाला. ते म्हणतात: “मला समजलं, की यहोवा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सगळं ठीक करेल आणि अन्याय दूर करेल. म्हणून मी आधीसारखं वागणं सोडून दिलं आणि हळूहळू स्वतःत चांगले बदल केले.”

पण एकदा संध्याकाळी एका गँगने एड्रियनवर हल्ला केला. त्या गँगची त्यांच्यासोबत आधीपासूनच दुश्‍मनी होती. त्यांनी हल्ला केला तेव्हा त्यातला एकजण एड्रियन यांना म्हणाला: “हिंमत असेल तर मारून दाखव.” एड्रियन म्हणतात: “त्या वेळी मला त्यांना खूप मारावसं वाटलं.” पण त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी शांत राहण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली आणि ते तिथून निघून गेले.

एड्रियन पुढे म्हणतात: “दुसऱ्‍या दिवशी गँगमधला तोच माणूस माझ्यासमोर आला. या वेळी तो एकटाच होता. त्याला पाहून माझं रक्‍त खवळलं. मला त्याला तिथंच मारावसं वाटलं. पण रागावर ताबा मिळवण्यासाठी मी पुन्हा एकदा यहोवाकडे मनातल्या मनात प्रार्थना केली. आणि आश्‍चर्य म्हणजे, तो माझ्याकडे आला आणि म्हणाला: ‘काल संध्याकाळी जे काही झालं त्याबद्दल मला माफ कर. खरंतर मलापण तुझ्यासारखंच चांगलं बनायचंय आणि बायबल अभ्यास करायचाय.’ खरंच, किती बरं झालं मी त्या वेळी स्वतःवर ताबा ठेवला! कारण त्यामुळे आम्ही सोबत बायबल अभ्यास करू लागलो.”

एड्रियन यांची पूर्ण जीवन कथा २०१६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) क्र. ५ मध्ये पान १४-१५ वर दिली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा