जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
४-१० मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ५८-५९
यहोवाकडून बरेच आशीर्वाद मिळवा
“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”
९ आज देवाच्या लोकांवर शब्बाथ पाळण्याचे, म्हणजेच आठवड्यातून एकदा २४ तास विश्रांती घेण्याचे बंधन नाही. पण, याचा अर्थ, प्राचीन काळातल्या शब्बाथाच्या आज्ञेशी आपला काहीही संबंध नाही असे मुळीच नाही. (कलस्सैकर २:१६) शब्बाथाची व्यवस्था आपल्याला याची आठवण करून देत नाही का, की आपणही जीवनात आध्यात्मिक कार्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे? दररोजच्या कामांत किंवा मनोरंजनात सगळा वेळ व शक्ती खर्च करून देवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांना आपण कधीही दुय्यम स्थान देऊ नये. (इब्री लोकांस ४:९, १०) या संदर्भात आपण स्वतःला हे प्रश्न विचारू शकतो: “मी कोणत्या गोष्टींना जीवनात सर्वात जास्त महत्त्व देतो? देवाच्या वचनाचा अभ्यास, प्रार्थना, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि राज्याची सुवार्ता इतरांना सांगणे या कार्यांना मी इतर कामांपेक्षा जास्त महत्त्व देत आहे का? की इतर कामांमुळे मला या महत्त्वाच्या कार्यांकरता वेळ मिळेनासा झाला आहे?” आपण जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिल्यास, यहोवा आपल्याला आश्वासन देतो की आपल्याला कोणत्याही जीवनावश्यक गोष्टींची उणीव भासणार नाही.—मत्तय ६:२४-३३.
कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवापासून दूर न नेवो!
५ तुम्ही नोकरीच्या शोधात आहात अशी कल्पना करा. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी नोकऱ्या मोठ्या मुश्कीलीने मिळत असतील, तर नोकरीची जी पहिली संधी तुमच्यासमोर येईल ती लगेच स्वीकारण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो, मग ती कोणतीही नोकरी असो. पण त्या नोकरीत तुम्हाला बायबल तत्त्वांच्या विरोधात असलेले काम करावे लागणार असेल, तर काय? नोकरीच्या वेळा आणि कामानिमित्ताने करावा लागणारा प्रवास यांमुळे जर तुमच्या ख्रिस्ती कार्यांवर किंवा कुटुंबासोबत तुम्ही घालवत असलेल्या वेळेवर गदा येणार असेल, तर काय? हे सर्व असूनही तुम्ही ती नोकरी स्वीकारावी का? सोयीची नसली, तरी बेरोजगार असण्यापेक्षा ही नोकरी बरी, असा विचार तुम्ही करावा का? आठवणीत असू द्या, अनुचित मार्ग निवडल्यास तुम्ही यहोवापासून दूर जाल. (इब्री २:१) नवी नोकरी शोधण्याच्या बाबतीत असो, किंवा सध्याच्या नोकरीबद्दल पुनर्विचार करण्याच्या बाबतीत असो, तुम्ही सुज्ञ निर्णय कसे घेऊ शकता?
६ याआधी सांगितल्याप्रमाणे, तुमचे ध्येय लक्षात ठेवा. स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘या नोकरीच्या किंवा करियरच्या साहाय्याने मला कोणते ध्येय साध्य करायचे आहे?’ जर यहोवाची सेवा करता यावी म्हणून स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे एक साधन, या दृष्टीने तुम्ही नोकरी-व्यवसायाकडे पाहत असाल, तर यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल. (मत्त. ६:३३) तुमची नोकरी तुमच्या हातून गेली, किंवा अचानक तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले, तरी यहोवा तुम्हाला मदत करण्यास समर्थ आहे. (यश. ५९:१) आपल्या सेवकांना कठीण परिस्थितीतून कसे सोडवावे “हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:९.
यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १९ ¶६, ८
कपट का परदाफाश!
६ लोग उपवास करते, धार्मिकता का ढोंग करते और यहोवा से कहते हैं कि वह उनकी खातिर धर्म से न्याय करे। मगर वे शरीर की अभिलाषाओं को पूरा करना और व्यापार-धंधे में डूबे रहना नहीं छोड़ते। वे झगड़ों में, अत्याचार और खून-खराबा करने में उलझे रहते हैं। और अपने इस बुरे व्यवहार को छिपाने के लिए शोक करने का नाटक करते हैं। वे झाऊ की तरह अपना सिर झुकाते और टाट बिछाकर और राख फैलाकर बैठते हैं, मानो वे अपने पापों के लिए पश्चाताप कर रहे हों। लेकिन जब तक वे विद्रोह करना नहीं छोड़ेंगे, तब तक इन सारी रस्मों को मानने का भला क्या फायदा? सच्चा उपवास रखनेवाले जिस तरह परमेश्वर के सामने शोक मनाते और पश्चाताप करते हैं, ये लोग ऐसा नहीं करते। इसलिए भले ही वे चिल्ला-चिल्लाकर रोते-पीटते हों, स्वर्ग में उनकी सुनवाई नहीं होती।
८ यहोवा चाहता है कि उसके लोग अपने पापों के लिए सिर्फ उपवास ही न करें बल्कि सच्चा पश्चाताप भी करें। तभी वे उसका अनुग्रह पा सकेंगे। (यहेजकेल 18:23, 32) वह उनको समझाता है कि एक इंसान का उपवास तभी कोई मायने रखता है जब वह पिछले पापों को छोड़कर अपने अंदर सुधार लाए। गौर कीजिए कि यहोवा उनके मन को परखते हुए कैसे सवाल पूछता है: “जिस उपवास से मैं प्रसन्न होता हूं क्या वह यह नहीं कि दुष्टता की बेड़ियां तोड़ी जाएं, जूए के बन्धन काटे जाएं, सताए हुए स्वतंत्र किए जाएं, और प्रत्येक जूआ तोड़ डाला जाए?”—यशायाह 58:6, NHT.
आध्यात्मिक रत्नं शोधा
पापी माणसांना सोडवायला यहोवाने काय केलंय?
४ या घटनेचे परिणाम जरी दुःखद असले, तरी यहोवाने आपल्या फायद्यासाठी त्याबद्दल बायबलमध्ये लिहून ठेवलंय. त्यामुळे आपल्याला कळतं, की त्याला पापाबद्दल इतकी चीड का आहे. पापामुळे आपण आपल्या पित्यापासून दूर जातो आणि त्यामुळेच आपला मृत्यू होतो. (यश. ५९:२) बंडखोर सैतानाला पाप करायला आवडतं. त्याने आदाम आणि हव्वाला पाप करायला प्रवृत्त केलं आणि आजही तो मानवांना पाप करायला प्रवृत्त करतोय. त्याला कदाचित वाटलं असेल की त्याने एदेन बागेत खूप मोठा विजय मिळवला. पण यहोवा देव किती प्रेमळ आहे हे त्याला समजत नाही. आदाम आणि हव्वाच्या वंशजांसाठी असलेला उद्देश यहोवाने कधीच बदलला नाही. त्याचं मानवांवर इतकं प्रेम आहे की त्याने लगेच त्यांना एक आशा दिली. (रोमकर ८:२०, २१ वाचा.) यहोवाला माहीत होतं की आदाम आणि हव्वाच्या वंशजांपैकी काही जण त्याच्यावर प्रेम करायचं निवडतील आणि पापाविरुद्ध लढण्यासाठी त्याची मदत मागतील. त्यांचा पिता या नात्याने तो त्यांना पापापासून मुक्त होण्यासाठी आणि त्याच्याजवळ येण्यासाठी मदत करणार होता. हे सगळं यहोवा कसं करणार होता?—नीत २८:१५.
११-१७ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ६०-६१
“हे स्त्री, ऊठ! आपला प्रकाश झळकू दे”
वाचकांचे प्रश्न
यशया ६०:१ मध्ये सांगितलंय: “हे स्त्री, ऊठ! आपला प्रकाश झळकू दे, कारण तुझा प्रकाश आला आहे. यहोवाच्या वैभवाचं तेज तुझ्यावर चमकत आहे.” संदर्भावरून लक्षात येतं, की या वचनात “स्त्री” असं जे म्हटलंय, ते सीयोन किंवा यरुशलेम शहर होतं आणि ते त्या वेळी यहूदाचं राजधानी शहर होतं. (यश. ६०:१४; ६२:१, २) हे शहर संपूर्ण इस्राएल राष्ट्राला सूचित करतं. त्यामुळे यशयाच्या शब्दांवरून दोन प्रश्न निर्माण होतात: पहिला, यरुशलेमने कधी आणि कसं ‘उठून आपला लाक्षणिक प्रकाश झळकवला’? दुसरा, यशयाच्या शब्दांची आज आपल्या दिवसांत मोठी पूर्णता आहे का?
यरुशलेमने कधी आणि कसं ‘उठून आपला प्रकाश झळकवला’? यहुदी जेव्हा ७० वर्षं बाबेलच्या गुलामगिरीत होते तेव्हा यरुशलेम आणि तिथलं मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत पडून होतं. पण जेव्हा बाबेलवर मेद आणि पर्शिया राज्य करू लागलं, तेव्हा संपूर्ण बाबेलमधले इस्राएली लोक गुलामगिरीतून मुक्त झाले आणि त्यांच्या मायदेशी परतून त्यांनी खरी उपासना पुन्हा सुरू केली. (एज्रा १:१-४) इ.स.पू. ५३७ पासून, इस्राएलच्या १२ वंशातले उरलेले विश्वासू लोकसुद्धा यरुशलेमला परत येऊ लागले. (यश. ६०:४) ते यहोवाला अर्पणं देऊ लागले, उत्सव साजरा करू लागले आणि मंदिर पुन्हा बांधू लागले. (एज्रा ३:१-४, ७-११; ६:१६-२२) अशा प्रकारे, परत एकदा यहोवाच्या वैभवाचं तेज यरुशलेमवर म्हणजे त्याच्या लोकांवर चमकू लागलं. मग हेच लोक आध्यात्मिक अंधकारात असलेल्या राष्ट्रातल्या लोकांसाठी प्रकाश बनले.
वाचकांचे प्रश्न
पण त्या वेळी यशयाच्या भविष्यवाण्या प्राचीन यरुशलेमवर काही प्रमाणातच पूर्ण झाल्या. कारण इस्राएल राष्ट्रातले लोक देवाच्या आज्ञांचं पालन करत राहिले नाहीत. (नेह. १३:२७; मला. १:६-८; २:१३, १४; मत्त. १५:७-९) नंतर तर त्यांनी मसीहाला म्हणजे येशूलाही नाकारलं. (मत्त. २७:१, २) मग इ.स. ७० मध्ये यरुशलेम आणि तिथल्या मंदिराचा दुसऱ्यांदा नाश झाला.
हे होईल याबद्दल यहोवाने आधीच सांगितलं होतं. (दानी. ९:२४-२७) हे स्पष्टच आहे की यशया अध्याय ६० मधल्या पुन्हा वसण्याच्या भविष्यवाणीचे प्रत्येक पैलू पृथ्वीवरची यरुशलेम पूर्ण करेल हा यहोवाचा उद्देश नव्हता.
वाचकांचे प्रश्न
यशयाच्या शब्दांची आज आपल्या दिवसांत मोठी पूर्णता आहे का? हो, पण दुसऱ्या एका लाक्षणिक स्त्रीच्या म्हणजे ‘वरच्या यरुशलेमच्या बाबतीत’ हे पूर्ण होत आहे. पौलने तिच्याबद्दल म्हटलं: “ती आपली आई आहे.” (गलती. ४:२६) वरची यरुशलेम ही देवाच्या संघटनेचा असा भाग आहे, जो स्वर्गात आहे आणि त्यात त्याचे एकनिष्ठ स्वर्गदूत आहेत. तिच्या मुलांमध्ये येशू आणि देवाच्या पवित्र शक्तीने अभिषिक्त असलेल्या १,४४,००० ख्रिश्चनांचा समावेश होतो. या ख्रिश्चनांना पौलसारखीच स्वर्गातल्या जीवनाची आशा आहे. आणि त्यांचं मिळूनच “पवित्र राष्ट्र” म्हणजे ‘देवाचं इस्राएल’ बनतं.—१ पेत्र २:९; गलती. ६:१६.
वरची यरुशलेम कधी ‘उठली’ आणि तिने आपला प्रकाश कसा ‘झळकवला’? तिने पृथ्वीवरच्या आपल्या अभिषिक्त मुलांद्वारे आपला प्रकाश झळकवला. यशया अध्याय ६० मध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती तिची आणि या मुलांना आलेल्या अनुभवाची तुलना करा.
अभिषिक्त ख्रिश्चनांना ‘उठावं’ लागणार होतं, कारण ते आध्यात्मिक रितीने अंधकारमय स्थितीत गेले होते. तसंच भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या शतकात धर्मत्यागाचं जंगली गवत खूप जास्त वाढलं होतं. (मत्त. १३:३७-४३) आणि अशा प्रकारे ते मोठ्या बाबेलच्या म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या बंदिवासात गेले. आणि ते ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीची’ सुरुवात होईपर्यंत बंदिवासात होते. ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीची’ सुरुवात १९१४ मध्ये झाली. (मत्त. १३:३९, ४०) त्यानंतर लगेचच १९१९ मध्ये त्यांना बंदिवासातून मुक्त करण्यात आलं आणि त्यांनी लगेचच स्वतःला प्रचारकार्यात झोकून दिलं, तेव्हा त्यांचा आध्यात्मिक प्रकाश झळकू लागला. त्यानंतरच्या वर्षांमध्ये सगळ्या राष्ट्रांतले लोक या प्रकाशाकडे आले आहेत. यात देवाच्या इस्राएलच्या उरलेल्या लोकांचा म्हणजे यशया ६०:३ मध्ये उल्लेख केलेल्या ‘राजांचा’ समावेश होतो.—प्रकटी. ५:९, १०.
भविष्यात अभिषिक्त ख्रिस्ती यहोवाकडून मिळालेला हा प्रकाश आणखी मोठ्या प्रमाणात झळकवतील. तो कसा? जेव्हा पृथ्वीवरचं त्यांचं जीवन संपेल तेव्हा ते ‘नवीन यरुशलेम’ म्हणजेच १,४४,००० राजे आणि याजकांनी मिळून बनलेल्या ख्रिस्ताच्या वधूचा भाग बनतील.—प्रकटी. १४:१, २१:१, २, २४; २२:३-५.
यशया ६०:१ मधली भविष्यवाणी पूर्ण करण्यात नवीन यरुशलेम एक महत्त्वाची भूमिका पार पाडेल. (यशया ६०:१, ३, ५, ११, १९, २० ची प्रकटीकरण २१:२, ९-११, २२-२६ सोबत तुलना करा.) ज्या प्रकारे पृथ्वीवरचं यरुशलेम हे जुन्या इस्राएली राष्ट्राचं सरकारी केंद्र होतं, त्याच प्रकारे नवीन यरुशलेम आणि ख्रिस्त नवीन व्यवस्थेचं सरकार बनेल. नवीन यरुशलेमबद्दल म्हटलंय की “ती स्वर्गातून, देवापासून खाली” उतरते. मग याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ ती आपलं पूर्ण लक्ष पृथ्वीकडे वळवते. त्यामुळे देवाला भिऊन वागणारे सर्व राष्ट्रांमधले लोक तिच्या “प्रकाशाने चालतील.” तसंच ते पाप आणि मृत्यूपासूनही मुक्त होतील. (प्रकटी. २१:३, ४, २४) याचा परिणाम म्हणजे यशया आणि इतर संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” होतील. (प्रे. कार्यं ३:२१) हा मोठा बदल ख्रिस्त जेव्हा राजा बनला तेव्हा सुरू झाला आणि त्याचा शेवट त्याच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी होईल.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो
१० देवाच्या पुत्राने दोन मार्गांनी लोकांना सुटका मिळवून दिली. पहिला मार्ग म्हणजे, येशूने लोकांना धार्मिक पुढारी शिकवत असलेल्या खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्यासाठी मदत केली. त्या काळात मानवी परंपरा आणि चुकीचे विश्वास पाळायला बऱ्याच यहुदी लोकांना भाग पाडलं जायचं. एका अर्थी ते त्यांचे दास बनले होते. (मत्त. ५:३१-३७; १५:१-११) धार्मिक पुढारी दावा करत होते की ते इतरांना देवाची उपासना करायला शिकवत आहेत. पण ते स्वतः देवाच्या इच्छेनुसार वागत नव्हते. मसीहाला आणि तो शिकवत असलेल्या गोष्टींना नाकारण्याद्वारे ते जणू आध्यात्मिक अंधारात आणि पापाच्या दास्यातच राहिले. (योहा. ९:१, १४-१६, ३५-४१) पण येशूने मात्र लोकांना सत्याची ओळख करून दिली आणि त्याने स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं. असं करण्याद्वारे त्याने नम्र लोकांना खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला.—मार्क १:२२; २:२३–३:५.
११ येशूने आणखी एका मार्गाने लोकांना सुटका मिळवून दिली. त्याने लोकांना पापाच्या दास्यातून सुटका मिळवण्याचा मार्ग खुला केला. येशूने दिलेल्या बलिदानाच्या आधारावर यहोवाला मानवांना क्षमा करणं शक्य झालं. ही क्षमा अशा लोकांना मिळणार होती जे येशूवर आणि त्याने दिलेल्या खंडणीवर विश्वास ठेवतात. (इब्री १०:१२-१८) येशूने म्हटलं होतं: “जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्त केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल.” (योहा. ८:३६) ही मुक्तता किंवा सुटका बऱ्याच बाबतीत इस्राएली लोकांना योबेल वर्षात मिळणाऱ्या सुटकेपेक्षा श्रेष्ठ होती. उदाहरणार्थ, योबेल वर्षात मुक्त झालेला दास, कदाचित परिस्थितीमुळे पुन्हा दास्यात जाऊ शकत होता आणि कालांतराने वय झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाच असता. पण येशूने लोकांसाठी केलेला सुटकेचा प्रबंध हा सदासर्वकाळ टिकणारा आहे.
१८-२४ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ६२-६४
प्रेमळ आणि दयाळू कुंभार
यहोवावर भरवसा ठेवा आणि भीतीवर मात करा
९ एखाद्या संकटामुळे तुम्ही जेव्हा घाबरून जाता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाला तुमच्यावर आलेलं संकट माहीत आहे आणि तुम्हाला कसं वाटतं हेसुद्धा त्याला कळतं. उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोकांवर जे अत्याचार होत होते ते यहोवाने पाहिलेच, पण त्यासोबतच “त्यांना किती यातना सोसाव्या लागत आहेत” हेसुद्धा यहोवा पाहत होता. (निर्ग. ३:७) ही गोष्ट दावीदनेसुद्धा अनुभवली. म्हणूनच त्याने एका स्तोत्रात असं गायलं, की यहोवा त्याचं “दुःख” आणि त्याला “होणाऱ्या यातना” जाणतो. (स्तो. ३१:७) यहोवाच्या लोकांनासुद्धा जेव्हा त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे वाईट परिणाम भोगावे लागले, तेव्हा यहोवाला ते पाहून “दुःख” झालं. (यश. ६३:९) तर हे नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही घाबरता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हे यहोवाला जाणवतं आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी तो तुम्हाला मदत करायला आतुर असतो.
गरजेची ओझी वाहा आणि बाकीची टाकून द्या
८ आपण घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेणं. यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्याची भेट दिली आहे. आणि चांगले निर्णय घेतल्यामुळे आपल्याला आनंद व्हावा असं त्याला वाटतं. पण वाईट निर्णय घेतल्यामुळे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्यांपासून तो आपल्याला वाचवत नाही. (गलती. ६:७, ८) त्यामुळे जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो, अविचारीपणे काही बोलतो किंवा करतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम आपण स्वीकारायला तयार असलं पाहिजे. आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे कदाचित आपला विवेक आपल्याला दोष देत असेल. पण आपण आपल्या चुकांसाठी जबाबदार आहोत हे माहीत असल्यामुळे आपण त्या कबूल करायला तयार होतो, त्या सुधारतो आणि त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेतो. या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जीवनाच्या शर्यतीत धावत राहायला मदत होऊ शकते.
९ आपण हे ओझं कसं वाहू शकतो? जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारा. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही हे लक्षात असू द्या. आपण घेतलेला निर्णय बरोबर होता हे पटवून देण्यासाठी किंवा आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. उलट, आपली चूक मान्य करा आणि आहे त्या परिस्थितीत काय चांगलं करता येईल याचा विचार करा. जर तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीबद्दल तुमचं मन तुम्हाला दोष देत असेल तर नम्रपणे यहोवाला प्रार्थना करा, आपली चूक कबूल करा आणि त्याच्याकडे क्षमा मागा. (स्तो. २५:११; ५१:३, ४) तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल तर त्याची माफी मागा आणि गरज असेल तर मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. (याको. ५:१४, १५) तसंच, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून काळजी घ्या. असं करत असताना तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की यहोवा तुम्हाला दया दाखवेल आणि तुम्हाला लागणारी मदत तो नक्की पुरवेल.—स्तो. १०३:८-१३.
तुमचे रूपांतर झाले आहे का?
१५ यशया ६४:८ वाचा. यशया संदेष्ट्याने वापरलेल्या उदाहरणावरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आपण मातीसारखे, तर यहोवा देव कुंभारासारखा आहे. आपल्याला आकार देत असताना यहोवा आपल्या बाहेरच्या स्वरूपात बदल करत नाही. उलट आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात तो बदल करतो. हे बदल स्वीकारल्यास, आपण यहोवाला आपल्या आतील व्यक्तीचे रूपांतर करू देतो. आणि यामुळे तो आपल्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये बदल घडवून आणतो. या जगातील वाईट प्रभावांचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये अशाच प्रकारचा बदल करण्याची गरज आहे. पण यहोवा आपल्याला नेमक्या कशा प्रकारे आकार देतो?
१६ चांगल्या दर्जाची भांडी बनवण्याकरता कुंभार उत्तम प्रतीची माती वापरतो. पण, सर्वात आधी त्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. सर्वप्रथम त्याला माती चांगल्या प्रकारे स्वच्छ करून कचरा इत्यादी काढून टाकावा लागतो. त्यानंतर मातीत योग्य प्रमाणात पाणी मिसळून तिचा मऊ गोळा तयार करावा लागतो, जेणेकरून भांडे तयार केल्यानंतर त्याचा आकार टिकून राहील.
१७ कुंभार माती स्वच्छ करतानाच नव्हे, तर तिचा मऊ गोळा तयार करतानादेखील पाण्याचा वापर करतो याकडे लक्ष द्या. असे केल्यामुळे त्याला त्या मातीपासून हवे ते भांडे, अगदी नाजूक भांडेदेखील तयार करता येते. पाण्यामुळे मातीत बदल होतो त्याच प्रकारे देवाचे वचन आपल्यामध्ये बदल घडवून आणते. ते आपल्याला सत्यात येण्यापूर्वीची जुनी विचारसरणी सोडून देण्यास आणि देवाच्या सेवेत उपयोगी ठरेल अशी व्यक्ती बनण्यास मदत करते. (इफिस. ५:२६) आपल्याला बायबल दररोज वाचण्याची आणि जेथे देवाच्या वचनातून चर्चा केली जाते त्या ख्रिस्ती सभांना नियमित रीत्या उपस्थित राहण्याची किती वेळा आठवण करून दिली जाते याचा विचार करा. या गोष्टी करण्याचे आपल्याला वारंवार प्रोत्साहन का दिले जाते? कारण जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा यहोवाने आपल्याला आकार द्यावा म्हणून आपण स्वतःला त्याच्या हातात सोपवून देत असतो.—स्तो. १:२; प्रे. कृत्ये १७:११; इब्री १०:२४, २५.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो?
७ जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करून आपली एखादी चिंता त्याला सांगतो, तेव्हा यहोवा कदाचित आधी आपल्याला त्या समस्येचा सामना करण्यासाठी ताकद देईल. आणि जर आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली समस्या लगेच दूर झाली नाही, तर तिचा सामना करण्यासाठी आपण वारंवार यहोवाला प्रार्थना करून ताकद मागितली पाहिजे. यहोवा स्वतः आपल्याला असं करायचं प्रोत्साहन देतो. हे यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला कळतं: “[यहोवाला] स्वस्थ बसू देऊ नका.” (यश. ६२:७) या शब्दांचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो, की आपण यहोवाला सतत प्रार्थना करत राहिलं पाहिजे. इतक्या वेळा, की जणू त्याला जराही स्वस्थ बसता येणार नाही. यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला येशूने दिलेल्या एका उदाहरणाचीही आठवण होते. प्रार्थनेबद्दल असलेलं ते उदाहरण आपल्याला लूक ११:८-१०, १३ या वचनांत वाचायला मिळतं. तिथे येशू आपल्याला सांगतो, की पवित्र शक्ती मिळावी म्हणून आपण ‘न लाजता वारंवार’ यहोवाकडे ‘मागत राहिलं’ पाहिजे. तसंच योग्य निर्णय घेता यावेत म्हणून आपण मार्गदर्शनासाठीही यहोवाला विनंती करू शकतो.
२५-३१ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ६५-६६
आध्यात्मिक नंदनवनावर आपलं प्रेम आहे!
आध्यात्मिक नंदनवन कधीच सोडून जाऊ नका!
५ आरोग्यदायी आणि ताजंतवानं. यशयाच्या भविष्यवाणीत आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्या लोकांमध्ये आणि बाहेर राहणाऱ्या लोकांमध्ये असलेला मोठा फरक स्पष्टपणे पाहायला मिळतो. (यशया ६५:१३ वाचा.) यहोवा त्याच्या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा उदारतेने पूर्ण करतो. आपल्याकडे त्याची पवित्र शक्ती आहे, त्याचं वचन आहे आणि भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न आहे. यामुळे आपण ‘पोटभर खाऊ शकतो, आपली तहान भागवू शकतो आणि आनंद साजरा करू शकतो.’ (प्रकटीकरण २२:१७ सोबत तुलना करा.) याच्या अगदी उलट, आध्यात्मिक नंदनवनाच्या बाहेर असलेले लोक “उपाशीच” आणि “तहानलेलेच” राहतात आणि यामुळे ते “लज्जित” होतात. कारण त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होत नाहीत.—आमो. ८:११.
आध्यात्मिक नंदनवन कधीच सोडून जाऊ नका!
९ शांत मन. यशया ६५:१४ मध्ये सांगितलंय, की जे आध्यात्मिक नंदनवनाच्या बाहेर राहायची निवड करतात त्यांचं ‘मन दुःखी असल्यामुळे ते मोठ्याने रडतात आणि निराशेमुळे आक्रोश करतात.’ पण ज्या गोष्टींमुळे देवाच्या लोकांना दुःख आणि त्रास सहन करावा लागतो त्या गोष्टींबद्दल काय? कालांतराने त्या गोष्टी ‘आठवणीत राहणार नाहीत, त्या देवाच्या नजरेआड केल्या जातील.’ (यशया ६५:१६, १७ वाचा.) यहोवा आपल्या सगळ्या समस्या काढून टाकेल आणि काळाच्या ओघात त्यांच्या आठवणींमुळे होणारं दुःखही नाहीसं केलं जाईल.
१० आपण आजसुद्धा जेव्हा सभांना जातो तेव्हा आपलं मन शांत होतं. तिथे आपण या दुष्ट जगाच्या चिंता मागे टाकून निश्चिंत होऊ शकतो. आपण जेव्हा पवित्र शक्तीच्या फळांच्या गुणांपैकी प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता आणि दयाळूपणा हे गुण दाखवतो तेव्हा आपण या आध्यात्मिक नंदनवनाच्या शांतीला हातभार लावत असतो. (गलती. ५:२२, २३) खरंच देवाच्या संघटनेत राहणं हा आपल्यासाठी किती मोठा आशीर्वाद आहे! जे या आध्यात्मिक नंदनवनात राहायची निवड करतात ते “नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी” हे देवाचं अभिवचन पूर्ण होताना पाहतील.
आध्यात्मिक नंदनवन कधीच सोडून जाऊ नका!
१३ शांत आणि सुरक्षित. जे भाऊबहीण आधी क्रूर आणि हिंसक स्वभावाचे होते, त्यांनी आपल्या जीवनात पवित्र शक्तीच्या मदतीने खूप मोठमोठे बदल केलेत. (यशया ६५:२५ वाचा.) त्यांनी त्यांच्या वाईट गुणांवर मात करण्यासाठी खूप मेहनत घेतली. (रोम. १२:२; इफिस. ४:२२-२४) हे खरंय की देवाचे लोक अजूनही अपरिपूर्ण असल्यामुळे चुका करत राहतील, पण यहोवाने “सर्व प्रकारच्या” लोकांना प्रेम आणि शांतीच्या अतूट बंधनात बांधलंय. (तीत २:११) आणि हा चमत्कार सर्वशक्तिमान देवच करू शकतो!
आध्यात्मिक रत्नं शोधा
येशू नरकातील अग्नीत यातना भोगण्याविषयी बोलत होता का?
येशूच्या शब्दांची यशयाच्या भविष्यवाणीतील शेवटल्या वचनाशी तुलना करून पाहा. येशूने यशयाच्या ६६ व्या अध्यायातील मजकुराचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला हे अगदी उघड आहे, नाही का? तेथे संदेष्टा यशयाने “जेरूसलेम शहराबाहेर असलेल्या हिन्नोमच्या खोऱ्यात (गेहेन्ना) जाण्याविषयी उल्लेख केला. या ठिकाणी एके काळी मनुष्यबली दिले जात होते (यिर्म ७:३१) आणि कालांतराने ही सबंध शहरातील कचरा आणून फेकण्याची जागा बनली.” (द जेरोम बिब्लिकल कॉमेंट्री) यशया ६६:२४ यातील लाक्षणिक भाषेतील वर्णन, यातना भोगण्याविषयी नाही हे तर स्पष्टच आहे कारण यात प्रेतांचा उल्लेख आहे. कधी मरावयाचे नाही असे जे म्हटले आहे, ते जिवंत मानवांबद्दल किंवा अमर आत्म्यांविषयी नसून किड्यांबद्दल म्हणण्यात आले आहे. तर मग येशूला नेमके काय सांगायचे होते?
एल ईव्हान्हेल्यो दी मार्कोस, आनालीसिस लिंग्विस्तीको ई कोमेन्तार्यो एक्सीहीटीको या कॅथलिक ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात मार्क ९:४८ यावर पुढील भाष्य करण्यात आले आहे: “[हा] वाक्यांश यशया (६६,२४) यातून घेतलेला आहे. त्या ठिकाणी संदेष्ट्याने, मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या दोन सर्वसामान्य पद्धतींविषयी सांगितले: कुजवणे व जाळणे. . . . या वचनात किड्यांचा व अग्नीचा एकसाथ उल्लेख करण्याद्वारे संपूर्ण विनाशाच्या कल्पनेवर भर देण्यात आला आहे. . . . येथे उल्लेख केलेल्या दोन्ही नाशकारक गोष्टी कायमस्वरूपी असल्याचे सांगण्यात आले आहे (‘मरत नाही, विझत नाही’): त्याअर्थी त्यांपासून सुटकेचा मार्गच नाही. शिल्लक राहतात ते मनुष्य नव्हेत, तर फक्त किडे आणि अग्नी. आणि या दोन गोष्टी त्यांच्या संपर्कात जे काही येईल त्याचा सर्वनाश करतात. तेव्हा, हे वर्णन सार्वकालिक यातनांचे नसून, संपूर्ण विनाशाचे आहे. आणि या विनाशानंतर पुनरुत्थानही शक्य नसल्यामुळे हा विनाश कायमस्वरूपी मृत्यूस सूचित करतो. अशा रीतीने, [अग्नी] संपूर्ण विनाशाचे प्रतीक आहे.”
१-७ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया १-३
“तू घाबरू नकोस, कारण . . . ‘मी तुझ्यासोबत आहे’”
यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो
७ यहोवावर विसंबून राहिल्यास आपल्याला आवश्यक असलेले पाठबळ तो नक्कीच पुरवेल. उदाहरणार्थ, यिर्मया बोलण्याच्या बाबतीत इतका निपुण नव्हता. त्यामुळे यहोवाने त्याला आपला संदेष्टा म्हणून नियुक्त केले तेव्हा तो म्हणाला: “अहो, प्रभु परमेश्वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” काही काळाने तर त्याने असेही म्हटले: “यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” (यिर्म. १:६; २०:९) पण, यहोवाच्या पाठबळामुळेच तब्बल ४० वर्षांपर्यंत यिर्मयाला एक अप्रिय संदेश लोकांना सांगणे शक्य झाले. यहोवाने वारंवार असे म्हणून त्याला धीर दिला: “तुझा बचाव करण्यास व तुला सोडविण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”—यिर्म. १:८, १९; १५:२०.
८ यहोवाने मोशे आणि यिर्मया यांना ज्याप्रमाणे पाठबळ दिले त्याचप्रमाणे तो ख्रिश्चनांकडून आज ज्या काही गोष्टी अपेक्षितो त्या पूर्ण करण्यास तो त्यांनाही मदत करू शकतो. पण, त्यासाठी आपण त्याच्यावर विसंबून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बायबल म्हणते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) यहोवा आपल्या वचनाद्वारे व मंडळीद्वारे पुरवत असलेल्या मदतीचा आपण फायदा करून घेतो, तेव्हा आपल्याला त्याच्यावर भरवसा असल्याचे आपण दाखवून देतो. जीवनात पावलोपावली यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारल्यास कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्यापासून दूर करू शकणार नाही.
आध्यात्मिक रत्नं शोधा
“खंबीर आणि स्थिर राहा”
४ आपण मूर्तिपूजेपासून दूर राहून फक्त यहोवाचीच उपासना करतो. यहोवाने इस्राएली लोकांना फक्त त्याचीच उपासना करण्याची आज्ञा दिली होती. (अनु. ५:६-१०) सैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली, तेव्हा येशूनेसुद्धा हेच दाखवून दिलं, की आपण फक्त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. (मत्त. ४:८-१०) म्हणून आपण उपासनेसाठी कोणत्याही मूर्तीचा वापर करत नाही. तसंच आपण कोणत्याही मानवांची उपासना करत नाही आणि त्यांना देवांचा दर्जा देत नाही; मग ते धार्मिक पुढारी असोत, राजकीय नेते असोत, किंवा मग खेळाच्या आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्ती असोत. आपण नेहमी यहोवाची बाजू घेतो आणि फक्त त्याचीच उपासना करतो. कारण त्यानेच “सर्व गोष्टी निर्माण केल्या” आहेत.—प्रकटीकरण ४:११ वाचा.
८-१४ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया ४-६
आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्या यहूदाच्या उदाहरणातून इशारा घ्या
यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?
८ “हृदयाने बेसुनत” याचा अर्थ काय आहे हे देवाने यहुद्यांना जे करण्यास आर्जवले होते त्यावरून सूचित होते. त्याने म्हटले: “अहो यहुदातल्या मनुष्यांनो व यरुशलेमेतल्या राहणाऱ्यांनो . . . आपल्या हृदयांची अग्रत्वचा काढून टाका; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टपणामुळे माझा क्रोध अग्नीसारखा निघून तो कोणाच्याने विझवणार नाही.” पण, त्यांच्या दुष्ट कृत्यांची सुरुवात कोठून झाली? त्यांच्या आतून, म्हणजे त्यांच्या हृदयातून. (मार्क ७:२०-२३ वाचा.) खरेच, यहुद्यांच्या दुष्ट कृत्यांचा स्रोत काय आहे याचे देवाने यिर्मयाद्वारे अगदी अचूकपणे निदान केले. त्यांचे हृदय हट्टी व बंडखोर बनले होते. त्यांचे हेतू व त्यांची विचारसरणी देवाला स्वीकृत नव्हती. (यिर्मया ५:२३, २४; ७:२४-२६ वाचा.) देवाने त्यांना असे सांगितले: “यहोवासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपल्या हृदयांची अग्रत्वचा काढून टाका.”—यिर्म. ४:४, पं.र.भा.; १८:११, १२.
९ तेव्हा, मोशेच्या काळातील इस्राएल लोकांप्रमाणेच यिर्मयाच्या दिवसांतील यहुद्यांनाही त्यांच्या हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया—“हृदयाची सुंता” करणे गरजेचे होते. (अनु. १०:१६; ३०:६) “हृदयांची अग्रत्वचा काढून” टाकण्याचा अर्थ, त्या यहुद्यांनी देवाच्या विचारसरणीच्या विरोधात असलेले विचार, भावना, किंवा हेतू आपल्या हृदयातून काढून टाकायचे होते. कारण, अशा गोष्टींमुळे त्यांचे हृदय देवाच्या विचारसरणीला प्रतिसाद देत नव्हते.—प्रे. कृत्ये ७:५१.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे
४:१०; १५:१८—यहोवाने आपल्या बंडखोर लोकांना फसविले ते कोणत्या अर्थाने? यिर्मयाच्या काळात, “खोटे संदेश” देणारे संदेष्टे होते. (यिर्मया ५:३१; २०:६; २३:१६, १७, २५-२८, ३२) यहोवाने या खोट्या संदेष्ट्यांना लोकांची भुलवणूक करणारे संदेश सांगण्यापासून रोखले नाही.
१५-२१ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया ७-८
त्यांनी यहोवाच्या मंदिराचा अनादर केला
जेरमाया २१ ¶१२
“शेवटच्या दिवसांत” सेवा करणं
१२ यहोयाकीम राजाच्या शासनाच्या सुरुवातीला यहोवाने यिर्मयाला मंदिरात जाऊन यहूदाच्या लोकांना त्यांच्या वाईट कामांसाठी कडक शब्दांत ताकीद द्यायला सांगितली. या लोकांना वाटायचं, की त्यांनी काहीही केलं तरी तिथे यहोवाचं मंदिर असल्यामुळे त्यांचं संरक्षण होईल. पण यहोवाने त्यांना ताकीद दिली की जर त्यांनी ‘चोऱ्यामाऱ्या, खून, व्यभिचार करायचं तसंच खोट्या शपथा घ्यायचं, बआलसाठी बलिदानं द्यायचं आणि ज्या देवांची त्यांना कधीच ओळख नव्हती, अशांच्या नादी लागयचं’ सोडलं नाही तर यहोवा आपलं मंदिर सोडून देईल. तसंच त्यानंतर “सगळा देश ओसाड होईल”. (यिर्म. ७:१-१५, ३४; २६:१-६) हा संदेश सांगण्यासाठी यिर्मयाला किती धैर्य दाखवावं लागणार होतं याचा विचार करा. तो कदाचित सार्वजनिक ठिकाणी श्रीमंत आणि नावाजलेल्या लोकांसमोर बोलला असावा. आजही काही भाऊबहिणींना सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करायला किंवा श्रीमंत आणि नावाजलेल्या लोकांना प्रचार करायला धैर्य लागतं. असं असलं तरी एका गोष्टीची आपल्याला खातरी आहे की यहोवा यिर्मयासारखंच आपल्यालाही नक्की मदत करेल.—इब्री १०:३९; १३:६.
इन्साइट “यहोवा” ¶७८
यहोवा
प्राचीन इस्राएलच्या इतिहासात यहोवाने त्याच्या लोकांना, त्याचं नाव पवित्र असणं किती महत्त्वाचं आहे याची बऱ्याचदा आठवण करून दिली. त्याने राजधानी असलेल्या यरुशलेम शहराला आणि सियोन पर्वताला आपल्या ‘नावाच्या गौरवासाठी आणि राहण्यासाठी’ निवडलं होतं. (अनु १२:५, ११; १४:२४, २५; यश १८:७; यिर्म ३:१७) यरुशलेममध्ये बांधलेल्या मंदिराला ‘यहोवाच्या नावाच्या गौरवासाठी’ असलेलं घर म्हटलं जायचं. (१इत २९:१३-१६; १रा ८:१५-२१, ४१-४३) मंदिरात किंवा शहरात जे काही बरंवाईट घडायचं त्याचा परिणाम यहोवाच्या नावावर व्हायचा. तसंच यहोवाचं त्याकडे लक्ष असायचं. (१रा ८:२९; ९:३; २रा २१:४-७) म्हणून जर इस्राएली लोकांनी तिथे यहोवाच्या नावाचा अनादर केला तर यहोवाने त्यांना शिक्षा करणार होता आणि मंदिराचाही नाश करणार होता.—१रा ९:६-८; यिर्म २५:२९; ७:८-१५.
यहोवावर प्रेम असल्याचं दाखवा
१७ शमुवेलाच्या काळात पलिष्ट्यांविरुद्ध लढताना इस्राएली लोकांचा पराभव झाला. अशा वेळी पुढे काय करावं हे यहोवाला विचारण्याऐवजी त्यांनी म्हटलं: “आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रूपासून आपले संरक्षण करेल.” या निर्णयाचा काय परिणाम झाला? बायबल सांगतं, की “त्यांचा तो दारुण पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला.” (१ शमु. ४:२-४, १०, ११, ईझी-टू-रीड व्हर्शन) इस्राएली लोकांना वाटलं, की फक्त कराराचा कोश जरी आपल्यासोबत असला, तरी यहोवा आपल्याला मदत करेल आणि आपलं संरक्षण करेल. खरंतर मदतीसाठी त्यांनी यहोवावर अवलंबून राहायला हवं होतं किंवा त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा होता. पण, याउलट त्यांनी स्वतःला योग्य वाटेल तेच केलं आणि त्याचा भयंकर परिणाम त्यांना सहन करावा लागला.—नीतिसूत्रे १४:१२ वाचा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
जेरमाया १३५ ¶१४
“देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे मेंढपाळ”
१४ यिर्मयाच्या दिवसांत, यिर्मयाने पाहिलं की लोकांना आध्यात्मिक रीत्या बरं होण्याची गरज होती. त्याने विचारलं “गिलादमध्ये मलम [किंवा बाल्सम] नाही का? तिथे कोणी वैद्य नाही का?” (यिर्म. ८:२२) गिलादच्या प्रदेशात बाल्सम नावाचं एक रोप होतं आणि त्यातून सुगंधित तेल काढलं जायचं. या तेलामुळे जखमा लवकर बऱ्या व्हायच्या आणि दुखणंही कमी व्हायचं. इस्राएलचे लोक आपल्या शारीरिक जखमा बऱ्या करु शकत होते, पण आध्यात्मिक रीत्या बरं व्हायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. असं का? यिर्मया म्हणतो: “संदेष्टे खोट्या भविष्यवाण्या करतात, याजक इतरांवर अधिकार गाजवतात, आणि हे सगळं माझ्या लोकांना आवडतं.” संदेष्टे आणि याजक लोकांना यहोवासोबतचं त्यांचं नातं पुन्हा जोडायला मदत करू शकले नाहीत. आज आपल्या मंडळीतही ‘गिलादचं बाल्सम’ आहे, नाही का? जसं बाल्सम तेलामुळे बरं वाटायचं, तसंच काळजी घेणाऱ्या मेंढपाळांनी दिलेल्या सांत्वनामुळेही आपल्याला खूप बरं वाटतं. ते प्रेमळपणे आपल्याला बायबलची तत्त्वं सांगतात, प्रोत्साहन देतात, तसंच आपल्यासोबत आणि आपल्यासाठी प्रार्थना करतात म्हणून आपण त्यांचे खूप आभारी आहोत!—याको. ५:१४, १५.
२२-२८ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया ९-१०
तुम्ही कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे?
आपण स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये
१३ काही अहवालांवरून दिसून आलं आहे, की जे लोक सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहण्यात आणि मेसेज वाचण्यात बराच वेळ घालवतात ते शेवटी निराश होतात, आणि त्यांना एकटेपणा जाणवतो. पण असं का होतं? याचं एक कारण असं असू शकतं की लोक सहसा आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर टाकतात. ते स्वतःचे, आपल्या मित्रांचे आणि ज्या ठिकाणी ते फिरायला गेले असतील त्या ठिकाणांचे सर्वात चांगले फोटो सोशल मीडियावर टाकतात. आणि ते फोटो पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कदाचित वाटेल की, ‘यांच्या तुलनेत माझं जीवन किती बोरिंग आहे.’ १९ वर्षांच्या एका ख्रिस्ती बहिणीला असंच वाटलं. ती म्हणते: “इतर लोक शनिवार-रविवार किती मजा करतात आणि मी मात्र घरात बसून बोर होते, याचं मला खूप वाईट वाटायचं.”
१४ हे खरं आहे की सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठीसुद्धा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहता येतं. पण तुमच्या लक्षात आलं असेल की काही लोक स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स टाकत असतात. एका अर्थी त्यांना असं सांगायचं असतं, की “माझ्याकडे बघा.” काही जण तर स्वतःच्या आणि इतरांच्या फोटोंबद्दल टीकात्मक किंवा अश्लील कमेंट्ही टाकतात. पण खऱ्या ख्रिश्चनांना असं प्रोत्साहन दिलं जातं की त्यांनी नम्र असावं आणि इतरांच्या भावनांचा विचार करावा. त्यामुळे आपण सोशल मीडियाचा सुज्ञपणे वापर करावा.—१ पेत्र ३:८ वाचा.
१५ तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर करत असाल तर स्वतःला विचारा: ‘मी सोशल मीडियावर जे कमेंट्स, फोटो किंवा व्हिडिओ टाकतो, त्यावरून लोकांना असं वाटेल का की मी स्वतःची बढाई मारतोय? यामुळे इतरांच्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण होईल का?’ बायबल म्हणतं: “जगातल्या सर्व गोष्टी—शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा—या पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.” (१ योहा. २:१६) इतरांनी आपल्याला महत्त्व द्यावं किंवा आपली प्रशंसा करावी असं ख्रिश्चनांना वाटू नये. आपण पुढे दिलेल्या बायबलच्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. बायबल म्हणतं: “आपण अहंकारी किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्न करणारे किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे असे होऊ नये.” (गलती. ५:२६) आपण जर नम्र असलो, तर जगातल्या लोकांसारखं आपण गर्विष्ठ बनणार नाही. तसंच त्यांच्यासारखं आपण स्वतःला खूप महत्त्व देण्याचा प्रयत्नही करणार नाही.
यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
१४ आपल्याला यहोवाच्या नावाचा अभिमान आहे. (स्तोत्र १०५:३ वाचा.) आपण यहोवाच्या नावाचा अभिमानाने गौरव करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. (यिर्म. ९:२३, २४; १ करिंथ. १:३१; २ करिंथ. १०:१७) त्याच्या नावाचा आदर करणं आणि त्याची बाजू घेणं ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत ही गोष्ट आपल्या कामावरच्या लोकांना, शाळेतल्या सोबत्यांना, शेजारच्यांना आणि इतरांना सांगायला आपल्याला कधीच लाज नाही वाटली पाहिजे. यहोवाचं नाव आपण इतरांना सांगू नये असं सैतानाला वाटतं. (यिर्म. ११:२१; प्रकटी. १२:१७) खरंतर, लोकांनी यहोवाचं नाव विसरून जावं असं सैतानाला आणि त्याच्या खोट्या शिकवणी पसरवणाऱ्यांना वाटतं. (यिर्म. २३:२६, २७) पण, आपलं यहोवाच्या नावावर प्रेम असल्यामुळे आपण ‘दिवसभर त्याच्या नावामुळे आनंदी असतो.’—स्तो. ५:११; ८९:१६.
योग्य मनोवृत्ती असलेल्यांना लवकरात लवकर मदत करा
१२ सुरुवातीपासूनच तुमचं ध्येय बायबल विद्यार्थ्याला यहोवा आणि येशूबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांच्यावरचं प्रेम वाढवायला मदत करणं, हे असलं पाहिजे. यासाठी तुम्ही त्याचं लक्ष स्वतःकडे किंवा तुमच्याकडे किती ज्ञान आहे याकडे नाही, तर देवाच्या वचनाकडे वळवलं पाहिजे. (प्रे. कार्यं १०:२५, २६) प्रेषित पौलचं या बाबतीत खूप चांगलं उदाहरण आहे. त्याने शिकवताना नेहमी इतरांचं लक्ष येशूकडे वेधलं. कारण लोकांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत व्हावी, म्हणून यहोवाने येशूला पाठवलं होतं. (१ करिंथ. २:१, २) नंतर पौलने भाऊबहिणींना काही चांगले गुण वाढवणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं. कारण या गुणांची तुलना सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांशी केली जाऊ शकते. (१ करिंथ. ३:११-१५) या मौल्यवान गुणांमध्ये विश्वास, बुद्धी, समंजसपणा आणि यहोवाची भीतीसुद्धा सामील आहे. (स्तो. १९:९, १०; नीति. ३:१३-१५; १ पेत्र १:७) तर मग तुमच्या विद्यार्थ्याला त्याचा विश्वास मजबूत करायला आणि यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करून तुम्हीसुद्धा पौलसारखं वागू शकता.—२ करिंथ. १:२४.
आध्यात्मिक रत्नं शोधा
भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?
१६ मंडळीत वडील म्हणून सेवा करायची इच्छा असलेल्या भावाची “शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्वसनीय वचनाला धरून असावी.” वडील म्हणून सेवा करणाऱ्या भावाला चांगला शिक्षक बनायचं असेल, तर तो जे काही शिकवतो आणि जो काही सल्ला देतो, तो देवाच्या वचनावर आधारलेला असला पाहिजे. म्हणून बायबल आणि आपल्या प्रकाशनांचा चांगला अभ्यास करा. (नीति. १५:२८; १६:२३) तुम्ही अभ्यास करत असताना आपली प्रकाशनं बायबलमधली वचनं कशी स्पष्ट करतात याकडे नीट लक्ष द्या. म्हणजे ती कशी लागू होतात हे तुम्हाला समजेल. तसंच, शिकवताना भाऊबहिणींच्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर चांगला शिक्षक व्हायचं असेल, तर मंडळीतल्या अनुभवी वडिलांकडून सल्ला घ्या आणि तो लागू करा. (१ तीम. ५:१७) वडिलांनी नेहमी ‘इतरांना प्रोत्साहन देणारे’ असलं पाहिजे. पण कधीकधी त्यांना भाऊबहिणींना सल्ला आणि “ताडनही” देण्याची गरज पडू शकते. म्हणून या दोन्ही गोष्टी करताना वडिलांनी नेहमी सौम्य असलं पाहिजे. तुम्ही जर नम्र आणि प्रेमळ असाल, आणि तुमची शिकवण ही देवाच्या वचनावर आधारित असेल, तर तुम्ही एक चांगले शिक्षक बनाल. कारण असं केल्यामुळे तुम्ही चांगला शिक्षक असलेल्या येशूचं अनुकरण करत असाल.—मत्त. ११:२८-३०; २ तीम. २:२४.
२९ जून–५ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया ११-१२
आपण ‘घोड्यांसोबत शर्यतीत कसं धावू’ शकतो?
छळ होत असूनही आनंदी
१२ आज यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपला छळ सहसा यासाठी केला जातो की आपण आवेशाने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतो. आपले शत्रू आपल्यावर “जबरदस्तीने धर्मांतर” करण्याचा आरोप करतात, पण आपल्याआधी यहोवाच्या इतर विश्वासू उपासकांनाही अशाप्रकारच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते हे आपल्याला माहीत आहे. (यिर्मया ११:२१; २०:८, ११) प्राचीन काळच्या विश्वासू संदेष्ट्यांना ज्या कारणासाठी छळले गेले त्याच कारणासाठी आपल्यालाही दुःख सहन करायला मिळावे हा आपण एक बहुमान समजतो. शिष्य याकोबाने लिहिले: “बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुखःसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.”—याकोब ५:१०, ११.
यिर्मयाप्रमाणे जागृत राहा
१९ सध्याची वेळ ही राज्याशी संबंधित कार्यांत धीमे पडण्याची वेळ नाही; तर यिर्मया १२:५ मधील शब्द किती महत्त्वाचे आहेत हे विचारात घेण्याची वेळ आहे. (यिर्मया १२:५ वाचा.) आपल्या सर्वांवर परीक्षा येतात आणि त्यांचा आपण धीराने सामना केला पाहिजे. विश्वासाच्या या परीक्षांची तुलना “पायी चालणाऱ्यांबरोबर” केली जाऊ शकते ज्यांच्यासोबत आपल्याला धावावे लागते. पण, “मोठे संकट” जवळ येते तसतशा या परीक्षा अधिकाधिक वाढण्याची अपेक्षा आपण करू शकतो. (मत्त. २४:२१) पुढे येणाऱ्या अधिक आव्हानात्मक समस्यांशी संघर्ष करण्याची तुलना “घोडेस्वारांबरोबर” धावण्याशी केली जाऊ शकते. भरधाव धावणाऱ्या घोडेस्वारांच्या सोबतीने धीराने धावण्यासाठी एका व्यक्तीला कितीतरी मोठ्या प्रमाणात शक्तीची गरज असते. तेव्हा, आज आपल्यावर येणाऱ्या परीक्षांना धीराने तोंड देणे महत्त्वाचे आहे, कारण असे केल्याने पुढे येणाऱ्या परीक्षांना धीराने तोंड देण्यास आपण सज्ज असू.
तुम्ही मोठ्या संकटासाठी तयार आहात का?
१५ आपल्यापैकी बरेच जण अशा मंडळ्यांमध्ये आहेत जिथे अनेक जण वेगवेगळ्या संस्कृतीतून आले आहेत. आणि त्यांचा स्वभावही वेगवेगळा आहे. पण आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देऊन, त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम वाढवू शकतो. न्यूझीलंडमध्ये सेवा करणाऱ्या वेनेसा नावाच्या बहिणीलासुद्धा तिच्या मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत जुळवून घेणं कठीण जात होतं. मग ज्यांचा स्वभाव तिला आवडत नव्हता, त्यांच्यापासून लांब राहण्याऐवजी तिने त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायचं ठरवलं. असं केल्यामुळे यहोवा त्यांच्यावर का प्रेम करतो, ते समजून घ्यायला तिला मदत झाली. ती म्हणते: “माझे पती विभागीय पर्यवेक्षक झाल्यापासून आमची सतत वेगवेगळ्या स्वभावाच्या भाऊबहिणींसोबत भेट होत राहते. आता मला त्यांच्याशी जुळवून घ्यायला सोपं जातं. इतकंच काय तर त्यांचा वेगवेगळा स्वभावसुद्धा मला आवडू लागला आहे.” यहोवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. त्यामुळे तो अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना, त्याची उपासना करण्यासाठी एकत्र करतो. जेव्हा आपण इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलंही त्यांच्यावर प्रेम असल्याचं आपण दाखवत असतो.—२ करिंथ. ८:२४.
१६ मोठ्या संकटाच्या काळात आपल्याला भाऊबहिणींवर प्रेम करत राहणं खूप महत्त्वाचं असेल. मोठं संकट सुरू झाल्यानंतर यहोवा आपलं संरक्षण कसं करेल? प्राचीन बाबेलवर हल्ला झाला तेव्हा यहोवाने त्याच्या लोकांना कोणती सूचना दिली होती त्याचा विचार करा. त्याने म्हटलं: “जा माझ्या लोकांनो, आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा, दारं लावून घ्या. देवाचा क्रोध शांत होईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) असं दिसतं, की मोठ्या संकटाचा सामना करत असताना आपल्यालाही या सूचनांचं पालन करावं लागेल. इथे ज्या ‘आतल्या खोल्यांबद्दल’ सांगण्यात आलंय, त्या कदाचित आपल्या मंडळ्या असतील. मोठ्या संकटादरम्यान आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून राहिलो, तरच यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपलं संरक्षण करेल. म्हणूनच आपण आपल्या भाऊबहिणींना फक्त सहनच केलं नाही पाहिजे, तर त्यांच्यावर प्रेम करत राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आपलं मोठ्या संकटातून वाचणं कदाचित यावरच अवलंबून असेल!
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवाला मनमोकळेपणे प्रार्थना करा
१५ यिर्मया १२:१ वाचा. यिर्मया संदेष्ट्याच्या जीवनातसुद्धा समस्या आल्या. दुष्ट लोकांची भरभराट पाहून त्याला चिड आली. तसंच, इस्राएली लोकांनी त्याला जी वाईट वागणूक दिली त्यामुळे तो निराश झाला. (यिर्म. २०:७, ८) यिर्मयाने यहोवासमोर त्याचा राग व्यक्त केला, तरी त्याने त्याच्या न्यायावर शंका घेतली नाही. वाईत लोकांना यहोवाने कशा प्रकारे शिक्षा दिली हे पाहून यहोवा न्यायी आहे या गोष्टीवरचा त्याचा विश्वास आणखी वाढला. (यिर्म. ३२:१९) मग यिर्मयाकडून आपण काय शिकू शकतो? आज आपणसुद्धा वाईट लोकांची भरभराट होताना पाहतो किंवा लोक आपल्याशी वाईट वागतात. अशा वेळी आपणही आपल्या भावना मनमोकळेपणे यहोवाला सांगू शकतो आणि असा भरवसा ठेवू शकतो की यहोवा त्याच्या ठरवलेल्या वेळी अन्याय काढून टाकेल.