वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. ६-७
  • १ | भेदभाव करू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १ | भेदभाव करू नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलची शिकवण:
  • याचा काय अर्थ होतो:
  • तुम्ही काय करू शकता:
  • तीत—“तुमच्याकरिता सहकारी”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • ३ | मनातून द्वेष काढून टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • यहोवा “पक्षपाती नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. ६-७
काळ्या वर्णाच्या व्यक्‍तीने गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीचा फोटो धरलाय आणि गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीने काळ्या वर्णाच्या व्यक्‍तीचा फोटो धरलाय. पाठीमागे रागीष्ठ लोकांचे फोटो आहेत.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

१ | भेदभाव करू नका

बायबलची शिकवण:

“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”​—प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.

याचा काय अर्थ होतो:

यहोवाa देव देश, वर्ण, वंश किंवा संस्कृती पाहत नाही. तर आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत, आपण कसा विचार करतो, आपल्या इच्छा काय आहेत हे तो पाहतो. खरंच, “माणूस फक्‍त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”​—१ शमुवेल १६:७.

तुम्ही काय करू शकता:

एखादी व्यक्‍ती खरोखर कशी आहे हे आपण ओळखू शकत नसलो, तरी आपण देवासारखा दृष्टिकोन बाळगू शकतो. आणि भेदभाव न करता सगळ्यांना सारख्याच नजरेने पाहू शकतो. एखाद्या व्यक्‍तीमुळे तो पूर्ण समाजच तसा आहे असा विचार करू नका. आणि जर तुम्हाला असं जाणवलं, की दुसऱ्‍या देशातल्या लोकांबद्दल किंवा एखाद्या वंशाबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, तर देवाकडे प्रार्थना करा आणि ही भावना मनातून काढून टाकायला त्याच्याकडे मदत मागा. (स्तोत्र १३९:२३, २४) भेदभावाची आणि द्वेषाची भावना मनातून काढून टाकण्यासाठी तुम्ही यहोवा देवाकडे प्रामाणिकपणे मदत मागितली, तर तो तुम्हाला नक्की मदत करेल.​—१ पेत्र ३:१२.

a यहोवा (याव्हे) हे देवाचं नाव आहे असं बायबल सांगतं.​—स्तोत्र ८३:१८.

“याआधी मी गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीसोबत कधी नीट बोललोही नव्हतो. . . . पण आता मी प्रामाणिक लोकांच्या जागतिक बंधूसमाजाचा भाग आहे.”​—टायटस

अनुभव​—टायटस

यांनी द्वेषावर मात केली

टायटस.

काळ्या आणि गोऱ्‍या लोकांमध्ये भेदभाव करणाऱ्‍या एका कायद्याबद्दल टायटस यांच्या मनात खूप राग होता. म्हणून त्यांच्यासारखाच विचार करणाऱ्‍या एका गँगचे ते सदस्य बनले. ते म्हणतात: “आम्ही मुद्दामहून शहरातल्या अशा हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये जायचो जिथे काळ्या लोकांना येऊ देत नव्हते. म्हणजे मग आम्हाला त्यांच्याशी मारामारी करता येईल.” टायटस कबूल करतात, की त्यांच्या मनात त्या लोकांबद्दल खूप द्वेष भरला होता. ते पुढे म्हणतात: “जर एखाद्या माणसासोबत किंवा बाईसोबत बाचाबाची झाली, तर मारामारीची सुरुवात मीच करायचो.”

मग यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केल्यावर त्यांनी स्वतःमध्ये बदल करायला सुरूवात केली. टायटस यांनी बायबल वाचलं तेव्हा त्यांच्यावर त्याचा जबरदस्त प्रभाव पडला. खासकरून त्यांना, भविष्यात जीवन कसं असेल याबद्दलचं एक वचन आवडलं. त्यात म्हटलंय: “यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”​—प्रकटीकरण २१:३, ४.

सुरुवातीला, मनातून द्वेष काढून टाकायला त्यांना खूप कठीण गेलं. ते म्हणतात: “माझ्या विचारांमध्ये आणि वागण्या-बोलण्यात बदल करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं.” पण प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५ मधून त्यांना जे शिकायला मिळालं होतं त्यामुळे त्यांना खूप मदत झाली. त्या वचनांत सांगितल आहे की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही.

याचा काय परिणाम झाला? टायटस म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांमध्ये वेगवेगळ्या वर्णाचे आणि वंशाचे लोक आहेत. पण तरी त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हे पाहून मला खातरी पटली, की तेच खऱ्‍या देवाच्या शिकवणींचं पालन करतात. माझा बाप्तिस्माही झाला नव्हता त्यावेळी मंडळीतल्या एका गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीने मला तिच्या घरी जेवायला बोलवलं. असं कधी होईल असा मी विचारही केला नव्हता. याआधी मी गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीसोबत कधी नीट बोललोही नव्हतो, मग त्याच्या घरी जेवणं तर दूरच. पण आता मी प्रामाणिक लोकांच्या जागतिक बंधूसमाजाचा भाग आहे.”

टायटस यांची पूर्ण जीवन कथा इंग्रजीतल्या १ ऑगस्ट २००९ च्या टेहळणी बुरूज  अंकात पान २८-२९ वर दिली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा