वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. १०-११
  • ३ | मनातून द्वेष काढून टाका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३ | मनातून द्वेष काढून टाका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलची शिकवण:
  • याचा काय अर्थ होतो:
  • तुम्ही काय करू शकता:
  • स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • स्तेफनाला दगडमार होतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • तो “विश्‍वासाने आणि पवित्र शक्‍तीने परिपूर्ण” होता
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. १०-११
एक माणूस विचार करतोय की तो दुसऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीसोबत हात मिळवतोय. पण त्यांच्या सावल्या मात्र एकमेकांशी भांडताएत आणि त्यांच्या हातात आंदोलनाचे पोस्टर आहेत.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

३ | मनातून द्वेष काढून टाका

बायबलची शिकवण:

“आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.”​—रोमकर १२:२.

याचा काय अर्थ होतो:

आपण काय विचार करतो याकडे देवाचं लक्ष असतं. (यिर्मया १७:१०) द्वेषाची सुरूवात आपल्या मनातून म्हणजे विचारांतून होते. जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी बोलतो  आणि त्यांच्याशी वाईट वागतो.  म्हणून आपण एखाद्याचा द्वेष करायचा विचारही मनात येऊ देऊ नये. आपण असं केलं तरच आपण “स्वतःचं रूपांतर होऊ” देऊ आणि द्वेषाचं चक्र मोडून टाकू.

तुम्ही काय करू शकता:

तुम्हाला दुसऱ्‍या वंशाच्या, जातीच्या आणि दुसऱ्‍या देशाच्या लोकांबद्दल कसं वाटतं याबद्दल प्रामाणिकपणे विचार करा. यासाठी स्वतःला असे प्रश्‍न विचारा: ‘मला त्यांच्याबद्दल काय वाटतं? माझं त्यांच्याबद्दल असलेलं मत, त्यांच्याबद्दल असलेल्या माहितीवर आधारीत आहे, की इतरांकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारीत आहे?’ तसंच, टिव्ही किंवा इंटरनेटवर हिंसेला किंवा द्वेषाला उत्तेजन देणारे कार्यक्रमही पाहू नका.

देवाचं वचन मनातून आणि हृदयातून द्वेष काढून टाकायला मदत करतं

एखाद्या देशाबद्दल किंवा जातीबद्दल आपण जो विचार करतो तो बरोबर आहे की नाही, हे आपण स्वतः सांगू शकत नाही. पण देवाचं वचन, म्हणजे बायबल आपल्याला आपल्या “हृदयातले विचार आणि हेतू यांची पारख” करायला मदत करू शकतं. (इब्री लोकांना ४:१२) म्हणून बायबल वाचत राहा. आणि त्यात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे तुमचे विचार आहेत की नाही याचं परिक्षण करत राहा. कारण देवाचं वचन आपल्याला आपल्या मनातून आणि हृदयातून ‘भक्कम बुरुजांसारखा’ असलेला आणि खोलवर मुळावलेला द्वेष काढून टाकायला मदत करतं.​—२ करिंथकर १०:४, ५.

अनुभव​—स्टीफन

यांनी दुसऱ्‍या वर्णाच्या लोकांबद्दलचे आपले विचार बदलले

स्टीफन.

स्टीफन आणि त्यांच्या कुटुंबाला गोऱ्‍या लोकांकडून द्वेषाचा सामना करावा लागला. त्यामुळे, लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्‍या एका राजकीय गटाच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले होते. काही काळाने ते हिंसक हल्ल्यांमध्येही भाग घेऊ लागले. स्टीफन म्हणतात: “कधीकधी आम्ही सगळे मित्र मिळून, अमेरिकेत आफ्रिकन गुलामांवर झालेल्या अत्याचारांवरचे पिक्चर पाहायला जायचो. त्यांच्यावर किती अन्याय झालाय हे पाहून आम्ही रागाने पेटून उठायचो. आणि तिथे थेएटरमध्येच गोऱ्‍या लोकांवर हल्ला करायचो. मग तिथून पुढे आम्ही गोऱ्‍या लोकांच्या वस्त्यांमध्ये जायचो आणि लोकांना पकडून मारायचो.”

यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केल्यानंतर स्टीफन यांची विचार करायची पद्धतच बदलून गेली. ते म्हणतात: “वेगवेगळ्या वंशांच्या लोकांमध्ये केला जाणारा भेदभाव मी आधीपासूनच पाहत आलो होतो. पण यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मी जे पाहिलं त्यामुळे मला खूप आश्‍चर्य वाटलं. जसं की, एका गोऱ्‍या वर्णाच्या साक्षीदाराला जेव्हा परदेशात जायचं होतं तेव्हा तो आपल्या मुलांना एका काळ्या वर्णाच्या साक्षीदार कुटुंबाकडे सोडून गेला. तसंच, जेव्हा एका काळ्या वर्णाच्या मुलाला राहायला जागा हवी होती, तेव्हा एका गोऱ्‍या वर्णाच्या कुटुंबाने त्याला आपल्या घरात राहायला जागा दिली.” हे पाहून स्टीफनला खातरी पटली, की खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह, म्हणजे प्रेम हे फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांमध्येच पाहायला मिळतं.​—योहान १३:३५.

स्टीफनला त्यांचा हिंसक स्वभाव सोडून द्यायला कशामुळे मदत मिळाली? रोमकर १२:२ या वचनामुळे त्यांना मदत मिळाली. ते म्हणतात: “मला याची जाणीव झाली की मला माझ्या विचार करायच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. मला माझा हिंसक स्वभाव सोडून सगळ्यांसोबत शांतीने वागण्याची गरज होती. आणि हाच जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे.” स्टीफन यांनी त्यांच्या मनातून द्वेष काढून टाकला आणि या गोष्टीला आता ४० वर्षं होऊन गेली आहेत. ते आता सगळ्यांसोबत प्रेमाने आणि शांतीने राहतात.

स्टीफन यांची पूर्ण जीवन कथा १ जूलै २०१५ च्या टेहळणी बुरूज अंकात पान १०-११ वर दिली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा