जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
५-११ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया १७-२०
“आम्हाला लुबाडणाऱ्यांचा वाटा”
“माझं राज्य या जगाचा भाग नाही”
१६ आपल्या मनोवृत्तीतही हे बदल करणं खूप गरजेचं आहे. बायबल म्हणतं की मानवजात समुद्रासारखी आहे, ती कधीच स्थिर राहात नाही तर नेहमी अशांत राहते. (यश. १७:१२; ५७:२०, २१; प्रकटी. १३:१) राजकीय मुद्यांमुळे लोक चिथवले जातात, त्यामुळे लोकांमध्ये फुटी पडतात आणि याचं रूपांतर हिंसेत होतं. पण आपण मात्र नेहमी एकतेने आणि शांतीने राहतो. हे जग विभागलेलं आहे, पण आपल्यात ऐक्य आहे हे पाहून यहोवाला खूप आनंद होत असेल.—सफन्या ३:१७ वाचा.
विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा
४ आज आपण अशा ठिकाणी राहत असू, जिथं राजकारणात सहभाग घेण्याची अपेक्षा कदाचित आपल्याकडून केली जात नसेल. पण जसजसा सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत आहे, तसतसं तटस्थ राहणं आपल्यासाठी कठीण होत जाईल. शिवाय, लोकदेखील आज पूर्वीपेक्षा जास्त “शांतताद्वेषी” व “हूड” म्हणजे उतावीळ किंवा अविचारी बनले आहेत आणि त्यांच्यातले मतभेद पुढे आणखीनच वाढत जातील. (२ तीम. ३:३, ४) आपल्यातील काही बांधवांना त्यांच्या देशातील अचानक बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं कठीण झालं आहे. त्यामुळे, कठीण परिस्थितीतही आपली भूमिका टिकवून ठेवणं शक्य व्हावं म्हणून आत्ताच तयारी करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणूनच, आता आपण अशा चार गोष्टींचा विचार करू या ज्यांमुळे हे करणं आपल्याला शक्य होईल.
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. १५ ¶२०
जातियों के खिलाफ यहोवा की युक्ति
२० इसका नतीजा क्या होगा? यशायाह कहता है: “सांझ को, देखो, घबराहट है! और भोर से पहिले, वे लोप हो गये हैं! हमारे नाश करनेवालों का भाग और हमारे लूटनेवाले की यही दशा होगी।” (यशायाह १७:१४) यहोवा के लोगों को बहुत-से लोग लूटते हैं, उनके साथ कठोरता से पेश आते हैं और उनकी बेइज़्ज़ती करते हैं। सच्चे मसीही इस संसार के मुख्य धर्मों का हिस्सा नहीं हैं, न ही वे बनना चाहते हैं, इसलिए पक्षपाती आलोचकों और कट्टर विरोधियों को लगता है कि वे इन्हें बड़ी आसानी से अपना शिकार बना सकते हैं। मगर परमेश्वर के लोगों को पूरा यकीन है कि वह “भोर” बहुत जल्द आनेवाली है जब उनकी तकलीफों का हमेशा के लिए अंत हो जाएगा।—२ थिस्सलुनीकियों १:६-९; १ पतरस ५:६-११.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे
यश २०:२—यशया खरोखरच तीन वर्षे नग्न अवस्थेत फिरत होता का? कदाचित यशयाने आपले बाहेरील वस्त्र काढून टाकले असावे व तो अतिशय कमी वस्त्रे घालत असावा.
१२-१८ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया २१-२३
शेबनाच्या उदाहरणातून शिका
शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा
७ शिस्त लावणं किती महत्त्वाचं आहे, हे समजण्यासाठी आता आपण अशा दोन व्यक्तींची उदाहरणं पाहू या ज्यांना यहोवाने शिस्त लावली. त्यातला एक आहे हिज्कीया राजाच्या काळातला शेबना नावाचा इस्राएली आणि दुसरा आहे आपल्या काळातला एक बांधव ग्रॅहम. शेबना हिज्कीया राजाच्या “राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी” होता. त्याचं पद खूप जबाबदारीचं होतं. (यश. २२:१५) पण तो गर्विष्ठ बनला आणि इतरांनी आपल्याला महत्त्वाचं समजावं असं त्याला वाटू लागलं होतं. त्याने स्वतःसाठी भव्य कबर बनवून घेतली होती आणि तो वैभवशाली ‘रथांतून’ फिरायचा.—यश. २२:१६-१८.
८ पण शेबना गर्विष्ठ झाल्यामुळे देवाने त्याची जबाबदारी एल्याकीमला दिली. (यश. २२:१९-२१) अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यरुशलेमवर हल्ला करण्याचं ठरवलं तेव्हा हे घडलं. नंतर हिज्किया राजाने शरण यावं आणि यहुद्यांनी घाबरून जावं यासाठी सन्हेरीबने अधिकाऱ्यांच्या एका गटाला आणि मोठ्या सैन्याला पाठवलं. (२ राजे १८:१७-२५) मग त्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हिज्कियाने एल्याकीम आणि त्याच्यासोबत इतर दोघांना पाठवलं. त्यातला एक म्हणजे शेबना. तो आता सचिव म्हणून काम करत होता. यावरून आपल्याला हे कळतं, की शेबना कदाचित नम्र झाला असावा. तो नाराज नव्हता किंवा त्याने वाईट वाटून घेतलं नव्हतं. कमी दर्जाचं पद स्वीकारण्यासाठी तो तयार होता. शेबनापासून आपण तीन धडे शिकू शकतो.
९ शेबनाला आपलं पद गमवावं लागलं. यावरून आपण पहिला धडा हा शिकतो, की “गर्व झाला की नाश ठेवलेला” आहे. (नीति. १६:१८) आपल्याला कदाचित मंडळीत काही खास जबाबदाऱ्या दिल्या असतील आणि यामुळे इतर जण आपल्याला महत्त्व देत असतील. मग अशा वेळी आपण नम्र राहणार का? आपल्यात ज्या क्षमता आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आपण साध्य केल्या आहेत, त्या फक्त यहोवामुळेच शक्य झाल्या आहेत हे आपण लक्षात ठेवतो का? (१ करिंथ. ४:७) प्रेषित पौलने याबद्दल ताकीद दिली की: “देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठे समजू नये, तर . . . स्वतःबद्दल समंजसपणे विचार करावा.”—रोम. १२:३.
शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा
१० यहोवाने शेबनाला ताडन दिलं. यावरून आपण दुसरा धडा हा शिकतो, की शेबना बदलू शकतो ही आशा यहोवाने कधीच सोडली नाही. (नीति. ३:११, १२) आपण मंडळीमध्ये एखादी खास जबाबदारी गमावली असेल तर आपल्यासाठी हा एक चांगला धडा आहे. अशा वेळी रागावण्याऐवजी किंवा नाराज होण्याऐवजी आपण यहोवाला सर्वोत्तम देत राहिलं पाहिजे. लावलेल्या शिस्तीबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? हा यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे असा आपण विचार केला पाहिजे. जे नम्र राहतात त्यांना यहोवा आशीर्वादित करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (१ पेत्र ५:६, ७ वाचा.) आपण जर नम्र असू आणि आपलं हृदय मऊ मातीसारखं असेल, तर प्रेमळपणे शिस्त लावण्याद्वारे यहोवा आपल्याला आकार देऊ शकतो.
शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा
११ यहोवा शेबनासोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपल्याला तिसरा महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, यहोवा ज्या प्रकारे शिस्त लावतो त्यावरून जरी दिसून येत असलं की तो पापाचा द्वेष करत आहे, तरी पाप करणाऱ्या व्यक्तीचा तो द्वेष करत नाही. लोकांमध्ये जे चांगले गुण आहेत ते तो पाहतो. जर तुम्ही एक पालक किंवा मंडळीचे वडील असाल तर तुम्हीही यहोवाच्या शिस्त लावण्याच्या पद्धतीचं अनुकरण कराल का?—यहू. २२, २३.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे
२१:१—बाबेलला “समुद्राचा प्रदेश” असं का म्हणण्यात आलंय? बॅबिलोनच्या आसपास कोणताही समुद्र नव्हता तरीसुद्धा त्याच्या संदर्भात असे म्हटले आहे. कारण, युफ्रेटिस व टायग्रिस नदीमुळे दर वर्षी या भागात पूर येत असल्यामुळे याठिकाणी दलदलीचा प्रदेश किंवा ‘समुद्र’ निर्माण झाला होता.
१९-२५ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया २४-२७
“हा आमचा देव आहे!”
यहोवा के करीब अध्या. १ ¶२१
“देखो, हमारा परमेश्वर यही है”
२१ क्या आपने कभी किसी छोटे बच्चे को बड़ी मासूमियत के साथ यह कहते हुए सुना है, “वो देखो, मेरे डैडी”? वह बड़े फख्र से अपने दोस्तों को अपना डैडी दिखाता है। यहोवा के बारे में उसके सेवकों को भी ऐसा ही महसूस करना चाहिए और इसकी कई वजह भी हैं। बाइबल ऐसे वक्त के बारे में भविष्यवाणी करती है जब वफादार जन खुशी से चिल्ला उठेंगे: “देखो, हमारा परमेश्वर यही है।” (यशायाह २५:८, ९) आप यहोवा के गुणों के बारे में जितनी गहरी समझ पाएँगे, उतना ही आप महसूस करेंगे कि उसके जैसा पिता कोई और हो ही नहीं सकता।
येशूने केलेला भाकरींचा चमत्कार
१४ येशूने आपल्याला ‘रोजच्या भाकरीसाठी’ प्रार्थना करायला सांगितलं. त्याच वेळी त्याने आपल्याला अशीही प्रार्थना करायला सांगितलं की यहोवाची “इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्त. ६:९-११) या शब्दांमुळे कोणतं चित्र तुमच्या डोळ्यांपुढे उभं राहतं? बायबलमध्ये सांगितलंय की जेव्हा यहोवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होईल, तेव्हा सगळ्यांना चांगलं अन्नही मिळेल. तसंच, यशया २५:६-८ मध्ये असं सांगितलंय, की देवाच्या राज्यात पृथ्वीवर भरपूर प्रमाणात चांगलं अन्न असेल. शिवाय, स्तोत्र ७२:१६ मध्ये अशी भविष्यवाणी दिलेली आहे की “पृथ्वी भरपूर उपज देईल; पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल.” नवीन जगात तुमचा आवडीचा पदार्थ बनवायची तुम्ही वाट पाहताय का? किंवा असा पदार्थ बनवायची वाट पाहताय का, जो तुम्ही कधीच खाल्ला नाही? इतकंच नाही तर नवीन जगात आपण फळबागा लावून त्यांची फळंसुद्धा खाऊ. (यश. ६५:२१, २२) आणि त्या वेळी पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्यांनाच या सुंदर गोष्टी मिळतील.
टेहळणी बुरूज२५.०१ २८-२९ ¶११-१२
यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
११ पृथ्वीवरच्या नंदनवनात तुमचं जीवन कसं असेल याची कल्पना करा. तुम्हाला आजारपणाची काळजी नसेल किंवा मृत्यूची भीती नसेल. (यश. २५:८; ३३:२४) यहोवा तुमच्या सगळ्या योग्य इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला नवीन जगात कशाबद्दल शिकायला आवडेल? प्राण्यांबद्दल? पक्ष्यांबद्दल? तुम्हाला एखादं वाद्य शिकायला आवडेल का? की चित्रं काढायला आवडतील? नंदनवनात आपल्याला अशा लोकांची गरज लागेल जे घरांची डिझाईन बनवू शकतील आणि घरं बांधू शकतील. तसंच, आपल्याला अशा लोकांचीसुद्धा गरज लागेल जे शेती करतील, जेवण बनवतील, वेगवेगळी अवजारं बनवतील, बागा लावतील आणि त्यांची निगा राखतील. (यश. ३५:१; ६५:२१) आपल्यापुढे न संपणारं जीवन असेल. त्यामुळे कोणतंही कौशल्य शिकायला आपल्याकडे भरपूर वेळ असेल.
१२ नवीन जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या प्रिय जनांचं स्वागत करताना आपल्याला खरंच खूप आनंद होईल! (प्रे. कार्यं २४:१५) सृष्टीतल्या अद्भुत गोष्टींचं निरीक्षण करून आपल्याला यहोवाबद्दल आणखी शिकून घेताना किती आनंद होईल याचीसुद्धा कल्पना करा. (स्तो. १०४:२४; यश. ११:९) आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, मनात कोणतीही दोषीपणाची भावना न ठेवता आपल्याला यहोवाची सेवा करता येईल. ‘पापाच्या क्षणिक सुखासाठी’ आपण हे सगळे आशीर्वाद गमावण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही! (इब्री ११:२५) आज आपल्याला कराव्या लागणाऱ्या कोणत्याही त्यागाच्या तुलनेत हे आशीर्वाद खूप मोठे आहेत. लक्षात असू द्या, एक असा दिवस येईल जेव्हा पृथ्वीवरचं नंदनवन फक्त भविष्यातली आशा नसेल, तर आपण तिथे प्रत्यक्ष असू. यहोवाने आपल्यावरच्या प्रेमापोटी खंडणी बलिदानाची भेट दिली नसती, तर यांपैकी कोणतीच गोष्ट शक्य झाली नसती.
आध्यात्मिक रत्नं शोधा
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती
आता बरेच अध्याय काव्य रूपात का मांडण्यात आले आहेत? बायबलचे बरेच भाग मूळ भाषेत काव्य रूपातच लिहिण्यात आले होते. आधुनिक भाषांमध्ये, लेखात आणि कवितेत मुख्य फरक हा असतो की कवितेत शब्दांचं यमक जुळवलेलं असतं, पण ही गोष्ट लेखाच्या बाबतीत नसते. पण इब्री भाषेतील काव्यात्मक लेखन, हे खासकरून त्यात असलेल्या दोन समानार्थी किंवा विरुद्धार्थी विधानांवरून ओळखता येतं. इब्री भाषेतील कवितेतली लय ही यमकांमुळे नाही तर विचारांच्या क्रमवार मांडणीमुळे साधलेली असते.
ईयोब आणि स्तोत्रसंहिता या पुस्तकांतील वचनं बायबल काळात गीतांच्या रूपात गायली किंवा म्हटली जायची. ही गोष्ट वाचकाला समजावी म्हणून न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये या पुस्तकांतील वचनांची मांडणी एका खालोखाल एक अशी करण्यात आली होती. अशा मांडणीमुळे कवितेतील समान किंवा विरुद्ध अर्थाची विधानं ठळकपणे समजायची आणि ती आठवणीत ठेवायलाही सोपी जायची. पण २०१३ च्या सुधारित आवृत्तीत या पुस्तकांसोबत नीतिसूत्रे, गीतरत्न, आणि संदेष्ट्यांच्या पुस्तकांतील बऱ्याच अध्यायांची मांडणीही अशा प्रकारे काव्य रूपात करण्यात आली आहे. त्यामुळे हे भाग मूळ भाषेत कवितेच्या रूपात लिहिण्यात आले होते हे समजण्यास तर मदत होतेच पण त्यासोबत, अशा मांडणीमुळे समान आणि विरुद्ध अर्थांची विधानं जास्त ठळकपणे दिसून येतात. याचं एक उदाहरण म्हणजे यशया २४:२. या वचनातील प्रत्येक ओळीत विरुद्धार्थी शब्द वापरण्यात आले आहेत आणि यहोवाच्या न्यायदंडातून कोणालाच सुटका मिळणार नाही या विचारावर जोर देण्यासाठी प्रत्येक ओळ आधीच्या ओळीला पूरक अशी लिहिण्यात आली आहे. अशा विशिष्ट मांडणीमुळे हे उतारे कवितेच्या रूपात आहेत हे ओळखता येत असल्यानं, बायबलचा लेखक एकच विचार उगाचच पुन्हापुन्हा मांडत आहे असं वाचकाला वाटत नाही. उलट, देवाचा संदेश जास्त जोरदारपणे व्यक्त करण्यासाठी त्यानं तो कवितेच्या रूपात मांडला आहे हे त्याच्या लक्षात येतं.
इब्री भाषेत लेख आणि कविता यांच्यातला फरक तितक्या सहजपणे दिसून येत नाही. त्यामुळे, बायबलच्या वेगवेगळ्या भाषांतरांत वेगवेगळी पुस्तकं आणि अध्याय काव्य रूपात मांडलेले आढळतात. काही उतारे कवितेच्या रूपात नसले तरीही त्यात काव्यात्मक शब्द, आलंकारिक भाषा, आणि समानार्थी विधानं वापरून मुद्दा स्पष्ट केलेला असतो. त्यामुळे, कोणते भाग कवितेच्या रूपात मांडले जावेत हे सहसा भाषांतरकार ठरवतात.
२६ जानेवारी–१ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया २८-२९
तुमच्या ओठांनी आणि हृदयाने यहोवाचा सन्मान करा
यशयाह की भविष्यवाणी-१ अध्या २२ ¶२३
यशायाह, यहोवा के ‘अनोखे काम’ की भविष्यवाणी करता है
२३ यहूदा के धार्मिक अगुवे दावा करते हैं कि वे आध्यात्मिक तरीके से बुद्धिमान हैं। मगर उन्होंने यहोवा को छोड़ दिया है। वे दूसरों को सही और गलत के बारे में यहोवा के नियम सिखाने के बजाय, अपने ही गलत विचार सिखा रहे हैं। इस तरह वे अपने अविश्वास और अनैतिक कामों को सही ठहराने की कोशिश कर रहे हैं और लोगों को ऐसे मार्ग पर ले जा रहे हैं जिससे परमेश्वर उनसे नाराज़ हो। इसलिए यहोवा एक “अचम्भे का काम” या “अनोखा काम” करेगा और उनसे उनके कपट का लेखा लेगा। वह कहता है: “ये लोग जो मुंह से मेरा आदर करते हुए समीप आते परन्तु अपना मन मुझ से दूर रखते हैं, और जो केवल मनुष्यों की आज्ञा सुन सुनकर मेरा भय मानते हैं; इस कारण सुन, मैं इनके साथ अद्भुत काम वरन अति अद्भुत और अचम्भे का काम करूंगा; तब इनके बुद्धिमानों की बुद्धि नष्ट होगी, और इनके प्रवीणों की प्रवीणता जाती रहेगी।” (यशायाह २९:१३,१४) यहूदा अपनी ही नज़रों में बुद्धिमान और प्रवीण है, मगर उसकी बुद्धि नष्ट होगी क्योंकि यहोवा हालात को ऐसे बदल देगा कि यहूदा का सारा धर्मत्यागी समाज बाबुल विश्वशक्ति के हाथों मिट जाएगा। पहली सदी में भी ऐसा ही हुआ, क्योंकि खुद को बहुत बुद्धिमान समझनेवाले अगुवों ने यहूदी जाति को गुमराह कर दिया था। हमारे दिनों में ईसाईजगत के साथ भी कुछ ऐसा ही होनेवाला है।—मत्ती १५:८,९; रोमियों ११:८.
जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही
७ येशूने त्याच्या काळातल्या परूश्यांचा उघडपणे विरोध केला. कारण यहोवाची योग्यपणे उपासना कशी करायची हे ते लोकांना शिकवत नव्हते. जसं की, आईवडिलांची काळजी कशी घ्यायची यापेक्षा आपले हात कसे धुवायचे यावर ते जास्त भर द्यायचे. म्हणून येशूने त्यांचा हा ढोंगीपणा उघड केला. (मत्त. १५:१-११) येशूने परूश्यांना जे म्हटलं ते ऐकून शिष्यांनाही फार आश्चर्य वाटलं असेल. त्यामुळे ते येशूला म्हणाले: “परूशी तुझ्या बोलण्याने अडखळले हे तुला कळलं का?” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “माझ्या पित्याने लावलं नाही असं प्रत्येक झाड उपटून टाकलं जाईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.” (मत्त. १५:१२-१४, तळटीप) येशूचं हे बोलणं परूश्यांना मुळीच पटलं नाही आणि ते त्याच्यावर खूप रागावले. पण म्हणून सत्याबद्दल बोलायचं येशूने थांबवलं नाही.
यहोवाचे पाहुणे बनून राहा!
८ आपल्या ‘मनातसुद्धा खरं बोलणारी’ व्यक्ती फक्त लोकांसमोर देवाची आज्ञा पाळत नाही, तर एकटं असतानासुद्धा देवाची आज्ञा पाळते. (यश. २९:१३) ती कपटीपणे वागत नाही. कारण यहोवाचे नियम नेहमीच आपल्या भल्याचे असतात यावर एक कपटी व्यक्ती शंका घेऊ शकते. (याको. १:५-८) ती कदाचित स्वतःला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत, त्याबाबतीत देवाच्या आज्ञा पाळणार नाही. आणि मग त्याचा काही वाईट परिणाम होत नाही, असं तिला दिसू लागतं तेव्हा ती आणखी गंभीर गोष्टींमध्ये देवाच्या आज्ञा मोडायचं धाडस करू लागते. मग तिची उपासना ही फक्त उपासना राहत नाही, तर ढोंगीपणा बनतो. (उप. ८:११) पण आपल्याला मात्र या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रामाणिक राहायचं आहे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट “अरीएल” ¶१; इन्साइट “अरीएल” क्र. ३
अरीएल
(अरीएल) [देवाच्या वेदीवर असलेली जाळण्याची जागा; किंवा, देवाचा सिंह].
३. यशया २९:१, २, ७ मध्ये यरुशलेमला ‘अरीएल’ म्हणण्यात आलंय. यरुशलेममध्ये यहोवाचं मंदिर होतं आणि त्यात बलिदानं जाळण्यासाठी एक वेदी होती. म्हणून यरुशलेम शहर एका अर्थाने “देवाच्या वेदीवर असलेली जाळण्याची जागा” होतं. (यशया २९:१, तळटीप) तसंच, ते यहोवाच्या शुद्ध उपासनेचं केंद्र होतं. पण यशया २९:१-४ प्रमाणे यरुशलेमवर हल्ला होणार होता. इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि त्या शहराचा नाश केला. त्यानंतर यरुशलेम एका वेगळ्या अर्थाने “वेदीवर असलेल्या जाळण्याची जागा” बनलं. कारण, ते शहर आगीने जाळून टाकण्यात आलं. तसंच, त्या शहरात जिथे-तिथे रक्त सांडलं होतं आणि मृतदेह पडले होते.—यशया २९:२-४.
२-८ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ३०-३२
यहोवाच्या पंखांखाली आश्रय घ्या
यहोवा आपला आश्रय आहे
७ यहोवा आपला आश्रय असल्यामुळे आपल्याला पुढील शब्दांतून सांत्वन मिळते: “तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य [“खरेपण,” NW] तुला ढाल व कवच [“तट,” NW] आहे.” (स्तोत्र ९१:४) पक्षी आपल्या पिलांवर सुरक्षा देण्यासाठी तळपत असतात त्याप्रमाणे देव आपले संरक्षण करतो. (यशया ३१:५) ‘तो आपल्यावर पाखर घालतो.’ पक्षी आपल्या पिलांवर पंख पसरून शिकारी पशूपक्ष्यांपासून त्यांचे संरक्षण करतात. लहान पिलांप्रमाणे आपण यहोवाच्या लाक्षणिक पंखांखाली सुरक्षित आहोत कारण आपण त्याच्या खऱ्या ख्रिस्ती संघटनेत आश्रय घेतला आहे.—रूथ २:१२; स्तोत्र ५:१, ११.
कठीण परिस्थितीत यहोवा तुम्हाला मदत करेल
१३ आपल्याला काय करायची गरज आहे? आपल्याला कितीही एकटं राहावंसं वाटलं, तरी आपण ते टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकटं राहिल्यामुळे आपण फक्त स्वतःबद्दल आणि ज्या समस्येतून आपण जात आहोत त्याबद्दलच विचार करत बसू. आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला अवघड जाऊ शकतं. (नीति. १८:१) हे खरंय, की खासकरून जेव्हा एखादी वाईट घटना आपल्यासोबत घडते, तेव्हा आपल्याला एकांत हवा असेल. पण आपण जर जास्त काळ एकटं राहिलो, तर आपण यहोवा पुरवत असलेली मदत नाकारत आहोत असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपल्याला कितीही वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागत असलं, तरी आपल्या घरच्यांकडून, मित्रांकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मिळाणारी मदत आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्यांच्याद्वारे यहोवाच आपल्याला मदत करत आहे, असा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे.—नीति. १७:१७; यश. ३२:१, २.
‘तो तुम्हाला बळ देईल’—कसं?
१९ तुम्हीसुद्धा तुमची आशा कशी मजबूत करू शकता? तुम्हाला जर पृथ्वीवर कायम जगण्याची आशा असेल तर बायबलमध्ये नंदनवन पृथ्वीचं जे वर्णन केलं आहे, ते वाचा आणि त्यावर मनन करा. (यश. २५:८; ३२:१६-१८) नवीन जगात जीवन कसं असेल याचा विचार करा. तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात अशी कल्पना करा. तिथे तुम्हाला कोणकोण दिसतंय? कोणकोणते आवाज तुमच्या कानावर पडत आहेत? तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय? याची कल्पना करा. तुमच्या कल्पनाशक्तीला आणखी चालना देण्यासाठी आपल्या प्रकाशनांमधली नंदनवनाची चित्रं पाहा. किंवा मग जब दुनिया होगी नयी, बस चार कदम आगे किंवा कैसा समाँ होगा यांसारखे व्हिडिओ पाहा. जर अशा प्रकारे आपण नवीन जगाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवली, तर आपल्याला आपल्या समस्या ‘तात्पुरत्या आणि हलक्या’ वाटतील. (२ करिंथ. ४:१७) यहोवाने आपल्याला जी आशा दिली आहे, त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळतं.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट “भाकर” ¶६
भाकर
बायबलमध्ये “भाकर” हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आलाय. उदाहरणार्थ, यहोशवा आणि कालेबने इस्राएली लोकांना सांगितलं की कनानचे लोक “आपल्यासाठी भाकर आहेत.” (गण. १४:९, तळटीप) याचा अर्थ, त्या दोघांनाही असा विश्वास होता की कनानी लोकांना हरवणं भाकर खाण्याइतकं सोपं आहे. तसंच, ज्याप्रमाणे भाकर खाल्ल्यामुळे शरीराला ताकद मिळते, त्याचप्रमाणे कनानी लोकांना हरवल्यामुळे ते ताकदवान होतील असा त्यांना विश्वास होता. याचं आणखी एक उदाहरण आपल्याला स्तोत्र ८०:५ मध्ये सापडतं. तिथे म्हटलंय, की यहोवा त्याच्या लोकांना ‘त्यांचे अश्रू अन्न [भाकर] म्हणून खायला घालतो.’ याचा अर्थ कदाचित यहोवा आपल्या लोकांवर खूश नसल्यामुळे ते खूप दुःखी होते. तसंच, यशया ३०:२० मध्ये असं म्हणण्यात आलंय, की यहोवा त्याच्या लोकांना “खायला दुःखाची भाकर” आणि “प्यायला जुलमाचं पाणी” देईल. याचा अर्थ जेव्हा देवाच्या लोकांना शत्रू घेरणार होते आणि त्यांची सुटका होणं अशक्य होणार होतं, तेव्हा त्यांना अतिशय वाईट परिस्थिती पाहावी लागणार होती. जसं आपण दररोज भाकर खातो आणि पाणी पितो तसं त्यांना दररोज वाईट परिस्थिती पाहावी लागणार होती.
९-१५ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ३३-३५
“तोच तुझं जीवन स्थिर करणारा आहे”
कठीण परिस्थितीत यहोवा तुम्हाला मदत करेल
७ समस्या. एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असताना आपण नेहमी जसं वागतो तसं वागत नाही. आपल्या भावना आणि आपले विचार बदलतात. आपल्या मनात विचारांचं वादळ उठलंय असं आपल्याला वाटू शकतं. सुरुवातीला उल्लेख केलेल्या ॲनाला लुईसच्या मृत्यूनंतर असंच वाटलं. ती म्हणते: “कधीकधी मला खूप निराश वाटायचं आणि मला स्वतःचंच वाईट वाटायचं. कधीकधी तर तो मला असं सोडून का गेला याचीच चीड यायची.” ॲनाला खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं आणि लुईस ज्या गोष्टी सांभाळायचा त्या आता आपल्यालाच सांभाळाव्या लागत आहेत, याचा तिला खूप त्रास व्हायचा. आपण वादळात अडकलोय असं तिला वाटायचं. आपल्यालाही जेव्हा असं वाटतं तेव्हा यहोवा आपल्याला कशी मदत करतो?
८ यहोवा कशी मदत करतो? तो आपल्याला खातरी देतो, की तो आपलं मन स्थिर करेल. (यशया ३३:६ वाचा.) जेव्हा एखादं जहाज वादळात सापडतं, तेव्हा ते कदाचित खूप जोराने हेलकावे खाऊ लागेल. अशा वेळी जहाज स्थिर ठेवण्यासाठी बऱ्याच जहाजांना खालून दोन्ही बाजूला पंख्यांसारखी दिसणारी उपकरणं लावली जातात. त्यामुळे जहाज स्थिर ठेवायला मदत होते. तसंच प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित राहतात आणि त्यांचा प्रवास सुखरूप होतो. पण जहाज पुढे जात राहतं तेव्हाचे ही उपकरणं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच प्रकारे संकटाच्या काळातही आपण जेव्हा विश्वासूपणे पुढे जात राहतो, तेव्हा यहोवा आपलं मन स्थिर करतो.
परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?
१० आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करा. संकटांचा सामना करत असताना आपल्याला जर आपला आनंद टिकवून ठेवायचा असेल तर सगळ्यात आधी आपण यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतील. (याकोब १:५ वाचा.) पण यहोवा आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देत नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय करावं? याकोबने म्हटलं त्याप्रमाणे आपण देवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आपण सारखंसारखं त्याच्याकडे बुद्धी मागितली तरी तो आपल्यावर चिडत नाही किंवा आपल्याला रागवत नाही. परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण देवाकडे बुद्धी मागतो तेव्हा तो ती “उदारपणे” आपल्याला देतो. (स्तो. २५:१२, १३) आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवाला खूप वाईट वाटतं. म्हणून आपल्याला मदत करायला तो नेहमी तयार असतो. आणि या जाणिवेमुळे आपल्याला खूप आनंद होतो. पण यहोवा आपल्याला बुद्धी कशी देतो?
११ यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला बुद्धी देतो. (नीति. २:६) ती बुद्धी मिळवण्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास केला पाहिजे. पण आपण फक्त अभ्यास करू नये, तर त्याप्रमाणे आपण वागलंही पाहिजे. योकोबने म्हटलं: “फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.” (याको. १:२२) बायबलमध्ये दिलेला सल्ला आपण जीवनात लागू करतो तेव्हा आपण शांती राखण्याचा आणि इतरांशी समजूतदारपणे वागण्याचा प्रयत्न करतो. तसंच, आपण आणखी दयाळू बनतो. (याको. ३:१७) या गुणांमुळे आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २६ ¶२१-२२
“कोई निवासी न कहेगा कि मैं रोगी हूं”
२१ यशायाह की यह भविष्यवाणी हमारे दिनों में भी पूरी हुई है। आज भी यहोवा के लोग आध्यात्मिक रूप से चंगे किए गए हैं। उन्हें अमर आत्मा, त्रिएक और नरकाग्नि जैसी झूठी शिक्षाओं से छुटकारा मिला है। उन्हें चालचलन के मामले में सही मार्गदर्शन दिया जाता है, और इस वजह से उन्होंने अनैतिक कामों को छोड़ दिया है और ज़िंदगी में सही फैसले कर पाते हैं। और यीशु मसीह के छुड़ौती बलिदान की बदौलत वे परमेश्वर की नज़रों में शुद्ध ठहरे हैं और उनके विवेक भी बेदाग हैं। (कुलुस्सियों १:१३,१४; १ पतरस २:२४; १ यूहन्ना ४:१०) इस आध्यात्मिक चंगाई से शारीरिक तौर पर भी फायदे होते हैं। मिसाल के लिए, मसीहियों को नाजायज़ लैंगिक संबंधों और तंबाकू से दूर रहने का यह फायदा हुआ है कि वे यौन-संबंधी रोगों से और कुछ किस्म के कैंसर से सुरक्षित रहते हैं।—१ कुरिन्थियों ६:१८; २ कुरिन्थियों ७:१.
२२ यही नहीं, यशायाह ३३:२४ के शब्द हरमगिदोन के बाद, परमेश्वर की नयी दुनिया में और भी शानदार तरीके से पूरे होंगे। मसीहाई राज्य के शासन में, सभी इंसानों को न सिर्फ आध्यात्मिक तौर पर बल्कि शारीरिक तौर पर भी चंगा किया जाएगा। (प्रकाशितवाक्य २१:३,४) जैसे चमत्कार यीशु ने पृथ्वी पर रहते वक्त किए थे, बेशक वैसे चमत्कार शैतान की दुष्ट दुनिया के विनाश के फौरन बाद, सारी पृथ्वी पर किए जाएँगे। तब अंधे देखेंगे, बहिरे सुनेंगे, और लंगड़े चलेंगे! (यशायाह ३५:५,६) इस वजह से, बड़े क्लेश से बचनेवाले सभी लोग पृथ्वी को एक सुंदर बाग बनाने के शानदार काम में हिस्सा ले पाएँगे।
आध्यात्मिक रत्नं शोधा
‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहा
८ काही जण म्हणतील, ‘ते सगळं ठीक आहे. पण एवढ्या आधी घडलेल्या या सगळ्या गोष्टींचा आज आमच्याशी काय संबंध आहे?’ संबंध आहे. कारण एका अर्थाने आज आपणही ‘पवित्रतेच्या मार्गावर’ प्रवास करत आहोत. आणि या मार्गावर चालत राहण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. मग आपण अभिषिक्तांपैकी असो किंवा ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असो. कारण “पवित्रतेचा मार्ग” आपल्याला आध्यात्मिक नंदनवनातून भविष्यात देवाच्या राज्यात मिळणाऱ्या आशीर्वादांकडे घेऊन जाणार आहे. (योहा. १०:१६) इ.स. १९१९ पासून लाखो स्त्री-पुरुष आणि मुलं खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी या लाक्षणिक राजमार्गावर प्रवास सुरू केला आहे. कदाचित तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकी एक असाल. हा मार्ग जवळजवळ १०० वर्षांआधी जरी सुरू झाला असला तरी हा रस्ता तयार करण्याचं काम बऱ्याच शतकांआधी सुरू झालं होतं.
१६-२२ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ३६-३७
त्यांचे शब्द ऐकून “तू घाबरून जाऊ नकोस”
इन्साइट “हिज्किया” क्र. १ ¶१४
हिज्किया
अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यरुशलेमवर हल्ला करायचा निश्चय केला. तो आणि त्याचं सैन्य तटबंदी असलेल्या लाखीश शहराविरुद्ध लढत असताना, त्याने सैनिकांची एक तुकडी यरुशलेमला पाठवली. त्याने त्याच्या सगळ्यात चांगल्या लष्करी अधिकाऱ्यांनाही त्या तुकडीसोबत पाठवलं. त्यांच्या वतीने बोलण्यासाठी रबशाकेला (हे त्याचं नाव नसून पदवी होती) नेमण्यात आलं होतं. त्याला इब्री भाषा चांगली बोलता यायची, म्हणून यरुशलेमच्या लोकांना ऐकू जावं यासाठी तो त्या लोकांशी मोठ्याने ओरडून इब्री भाषेत बोलला. त्याने हिज्कीया राजाची थट्टा केली आणि यहोवाचा अपमान केला. आणि त्याने फुशारकी मारत असं म्हटलं, की इतर राष्ट्रांचे देव जसं त्यांच्या लोकांना अश्शूरच्या राजाच्या हातून वाचवू शकले नाहीत तसंच, यहोवाही आपल्या लोकांना वाचवू शकणार नाही.—२रा १८:१३-३५; २इत ३२:९-१५; यश ३६:२-२०.
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २९ ¶१०
एक राजा को उसके विश्वास का प्रतिफल मिला
१० इसके बाद रबशाके यहूदियों को याद दिलाता है कि अश्शूर के सामने उनकी फौज तो बहुत ही घटिया दर्जे की है। घमंड से चूर वह यहूदियों को यह चुनौती देता है: “यदि तू अपनी ओर से उन पर सवार चढ़ा सके तो मैं तुझे दो हज़ार घोड़े दूंगा।” (यशायाह ३६:८, NHT) लेकिन, क्या वाकई इस बात से कोई फर्क पड़ता है कि यहूदा में काबिल घुड़सवारों की कितनी बड़ी फौज है? बिलकुल नहीं, क्योंकि यहूदा का उद्धार बढ़िया फौजी ताकत पर निर्भर नहीं करता। नीतिवचन २१:३१ में इसे यूँ समझाया गया है: “युद्ध के दिन के लिये घोड़ा तैयार तो होता है, परन्तु जय यहोवा ही से मिलती है।” अब रबशाके दावा करता है कि यहोवा की आशीष अश्शूरियों पर है, यहूदियों पर नहीं। वह दलील देता है कि अगर ऐसा न होता तो अश्शूरी यहूदा के इलाके में इतनी दूर तक भला कैसे आ सकते थे।—यशायाह ३६:९,१०.
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २९ ¶१३-१४
एक राजा को उसके विश्वास का प्रतिफल मिला
१३ अपनी दलीलों से रबशाके अब एक और वार करता है। वह यहूदियों को चेतावनी देता है कि अगर हिजकिय्याह कहे कि “यहोवा हम को बचाएगा,” तो उस पर यकीन न करें। रबशाके यहूदियों को याद दिलाता है कि जब इस्राएल के दस गोत्रों को अश्शूरियों ने जीत लिया तो शोमरोन के देवता कुछ न कर सके थे। और दूसरे देशों के देवता कहाँ थे जब अश्शूर ने इन देशों को रौंद डाला? वह जवाब माँगता है: “हमात और अर्पाद के देवता कहां रहे? सपर्वैम के देवता कहां रहे? क्या उन्हों ने शोमरोन को मेरे हाथ से बचाया?”—यशायाह ३६:१८-२०.
१४ बेशक, झूठे देवताओं को पूजनेवाले रबशाके को यह नहीं समझ आता कि धर्मत्यागी शोमरोन या सामरिया में और हिजकिय्याह के अधीन यरूशलेम में ज़मीन-आसमान का फर्क है। शोमरोन के झूठे देवताओं के पास दस गोत्रों के उस राज्य को बचाने की ताकत नहीं थी। (२ राजा १७:७,१७,१८) दूसरी तरफ, हिजकिय्याह के राज में यरूशलेम ने झूठे देवताओं को छोड़ दिया है और अब वे यहोवा की सेवा करने लगे हैं। मगर, हिजकिय्याह के तीनों दूत रबशाके को यह सब समझाने की कोशिश नहीं करते। “वे चुप रहे और उसके उत्तर में एक बात भी न कही, क्योंकि राजा की ऐसी आज्ञा थी कि उसको उत्तर न देना।” (यशायाह ३६:२१) एल्याकीम, शेब्ना और योआह लौटकर हिजकिय्याह के पास आते हैं और वे रबशाके की कही एक-एक बात की रिपोर्ट पेश करते हैं।—यशायाह ३६:२२.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट “लगाम” ¶४
लगाम
यहोवाने अश्शूरचा राजा सन्हेरीब याला म्हटलं: “म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन. आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.” (२रा १९:२८; यश ३७:२९) सन्हेरीबने आपल्या मर्जीने यरुशलेम सोडलं नाही. उलट जसं एक व्यक्ती प्राण्याला लगाम घालून त्याला ताब्यात ठेवतो, तसंच यहोवाने सन्हेरीबची योजना यशस्वी होऊ न देता त्याला निनवेला जायला भाग पाडलं. मग नंतर तिथे त्याच्या मुलांनीच त्याला मारून टाकलं. (२रा १९:३२-३७; यश ३७:३३-३८) ज्याप्रमाणे लगामामुळे प्राण्याला ताब्यात ठेवता येतं, त्याप्रमाणे यहोवा त्याच्या शत्रुंच्या तोंडात लगाम घालतो, म्हणजे त्याचं त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण असतं.—यश ३०:२८.
२३ फेब्रुवारी–१ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ३८-४०
“तो मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपाची काळजी घेईल”
बायबल त्याच्या लेखकाबद्दल काय सांगतं?
३ यशया ४०:८ वाचा. गेल्या हजारो वर्षांपासून बायबलने विश्वासू स्त्री-पुरूषांना खूप मोलाचं मार्गदर्शन दिलंय. हे कसं काय शक्य झालं? कारण बायबल तर अशा साहित्यांवर लिहिण्यात आलं होतं, जे सहज नष्ट होऊ शकतं. त्यामुळे त्याच्या मूळ प्रतींपैकी आज एकही प्रत अस्तित्वात नाही. पण आपल्या या पवित्र लिखाणाच्या बऱ्याच प्रती तयार केल्या जातील अशी योजना यहोवाने केली. प्रती तयार करणारे नकलाकार जरी अपरिपूर्ण असले, तरी ते आपलं काम करताना खूप बारीक लक्ष द्यायचे. आणि म्हणूनच हिब्रू शास्त्रवचनांबद्दल एका विद्वानाने असं म्हटलं: “आपण खातरीने म्हणू शकतो, की या लिखाणांसारखं दुसरं कोणतंही प्राचीन लिखाण आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचलेलं नाही.” बायबल हे जरी हजारो वर्षांपूर्वी आणि नष्ट होणाऱ्या साहित्यांवर लिहिलेलं असलं, तसंच त्याच्या प्रती बनवणारे नकलाकार अपरिपूर्ण असेल, तरी आज आपण बायबलमध्ये जे काही वाचतो ते त्याच्या लेखकाचेच विचार आहेत असं आपण खातरीने म्हणू शकतो.
४ प्रत्येक “चांगली देणगी आणि परिपूर्ण दान,” हे यहोवाकडून आहे. (याको. १:१७) बायबल ही यहोवाकडून मिळालेली एक सुंदर भेट आहे. तुम्हाला कोणी कधी अशी भेट दिली आहे का, ज्याची तुम्हाला खूप गरज होती? यावरून कळतं, की ती व्यक्ती आपल्याला खूप चांगलं ओळखते आणि आपल्याला काय हवंय हे तिला चांगलं माहीत आहे. बायबलसुद्धा असंच आहे. आपण जेव्हा बायबल वाचतो, तेव्हा यहोवा आपल्याला किती चांगलं ओळखतो आणि आपल्याला कशाची गरज आहे हे त्याला चांगलं माहीत आहे, हे आपल्याला कळतं. तसंच, बायबल वाचल्यामुळे यहोवाच्या बऱ्याच गुणांबद्दल आपल्याला समजतं. जसं की, तो खूप बुद्धिमान आहे, न्यायी आहे आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. या लेखात आपण याच तीन गुणांबद्दल पाहणार आहोत. तर चला सगळ्यात आधी आपण हे पाहू, की बायबल वाचल्यामुळे यहोवा खूप बुद्धिमान आहे हे आपल्याला कसं कळतं.
यहोवा के करीब अध्या. ७ ¶७
रक्षा करने की शक्ति—‘परमेश्वर हमारा शरणस्थान है’
७ अपनी तुलना एक चरवाहे के साथ करके यहोवा हमें यकीन दिलाता है कि वह दिल से हमारी रक्षा करना चाहता है। (यहेजकेल ३४:११-१६) याद कीजिए कि यशायाह ४०:११ (NHT) में यहोवा के बारे में क्या बताया है और जिसका ज़िक्र इस किताब के दूसरे अध्याय में किया गया है। वहाँ लिखा है: “वह चरवाहे के समान अपने झुण्ड को चराएगा: वह मेमनों को अपनी बाहों में समेट लेगा और गोद में लिए रहेगा।” भेड़ का बच्चा चरवाहे की “गोद” या उसके बागे के अंदर कैसे आता है? एक मेम्ना शायद चरवाहे के पास आए और उसके पैरों को टहोका भी दे। लेकिन झुकना तो चरवाहे को ही पड़ता है, ताकि वह मेम्ने को उठाकर बड़ी कोमलता के साथ अपनी गोद में छिपा ले जहाँ वह महफूज़ रहे। यह हमारे महान चरवाहे यहोवा का क्या ही कोमल रूप है, जो हमारी ढाल बनकर हमारी रक्षा करने के लिए हमेशा तैयार रहता है!
“तो थकलेल्याला शक्ती देतो”
४ यशया ४०:२६ वाचा. या विश्वात किती तारे आहेत, हे आजवर कोणीही मोजू शकलं नाही. वैज्ञानिकांच्या मते फक्त आपल्या आकाशगंगेतच जवळजवळ ४० हजार कोटी इतके तारे असावेत. पण तरीही यहोवाने प्रत्येक ताऱ्याला नाव दिलं आहे. यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? जर तो निर्जीव ताऱ्यांमध्ये वैयक्तिक आस्था दाखवतो, तर विचार करा त्याला तुमच्याबद्दल कसं वाटत असेल! यहोवाची सेवा केलीच पाहिजे म्हणून नाही, तर तुमचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही त्याची सेवा करता. (स्तो. १९:१, ३, १४) आपल्या प्रिय पित्याला तुमच्याबद्दल सर्वकाही माहीत आहे. बायबल म्हणतं, की त्याने “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.” (मत्त. १०:३०) यहोवाने आपली “दैन्यावस्था पाहिली आहे” आणि आपल्या “जिवावरील संकटे” तो जाणतो ही गोष्ट आपल्याला माहीत असावी अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ३१:७) यावरून हे स्पष्टच आहे, की यहोवा तुमच्या सर्व समस्या जाणतो आणि त्या सहन करण्यासाठी तो प्रत्येकाला हवी असलेली शक्ती देतो.
५ यशया ४०:२८ वाचा. यहोवा शक्तींचा स्त्रोत आहे. उदाहरणार्थ, सुर्याला तो किती उर्जा देतो याचा जरा विचार करा. विज्ञानाबद्दल लिहिणारे डेवीड बोडानीस म्हणतात, की अब्जावधी अणू बॉम्बच्या विस्फोटामुळे जेवढी उर्जा उत्पन्न होऊ शकते, तेवढी उर्जा प्रत्येक सेकंदाला सूर्य निर्माण करत असतो. दुसऱ्या एका संशोधकाने असं गणित मांडलं, की सूर्य एका सेकंदाला इतकी उर्जा उत्पन्न करतो की ती संपूर्ण जगातल्या लोकांना २,००,००० वर्षांसाठी पुरू शकते! यहोवा जर सुर्याला इतकी उर्जा देऊ शकतो, तर आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती पुरवू शकत नाही का? नक्कीच पुरवू शकतो!
६ यशया ४०:२९ वाचा. यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “माझं जू आपल्या खांद्यावर घ्या.” त्याने पुढे म्हटलं: “तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल. कारण माझं जू वाहायला सोपं व माझं ओझं हलकं आहे.” (मत्त. ११:२८-३०) ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे! कधीकधी आपल्याला प्रचाराला किंवा सभेला जाताना खूप थकल्यासारखं वाटतं. पण तिथून परत आल्यावर आपल्याला कसं वाटतं? आपला सगळा थकवा कुठल्या कुठे निघून गेलेला असतो आणि आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण तयार असतो. खरंच, येशूचं जू वाहायला सोपं आहे!
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
१२ जेव्हा आपण यहोवाच्या नावाला पाठिंबा देतो तेव्हा आपण येशू ख्रिस्तासारखं वागत असतो. यशयाने अशा एका व्यक्तीबद्दलसुद्धा भविष्यवाणी केली, जो “यहोवासाठी मार्ग मोकळा [किंवा, “तयार,” तळटीप]” करणार होता. (यश. ४०:३) ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने येशूसाठी मार्ग तयार केला. पण खरंतर त्याने यहोवासाठी मार्ग तयार केला. कारण येशू यहोवाच्या नावाने आला आणि त्याच्या वतीने बोलला. (मत्त. ३:३; मार्क १:२-४; लूक ३:३-६) याच भविष्यवाणीत पुढे असं म्हटलंय: “यहोवाचं वैभव प्रकट होईल.” (यश. ४०:५) हे कसं होणार होतं? जेव्हा येशू या पृथ्वीवर आला, तेव्हा त्याने यहोवाचं प्रतिनिधित्व इतक्या चांगल्या प्रकारे केलं की जणू स्वतः यहोवाच या पृथ्वीवर आला होता.—योहा. १२:४५.