वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr26 मार्च पृ. १-१२
  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२६
  • उपशिर्षक
  • २-८ मार्च
  • ९-१५ मार्च
  • १६-२२ मार्च
  • २३-२९ मार्च
  • ६-१२ एप्रिल
  • १३-१९ एप्रिल
  • २०-२६ एप्रिल
  • २७ एप्रिल–३ मे
जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२६
mwbr26 मार्च पृ. १-१२

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ

© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

२-८ मार्च

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ४१-४२

“भिऊ नकोस”

टेहळणी बुरूज२५.०५ १२ ¶१३

सांत्वनासाठी यहोवाकडे पाहा!

१३ यहोवाने एक अद्‌भुत आशा देऊन यहुद्यांचं सांत्वन केलं असलं तरी त्याला माहीत होतं, की त्यांच्या सुटकेच्या वेळी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. यहोवाने आधीच सांगितलं होतं, की बंदिवासाच्या शेवटी एक शक्‍तिशाली राजा आजूबाजूच्या राष्ट्रांचा नाश करेल आणि बाबेलला धमकावेल. (यश. ४१:२-५) मग याबद्दल यहुद्यांना काळजी करायची गरज होती का? नाही. कारण यहोवाने खूप आधी त्याच्या लोकांचं सांत्वन करत म्हटलं होतं: “भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे.” (यशया ४१:१०-१३ वाचा.) यहोवाने जेव्हा म्हटलं, की “मी तुझा देव आहे,” तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? यहुद्यांनी त्याची उपासना केली पाहिजे याची तो त्यांना इथे आठवण करून देत होता का? नाही, तो त्यांना याची आठवण करून देत होता, की तो अजूनही त्यांच्या बाजूने आहे.—स्तो. ११८:६.

टेहळणी बुरूज१२ ७/१ १० ¶३-५

देवाच्या जवळ या

मी यहोवा “तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे

“तू भिऊ नको,” असे यहोवा आर्जवतो. (वचन १०) हे काही पोकळ शब्द नाहीत. आपल्या लोकांनी का घाबरू नये हे तो पुढे सांगतो. तो म्हणतो: “कारण मी तुझ्याबरोबर आहे.” यहोवा आपल्यापासून दूर असणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीसारखा नाही जी फक्‍त गरजेच्या वेळी मदतीला धावून येण्याचे आश्‍वासन देते. तर यहोवा आपल्या सेवकांना ही हमी देऊ इच्छितो की त्यांना साहाय्य करण्यासाठी तो नेहमी त्यांच्यासोबत आहे, जणू त्यांच्या बाजूला उभा आहे. हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते!

यहोवा पुढे आश्‍वासन देतो: “घाबरू नको.” (वचन १०) येथे वापरण्यात आलेले इब्री क्रियापद, “आपल्याला कोणी इजा पोचवेल या भीतीने सभोवताली पाहणाऱ्‍यांना” सूचित करते. आपल्या लोकांनी भीतीने येथे-तेथे पाहण्याची गरज का नाही हे यहोवा पुढे सांगतो: “कारण मी तुझा देव आहे.” यापेक्षा आणखी आश्‍वासन देणारे शब्द काय असू शकतात? यहोवा या जगाचा परात्पर आणि सर्वसमर्थ आहे. (स्तोत्र ९१:१) सर्वशक्‍तिमान यहोवा देव त्यांच्या बाजूने असल्यावर त्यांना घाबरण्याचे काय कारण आहे?

तर मग, यहोवाचे उपासक त्याच्याकडून कशाची अपेक्षा करू शकतात? तो अभिवचन देतो: “मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (वचन १०) तो पुढे असेही म्हणतो: “मी परमेश्‍वर [“यहोवा,” NW] तुझा देव तुझा उजवा हात धरून” आहे. (वचन १३) हे शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात कोणते चित्र तयार होते? एका संदर्भानुसार “ही दोन्ही वचने वाचल्यावर मनात एका पित्याचे व मुलाचे जिवंत चित्र तयार होते. [तो पिता] फक्‍त गरजेच्या वेळी मुलाचे संरक्षण करण्यास येत नाही, तर तो त्या मुलासोबत त्याचा हात धरून उभा आहे. तो कधीही आपल्या मुलाला स्वतःपासून दूर होऊ देणार नाही.” जरा विचार करा, यहोवाही त्याच्या लोकांना स्वतःपासून कधीही दूर होऊ देणार नाही, त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण समयीही तो त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत उभा राहील.—इब्री लोकांस १३:५, ६.

टेहळणी बुरूज१६.०७ १८ ¶४-५

“भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो”

यहोवाचं हे अभिवचन खरोखरच किती सांत्वनदायी आहे! या वचनांत नेमकं काय म्हटलं आहे त्याकडे थोडं लक्ष द्या. वचनांत असं म्हटलेलं नाही, की तुम्ही यहोवाचा हात धरून त्याच्या सोबत चालत आहात. जर तसं असतं तर यहोवाच्या उजव्या हातात तुमचा डावा हात असता. याउलट, यहोवाने “धार्मिकतेच्या उजव्या हाताने” तुमचा “उजवा हात” धरला आहे. एका अर्थी त्याने आपल्याला आपल्या समस्येतून बाहेर ओढून काढण्यासाठी त्याचा उजवा हात दिला आहे. आणि असं करताना आपल्याला धीर देण्यासाठी तो म्हणतो, “भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो.”

तुम्ही यहोवाला तुमचा प्रेमळ पिता आणि मित्र समजता का? जेव्हा तुम्ही संकटात किंवा समस्येत असता तेव्हा तो तुमच्या मदतीकरता धावून येईल, असा विश्‍वास तुम्ही बाळगता का? यहोवाला तुमची खरोखर काळजी आहे आणि तुम्हाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही संकटातून किंवा परीक्षेतून जात असता, तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटावं अशी त्याची इच्छा आहे. कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. “तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.”—स्तो. ४६:१.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०१ १०/१ २० ¶३

निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो?

यहोवाने आपला मित्र अब्राहाम याला सांगितले: “मी तुझी ढाल आहे.” (उत्पत्ति १५:१; यशया ४१:८) यहोवा केवळ बोलण्यासाठी असे बोलत नव्हता. तर त्याने अब्राहामला व त्याच्या घराण्याला फारोपासून व अबीमलेखपासून वाचवले व संकटातून त्यांची सुटका केली. लोटवर चार राजांनी मिळून हल्ला केला व अब्राहाम त्याला मदत करायला गेला तेव्हा यहोवाने अब्राहामाला साहाय्य केले. यहोवाने १०० वर्षांचा अब्राहाम व ९० वर्षांची साराह यांना त्यांची प्रजनन क्षमता परत दिली जेणेकरून प्रतिज्ञात वंश त्यांच्याद्वारे जन्माला येऊ शकेल. यहोवा नियमितपणे अब्राहामशी दृष्टान्त, स्वप्न, व देवदूत यांच्याद्वारे संवाद करत असे. किंबहुना, अब्राहाम जिवंत असताना आणि त्याचा मृत्यू होऊन बराच काळ लोटल्यावरही यहोवाने त्याच्याविषयी निष्ठा प्रदर्शित केली. येणाऱ्‍या अनेक शतकांत त्याने अब्राहामाच्या वंशजांना, अर्थात इस्राएल राष्ट्राला केलेल्या प्रतिज्ञा (ते त्याच्या मार्गात टिकून राहिले नाही तरीसुद्धा) पूर्ण केल्या. अब्राहामशी असलेला यहोवाचा नातेसंबंध, खरी निष्ठा काय असते ते दाखवून देतो, अर्थात कृतीतून व्यक्‍त केलेले प्रेम.—उत्पत्ति, अध्याय १२-२५.

९-१५ मार्च

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ४३-४४

एक अशी भविष्यवाणी जी पूर्ण होण्याच्या २०० वर्षांआधीच भाकित करण्यात आली

कायम आनंद घ्या! धडा ३ मुद्दा ५

बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

यशया ४४:२७–४५:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

बाबेल (बॅबिलॉन) शहराचा नाश होण्याच्या २०० वर्षांआधी बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

व्हिडिओ पाहा

इतिहास या गोष्टीचा पुरावा देतं, की इसवी सन पूर्व ५३९ मध्ये पारसचा राजा कोरेशने बाबेल शहरावर कब्जा केला. त्याच्या सैनिकांनी शहराभोवती असलेल्या नदीचा प्रवाह दुसरीकडे वळवला आणि यामुळे नदीचं पाणी आटलं. तसंच, त्या दिवशी शहराचे दरवाजे चुकून उघडेच राहिल्यामुळे कोरेशचे सैनिक सहज शहरात घुसू शकले. आणि त्यांनी लढाई न करताच शहरावर विजय मिळवला. आज २,५०० पेक्षा जास्त वर्षांनंतरही बाबेल शहरात फक्‍त दगडमातीचे ढिगारे पाहायला मिळतात. याबद्दल बायबलमध्ये आधीच काय सांगितलं होतं, ते पाहू या.

यशया १३:१९, २० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

इन्साइट “कोरेश” ¶७

कोरेश

बाबेलचा नाश.

कोरेश बाबेलवर हल्ला करायला तयार होता, त्या वेळेपासून त्याने बायबलची भविष्यवाणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. बाबेलचा नाश करायला आणि तिथे बंदिवासात असलेल्या यहुद्यांना सोडवायला यहोवा कोरेशला नेमेल, अशी यशयाने भविष्यवाणी केली होती. (यश ४४:२६–४५:७) ही भविष्यवाणी लिहून ठेवण्यात आली त्याच्या १५० पेक्षा जास्त वर्षांनंतर कोरेश राजा बनला. खरंतर, यहुदी लोक बाबलेच्या बंदिवासात गेले तेव्हा त्याचा जन्मही झाला नव्हता. पण तरीही, यहोवाच्या लोकांना सोडवण्यासाठी तो ‘मेंढपाळासारखा’ काम करेल असं यहोवाने म्हटलं होतं. (यश ४४:२८; रोम ४:१७ सोबत तुलना करा.) यहोवाने कोरेशला आधीच निवडलं असल्यामुळे, त्याला यहोवाचा “अभिषिक्‍त” म्हणण्यात आलं. (यश ४५:१) देव कोरेशला ‘त्याच्या नावाने हाक मारतो’ असं जेव्हा बायबल म्हणतं, तेव्हा त्याचा असा अर्थ होत नाही की देव त्याला त्याच्या जन्माच्या वेळी हे नाव देणार होता. (यश ४५:४) उलट, भविष्यात कोरेश नावाची एक व्यक्‍ती असेल आणि यहोवा त्याच व्यक्‍तीला नावाने हाक मारेल हे त्याला आधीच माहीत होतं हे यावरून कळतं.

इन्साइट “कोरेश” ¶१७

कोरेश

कोरेश यहुद्यांशी खूप चांगला वागला. इतर राष्ट्रांचे राजे यहुद्यांशी जसं क्रूरपणे वागले तसा तो वागला नाही. नबुखदनेस्सर राजाने यहोवाच्या मंदिरातून जी मौल्यवान भांडी नेली होती, ती कोरेशने यहुद्यांना परत केली. त्याने त्यांना लबानोनमधून देवदारची लाकडं आणण्याची परवानगी दिली. त्याने मंदिराच्या बांधकामासाठी शाही खजिन्यातून पैसेही दिले. (एज १:७-११; ३:७; ६:३-५) एका जुन्या शिलालेखावरून स्पष्ट होतं, की कोरेश ज्या लोकांवर विजय मिळवायचा त्यांच्याशी खूप दयेने वागायचा. या शिलालेखावरून हेसुद्धा समजतं, की तो त्यांच्या देवांच्या मूर्ती त्यांच्या पवित्र शहरांत पुन्हा पाठवून द्यायचा आणि त्यांच्यासाठी मंदिरंही बांधायचा. त्या शहरांमध्ये आधी राहण्याऱ्‍या लोकांना तो एकत्र करायचा आणि त्यांना पुन्हा तिथे जायला मदत करायचा.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२४.०२ ३० ¶८

वाचकांचे प्रश्‍न

दुसरं उदाहरण पर्शियाचा राजा कोरेश याच्याबद्दल असलेल्या भविष्यवाणीचं आहे. त्याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं, की तो बंदिवासात असलेल्या यहुद्यांना सोडवेल आणि यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचा आदेश देईल. (यश. ४४:२६–४५:४) ही भविष्यवाणी याच कोरेश राजाने पूर्ण केली. (एज्रा १:१-४) पण तो कधीच खऱ्‍या देवाचा उपासक बनला नाही. अशा प्रकारे यहोवाने कोरेश राजाच्या इच्छा स्वातंत्र्याला हात न लावता ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर केला.—नीति. २१:१.

१६-२२ मार्च

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ४५-४७

“मीच देव आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही”

टेहळणी बुरूज२०.०६ ५ ¶१४

“तुझे नाव पवित्र मानले जावो”

१४ सैतानाची इच्छा नाही, की यहोवाचा उद्देश पूर्ण व्हावा आणि यासाठी त्याने पुरेपूर प्रयत्न केले आहेत. पण सैतान यात एकदा नाही, तर अनेकदा अपयशी ठरला आहे. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत काय केलं आहे, हे आपल्याला बायबलमधून कळतं. यावरून हे सिद्ध झालं आहे, की यहोवा सर्वात चांगला शासक आहे. हे खरं आहे, की सैतान आणि त्याच्या बाजूने असलेल्या लोकांच्या बंडाळीमुळे यहोवाचं मन दुखावलं आहे. (स्तो. ७८:४०) पण, यहोवाच्या नावावर दोष लावण्यात आला तेव्हा त्याने ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने विचारपूर्वक, न्यायीपणे आणि धीराने काम केलं. तसंच, त्याने अनेक वेळा आपली अपार शक्‍ती दाखवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक कामातून आपला मुख्य गुण, प्रेम दाखवला आहे. (१ योहा. ४:८) यहोवाने आपलं नाव पवित्र करण्यासाठी आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत आणि आजही तो करत आहे.

यहोवा के करीब अध्या. ४ ¶१४

“यहोवा . . . बड़ा शक्‍तिमान है”

१४ जैसा हम आगे देखेंगे, परमेश्‍वर अपनी शक्‍ति को सृष्टि करने, विनाश करने, रक्षा करने, बहाल करने के लिए—थोड़े शब्दों में कहें, तो जो काम उसके सिद्ध उद्देश्‍य के मुताबिक सही है उसे पूरा करने के लिए इस्तेमाल करता है। (यशायाह ४६:१०) कुछ मामलों में, यहोवा अपनी शख्सियत और अपने स्तरों के ज़रूरी पहलुओं को ज़ाहिर करने के लिए अपनी शक्‍ति इस्तेमाल करता है। सबसे बढ़कर, वह अपनी मरज़ी पूरी करवाने के लिए यानी मसीहाई राज्य के ज़रिए अपनी हुकूमत को बुलंद करने और अपने नाम को पवित्र ठहराने के लिए अपनी शक्‍ति इस्तेमाल करता है। और कोई भी चीज़, कभी इस उद्देश्‍य के आड़े नहीं आ सकती।

इन्साइट “बाबेलच्या बंदीवासातून सुटका” ¶१

बाबेलच्या बंदीवासातून सुटका

इ.स.पू ६०७ मध्ये यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं. पण उरलेले काही इजिप्तला पळून गेले. यहोवाने सांगितलं होतं: “मी यहूदाच्या शहरांना ओसाड करून टाकीन; तिथे एकही माणूस उरणार नाही” आणि तसंच घडलं. (यिर्म ९:११) पण यहोवा खूप प्रेमळ असल्यामुळे त्याने त्याच्या लोकांना कायमसाठी बंदिवासात राहू दिलं नाही. त्याने आधीच सांगितलं होतं, की त्यांना “७० वर्षं बाबेलच्या राजाची गुलामी करावी लागेल” आणि त्यानंतर तो विश्‍वासू लोकांची सुटका करेल. (यिर्म २५:११, १२; २९:१०-१४) बाबेल त्या वेळची जागतिक महासत्ता असल्यामुळे त्यावर विजय मिळवणं अशक्य वाटत होतं. पण तरी यहोवाचं वचन पूर्ण होण्यापासून राहिलं नाही. भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे यहुदी त्यांच्या घरी परत आले. यहोवाने केलेल्या भविष्यवाण्या अगदी तंतोतंत पूर्ण झाल्याचं हे फक्‍त एक उदाहरण आहे.

टेहळणी बुरूज९९ ५/१५ १४ ¶१८-१९

यहोवाच्या मार्गदर्शनामुळे आनंदी

१८ भूतकाळाप्रमाणे आजही यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता एकनिष्ठेची गरज आहे—केवळ त्याचीच सेवा करण्याचा दृढनिश्‍चय. यहोवावर भरवसा असण्याची आवश्‍यकता आहे—यहोवाची अभिवचने विश्‍वासयोग्य आहेत आणि ती पूर्ण होतीलच असा पूर्ण विश्‍वास बाळगण्याची आवश्‍यकता आहे. यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता आज्ञाधारकतेची गरज आहे—त्याच्या मार्गावरून विचलित न होता त्याच्या नियमांचे पालन करणे आणि त्याच्या उच्च दर्जांनुसार चालणे. “परमेश्‍वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे.”—स्तोत्र ११:७.

१९ अहाजने सुरक्षा प्राप्त व्हावी म्हणून सिरियाच्या दैवतांकडे डोळे लावले. इजिप्तमधल्या इस्राएल लोकांनी भौतिकरित्या संपन्‍न व्हावे म्हणून ‘आकाशराणीकडे’—प्राचीन मध्यपूर्वेमध्ये उपासना केल्या जाणाऱ्‍या देवतेवर आशा ठेवली. आज, अनेक दैवते मूर्तींच्या रूपात नाहीत. येशूने यहोवाची सेवा करण्याऐवजी “धनाची” सेवा केली जात असल्याचा इशारा दिला होता. (मत्तय ६:२४) प्रेषित पौलाने ‘लोभाला’ मूर्तिपूजा असे म्हटले. (कलस्सैकर ३:५) ‘पोट हेच दैवत’ असलेल्या लोकांविषयीही त्याने सांगितले. (फिलिप्पैकर ३:१९) होय, आज उपासना केली जाणारी प्रमुख दैवते म्हणजे पैसा आणि चैनीच्या वस्तू. वास्तविकतेत बहुतेक लोक—अनेक धार्मिक प्रवृत्तीचे लोकही—त्यांची आशा “चंचल धनावर” ठेवतात. (१ तीमथ्य ६:१७) या दैवतांची उपासना करण्याकरता अनेक लोक फार परिश्रम करतात आणि काही प्रतिफळांचा आनंदही घेतात—उत्तम घरांत राहतात, महागड्या वस्तू घेतात आणि चमचमीत अन्‍न खातात. पण सर्वच लोकांना या गोष्टी मिळत नाहीत. आणि या गोष्टी मिळालेल्या लोकांनाही असे दिसून येते की केवळ या वस्तू असून माणसाला समाधान मिळत नाही. या सर्व गोष्टी तात्पुरत्या, क्षणिक असतात आणि आध्यात्मिक गरजा त्यामुळे भागत नाहीत.—मत्तय ५:३.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज११ ७/१ १२ ¶२-३

आदाम आणि हव्वा पाप करतील हे देवाला माहीत होते का?

यहोवा “एकच ज्ञानी देव” आहे असेही बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (रोमकर १६:२५-२७) देवाबरोबर स्वर्गात असलेल्या देवदूतांनी देवाची ही असीम बुद्धी अनेक गोष्टींत पाहिली. यहोवाने जेव्हा पृथ्वीवरील प्राण्यांची निर्मिती केली तेव्हा या देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयोब ३८:४-७) या बुद्धिमान आत्मिक प्राण्यांनी, एदेन बागेत देवाने आदाम आणि हव्वेला कसे बनवले होते ते आवडीने पाहिले होते. तर मग, ज्याने या भय-प्रेरक विश्‍वाची, डोळ्यांचे पारणे फिटेल अशा गोष्टींची पृथ्वीवर निर्मिती केली होती तो सर्वज्ञानी देव, या देवदूतांसमोर, अशा दोन अनोख्या मानवांची निर्मिती करेल का, की जे कालांतराने पापच करणार होते? असफल ठरणाऱ्‍या गोष्टीची योजना करणे तर्काला न पटणारे आहे.

तरीपण काहीजण म्हणतील, ‘पण मग सर्वज्ञानी देवाला, आदाम आणि हव्वा पाप करणार आहे हे माहीत न होणे कसे शक्य आहे?’ यहोवाकडे असीम बुद्धी असल्यामुळे, “आरंभीच शेवट” कळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, हे कबूल आहे. (यशया ४६:९, १०) तरीपण या क्षमतेचा त्याला नेहमीच वापर करण्याची गरज नाही. तसे तर त्याच्याजवळ अमर्याद शक्‍ती देखील आहे. मग तो सतत आपल्या शक्‍तीचे प्रदर्शन करतो का? तसेच, शेवट माहीत करण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे मग याचा असा अर्थ होत नाही, की त्याने या क्षमतेचा नेहमीच वापर केला पाहिजे. या क्षमतेचा केव्हा उपयोग करायचा हे तो सुज्ञपणे ठरवतो. योग्य वेळी व आवश्‍यकता असते तेव्हाच तो या क्षमतेचा उपयोग करतो.

२३-२९ मार्च

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ४८-४९

यहोवा जे सांगतो त्याकडे लक्ष दिल्याने फायदा होतो

इन्साइट “शिक्षक, शिकवणे” ¶२

शिक्षक, शिकवणे

या सृष्टीचा निर्माणकर्ता, यहोवा देव त्याच्या सेवकांचा महान शिक्षक आहे. (१रा ८:३६; स्तो २७:११; ८६:११; ११९:१०२; यश ३०:२०; ५४:१३) सृष्टीतून हे स्पष्ट होतं की एक देव अस्तित्वात आहे आणि तो खूप बुद्धिमान आहे. इतकी वर्षं संशोधन करूनसुद्धा सृष्टीतून शिकण्यासारखं आणखी बरंच काही आहे. (ईयोब १२:७-९) यहोवाने मानवांना त्याच्या नावाबद्दल, उद्देशांबद्दल आणि नियमांबद्दलही खास मार्गांनी शिकवलंय. (निर्ग ४:१२, १५; २४:१२; ३४:५-७ सोबत तुलना करा.) या शिकवणींबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. त्यामुळे आपल्याला देवाच्या इच्छेबद्दल स्पष्टपणे समजायला मदत होते. (रोम १५:४; २ती ३:१४-१७) तसंच आपल्याला देवाच्या पवित्र शक्‍तीकडूनसुद्धा शिकायला मिळतं.—योह १४:२६.

बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख ४४ ¶२-३

इच्छास्वातंत्र्याबद्दल बायबल काय म्हणतं? देव आपलं नशीब लिहितो का?

● देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरुपात बनवलंय. (उत्पत्ती १:२६) आपण प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण प्रेम आणि न्याय यांसारखे देवाचे गुण दाखवू शकतो. तसंच, आपल्याकडे इच्छास्वातंत्र्यही आहे.

● आपलं भविष्य कसं असेल हे बऱ्‍याचदा आपल्या निर्णयांवरून ठरतं. बायबलमध्ये देव आपल्याला सांगतो, की आपण त्याचं ऐकून जीवन निवडावं. म्हणजेच आपण जर त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपलं भविष्य चांगलं असेल. (अनुवाद ३०:१९, २०) विचार करा, जर आपल्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य नसतं तर देवाने आपल्याला ‘जीवन निवडा’ असं सांगितलं असतं का? नाही. तो आपल्याला कधीच त्याच्या इच्छेप्रमाणे वागायची जबरदस्ती करत नाही. उलट तो प्रेमाने आपल्याला असं सांगतो: “तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल! मग तुझी शांती नदीसारखी, आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.”—यशया ४८:१८.

देवाचे प्रेम अध्या. १७ ¶८

“आपल्या परमपवित्र विश्‍वासावर स्वतःची रचना करा”

८ यहोवा आपल्याला येथे आठवण करून देतो, की आपण जर त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपला फायदा होईल. तो आपल्याला दोन फायद्यांविषयी सांगतो. पहिला फायदा, आपली शांती तुडुंब भरलेल्या आणि संथ व सतत वाहणाऱ्‍या एका नदीसारखी होईल. दुसरा फायदा, आपली धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी होईल. तुम्ही कधी समुद्रकिनारी उभे राहून एकापाठोपाठ एक येणाऱ्‍या लाटा पाहिल्या आहेत का? त्यांना पाहून तुमच्या मनात चिरकालाची भावना येते का? या लाटांना अंत नसतो; अगणित युगांपासून त्या न थांबता एकामागोमाग एक अशा येतच आहेत. तुमची धार्मिकता म्हणजे योग्य करण्याचा तुमचा मार्ग या लाटांसारखा होईल, असे यहोवा म्हणतो. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी विश्‍वासू राहाल तोपर्यंत तो तुम्हाला कधीही सोडणार नाही! (स्तोत्र ५५:२२) ही अभिवचने यहोवावरील आणि त्याच्या नीतिनियमांवरील तुमचा विश्‍वास वाढवत नाहीत का?

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “कृपेचा काळ” ¶१-३

कृपेचा काळ

यशया ४९:८ मधल्या भविष्यवाणीत असं म्हटलंय: “यहोवा म्हणतो: ‘मी तुला कृपेच्या काळात उत्तर दिलं, आणि तारणाच्या दिवशी मदत केली. तुला लोकांसाठी करार म्हणून देता यावं, देशात पुन्हा लोकवस्ती व्हावी, आणि माझ्या लोकांना ओसाड पडलेल्या आपल्या वारशाच्या जमिनींचा ताबा घेता यावा, म्हणून मी तुझं रक्षण करत आलो.’” इस्राएली लोकांची बाबेलमधून सुटका झाली तेव्हा ही भविष्यवाणी पहिल्यांदा पूर्ण झाली. यहोवा त्यांना म्हणाला, “बाहेर या!” मग ते पुन्हा आपल्या मायदेशी परतले आणि पुन्हा तिथे राहू लागले.—यश ४९:९.

पण यशया ४९:८ मधली भविष्यवाणी येशू ख्रिस्तावर मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली. भविष्यवाणीत म्हटलंय: “तुला लोकांसाठी करार म्हणून देता यावं” आणि “माझ्याकडून मिळणारं तारण पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत पोहोचावं, यासाठीही मी तुला राष्ट्रांकरता प्रकाश म्हणून दिलंय.” या शब्दांवरून कळतं की ही भविष्यवाणी खरंतर पुढे येणाऱ्‍या देवाच्या सेवकाबद्दल म्हणजे मसीहाबद्दल होती. (यश ४९:६, ८) पृथ्वीवर असताना येशूने यहोवाला आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना आणि विनंत्या केल्या. कारण त्याला माहीत होतं की तो त्याला वाचवू शकतो. (इब्री ५:७-९; योह १२:२७, २८; १७:१-५; लूक २२:४१-४४; २३:४६ सोबत तुलना करा.) यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला मदत केली. अशा प्रकारे तो काळ येशूसाठी ‘कृपेचा काळ’ आणि “तारणाचा दिवस” बनला. या काळात येशूने तो यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून दिलं. आणि “त्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्‍या सगळ्यांचं सर्वकाळासाठी तारण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.”—इब्री ५:९.

तसंच, २ करिंथकर ६:२ मध्ये पौलने यशया ४९:८ मधल्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. यावरून समजतं, की ही भविष्यवाणी येशूच्या शिष्यांना म्हणजेच ‘देवाच्या इस्राएललाही’ लागू होते. (गल ६:१६) पौलने त्यांना असंसुद्धा प्रोत्साहन दिलं: “पाहा! आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे.” ख्रिश्‍चनांनी त्यांच्या कामातून ते देवाच्या अपार कृपेसाठी पात्र असल्याचं दाखवून द्यायचं होतं. (२कर ६:१, २) तसंच, “तारणाचा दिवस” पाहण्यासाठी त्यांना देवाला विश्‍वासू राहण्याची गरज होती.

६-१२ एप्रिल

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ५०-५१

देवाने ज्याला शिकवलं त्याचं ऐका

राज किताब अध्या. १७ ¶५

राज के सेवकों का प्रशिक्षण

५ समय आने पर यहोवा ने अपने बेटे को उस सेवा के बारे में सिखाया जो उसे धरती पर करनी थी। एक भविष्यवाणी पर ध्यान दीजिए जिसमें बताया गया है कि महान उपदेशक यहोवा का अपने पहलौठे बेटे के साथ कैसा रिश्‍ता था। (यशायाह ५०:४, ५ पढ़िए।) भविष्यवाणी कहती है कि यहोवा अपने बेटे को “हर सुबह उठाता” था, जैसे एक शिक्षक अपने विद्यार्थी को हर सुबह तड़के जगाता है ताकि वह उसे सिखाए। बाइबल की समझ देनेवाली एक किताब कहती है, ‘जैसे एक शिक्षक विद्यार्थी को स्कूल में सिखाता है, उसी तरह स्वर्ग में यहोवा ने उसे सिखाया कि उसे क्या प्रचार करना चाहिए और कैसे।’ यहोवा ने अपने बेटे को सिखाया कि उसे ‘क्या-क्या बताना है और क्या-क्या बोलना है।’ (यूह. १२:४९) पिता ने उसे यह भी बताया कि उसे दूसरों को कैसे सिखाना चाहिए। यीशु ने अपने पिता से मिले प्रशिक्षण का अच्छा इस्तेमाल किया। उसने न सिर्फ अपनी सेवा पूरी की बल्कि अपने चेलों को भी उनकी सेवा पूरी करने का प्रशिक्षण दिया।

मेरा चेला बन जा अध्या. १३ ¶ १३

“मैं पिता से प्यार करता हूँ”

१३ इस धरती पर आने से पहले भी यह बेटा मन लगाकर अपने पिता से सीखता था। यशायाह ५०:४-६ में दर्ज़ एक भविष्यवाणी ज़ाहिर करती है कि यहोवा ने अपने बेटे को मसीहा के तौर पर उसकी भूमिका के बारे में खास शिक्षा दी थी। हालाँकि इस शिक्षा में यीशु को यह भी सीखना पड़ा कि यहोवा के अभिषिक्‍त जन के तौर पर उसे कौन-सी मुश्‍किलें सहनी पड़ेंगी, फिर भी उसने बहुत ही ध्यान से सीखा। बाद में जब वह इस धरती पर आया और बड़ा हुआ, वह अपने पिता के घर जाने और वहाँ उपासना में भाग लेने और वह शिक्षा देने के लिए हमेशा तैयार रहता था जो यहोवा चाहता था कि वहाँ दी जाए। बाइबल बताती है कि यीशु मंदिर और सभा-घर में बिना नागा हाज़िर होता था। (लूका ४:१६; १९:४७) अगर हम यहोवा के लिए अपने प्यार को जीवित और फलता-फूलता बनाए रखना चाहते हैं, तो हमें भी बिना नागा मसीही सभाओं में हाज़िर होने की ज़रूरत है। क्योंकि वहाँ हम यहोवा की उपासना करते हैं, उसके बारे में अपना ज्ञान और कदरदानी बढ़ाते हैं।

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “खाण” ¶२

खाण

यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे आपल्या लोकांना एक जबरदस्त उदाहरण दिलं. त्याने खाणीतून खडक खणून काढण्याचं उदाहरण वापरलं. (यश ५१:१) यशया ५१:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे, खडक अब्राहामला तर खाण साराला सूचित करते. कारण अब्राहाम इस्राएलचा कुलपिता होता आणि इस्राएलचा पूर्वज इसहाक याने साराच्या पोटी जन्म घेतला होता. पण इसहाकचा जन्म चमत्काराने झाला असल्यामुळे या उदाहरणाचा आणखी एक खोल अर्थ होता. अनुवाद ३२:१८ मध्ये इस्राएलला “जन्म देणाऱ्‍या” आणि “जीवन देणाऱ्‍या” यहोवाला ‘खडक’ म्हटलंय. या वचनात “जन्म देणाऱ्‍या” या शब्दासाठी जे क्रियापद वापरलंय तेच यशया ५१:२ मध्ये सारासाठी वापरण्यात आलंय.

१३-१९ एप्रिल

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ५२-५३

येशूने अपार प्रेम केलं!

टेहळणी बुरूज१० ११/१५ ७ ¶२

मुलांनो—मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करा

२ तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यावर जबरदस्त प्रभाव पडतात का? असल्यास, त्याचे कारण काय असू शकते? त्यांनी तुम्हाला त्यांच्यापैकीच एक समजून तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटत असल्यामुळे तर नसेल? खरेतर, इतरांनी आपल्याला आपलेसे करावे अशी इच्छा बाळगणे चुकीचे नाही. किंबहुना, मोठ्यांनासुद्धा असेच वाटते. कारण कोणालाही—मग तो लहान असो अथवा मोठा—मित्रांकडून नाकारले जाणे मुळीच आवडत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे, की जीवनात योग्य ते करण्यासाठी तुम्ही ठाम भूमिका घेता तेव्हा सर्वच जण तुमच्यावर खूष होतील असे नाही. येशूलादेखील याचा सामना करावा लागला. असे असले तरी त्याने नेहमी योग्य तेच केले. त्यामुळे, काही जण त्याचे अनुसरण करून त्याचे शिष्य बनले, तर इतर काहींनी देवाच्या या पुत्राला तुच्छ लेखले व ‘त्याला मानले नाही.’—यश. ५३:३.

यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १४ ¶ २५

यहोवा अपने मसीहाई सेवक को अति महान करता है

२५ क्या मसीहा दुःख उठाने और मरने के लिए दिल से तैयार था? यशायाह कहता है: “वह सताया गया, तौभी वह सहता रहा और अपना मुंह न खोला; जिस प्रकार भेड़ बध होने के समय वा भेड़ी ऊन कतरने के समय चुपचाप शान्त रहती है, वैसे ही उस ने भी अपना मुंह न खोला।” (यशायाह ५३:७) धरती पर अपनी ज़िंदगी की आखिरी रात को अगर यीशु चाहता तो मदद के लिए “स्वर्गदूतों की बारह पलटन से अधिक” बुला सकता था। लेकिन उसने यह कहा: “परन्तु पवित्र शास्त्र की वे बातें कि ऐसा ही होना अवश्‍य हैं, क्योंकर पूरी होंगी?” (मत्ती २६:५३, ५४) ‘परमेश्‍वर के मेम्ने’ ने दुःख उठाने से खुद को नहीं रोका। (यूहन्‍ना १:२९) जब पीलातुस के सामने महायाजक और पुरनियों ने यीशु पर झूठे इलज़ाम लगाए तो “उस ने कुछ उत्तर नहीं दिया।” (मत्ती २७:११-१४) वह ऐसा कुछ नहीं कहना चाहता था जिससे परमेश्‍वर की मरज़ी पूरी करने में उसके आगे कोई रुकावट पैदा हो। यीशु, बलि के मेम्ने की तरह मरने को तैयार था, क्योंकि वह अच्छी तरह जानता था कि उसकी मृत्यु से आज्ञा माननेवाले इंसानों को पाप, बीमारी और मौत से छुटकारा मिलेगा।

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “भांडी” ¶२

भांडी

यहोवाच्या मंदिरात उपासनेसाठी बरीच भांडी वापरली जायची. (निर्ग २५:२९, ३०, ३९; २७:३, १९; ३७:१६, २३; ३८:३; १रा ७:४०-५०; २इत ४:११-२२) ही भांडी उपासनेसाठी वापरली जात असल्यामुळे त्यांना “पवित्र” मानलं जायचं. (१रा ८:४) नंतर, नबुखद्‌नेस्सर राजाने ही भांडी बाबेलला नेली. पण इ.स.पू ५३७ मध्ये इस्राएली लोकांना आपल्या मायदेशी परत येताना ही भांडी पुन्हा आणण्याचा बहुमान मिळाला. ही भांडी आणण्यासाठी त्यांना नैतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या शुद्ध असण्याची गरज होती. म्हणून त्यांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “दूर व्हा! दूर व्हा! तिथून बाहेर निघा! कुठल्याही अशुद्ध गोष्टीला स्पर्श करू नका! यहोवाच्या मंदिरातली भांडी वाहून नेणाऱ्‍यांनो, तिच्यामधून बाहेर निघा! स्वतःला शुद्ध ठेवा!” (यश ५२:११) ही आज्ञा त्यांना फक्‍त स्वतःला बाहेरून शुद्ध ठेवण्याबद्दल किंवा नियमशास्त्रानुसार शुद्ध असण्याबद्दलच नव्हती, तर मन शुद्ध ठेवण्याबद्दलही होती. पुढे प्रेषित पौलने यशयाचे हे शब्द ख्रिश्‍चनांनाही लागू केले. त्याने म्हटलं की ख्रिश्‍चनांनी “आपल्या शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्‍या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध” केलं पाहिजे.—२कर ६:१४-१८; ७:१.

२०-२६ एप्रिल

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ५४-५५

यहोवाकडून शिकायला तुम्ही किती किंमत मोजायला तयार आहात?

टेहळणी बुरूज०९ ९/१५ २१ ¶३

देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ

३ यहोवाच्या चांगुलपणामुळेच तो अपरिपूर्ण मानवांना शिकवण्यास उत्सुक आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसंबंधी यशया ५४:१३ असे भाकीत करते: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” हे शब्द एका अर्थाने, ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांनाही’ लागू होतात. (योहा. १०:१६) आपल्या काळात पूर्ण होत असलेल्या एका भविष्यवाणीवरून हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. यशयाने एका दृष्टांतात राष्ट्रांतील लोकांचे लोंढेच्या लोंढे खऱ्‍या उपासनेकडे येत असल्याचे पाहिले. यशयाने वर्णन केल्याप्रमाणे हे लोक एकमेकांना असे म्हणतात: “आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यश. २:१-३) खरेच, देवाने आपल्याला शिक्षण द्यावे ही आपल्याकरता किती सन्मानाची गोष्ट आहे!

टेहळणी बुरूज१८.११ ४ ¶६-७

सत्य विकत घे, ते कधीच विकू नको

६ यशया ५५:१-३ वाचा. सत्य विकत घेण्याचा अर्थ आपल्याला या वचनातील यहोवाच्या शब्दांवरून कळतो. या वचनात यहोवा सत्याची तुलना पाणी, दूध आणि द्राक्षारस यांसोबत करतो. एका तहानलेल्या व्यक्‍तीला जसं थंड पाणी तजेला देतं, तसंच सत्य आपल्याला तजेला देतं. आणि दूध जसं लहान मुलाला वाढण्यासाठी आणि शक्‍ती मिळवण्यासाठी मदत करतं, तसंच बायबलची सत्यं यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी मदत करतात. यहोवाने त्याच्या वचनाची तुलना द्राक्षारसासोबतही केली आहे. असं का? बायबल सांगतं की द्राक्षारसामुळे मनुष्याच्या मनाला आनंद होतो. (स्तो. १०४:१५) त्यामुळे जेव्हा यहोवा आपल्याला द्राक्षारस विकत घ्यायला सांगतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जर आपण जीवनात त्याचं मार्गदर्शन पाळलं तर आपण आनंदी होऊ. (स्तो. १९:८) या उदाहरणांचा उपयोग करून यहोवा आपल्याला सत्य शिकून घेण्याचे आणि ते लागू करण्याचे फायदे समजण्यास मदत करतो. आता आपण अशा पाच गोष्टींबद्दल चर्चा करू या ज्या आपल्याला कदाचित सत्य विकत घेण्यासाठी सोडाव्या लागतात.

सत्य विकत घेण्यासाठी तुम्ही कशाचा त्याग केला आहे?

७ वेळ. राज्याचा संदेश ऐकण्यासाठी, बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनं वाचण्यासाठी आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच, सभांसाठी तयारी करायला आणि तिथे उपस्थित राहायलाही वेळ द्यावा लागतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण कमी महत्त्वाच्या इतर गोष्टींमधून वेळ काढला पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६ आणि तळटीप वाचा.) बायबलची मूलभूत सत्यं शिकून घेण्यासाठी किती वेळ लागतो? हे प्रत्येक व्यक्‍तीवर अवलंबून आहे. यहोवाच्या बुद्धीबद्दल, त्याच्या मार्गांबद्दल आणि त्याने केलेल्या कार्यांबद्दल शिकण्याला कोणतीच मर्यादा नाही. (रोम. ११:३३) इंग्रजीमधील टेहळणी बुरूजच्या पहिल्या अंकात सत्याची तुलना “एका लहान फुलाशी” करण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं: “सत्याच्या फक्‍त एका फुलानेच संतुष्ट होऊ नका. जर एकच फूल पुरेसं असतं, तर इतर फुलांची गरजच पडली नसती. नेहमी फुलं वेचत राहा आणि शोधत राहा.” आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी यहोवाबद्दल किती शिकलो आहे?’ आपण जरी सदासर्वकाळ जगलो तरी यहोवाबद्दल शिकणं संपणार नाही. पण आज खासकरून हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेत यहोवाबद्दल होईल तितकं शिकत राहावं. असं करणाऱ्‍या एका व्यक्‍तीचं आपण उदाहरण पाहू या.

सेवा स्कूल १४ ¶३-५

“चौकस रहो, कि तुम किस रीति से सुनते हो”

बहुत-सी चीज़ें सुनने में बाधा बन सकती हैं। हो सकता है, हमारे मन में ढेर सारी चिंताएँ हों। हॉल के अंदर या बाहर से आनेवाली आवाज़ों या फिर हाज़िर लोगों में होनेवाली हलचल से हमारा ध्यान भटक सकता है। बैठने में परेशानी या बेचैनी की वजह से भी एक मन से सुनना मुश्‍किल हो सकता है। जिनके छोटे बच्चे हैं, उनका ध्यान अकसर बँटा रहता है। ऐसे में कार्यक्रम पर ध्यान जमाए रखने के लिए क्या किया जा सकता है?

जहाँ हमारी नज़र जाती है, वहीं हमारा ध्यान भी जाता है। इसलिए ध्यान से सुनने के लिए अपनी आँखें भाषण देनेवाले पर लगाए रखिए। जब वह बाइबल से कोई आयत पढ़ता है, भले ही वह आपको मुँहज़बानी याद हो, तब भी आप अपनी बाइबल खोलकर साथ-साथ पढ़िए। अपने साथ सख्ती बरतिए ताकि आप हर आहट या चलने-फिरने की आवाज़ पर पलटकर न देखें। आप जितनी चीज़ों को देखेंगे, उतनी ही बातों पर आपका ध्यान जाएगा और इस तरह आप बहुत कुछ सुनने से चूक जाएँगे।

“परेशान करनेवाले खयाल” भी सभाओं पर ध्यान देना मुश्‍किल कर सकते हैं। तब यहोवा से प्रार्थना कीजिए कि वह आपके मन और हृदय को सुकून दे ताकि आप ध्यान लगाकर सुन सकें। (भज. ९४:१९, NW; फिलि. ४:६, ७) और अगर ज़रूरत पड़े तो बार-बार प्रार्थना कीजिए। (मत्ती ७:७, ८) यकीन मानिए, यहोवा आपकी प्रार्थना ज़रूर सुनेगा क्योंकि मसीही सभाओं का इंतज़ाम उसी ने किया है और वह चाहता है कि आप उनसे लाभ पाएँ।—१ यूह. ५:१४, १५.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१९.०१ ६ ¶१४-१५

“घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे”

१४ पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला अपेक्षित आहे की ख्रिस्ताचे अनुयायी यानात्याने आपला द्वेष केला जाईल. (मत्त. १०:२२) शेवटच्या दिवसांत येशूच्या शिष्यांचा तीव्र छळ केला जाईल असं त्याने आधीच सांगितलं होतं. (मत्त. २४:९; योहा. १५:२०) दुसरी गोष्ट म्हणजे, यशयाच्या भविष्यवाणीमुळे आपल्याला इशारा मिळतो, की आपले शत्रू फक्‍त आपला द्वेषच करणार नाहीत तर आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या हत्यारांचाही वापर करतील. ते कदाचित आपली फसवणूक करतील किंवा आपल्याबद्दल खोटं पसरवतील अथवा आपला तीव्र छळही करतील. (मत्त. ५:११) यहोवा शत्रूंना आपल्याविरुद्ध हत्यारांचा वापर करण्यापासून थांबवणार नाही. (इफिस. ६:१२; प्रकटी. १२:१७) पण अशा वेळी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपण असं का म्हणू शकतो?

१५ आपण कोणती तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे आता आपण पाहू. यहोवाने म्हटलं की आपल्याविरुद्ध चालवले जाणारे “कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” ज्या प्रकारे एक भिंत भयानक वादळी पावसापासून आपलं संरक्षण करते, त्याच प्रकारे यहोवा आपलं ‘निर्दय लोकांच्या झपाट्यापासून’ संरक्षण करतो. (यशया २५:४, ५ वाचा.) आपले शत्रू आपल्याला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवण्यात कधीच यशस्वी होणार नाहीत.—यश. ६५:१७.

२७ एप्रिल–३ मे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ५६-५७

यहोवा आपला देव आहे याचा आपल्याला आनंद आहे

यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १८ ¶१४-१६

यहोवा दीन-हीन लोगों में नयी जान फूँकता है

१४ मगर वह दिन ज़रूर आएगा जब यहोवा के सब्र का बाँध टूटेगा। उस वक्‍त के बारे में यहोवा साफ-साफ कहता है: “मैं आप तेरे धर्म और कर्मों का वर्णन करूंगा, परन्तु, उन से तुझे कुछ लाभ न होगा। जब तू दोहाई दे, तब जिन मूर्त्तियों को तू ने जमा किया है वे ही तुझे छुड़ाएं! [“वे तुझे न छुड़ाएंगी,” NW] वे तो सब की सब वायु से वरन एक ही फूंक से उड़ जाएंगी।” (यशायाह ५७:१२,१३क) यहोवा, यहूदा देश के धर्म-कर्म के ढोंग से परदा उठा देगा। यहूदा को अपने कपट भरे कामों से कोई फायदा नहीं होगा। ‘जिन मूर्तियों को उसने जमा किया है,’ उसका अम्बार यहूदा को बचा नहीं पाएगा। उसे जिन देवी-देवताओं पर एतबार है वे, मुसीबत की आँधी आने पर हवा के बस एक ही झोंके से उड़ जाएँगे।

१५ यहोवा के ये शब्द सा.यु.पू. ६०७ में पूरे हुए। उसी साल बाबुल के राजा, नबूकदनेस्सर ने यरूशलेम को नाश कर डाला, मंदिर को जला दिया और बहुत-से लोगों को बंदी बनाकर ले गया। “यों यहूदी बन्धुआ बनके अपने देश से निकाल दिए गए।”—२ राजा २५:१-२१.

१६ उसी तरह, ईसाईजगत ने जो मूर्तियों का अम्बार लगा रखा है, वह उसे यहोवा के क्रोध के दिन बचा नहीं सकेगा। (यशायाह २:१९-२२; २ थिस्सलुनीकियों १:६-१०) ‘बड़े बाबुल’ यानी संसार भर में साम्राज्य की तरह फैले सभी झूठे धर्मों के साथ-साथ ईसाईजगत का भी नामो-निशान मिट जाएगा। किरमिजी रंग का लाक्षणिक जंगली पशु और उसके दस सींग “[बड़े बाबुल को] लाचार और नङ्‌गी कर देंगे; और उसका मांस खा जाएंगे, और उसे आग में जला देंगे।” (प्रकाशितवाक्य १७:३,१६,१७) लेकिन हम कितने खुश हैं कि हमने इस आज्ञा का पालन किया है: “हे मेरे लोगो, उस में से निकल आओ; कि तुम उसके पापों में भागी न हो, और उस की विपत्तियों में से कोई तुम पर आ न पड़े”! (प्रकाशितवाक्य १८:४,५) आइए हम संकल्प कर लें कि हम बड़े बाबुल या उसके मार्गों की ओर कभी वापस न लौटें।

टेहळणी बुरूज१८.०६ ७ ¶१६

“माझं राज्य या जगाचा भाग नाही”

१६ आपल्या मनोवृत्तीतही हे बदल करणं खूप गरजेचं आहे. बायबल म्हणतं की मानवजात समुद्रासारखी आहे, ती कधीच स्थिर राहात नाही तर नेहमी अशांत राहते. (यश. १७:१२; ५७:२०, २१; प्रकटी. १३:१) राजकीय मुद्यांमुळे लोक चिथवले जातात, त्यामुळे लोकांमध्ये फुटी पडतात आणि याचं रूपांतर हिंसेत होतं. पण आपण मात्र नेहमी एकतेने आणि शांतीने राहतो. हे जग विभागलेलं आहे, पण आपल्यात ऐक्य आहे हे पाहून यहोवाला खूप आनंद होत असेल.—सफन्या ३:१७ वाचा.

इन्साइट “पृथ्वी” ¶२१

पृथ्वी

बायबलमध्ये पृथ्वी हा शब्द काही वेळा मानवजातीच्या अशा समूहासाठीसुद्धा वापरण्यात आलाय ज्याचा कधी नाश होणार नाही. याउटल, समुद्र हा शब्द बऱ्‍याचदा मानवजातीच्या अशा समूहासाठी वापरण्यात आलाय जो अस्थिर आहे आणि ज्याचा नाश होईल.—यश ५७:२०; याक १:६; यहू. १३; प्रक १२:१६; २०:११; २१:१ सोबत तुलना करा.

इन्साइट “शांती” ¶३

शांती

शांती मिळवणं. यहोवा शांतीचा देव आहे. (१कर १४:३३; २कर १३:११; १थेस ५:२३; इब्री १३:२०) तोच आपल्याला शांती देतो. (गण ६:२६; १इत २२:९; स्तो ४:८; २९:११; १४७:१४; यश ४५:७; रोम १५:३३; १६:२०) शांती त्याच्या पवित्र शक्‍तीच्या फळाचा एक गुण आहे. (गल ५:२२) म्हणून ज्यांचं यहोवासोबतचं नातं चांगलं असतं त्यांनाच शांती मिळते. जे गंभीर पाप करतात त्यांचं यहोवासोबतचं नातं तुटतं आणि त्यांची शांती भंग होते. स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं: “माझ्या पापामुळे मला जराही शांती नाही.” (स्तो ३८:३) म्हणूनच ज्यांना शांती मिळवायची इच्छा आहे, त्यांनी ‘वाइटापासून वळून, चांगलं ते केलं पाहिजे; शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.’ (स्तो ३४:१४) जे देवाचे नीतिमान स्तर पाळत नाहीत त्यांना कधीच शांती मिळत नाही. (स्तो ७२:३; ८५:१०; यश ३२:१७) म्हणूनच दुष्ट लोकांना कधीच शांती मिळत नाही. (यश ४८:२२; ५७:२१; यश ५९:२-८ सोबत तुलना करा.) पण जे लोक यहोवाला एकनिष्ठ राहतात, त्याच्या नियमशास्त्रावर प्रेम करतात, (स्तो ११९:१६५) आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्यांना खरी आणि कायम टिकणारी शांती मिळते.—यश ४८:१८.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०७ १/१५ १० ¶३

यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे

५६:६— “विदेशी” कोण आहेत आणि ते कशाप्रकारे यहोवाचा “करार दृढ धरून राहतात”? येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ “विदेशी” म्हटले आहे. (योहान १०:१६) ते नव्या कराराला या अर्थाने दृढ धरून राहतात की त्या कराराशी संबंधित आज्ञांचे ते पालन करतात, त्याद्वारे करण्यात आलेल्या तरतुदींना पूर्ण सहयोग देतात, अभिषिक्‍त ख्रिश्‍चन जे आत्मिक अन्‍न ग्रहण करतात तेच तेही ग्रहण करतात आणि राज्याच्या प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात त्यांना साहाय्य करतात.

टेहळणी बुरूज०६ ११/१ २८ ¶१

पवित्र सभांविषयी आदर दाखवणे

यहोवाने आपल्या लोकांना, अर्थात अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांच्या सहकाऱ्‍यांना त्याच्या “पवित्र पर्वतावर” उपासना करण्याकरता एकत्रित केले आहे. तो त्यांना आपल्या “प्रार्थनामंदिरात,” म्हणजेच त्याच्या आत्मिक मंदिरात हर्षित करत आहे. हे “सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर” आहे. (यशया ५६:७; मार्क ११:१७) यावरून हे सूचित होते की यहोवाची उपासना पवित्र, शुद्ध आणि उदात्त आहे. आपल्या सभा, अभ्यास व उपासनेविषयी उचित आदर बाळगण्याद्वारे आपण हे दाखवून देतो की पवित्र गोष्टींसंबंधी आपला दृष्टिकोनही यहोवासारखाच आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा