जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
४-१० सप्टेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एस्तेर १-२
“एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा”
आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
११ आपली खूप जास्त प्रशंसा केली जाते किंवा मान दिला जातो, तेव्हाही आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते. एस्तेरला देखील खूप प्रशंसा आणि मान मिळाला होता. संपूर्ण पर्शियामध्ये असलेल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी ती एक होती. तिला आणि तिच्यासोबत इतरही अनेक तरुण स्त्रियांना एक पूर्ण वर्ष खास सौंदर्य उपचार देण्यात आले होते. राजा त्यांच्यापैकी एकीला आपली राणी होण्याकरता पसंत करणार होता आणि त्यासाठी त्यांच्यात जणू एक स्पर्धाच चालली होती. राजाने शेवटी एस्तेरला आपली राणी होण्याकरता निवडलं. पण, तिला मिळालेल्या या सन्मानामुळे ती बदलली नाही. ती गर्विष्ठ बनली नाही किंवा ती फक्त स्वतःचाच विचार करू लागली नाही. ती पुढेही नम्र राहिली आणि इतरांशी वागताना तिने नेहमी दयाळूपणा आणि आदर दाखवला.—एस्ते. २:९, १२, १५, १७.
देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
१५ एस्तेरला राजाच्या पुढे नेण्याची वेळ आली, तेव्हा आवश्यक वाटणाऱ्या कोणत्याही वस्तू मागण्याची तिला संधी देण्यात आली. उदाहरणार्थ, आपल्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी ती हवं ते मागू शकत होती. पण, हेगेनं ज्या गोष्टी तिला देण्याचं ठरवलं होतं त्यांव्यतिरिक्त तिनं त्याच्याकडे काहीही मागितलं नाही. (एस्ते. २:१५) फक्त सौंदर्याच्या बळावर आपण राजाचं मन जिंकू शकत नाही, याची एस्तेरला जाणीव होती. उलट, त्या राजवाड्यातल्या बहुतेक लोकांमध्ये नसलेले, विनम्रता आणि विनयशीलता यांसारखे गुण त्याला जास्त प्रभावित करतील हे तिनं ओळखलं. मग, तिचा हा अंदाज खरा ठरला का?
आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
१२ आपण जर नम्र असलो तर आपल्या पेहरावावरून आणि वागणुकीवरून आपण स्वतःचा आणि इतरांचा आदर करतो हे दिसून येईल. स्वतःची बढाई मारण्याऐवजी किंवा लोकांवर आपली छाप पाडण्याऐवजी, आपण “सौम्य व शांत आत्मा” बाळगण्याचा प्रयत्न करू. (१ पेत्र ३:३, ४ वाचा; यिर्म. ९:२३, २४) आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं हे आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येतं. उदाहरणार्थ, आपण जे काम करतो, ज्या गोष्टींची आपल्याला माहिती आहे त्यामुळे, किंवा काही लोकांशी आपली ओळख आहे त्यामुळे आपण विशेष आहोत, असा विचार करण्यास आपण कदाचित इतरांना भाग पडण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा मग इतरांनी जरी आपल्याला मदत केली असली तरी एखादी महत्त्वाची गोष्ट आपण स्वतःच्या बळावर केली आहे असं दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. पण, येशूचा विचार करा. आपण किती हुशार आहोत हे तो लोकांना दाखवू शकला असता आणि त्यांच्यावर आपली छाप पाडू शकला असता. पण, असं करण्याऐवजी त्याने नेहमी शास्त्रवचनांचा उल्लेख केला. लोकांनी आपली स्तुती करावी अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. उलट, सर्व स्तुती आणि गौरव यहोवाला मिळावा अशी त्याची इच्छा होती.—योहा. ८:२८.
आध्यात्मिक रत्नं
तुम्हाला माहीत होतं का?
या संशोधन करणाऱ्यांना पर्शियन भाषेतले असे काही ऐतिहासिक लेख सापडले ज्यात मारडूका (इंग्रजीत मॉर्डीकाय) नावाच्या एका माणसाचा उल्लेख आहे. तो शूशन शहरात एक प्रशासकीय अधिकारी होता. कदाचित तो जमाखर्च अहवाल तपासण्याचं काम करत असेल. या लेखांचा शोध लागला तेव्हा पूर्वेकडच्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे विद्वान आर्टूर अंगनाड यांनी असं म्हटलं, की “बायबलच्या बाहेर मर्दखयचा उल्लेख येण्याची” ही पहिलीच वेळ आहे.
अंगनाड यांचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून आजपर्यंत विद्वानांनी पर्शियाच्या हजारो ऐतिहासिक लेखांचं भाषांतर केलं आहे. यांचं एक उदाहरण म्हणजे पर्सिपोलिस शहराजवळ सापडलेल्या छोट्या-छोट्या मातीच्या पाट्या. या पाट्या त्यांना शहराच्या भिंतींजवळ असलेल्या शाही खजिन्याच्या अवशेषांमधून सापडल्या. आणि त्या झर्कसीझ पहिला याच्या शासनकाळातल्या आहेत. या पाट्यांवरचं लिखाण एलामी भाषेत आहे आणि एस्तेर पुस्तकात उल्लेख केलेली बरीच नावं त्यांत आढळतात.
पर्सिपोलिसमध्ये सापडलेल्या बऱ्याच मातीच्या पाट्यांवर मारडूका या नावाचा उल्लेख आहे. तो झर्कसीझ पहिला याच्या शासनकाळात शूशनच्या राजदरबारात राजाचा सचिव म्हणून काम करत होता. एका पाटीवर मारडूका हा भाषांतरकार होता असं म्हटलंय. बायबलमध्ये मर्दखयबद्दल जी माहिती दिली आहे त्याच्याशी ही माहिती जुळते. बायबलमध्ये सांगितलंय, की तो अहश्वेरोश (झर्कसीझ पहिला) राजाच्या दरबारात एक अधिकारी होता आणि त्याला कमीत कमी दोन भाषा बोलता येत होत्या. तसंच मर्दखय शूशनच्या राजमहालाच्या दरवाजाजवळ नेहमी बसायचा असंही बायबलमध्ये सांगितलंय. (एस्ते. २:१९, २१; ३:३) राजमहालाचा हा दरवाजा म्हणजे एक मोठी इमारत होती आणि इथे राजदरबारातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांचं कामकाज चालायचं.
ऐतिहासिक लेखांमध्ये उल्लेख केलेला मारडूका आणि बायबलमध्ये सांगण्यात आलेला मर्दखय यांच्यात बऱ्याच लक्षवेधक साम्यता दिसून येतात. ते एकाच काळात, एकाच शहरात आणि एकाच कामाच्या ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा करत होते. या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं, की ऐतिहासिक लेखांमध्ये उल्लेख केलेला मारडूका आणि बायबलमधल्या एस्तेरच्या पुस्तकात सांगितलेला मर्दखय हे दोघंही कदाचित एकच व्यक्ती असावेत.
११-१७ सप्टेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एस्तेर ३-५
“यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा”
इन्साइट-२ ४३१ ¶७
मर्दखय
हामानला नमन करायला नकार देतो. अहश्वेरोश राजाने हामानला मुख्य अधिकारी बनवलं. राजाने राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणाऱ्या सगळ्या सेवकांना असा हुकूम दिला, की त्यांनी हामानला वाकून नमन करावं आणि त्याला दंडवत घालावा. पण मर्दखयने मात्र त्याला वाकून नमन करायला किंवा दंडवत घालायला साफ नकार दिला कारण आपण यहुदी आहोत, असं त्याने सांगितलं. (एस्ते ३:१-४) मर्दखयला हे माहीत होतं, की हामानला वाकून नमन करणं फक्त आदर दाखवायची गोष्ट नव्हती. प्राचीन काळात इस्राएली लोक, आपल्यावर कोणीतरी शासक आहे हे दाखवण्यासाठी उच्च पदावर असलेल्या शासकाला नमन करायचे. (२शमु १४:४; १८:२८; १रा १:१६) पण हामानला मर्दखयने नमन केलं नाही याचं एक महत्त्वाचं कारण होतं. कदाचित हामान हा एक अमालेकी असावा. आणि यहोवाने असं म्हटलं होतं, की तो “पिढ्या न् पिढ्या अमालेकशी युद्ध करेल.” (निर्ग १७:१६) त्यामुळे मर्दखयसाठी ही फक्त अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीला आदर दाखवायची गोष्ट नव्हती, तर देवाला एकनिष्ठ राहण्याची गोष्ट होती.
इन्साइट-२ ४३१ ¶९
मर्दखय
इस्राएलच्या बचावासाठी वापर करण्यात आला. राजाने यहुद्यांचा समूळ नाश करायची आज्ञा दिली आहे असं मर्दखयला कळतं. पण एस्तेर राणीवर तो भरवसा असल्याचं दाखवतो. कारण अशाच प्रसंगासाठी म्हणजे यहुद्यांचा बचाव करण्यासाठी तिला अगदी योग्य वेळी राणीपद मिळालं असेल असा त्याचा विश्वास असतो. एस्तेर राणीवर आता किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव तो तिला करून देतो. आणि तिने राजाला मदतीसाठी विनंती करावी असं तो तिला सांगतो. एस्तरच्या जिवाला धोका असतानाही ती हे करायला तयार होते.—एस्ते ४:७–५:२.
देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
२२ मर्दखयचा निरोप ऐकल्यावर नक्कीच एस्तेरच्या हृदयाचं पाणी पाणी झालं असेल. तिच्या विश्वासाची ही सर्वात मोठी कसोटी होती. सुरुवातीला ती घाबरली आणि तिनं मर्दखयला पाठवलेल्या उत्तरात तसं कबूलही केलं. तसंच, तिनं त्याला राजाच्या कायद्याची आठवण करून दिली. राजानं स्वतः बोलावलेलं नसताना त्याच्यापुढं जाणाऱ्याला मृत्युदंड होऊ शकत होता. फक्त, राजानं त्याला पाहून आपला सुवर्णदंड पुढं केल्यास त्याचा जीव वाचू शकत होता. वश्ती राणीनं राजाच्या आज्ञेचं पालन केलं नाही तेव्हा तिच्यासोबत काय घडलं हे एस्तेरला चांगलं माहीत होतं. त्यामुळं, राजा सुवर्णदंड पुढं करून आपल्याला जीवदान देईल अशी खातरी ती खरंच बाळगू शकत होती का? शिवाय, राजानं ३० दिवसांपासून आपल्याला त्याच्यासमोर हजर होण्याचं आमंत्रण दिलेलं नाही, असंही एस्तेरनं मर्दखयला सांगितलं. इतक्या दिवसांपासून राजानं बोलावलं नसल्यामुळं आपण त्याच्या मर्जीतून उतरलो आहोत की काय, अशी भीतीही साहजिकच एस्तेरला वाटली असावी.—एस्ते. ४:९-११.
२३ एस्तेरचा विश्वास खंबीर करण्यासाठी मर्दखयनं तिला अगदी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं. जर तिनं या प्रसंगी धैर्य दाखवलं नाही, तर दुसऱ्या कोणत्याही मार्गानं यहुद्यांची सुटका केली जाईल, असं त्यानं म्हटलं. पण, छळाचा जोर वाढल्यावर ती आपला जीव वाचवू शकेल का, याचा विचार करण्यास त्यानं तिला सांगितलं. मर्दखयनं दिलेल्या उत्तरातून त्याचा यहोवावर किती मजबूत विश्वास होता हे दिसून येतं. यहोवा आपल्या लोकांचा कधीही समूळ नाश होऊ देणार नाही आणि त्यानं दिलेली वचनं तो कधीही निष्फळ ठरू देणार नाही, याची मर्दखयला पूर्ण खातरी होती. (यहो. २३:१४) शेवटी, मर्दखयनं एस्तेरला विचारलं, “तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?” (एस्ते. ४:१२-१४) खरोखर, मर्दखयच्या दृढ विश्वासावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपला देव, यहोवा याच्यावर त्यानं पूर्ण भरवसा ठेवला. आपणही ठेवतो का?—नीति. ३:५, ६.
आध्यात्मिक रत्नं
राज किताब अध्या. १५ ¶१४
उपासना करने की आज़ादी के लिए लड़ाई
१४ पुराने ज़माने के एस्तेर और मोर्दकै की तरह, आज यहोवा के लोग कानूनी लड़ाइयाँ इसलिए लड़ते हैं कि उन्हें यहोवा की उपासना उसके बताए तरीके से करने की आज़ादी मिले। (एस्ते. ४:१३-१६) क्या आप भी इसमें मदद कर सकते हैं? बेशक। आप उन भाई-बहनों के लिए लगातार प्रार्थना कर सकते हैं जो आज कानून के हाथों अन्याय सह रहे हैं। आपकी प्रार्थनाओं से उन्हें ज़ुल्म सहने में मदद मिल सकती है। (याकूब ५:१६ पढ़िए।) क्या यहोवा ऐसी प्रार्थनाओं का जवाब देता है? हमें अदालतों में कई बार जो जीत मिली है उससे साबित होता है कि वह ज़रूर जवाब देता है!—इब्रा. १३:१८, १९.
१८-२४ सप्टेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एस्तेर ६-८
“एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका”
ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
१५ अशा रीतीनं, हामानानं स्वतःचीच फजिती करून घेतली. एस्तेरनं धीर दाखवल्यामुळं आणि आपली मागणी राजाला सांगण्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहिल्यामुळंच हे घडू शकलं. त्या रात्री राजाची झोप उडाली, हे कदाचित यहोवानंच घडवून आणलं असावं, नाही का? (नीति. २१:१) खरोखर, वाट पाहत राहण्याची मनोवृत्ती दाखवावी, असं प्रोत्साहन देवाचं वचन आपल्याला उगीच देत नाही! (मीखा ७:७ वाचा.) कारण, जेव्हा आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवून तो कार्य करेपर्यंत वाट पाहतो, तेव्हा आपल्या समस्यांवर स्वतः शोधून काढलेल्या मार्गांपेक्षा, यहोवाचे मार्ग कितीतरी पटीनं चांगले असल्याचं आपल्याला दिसून येतं.
ती धैर्यानं बोलली
१६ राजा दुसऱ्यांदा एस्तेरकडे मेजवानीला आला; आता मात्र त्याला आणखी वाट पाहायला लावणं योग्य नाही, त्याला सर्वकाही सांगितलंच पाहिजे, हे एस्तेरनं ओळखलं. पण, सुरुवात कुठून करावी? झालं असं, की राजानं स्वतःच एस्तेरला पुन्हा एकदा तिची मागणी काय आहे, असं विचारलं. (एस्ते. ७:२) एस्तेरला जाणीव झाली, की आता “बोलण्याचा समय” आला आहे.
ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
१७ बोलायला सुरुवात करण्याआधी एस्तेरनं नक्कीच मनातल्या मनात प्रार्थना केली असेल. मग ती म्हणाली: “महाराज, मजवर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांस प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे.” (एस्ते. ७:३) “आपल्या मर्जीस आल्यास” असं म्हणण्याद्वारे, राजा जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं तिनं त्याला आश्वासन दिलं. एस्तेर ही वश्ती राणीपेक्षा किती वेगळी होती! राजाच्या त्या पूर्वीच्या पत्नीनं सर्वांसमोर जाणूनबुजून त्याचा अपमान केला होता. (एस्ते. १:१०-१२) पण एस्तेरनं राजाचा आदर केला. शिवाय, अविचारीपणे हामानावर विश्वास ठेवल्याबद्दल तिनं राजाला दोषदेखील दिला नाही. त्याऐवजी, तिनं फक्त राजाला तिचा जीव वाचवण्याची विनवणी केली.
ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
१८ एस्तेरची विनंती ऐकून कदाचित राजाला धक्का बसला असेल. ‘माझ्या राणीचा जीव धोक्यात घालण्याची कोणाची हिम्मत?’ असा त्यानं नक्कीच विचार केला असेल. एस्तेर पुढं म्हणाली: “माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.” (एस्ते. ७:४) एस्तेरनं आपली समस्या अगदी स्पष्ट शब्दांत सांगितली. पण, पुढं ती असंही म्हणाली की फक्त दासदासी होण्याची भीती असती, तर ती गप्प राहिली असती. पण, यहुदी लोकांच्या या संहारामुळं खुद्द राजाचं नुकसान होणार असल्यामुळं साहजिकच ती गप्प राहू शकत नव्हती.
१९ कोणाला एखादी गोष्ट पटवून देण्याविषयी एस्तेरच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. एखादी गंभीर समस्या आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या किंवा अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीच्या लक्षात आणून द्यायची असते, तेव्हा एस्तेरप्रमाणेच आपणही धीरानं, आदरानं आणि प्रामाणिकपणे बोललं पाहिजे.—नीति. १६:२१, २३.
आध्यात्मिक रत्नं
एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
७:४—सर्व यहुद्यांचा नायनाट झाला असता तर ‘राजाचे नुकसान’ कसे झाले असते? यहुदी लोकांना दास म्हणून विकता येते, त्यामुळे त्यांचा जर नाश झाला तर त्यात राजाचेच नुकसान आहे, ही गोष्ट एस्तेर अतिशय चलाखीने राजाच्या नजरेस आणून देते. हामानाने जे १०,००० चांदीचे नाणे देण्याचे वचन दिले होते ते, त्याने सर्व यहुद्यांना दास म्हणून विकून जे पैसे मिळाले असते त्याच्या तुलनेत खूपच कमी होते; त्यांच्यामुळे राजाच्या संपत्तीत इतकी काही भर पडली नसती. हामानाचे कारस्थान सफल आले असते तर राणी देखील त्यात मरण पावली असती.
२५ सप्टेंबर–१ ऑक्टोबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एस्तेर ९-१०
“त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला”
इन्साइट-२ ४३२ ¶२
मर्दखय
हामानच्या जागी मर्दखयला मुख्य अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. मर्दखयला दस्तऐवजांवर मोहर लावण्यासाठी राजमुद्रेची अंगठी देण्यात आली होती. यहुद्यांना आपला बचाव करता यावा म्हणून आधीच्या फर्मानाच्या उलट मर्दखयने आणखी एक फर्मान काढलं. आणि त्याला कायद्याचं स्वरूप देण्यासाठी त्याने याच अधिकाराचा वापर केला. यामुळे यहुदी लोकांनी आनंदाने जल्लोष केला कारण त्यांना आशा मिळाली होती. अदार महिन्याच्या १३ व्या दिवशी राज्याच्या आज्ञेनुसार यहुद्यांवर हल्ला केला जाणार होता. पण ते त्यासाठी आधीच तयार होते. शूशनमध्ये ही लढाई दुसऱ्या दिवसापर्यंत चालली. पर्शियाच्या साम्राज्यातल्या ७५,००० पेक्षा जास्त शत्रूंना तसंच हामानच्या १० मुलांना यहुद्यांनी ठार मारलं. (एस्ते ८:१–९:१८) मर्दखयने सगळ्या यहुद्यांना असं कळवलं की त्यांनी दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवस सण म्हणून साजरा करावा. आणि या सणाला “पुरीम” असं नाव पडलं. त्या दिवशी यहुद्यांना मेजवान्या करून आनंदोत्सव साजरा करायचा होता. तसंच एकमेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवायच्या होत्या आणि गोरगरिबांना दानधर्म करायचा होता. संपूर्ण साम्राज्यात मर्दखय, राजाच्या खालोखाल असल्यामुळे यहुदी लोक त्याचा खूप आदर करायचे. आणि तोही शेवटपर्यंत त्यांच्या भल्यासाठी काम करत राहिला.—एस्ते ९:१९-२२, २७-३२; १०:२, ३.
इन्साइट-२ ७१६ ¶५
पुरीम
उद्देश. यहोवाने त्याच्या लोकांना शत्रूंच्या हातून वाचवलं म्हणून यहोवाचा सन्मान करण्यासाठी पुरीम हा सण पाळला जात होता. पण आज हा सण यहुदी लोक वेगळ्या पद्धतीने पाळतात.
यहोवा के करीब अध्या. १० ¶१२-१३
अपनी शक्ति इस्तेमाल करने में “परमेश्वर के समान बनो”
१२ यहोवा ने कलीसिया में अगुवाई के लिए ओवरसियरों को ठहराया है। (इब्रानियों १३:१७) इन काबिल भाइयों को परमेश्वर से मिले अधिकार का इस्तेमाल करके झुंड की ज़रूरी देखभाल करनी चाहिए ताकि उनकी आध्यात्मिक खुशहाली बढ़ती चली जाए। क्या प्राचीनों का पद उन्हें अपने संगी भाई-बहनों पर रोब जमाने का हकदार बनाता है? बिलकुल नहीं! प्राचीनों के लिए ज़रूरी है कि वे कलीसिया में अपनी ज़िम्मेदारी के बारे में संतुलित नज़रिया रखें और नम्र हों। (१ पतरस ५:२, ३) बाइबल ओवरसियरों से कहती है: “परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जिसे उसने अपने प्रिय पुत्र के रक्त से प्राप्त किया है।” (प्रेरितों २०:२८, नयी हिन्दी बाइबिल) यही सबसे बड़ी वजह है कि क्यों झुंड के हर सदस्य के साथ कोमलता से पेश आना ज़रूरी है।
१३ इसे समझने के लिए हम यह उदाहरण ले सकते हैं। आपका एक करीबी दोस्त अपनी किसी कीमती चीज़ की देखभाल करने के लिए आपसे कहता है। आप जानते हैं कि आपके दोस्त ने इस चीज़ को बहुत बड़ी कीमत देकर पाया है। तो क्या आप उस अमानत को बहुत संभालकर, हद-से-ज़्यादा एहतियात के साथ नहीं रखेंगे? उसी तरह, परमेश्वर ने प्राचीनों को अपनी एक बहुत ही बेशकीमती चीज़ संभालने की ज़िम्मेदारी सौंपी है, वह है: कलीसिया, जिसके सदस्यों की तुलना भेड़ों से की गयी है। (यूहन्ना २१:१६, १७) यहोवा को अपनी भेड़ें बेहद प्यारी हैं—इतनी प्यारी कि उसने उन्हें अपने एकलौते पुत्र, यीशु मसीह का कीमती लहू देकर मोल लिया है। यहोवा ने अपनी इन भेड़ों के लिए सबसे बड़ी कीमत अदा की है। नम्र प्राचीन इस बात को हमेशा ध्यान में रखकर यहोवा की भेड़ों के साथ प्यार से पेश आते हैं।
आध्यात्मिक रत्नं
एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
९:१०, १५, १६—राजाने दिलेल्या हुकूमात, लूटीस परवानगी देण्यात आली होती तरीपण यहुद्यांनी लुटीस हात का लावला नाही? त्यांनी दिलेल्या नकारावरून, त्यांचा हेतू संपत्ती मिळवण्याचा नव्हे तर जीव वाचवणे होता हे स्पष्टपणे दिसून आला.
२-८ ऑक्टोबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब १-३
“तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा”
नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा
१६ ईयोबसमोर कोणत्या काही समस्या होत्या? ईयोबला आपल्या जीवनात खूप मोठमोठ्या बदलांचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला ईयोब “पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता.” (ईयो. १:३) तो खूप श्रीमंत आणि नावाजलेला असून लोक त्याचा खूप आदर करायचे. (ईयो. २९:७-१६) असं असलं तरी आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत किंवा आपल्याला देवाची गरज नाही, असा विचार त्याने कधीच केला नाही. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण यहोवाने त्याला “माझा सेवक” असं म्हटलं. तो असंही म्हणाला, की ईयोब “सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” आहे.—ईयो. १:८.
१७ पुढे अचानक ईयोबचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्याने सर्वकाही गमावलं आणि तो इतका निराश झाला की त्याला मरून जावंसं वाटलं. त्याच्यावर आलेल्या समस्या सैतानामुळे होत्या हे आपल्याला माहीत आहे. ईयोब यहोवाची सेवा स्वार्थासाठी करत आहे, असं सैतान म्हणाला. (ईयोब १:९, १० वाचा.) हा आरोप यहोवासाठी खूप गंभीर होता. सैतान दुष्ट असून तो खोटं बोलत आहे, हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने काय केलं? ईयोब देवाला एकनिष्ठ आहे आणि तो देवाची सेवा प्रेमापोटी करतो, हे सिद्ध करण्याची संधी त्याने ईयोबला दिली.
खरेपणा टिकवून ठेवा!
१० सैतान आपल्या प्रत्येकावर रोज हेच आरोप लावतो. सैतानाने ईयोबच्या बाबतीत उपस्थित केलेल्या वादविषयात तुम्ही कसे सामील आहात? त्याचं म्हणणं आहे की तुमचं यहोवावर खरं प्रेम नाही, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी त्याची सेवा करण्याचं सोडून द्याल आणि तुम्ही खरेपणा टिकवून ठेवणार नाही. (ईयो. २:४, ५; प्रकटी. १२:१०) हे ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल! पण जरा याचा विचार करा: यहोवाचा तुमच्यावर इतका भरवसा आहे की त्याने तुम्हाला एक उत्कृष्ट संधी दिली आहे. यहोवाने सैतानाला तुमची परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. पण तुम्ही आपला खरेपणा टिकवून ठेवाल आणि सैतान खोटं असल्याचं सिद्ध कराल असा पूर्ण भरवसा यहोवाला आहे. तसंच, यहोवा वचन देतो की असं करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. (इब्री १३:६) संपूर्ण विश्वाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा तुमच्यावर भरवसा आहे, हा खरंच किती मोठा बहुमान आहे! यावरून आपल्याला समजतं की खरेपणा इतका महत्त्वपूर्ण का आहे. खरेपणा बाळगल्यामुळे आपण सैतानाच्या खोट्या आरोपांना फेटाळून लावू शकतो, आपल्या पित्याचं नाव उंचावू शकतो आणि त्याच्या अधिकाराचं समर्थन करू शकतो. आपला खरेपणा टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
आध्यात्मिक रत्नं
येशूच्या शेवटच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?
९ येशू काय बोलला? अखेरचा श्वास घेण्याआधी येशू म्हणाला: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?” (मत्त. २७:४६) येशू असं का बोलला ते बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण त्या शब्दांतून काय शिकायला मिळतं त्याचा विचार करा. एक म्हणजे, येशू स्तोत्र २२:१ मध्ये दिलेली भविष्यवाणी पूर्ण करत होता. शिवाय, येशूच्या त्या शब्दांवरून दिसून आलं, की यहोवाने आपल्या मुलाला ‘सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्याभोवती कुंपण घातलं नव्हतं.’ (ईयो. १:१०) येशूला हे समजलं होतं, की आपल्या विश्वासाची पूर्णपणे परीक्षा होण्यासाठी आपल्या पित्याने आपल्याला शत्रूंच्या हाती सोपवलं आहे. त्याच्या विश्वासाची जितकी परीक्षा झाली, तितकी आजपर्यंत कोणत्याही मानवाची झाली नाही. शिवाय, येशूच्या शब्दांवरून हे सिद्ध झालं, की तो निरपराध होता. मृत्यूची शिक्षा मिळावी असा कोणताही गुन्हा त्याने केला नव्हता.
९-१५ ऑक्टोबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब ४-५
“खोट्या माहितीपासून सावध राहा”
इन्साइट-१ ७१३ ¶११
अलीफज
२. ईयोबच्या तीन मित्रांपैकी हा एक होता. (ईयोब २:११) तो अब्राहामचा वंशज आणि ईयोबच्या लांबच्या नातेवाइकांपैकी एक होता. त्याला आणि त्याच्या वंशजांना त्यांच्या बुद्धीमत्तेबद्दल खूप गर्व होता. (यिर्म ४९:७) “सांत्वन करण्यासाठी” आलेल्या या तिघांमध्ये अलीफज जास्त महत्त्वाचा आणि जास्त प्रभावी होता. तो कदाचित वयानेही सगळ्यात मोठा असावा. ईयोबशी घातलेल्या वादविवादाच्या तीन फेऱ्यांमध्ये अलीफजच नेहमी पहिल्यांदा आणि इतरांच्या तुलनेत भरपूर वेळ बोलला.
टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २६ ¶२
गलत सोच का विरोध कीजिए!
एलीपज अपने साथ हुई एक अलौकिक घटना को याद करते हुए कहता है: “एक आत्मा मेरे साम्हने से होकर चली; और मेरी देह के रोएं खड़े हो गए। वह चुपचाप ठहर गई और मैं उसकी आकृति को पहिचान न सका। परन्तु मेरी आंखों के साम्हने कोई रूप था; पहिले सन्नाटा छाया रहा, फिर मुझे एक शब्द सुन पड़ा।” (अय्यूब ४:१५, १६) यह आत्मा क्या थी जिसने एलीपज की सोच पर असर किया था? एलीपज ने आगे जो कड़वे शब्द कहे, उनसे पता चलता है कि यह आत्मा परमेश्वर का कोई धर्मी स्वर्गदूत हो ही नहीं सकता। (अय्यूब ४:१७, १८) दरअसल वह एक दुष्ट आत्मिक प्राणी था। और उसी आत्मिक प्राणी के बहकावे में आकर एलीपज और उसके दोनों साथियों ने यहोवा के बारे में गलत बातें कही थी। यही वजह है कि यहोवा ने उन्हें झिड़का। (अय्यूब ४२:७) जी हाँ, एलीपज पर दुष्टात्मा का असर था। उसकी बातों से पता चलता है कि उसकी सोच परमेश्वर की सोच के खिलाफ थी।
सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीचा प्रतिकार करा
सैतानाने ईयोबाच्या तीन मित्रांपैकी एक असलेल्या अलीफजाचा उपयोग करून असा दावा केला, की मनुष्य इतका कमजोर आहे की तो देवाला कायम विश्वासू राहूच शकत नाही. मानवांविषयी बोलताना अलीफजाने ईयोबाला म्हटले, की ते “मृत्तिकागृहात” म्हणजेच मातीच्या घरांत राहतात आणि “[त्यांचा] पाया मातीत घातला आहे. . . . ते पतंगासारखे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही.”—ईयो. ४:१९, २०.
बायबलच्या इतर शास्त्रवचनांत आपली तुलना अत्यंत नाजूक अशा ‘मातीच्या भांड्यांशी’ करण्यात आली आहे. (२ करिंथ. ४:७) आपण कमजोर आहोत ते वारशाने आपल्याला मिळालेल्या पापामुळे व अपरिपूर्णतेमुळे. (रोम. ५:१२) तेव्हा, आपण स्वतःच्या बळावर सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केल्यास आपला टिकाव लागणार नाही. पण, ख्रिस्ती या नात्याने आपण एकटे नाहीत. तर खुद्द यहोवा आपल्या पाठीशी आहे. आपल्यात अनेक दोष असले तरी देवाच्या नजरेत आपण अनमोल आहोत. (यश. ४३:४) शिवाय, जे यहोवाकडे विनंती करतात त्यांना तो आपला पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) देवाच्या आत्म्यामुळे आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ लाभते, ज्याच्या बळावर सैतानाकडून येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करण्यास आपण समर्थ होऊ शकतो. (२ करिंथ. ४:७; फिलिप्पै. ४:१३) आपण दियाबलाविरुद्ध “विश्वासात दृढ” उभे राहिल्यास देव आपल्याला स्थिर व बळकट करेल. (१ पेत्र ५:८-१०) तेव्हा, सैतानाला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
आणखी विषय ३२ ¶१३-१७
खोट्या माहितीपासून सावध राहा
● माहिती कुठून मिळाली आणि त्यात काय म्हटलंय ते तपासून पाहा
बायबल काय म्हणतं: “सगळ्या गोष्टींची खातरी करा.”—१ थेस्सलनीकाकर ५:२१.
एखादी गोष्ट बातम्यांमध्ये खूप चर्चेत असली, तरी तिच्यावर विश्वास ठेवण्याआधी किंवा इतरांना पाठवण्याआधी ती खरी आहे की नाही याची खातरी करा. हे कसं करता येईल?
माहितीचा मूळ स्रोत किती भरवशालायक आहे, ते तपासून पाहा. बातम्यांचं प्रसारण करणाऱ्या कंपन्या आणि इतर संघटना कदाचित त्यांच्या स्वतःच्या आर्थिक किंवा राजकीय मतांमुळे एखाद्या माहितीला वेगळं वळण देतील. म्हणून एका बातमीपत्रात काय म्हटलंय याची तुलना इतर बातमीपत्रांमध्ये काय म्हटलंय याच्याशी करून पाहा. असं होऊ शकतं, की आपल्या ओळखीचे लोक नकळत चुकीची माहिती ई-मेल किंवा सोशल मिडियासारख्या माध्यमांवर पाठवू शकतात. त्यामुळे एखाद्या बातमीच्या मूळ स्रोताची खातरी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.
तुम्हाला मिळालेली माहिती ताजी आणि अचूक आहे याची खातरी करा. माहितीत जे सांगितलंय त्याला तारखा, पडताळता येतील अशा गोष्टी आणि इतर भक्कम पुरावे पाठिंबा देतात का, ते तपासून पाहा. एखादी किचकट माहिती खूपच सोपी करून सांगितली जात असेल किंवा लोकांच्या भावना चेतवल्या जातील अशा प्रकारे सादर केली जात असेल तर खासकरून सावध असा.
आध्यात्मिक रत्नं
स्थिर राहा, आणि जीवनाच्या शर्यतीत जिंका
खऱ्या उपासकांच्या जगव्याप्त संघटनेचा भाग असल्यामुळेही आपण अधिक स्थिर होऊ शकतो. एका प्रेमळ, जागतिक बंधुसमाजासोबत सहवासाची संधी मिळणे हा किती मोठा आशीर्वाद आहे! (१ पेत्र २:१७) आणि आपण देखील आपल्या सहविश्वासू बांधवांना स्थिर होण्यास मदत करू शकतो.
सात्विक पुरुष ईयोब याच्या परोपकारांवर जरा लक्ष द्या. खोटा सांत्वनदाता एलिफज याला देखील पुढीलप्रमाणे कबूल करावे लागले: “तुझ्या शब्दांनी ठेंचाळत असलेल्यांस धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत.” (ईयोब ४:४) याबाबतीत आपण कसे आहोत? आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींना देवाच्या सेवेत टिकून राहण्याकरता मदत करण्याची आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यांच्याशी व्यवहार करत असताना आपण पुढील शब्दांप्रमाणे कृती करू शकतो: “गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.” (यशया ३५:३) ख्रिस्ती बांधवांशी जेव्हाही भेट होते तेव्हा निदान एक किंवा दोन सहविश्वासू बांधवांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्याचे ध्येय तुम्हाला ठेवता येईल का? (इब्री लोकांस १०:२४, २५) प्रशंसेचे प्रोत्साहनदायक शब्द आणि यहोवाला संतुष्ट करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्यांना स्थिर राहून जीवनाच्या शर्यतीत जिंकण्यासाठी अवश्य मदत मिळेल.
१६-२२ ऑक्टोबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब ६-७
“जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जातात”
ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
७:१; १४:१४—“कष्ट” किंवा ‘कष्टमय सेवा’ यांचा काय अर्थ होतो? ईयोबावर कोसळलेले संकट इतके मोठे होते, की जीवन खडतर, वेठबिगारी सारखे आहे असे त्याला वाटत होते. (ईयोब १०:१७, NW तळटीप) मनुष्य शिओलात जातो त्या—मृत्यूपासून पुनरुत्थान होईपर्यंतच्या—कालावधीची तुलना ईयोबाने वेठबिगारीशी केली आहे.
यहोवा निराश असलेल्यांना वाचवतो
बायबल म्हणतं, की “माणसाचं आयुष्य, फक्त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं असतं.” (ईयो. १४:१) हे किती खरं आहे! या छोट्या आणि समस्यांनी भरलेल्या आयुष्याचा विचार करून, आपण सगळेच कधी ना कधी निराश होतो. बायबलच्या काळात यहोवाच्या अनेक सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं. काहींना तर आपलं जीवनही नकोसं झालं होतं. (१ राजे १९:२-४; ईयो. ३:१-३, ११; ७:१५, १६) पण यहोवाने नेहमी त्यांना धीर आणि बळ दिलं. त्यांच्या उदाहरणांतून आज आपल्याला धीर मिळावा आणि काहीतरी शिकायला मिळावं, म्हणून हे अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहेत.—रोम. १५:४.
सावध राहा!-HI ४/१२ १४-१६
जब न हो जीने की आस
चाहे आपके हालात कितने ही बुरे क्यों न हो, एक बात हमेशा याद रखिए कि आप अकेले नहीं हैं। आज लगभग सभी लोग किसी-न-किसी मुश्किल से गुज़र रहे हैं। बाइबल कहती है: “सारी सृष्टि . . . एक-साथ कराहती और दर्द से तड़पती रहती है।” (रोमियों ८:२२) हो सकता है, आपको लगे कि आपकी मुश्किलें पहाड़ जैसी हैं, उनका कोई हल नहीं। मगर अकसर देखा गया है कि वक्त के गुज़रते हालात सुधर जाते हैं। लेकिन तब तक, क्या बात आपकी मदद कर सकती है?
किसी समझदार, भरोसेमंद दोस्त को अपनी भावनाएँ बताइए। बाइबल बताती है: “[सच्चा] मित्र सब समयों में प्रेम रखता है, और विपत्ति के दिन भाई बन जाता है।” (नीतिवचन १७:१७) बाइबल में अय्यूब नाम के एक नेक आदमी के बारे में बताया गया है। उस पर जब बुरा वक्त आया, तो उसने दूसरों को बताया कि वह कैसा महसूस कर रहा है। वह “अपने जीवन से ऊब गया” था और उसने कहा: “मैं जी भर कर अपना दुखड़ा रोऊंगा; मैं अपने मन की कड़ुवाहट में बोलूंगा।” (अय्यूब १०:१, अ न्यू हिंदी ट्रांस्लेशन) किसी भरोसेमंद दोस्त को अपनी भावनाएँ बताने से आप कुछ हद तक इन पर काबू पा सकेंगे। और इससे शायद आप अपनी मुश्किलों को एक अलग नज़रिए से देखने लगें।
प्रार्थना में परमेश्वर को अपने दिल का सारा हाल कह सुनाइए। कुछ लोगों का मानना है कि प्रार्थना करने से सिर्फ मन का बोझ हलका होता है और कुछ नहीं। मगर बाइबल ऐसा नहीं कहती। इसके उलट, भजन ६५:२ में लिखा है कि यहोवा परमेश्वर ‘प्रार्थना का सुननेवाला’ है। और १ पतरस ५:७ कहता है कि “उसे तुम्हारी परवाह है।” बाइबल की कई आयतें बताती हैं कि मुश्किलों के दौरान परमेश्वर पर भरोसा रखना क्यों ज़रूरी है। मिसाल के लिए:
“तू अपनी समझ का सहारा न लेना, वरन सम्पूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना। उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिये सीधा मार्ग निकालेगा।”—नीतिवचन ३:५, ६.
“जो [यहोवा] से डरते हैं वह उनकी इच्छा पूरी करेगा; वह उनकी दुहाई भी सुनेगा और उन्हें बचा लेगा।”—भजन १४५:१९, अ न्यू हिंदी ट्रांस्लेशन।
“हमें परमेश्वर के बारे में यह भरोसा है कि हम उसकी मरज़ी के मुताबिक चाहे जो भी माँगें वह हमारी सुनता है।”—१ यूहन्ना ५:१४.
“यहोवा दुष्टों से दूर रहता है, परन्तु धर्मियों की प्रार्थना सुनता है।”—नीतिवचन १५:२९.
अगर आप परमेश्वर को अपनी मुश्किलों के बारे में बताएँ, तो वह ज़रूर आपकी मदद करेगा। इसीलिए बाइबल आपको बढ़ावा देती है कि “हर समय उस पर भरोसा रखो; उस से अपने अपने मन की बातें खोलकर कहो।”—भजन ६२:८.
आध्यात्मिक रत्नं
ऐकून घ्या, जाणून घ्या आणि दयाळूपणे वागा
१० यहोवाचं अनुकरण करून आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भाऊबहिणींना समजून घ्यायचा प्रयत्न करा. सभांच्या आधी आणि नंतर त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत प्रचारकार्य करा आणि शक्य असेल तर त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला कदाचित कळेल की जी बहीण मिळून-मिसळून वागत नाही असं तुम्हाला वाटायचं, ती खरंतर खूप लाजाळू आहे; एखादा श्रीमंत भाऊ खरंतर पैशाच्या मागे धावत नाही, उलट तो खूप उदार आहे; किंवा सभांना नेहमी उशिरा येणाऱ्या कुटुंबाला खरंतर विरोधाचा सामना करावा लागत आहे. (ईयो. ६:२९) हे खरं आहे की आपण दुसऱ्यांच्या जीवनात “लुडबुड” करू नये. (१ तीम. ५:१३) पण, आपल्या भाऊबहिणींच्या परिस्थितीबद्दल आणि त्यांना जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेणं शक्य होईल.
२३-२९ ऑक्टोबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब ८-१०
“देवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला सैतानाच्या खोट्या गोष्टींपासून वाचवतं”
आपण देवाला खुष करू शकतो का?
ईयोब याच्यावर एकापाठोपाठ एक संकटं आली. त्याची काहीही चूक नसताना त्याला ही सर्व संकटं सहन करावी लागली. त्याच्यावर जणू अन्याय झाला असं त्याला वाटलं. त्याचा असा गैरसमज झाला, की आपण देवावर विश्वास ठेवला काय आणि नाही काय, देवाला काही फरक पडत नाही. (ईयोब ९:२०-२२) तो स्वतःला धार्मिक समजू लागला. त्याच्या बोलण्यावरून इतरांना असं वाटलं की तो स्वतःला देवापेक्षाही जास्त धार्मिक समजतोय.—ईयोब ३२:१, २; ३५:१, २.
यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
१४ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आध्यात्मिक रितीने आपलं संरक्षण होतं. यहोवाला प्रार्थना करताना दावीदने असं म्हटलं: “तू माझा आश्रय आहेस; तू मला संकटापासून सुरक्षित ठेवशील. सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील. . . . यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांवर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.” (स्तो. ३२:७, १०) प्राचीन काळात शहराभोवती असलेल्या भिंतींमुळे शहरातल्या लोकांचं संरक्षण व्हायचं. यहोवाचं एकनिष्ठ प्रेमसुद्धा सुरक्षा देणाऱ्या त्या भिंतीसारखंच आहे. त्याच्यासोबतचं आपलं नातं कमजोर करणाऱ्या कोणत्याही धोक्यापासून ते आपलं संरक्षण करतं. शिवाय, त्याच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच तो आपल्याला जवळ घेतो.—यिर्म. ३१:३.
आध्यात्मिक रत्नं
टेहळणी बुरूज१० १०/१५ ६-७ ¶१९-२०
‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे?’
१९ ‘यहोवाच्या मनाविषयी’ आपण काय शिकलो आहोत? यहोवाचे मन जाणून घेण्यासाठी आपण देवाच्या वचनानुसार आपल्या समजबुद्धीला आकार दिला पाहिजे. आपण केव्हाही आपल्या मर्यादा यहोवावर लादू नयेत आणि आपल्या स्तरांच्या व विचारसरणीच्या आधारावर यहोवाविषयी मत बनवू नये. ईयोबाने म्हटले: “मी [देवाशी] वाद करावा, आम्ही एकमेकांत लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही.” (ईयो. ९:३२) ईयोबाप्रमाणे आपल्याला यहोवाचे मन समजू लागते तेव्हा आपणही असे म्हणण्यास प्रवृत्त होतो: “पाहा; ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?”—ईयो. २६:१४.
२० बायबलचे वाचन करत असताना त्यातील एखादा उतारा, खासकरून यहोवाच्या विचारसरणीसंबंधी असलेला उतारा समजण्यास आपल्याला कठीण वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे? त्या विषयावर संशोधन केल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही, तर ही जणू यहोवावरील आपल्या भरवशाची कसोटीच आहे असे आपण समजू शकतो. नेहमी लक्षात असू द्या, काही वेळा बायबलमधील काही विधाने यहोवाच्या गुणांवर आपला किती विश्वास आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला देतात. यहोवा जे काही करतो त्याबद्दल आपण सर्व काही समजू शकत नाही हे आपण नम्रपणे मान्य करू या. (उप. ११:५) असे केल्यास, प्रेषित पौलाच्या या शब्दांशी आपण नक्कीच सहमत होऊ: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! ‘प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?’ कारण सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.”—रोम. ११:३३-३६.
३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब ११-१२
“बुद्धी मिळवून त्यापासून फायदा मिळवण्याचे तीन मार्ग”
ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
१७ शेवटपर्यंत विश्वासू राहणे ईयोबाला कशामुळे शक्य झाले? निश्चितच, त्याच्यावर संकटे येण्याअगोदरच त्याने यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडला होता. सैतानाने उठवलेल्या वादाबद्दल ईयोबाला माहीत होते असे म्हणण्याकरता आपल्याजवळ कोणताही पुरावा नाही. पण तरीसुद्धा, ईयोबाने यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा दृढनिश्चय केला होता. त्याने म्हटले: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.” (ईयो. २७:५) देवासोबत असा घनिष्ट नातेसंबंध जोडण्याकरता ईयोबाने काय केले? नक्कीच त्याने अब्राहाम, इसहाक व याकोब या आपल्या दूरच्या नातेवाइकांकडून देवाच्या व्यवहारांबद्दल जे ऐकले होते त्यावर मनन केले असावे. तसेच, यहोवाच्या निर्मितीकृत्यांचे निरीक्षण करण्याद्वारेही ईयोबाला त्याच्या अद्भुत गुणांविषयी समजले असावे.—ईयोब १२:७-९, १३, १६ वाचा.
टेहळणी बुरूज२१.०६ १०-११ ¶१०-१२
तुम्ही एकटे नाही, यहोवा नेहमी तुमच्यासोबत आहे
१० भाऊबहिणींशी मैत्री करा. मंडळीत ज्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल त्यांच्याशी मैत्री करा. मग ते कोणत्याही संस्कृतीचे किंवा वयाचे असले तरीही. कारण बायबल म्हणतं, “म्हाताऱ्या माणसांजवळ बुद्धी” असते. (ईयो. १२:१२) तसंच, वयस्कर लोकसुद्धा तरुण भाऊबहिणींकडून खूप काही शिकू शकतात. दावीद आणि योनाथानचाच विचार करा. दावीद योनाथानपेक्षा खूप लहान होता. पण तरीसुद्धा ते खूप चांगले मित्र बनले. (१ शमु. १८:१) त्यांच्या जीवनात अनेक समस्या आल्या, तरी त्यांनी एकमेकांना यहोवाची सेवा करायला मदत केली. (१ शमु. २३:१६-१८) आयरिन नावाची बहीण सध्या एकटीच सत्यात आहे. ती म्हणते, “आपल्या आईवडीलांची आणि भावंडांची कमी भरून काढण्यासाठी यहोवा मंडळीतल्या भाऊबहिणींचा उपयोग करू शकतो.”
११ नवीन मित्र बनवणं सोपं नसतं, खासकरून तुम्ही लाजाळू स्वभावाचे असाल तर. रत्ना नावाच्या एका बहिणीचा स्वभावसुद्धा असाच होता. पण कुटुंबातून बराच विरोध होत असूनही ती सत्य शिकली. ती म्हणते, “मला मंडळीतल्या भाऊबहिणींच्या मदतीची आणि आधाराची खूप गरज आहे हे मला जाणवलं.” कुणाकडे मन मोकळं करणं सोपं नसतं. पण जवळची मैत्री करण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. तुमचे मित्र तुम्हाला धीर द्यायला आणि मदत करायला नेहमी तयार आहेत. पण त्यासाठी तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगितली पाहिजे. तरच ते तुम्हाला मदत करू शकतील.
१२ आपण भाऊबहिणींसोबत प्रचारकार्य करतो तेव्हा त्यांच्यासोबत मैत्री करण्याची सगळ्यात चांगली संधी आपल्याला मिळते. कविता नावाच्या ज्या बहिणीबद्दल आपण आधी पाहिलं होतं ती म्हणते, “मंडळीतल्या बहिणींसोबत प्रचार केल्यामुळे आणि यहोवाच्या सेवेतली इतर कामं एकत्र मिळून केल्यामुळे त्यांच्यासोबत माझी खूप चांगली मैत्री झाली आहे. अशा मित्रांद्वारेच यहोवाने नेहमी माझी मदत केली आहे.” यावरून दिसून येतं, की भाऊबहिणींशी मैत्री करणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण निराश असतो, आपल्याला एकटेपणा वाटतो तेव्हा याच मित्रांचा उपयोग करून यहोवा आपल्याला मदत करतो.—नीति. १७:१७.
इन्साइट-२ ११९० ¶२
बुद्धी
यहोवाची बुद्धी. फक्त यहोवा देवच पूर्णार्थाने बुद्धिमान आहे. म्हणजे फक्त तोच एकमेव असा आहे ज्याच्या बुद्धीला कोणतीही मर्यादा नाही. बायबलमधून कळतं की, त्याची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. त्यात म्हटलंय, की तोच “एकमेव बुद्धिमान” आहे. (रोम १६:२७; प्रक ७:१२) ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती. आणि आपला निर्माणकर्ता “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” (स्तो ९०:१, २) अस्तित्वात असल्यामुळे त्याला या विश्वाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल सगळं काही माहीत आहे. त्याने सृष्टीतले सगळे नियम घालून दिले आहेत आणि त्यातली चक्रं निश्चित केली आहेत. यांच्याच आधारावर मानव संशोधन करतात आणि नवनवीन गोष्टींचा शोध लावतात. याहून महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्याला नैतिक स्तर दिले आहेत. त्यामुळे आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. (अनु ३२:४-६) कोणतीही गोष्ट त्याच्या समजशक्तीच्या पलीकडे नाही. (यश ४०:१३, १४) तो कदाचित आपल्या नीतिमान स्तरांविरुद्ध काही गोष्टी घडू देईल आणि त्यांना काही काळासाठी राहू देईल. पण भविष्यात या गोष्टींचा शेवट काय असेल हे फक्त तोच ठरवू शकतो. त्याचे शब्द ‘पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.’—यश ५५:८-११; ४६:९-११.
आध्यात्मिक रत्नं
पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद
▪ ‘माझं मूल मला जे सांगायचा प्रयत्न करत आहे त्यामागच्या भावनाही मला समजतात का?’ ईयोब १२:११ मध्ये म्हटलं आहे: “जीभ अन्नाची रुचि घेते, तसा कान शब्दांची पारख करीत नाही काय?” पहिल्यापेक्षा आता तुम्हाला, तुमच्या मुलाच्या अथवा मुलीच्या “शब्दांची पारख” करण्याची अधिक गरज आहे. टीनएज मुलं सहसा कोणत्याही गोष्टींविषयी बोलत असताना, त्या जणू काय खऱ्या आहेत अशा पद्धतीनं बोलतात. जसे की, ते तुम्हाला म्हणतील, “तुम्ही मला नेहमीच कुकुलं बाळ समजता!” किंवा “तुम्ही माझं बोलणं कधीच ऐकून घेत नाही.” अशावेळी, त्यानं/तिनं वापरलेल्या “नेहमीच” व “कधीच” या शब्दांवर वाद घालत बसण्याऐवजी, त्यानं/तिनं असं मुद्दामहून म्हटलं नाही हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, “तुम्ही मला नेहमीच कुकुलं बाळ समजता!” या बोलण्याचा अर्थ “तुमचा माझ्यावर विश्वास नाही,” असा असेल; आणि, “तुम्ही माझं बोलणं कधीच ऐकून घेत नाही,” या बोलण्याचा अर्थ “मला नेमकं कसं वाटतंय ते मला तुम्हाला सांगायचंय,” असा असू शकेल. तुमच्या मुलाच्या शब्दांमागच्या भावना समजायचा प्रयत्न करा.