वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr23 जुलै पृ. १-१२
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२३
  • उपशिर्षक
  • ३-९ जुलै
  • १०-१६ जुलै
  • १७-२३ जुलै
  • २४-३० जुलै
  • ३१ जुलै–६ ऑगस्ट
  • ७-१३ ऑगस्ट
  • १४-२० ऑगस्ट
  • २१-२७ ऑगस्ट
  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ—२०२३
mwbr23 जुलै पृ. १-१२

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

३-९ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एज्रा ४-६

“मंदिराच्या कामात लुडबुड करू नका”

टेहळणी बुरूज२२.०३ १७ ¶१३

जखऱ्‍याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?

१३ मंदिराच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा, आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने ज्यांना नियुक्‍त केलं होतं, म्हणजे महायाजक येशूवा (यहोशवा) आणि राज्यपाल जरूब्बाबेल यांनी देवाचं मंदिर पुन्हा बांधायला सुरुवात केली. (एज्रा ५:१, २) काही यहुद्यांना हा निर्णय चुकीचा वाटला असेल. कारण मंदिराचं बांधकाम शत्रूंपासून लपवता येणार नव्हतं. यहुद्यांना माहीत होतं की त्यांचे शत्रू काहीही करून मंदिराचं बांधकाम बंद पाडायचा प्रयत्न करतील. म्हणून यहोशवा आणि जरूब्बाबेल यांना, आपल्या कामाला यहोवाचा पाठिंबा आहे या गोष्टीची खातरी हवी होती. मग त्यांना ती खातरी कशी मिळाली?

टेहळणी बुरूज८६-E २/१ २९, चौकट ¶२-३

“वडीलजनांवर देवाचं लक्ष होतं”

इस्राएलच्या वडीलजनांनी विरोधकांना कशा प्रकारे उत्तर दिलं? ते जर विरोध करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांना घाबरले असते, तर मंदिर पुन्हा बांधायचं काम ठप्प पडलं असतं. आणि ते जर त्या अधिकाऱ्‍यांच्या मनाविरुद्ध वागले असते, तर त्यांनी बांधकामावर बंदी घातली असती. परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे वडीलजनांनी अधिकाऱ्‍यांना योग्य प्रकारे उत्तर देणं खूप गरजेचं होतं. त्यांनी कदाचित राज्यपाल जरूब्बाबेल आणि महायाजक यहोशवा यांचा सल्ला घेतला असावा, आणि मग पुरेसा विचार करून अधिकाऱ्‍यांना अगदी आदराने योग्य असं उत्तर दिलं. त्यांनी त्या अधिकाऱ्‍यांना, मंदिर पुन्हा बांधण्याचं जे फर्मान कोरेश राजाने बऱ्‍याच काळाआधी काढलं होतं त्याची आठवण करून दिली. या अधिकाऱ्‍यांना हे चांगलं माहीत होतं, की पर्शियाच्या साम्राज्यात एकदा का एखादा कायदा बनवण्यात आला, तर तो कधीच रद्द केला जाऊ शकत नाही. त्यामुळे राजाने काढलेल्या फर्मानाच्या विरोधात जाऊन काम करायची त्यांनी हिंमत केली नसती. आणि म्हणून नंतर दारयावेश राजाकडून कायदेशीर मंजुरी मिळेपर्यंत हे काम पुढे चालूच राहिलं!—एज्रा ५:११-१७; ६:६-१२.

टेहळणी बुरूज२२.०३ १५ ¶७

जखऱ्‍याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?

७ मग एक अशी घटना घडली ज्यामुळे मंदिराचं बांधकाम करणाऱ्‍या यहुद्यांना दिलासा मिळाला. ती घटना काय होती? इ.स.पू. ५२० मध्ये पर्शियावर दारयावेश नावाचा नवीन राजा राज्य करत होता. त्याच्या राज्याच्या दुसऱ्‍या वर्षी त्याला असं कळलं की मंदिराच्या बांधकामावर लावलेली बंदी बेकायदेशीर होती. तेव्हा त्याने एक असं फरमान काढलं ज्याचं सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटलं. त्याने मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचा आदेश दिला. (एज्रा ६:१-३) पण तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने आजूबाजूच्या राष्ट्रांना असा हुकूम दिला की त्यांनी मंदिराच्या बांधकामात कोणताही व्यत्यय आणू नये. उलट, बांधकामासाठी लागणारा खर्च आणि इतर वस्तू त्यांना पुरवाव्यात असा राज्याने हुकूम दिला. (एज्रा ६:७-१२) अशा प्रकारे, इ.स.पू. ५१५ मध्ये म्हणजे जवळपास पाच वर्षांत यहुद्यांनी मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं.—एज्रा ६:१५.

टेहळणी बुरूज२२.०३ १८ ¶१६

जखऱ्‍याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?

१६ आज यहोवा आपल्याला ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ मार्गदर्शन पुरवत आहे. (मत्त. २४:४५) काही वेळा बुद्धिमान दासाने दिलेला सल्ला आपल्याला पूर्णपणे समजत नाही. जसं की, हे बांधव कदाचित आपल्याला एखाद्या नैसर्गिक विपत्तीचा सामना कसा करावा याबद्दल काही खास सूचना देतील. पण आपल्याला कदाचित असं वाटेल, की अशा प्रकारची विपत्ती आपल्या भागात येण्याची शक्यता कमी आहे. किंवा महामारीच्या काळात विश्‍वासू आणि बुद्धिमान दास गरजेपेक्षा जास्त खबरदारी घेत आहेत असं कदाचित आपल्याला वाटेल. आपल्याला दिलं जाणारं मार्गदर्शन व्यावहारिक नाही असं आपल्याला वाटलं, तर आपण काय केलं पाहिजे? यहोशवा आणि जरूब्बाबेल यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा त्या काळातल्या यहुद्यांना कसा फायदा झाला याचा आपण विचार करू शकतो. तसंच आपण बायबलमधल्या इतर अहवालांचाही विचार करू शकतो. काही वेळा देवाच्या लोकांना असं मार्गदर्शन देण्यात आलं, जे मानवांच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक नव्हतं. पण त्याचं पालन केल्यामुळे त्यांचे जीव वाचले.—शास्ते ७:७; ८:१०.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज९३-E ६/१५ ३२ ¶३-५

तुम्ही बायबलवर भरवसा ठेवू शकता का?

इ.स.पू. चौथ्या शतकात, म्हणजे पर्शियाचा राज्यपाल मेझाएस याच्या शासनकाळात तयार केलेलं एक नाणं पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडलं. त्यावर मेझाएस हा “नदीपलीकडच्या प्रदेशाचा,” म्हणजेच फरात नदीपलीकडच्या प्रदेशाचा राज्यपाल असल्याचं कोरलेलं आहे.

पण ही माहिती इतकी महत्त्वाची का आहे? कारण नाण्यावर जे लिहिलंय तेच बायबलमध्येसुद्धा वाचायला मिळतं. उदाहरणार्थ एज्रा ५:६-६:१३ या वचनांमध्ये, “नदीपलीकडच्या प्रदेशाचा राज्यपाल” ततनइ याच्याबद्दल सांगितलंय. त्यानेच पर्शियाच्या राजाला पत्र लिहिलं होतं. आपल्याला माहीत आहे, की एज्रा हा देवाच्या नियमशास्त्राचा एक कुशल नकलाकार होता. त्यामुळे त्याने जे लिहिलं ते शंभर टक्के बरोबर असल्याची खातरी आपण ठेवू शकतो.

हे नाणं बनवण्यात आलं त्याच्या जवळजवळ १०० वर्षांआधी, म्हणजे इ.स.पू. ४६० च्या आसपास एज्राने हा अहवाल लिहिला होता. काहींना कदाचित वाटेल, की एखाद्या नाण्यावर प्राचीन काळातल्या कोणत्या तरी अधिकाऱ्‍याच्या पदाबद्दलची माहिती असणं ही फार किरकोळ गोष्ट आहे. पण आपल्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे. कारण त्यावरून आपल्याला समजतं, की बायबलचे लेखक जर अगदी बारीकसारीक गोष्टींच्या बाबतीतही इतके अचूक असू शकतात, तर मग त्यांनी लिहिलेल्या इतर गोष्टीही तितक्याच अचूक असल्या पाहिजेत. आणि यामुळे बायबलवरचा आपला भरवसा आणखी वाढतो.

१०-१६ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एज्रा ७-८

“एज्रा ज्या प्रकारे वागला त्यामुळे यहोवाचा गौरव झाला”

टेहळणी बुरूज०० १०/१ १४ ¶८

अभ्यास—फलदायक व आनंददायक

८ निश्‍चितच यहोवा देवाच्या वचनाबद्दल आपल्याला मनापासून प्रेम वाटले पाहिजे. देवाच्या वचनातून आपण जे वाचले त्यावर विचार करत राहण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. गहन आध्यात्मिक विचारांबद्दल आपण मनन केले पाहिजे, त्यांत पूर्णपणे गढून चिंतन केले पाहिजे. याकरता शांतचित्ताने विचार करणे व प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. एज्राप्रमाणे आपणही देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास करण्याचा मनापासून निश्‍चय केला पाहिजे. एज्राविषयी बायबलमध्ये असे सांगितले आहे: “परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्‍चयच केला होता.” (एज्रा ७:१०) एज्राने कोणत्या तीन गोष्टी करण्याचा निश्‍चय केला होता ते लक्षात घ्या. अध्ययन करण्याचा, त्याप्रमाणे चालण्याचा आणि इतरांना शिकवण्याचा. आपणही एज्राच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे.

ऑल स्क्रिप्चर्स ७५ ¶५

बायबलचं १३ वं पुस्तक—१ इतिहास

५ यहोवाची पवित्र शक्‍ती एज्रावर होती. एज्राकडे देवाकडून मिळालेली बुद्धी आहे हे महासत्ता असलेल्या पर्शियाच्या राजाने ओळखलं आणि म्हणून त्याने त्याला यहूदा प्रांतावर मोठा अधिकार दिला. (एज्रा ७:१२-२६) अशा प्रकारे एज्राला देवाकडून आणि महासत्ता असलेल्या पर्शियाकडून अधिकार मिळाला.

टेहळणी बुरूज९२ ६/१ ३० ¶४

नम्रतेचे लेणे का परिधान करावे?

ईश्‍वरीय मार्गदर्शन मिळविण्यास नम्रता आम्हास मदत करते. यहोवाने एका दृष्टांतासह एक दूतास दानीएलाकडे पाठविले, कारण त्या संदेष्ट्याने मार्गदर्शन व समज यांचा शोध घेताना स्वतःला देवापुढे लीन केले. (दानीएल १०:१२) यरुशलेमेतील मंदिर शोभायमान करण्यासाठी भरपूर सोने व चांदी यासह बाबेलमधून इस्राएलांना काढतेवेळी एज्राने एक उपास घोषित केला, ज्यामुळे परमेश्‍वरापुढे ते स्वतःला नम्र करु शकत होते. त्याचा परिणाम काय झाला? त्या धोकादायक प्रवासात शत्रूच्या हल्ल्यापासून यहोवाने त्यांना सुरक्षित ठेवले. (एज्रा ८:१-१४, २१-३२) देवाने दिलेली नेमणूक पार पाडण्यात, स्वतःचे ज्ञान व सामर्थ्य याद्वारे प्रयत्नशील असण्याऐवजी, दानीएल व एज्रा यांच्यासारखी नम्रता प्रदर्शित करावी व यहोवाचे मार्गदर्शन स्विकारावे.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ १/१ १० ¶११

एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे

७:२८–८:२०—बॅबिलोनमधील अनेक यहुदी एज्राबरोबर जेरुसलेमेस जायला कचरत का होते? यहुद्यांचा पहिला गट आपल्या मायदेशी जाऊन ६० पेक्षा अधिक वर्षे उलटली होती तरीसुद्धा जेरुसलेमचे काही काही भागच वसलेले होते. जेरुसलेमेत येऊन राहणे म्हणजे कठीण, घातक परिस्थितीत नवीन जीवन सुरू करणे. बॅबिलोनमध्ये ज्यांची चंगळ होती अशा यहुद्यांसाठी त्या दिवसांतील जेरुसलेममध्ये कसल्याही भौतिक सुखसोयी नव्हत्या. शिवाय, जेरुसलेमकडे जाणारा रस्ता सुरक्षित नव्हता. जेरुसलेमला परत येणाऱ्‍या लोकांना, यहोवावर भक्कम विश्‍वास, खऱ्‍या उपासनेबद्दल खरा आवेश आणि प्रवास करण्याचे धाडस हवे होते. एज्राने देखील स्वतःला यहोवाच्या बाहुबलामुळे मजबूत केले. एज्राच्या प्रोत्साहनामुळेच १,५०० कुटुंबे—कदाचित एकूण ६,००० लोक—त्याच्याबरोबर जेरुसलेमेस जायला तयार झाले. एज्राने आणखी काही पावले उचलल्यावर, ३८ लेवी आणि २२० नेथीनीम त्याच्याबरोबर यायला तयार झाले.

१७-२३ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | एज्रा ९-१०

“आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम”

टेहळणी बुरूज०६ १/१ ११ ¶१

एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे

९:१, २—देशांतील लोकांबरोबर विवाहाद्वारे संधान बांधणे किती धोकादायक होते? पुनर्स्थापित इस्राएल राष्ट्राला, मशिहा येईपर्यंत यहोवाची उपासना चालू ठेवायची होती. परराष्ट्रांतील लोकांबरोबर विवाहाद्वारे संधान बांधल्यास खऱ्‍या उपासनेला धोका होता. काही इस्राएल लोकांनी मूर्तिपूजक लोकांबरोबर विवाह संधान बांधल्यास संपूर्ण राष्ट्र कालांतराने मूर्तिपूजक राष्ट्रांमध्ये सामील झाले असते. शुद्ध उपासना पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीशी झाली असती. मग मशिहा कोणासाठी आला असता? म्हणूनच एज्रा जेव्हा जेरुसलेमेत जे काही चालले आहे ते पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो!

टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶६

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

आपण जर मनापासून आज्ञांचे पालन केले तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. मोशेने लिहिले: ‘परमेश्‍वराच्या ज्या आज्ञा . . . मी आज तुझ्या बऱ्‍यासाठी सांगत आहे त्या तू पाळाव्यात.’ (वचन १३) होय, यहोवाची प्रत्येक आज्ञा अर्थात तो आपल्याकडून जे काही मागतो ते सर्व आपल्या हिताचेच आहे. देवाने आपल्याकडून अशी अपेक्षा करणे योग्यच आहे, “कारण देव प्रीति आहे” असे बायबल म्हणते. (१ योहान ४:८) त्याने आपल्याला अशाच आज्ञा दिल्या आहेत ज्यांचे पालन केल्याने आपले हित होते. (यशया ४८:१७) यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण केल्याने आपण सध्या अनेक समस्यांपासून वाचू शकतो व भविष्यात आपल्याला त्याच्या राज्याधिकाराखाली अनंत काळासाठी आशीर्वाद मिळू शकतात.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ १/१ ११ ¶२

एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे

१०:३, ४४—स्त्रियांबरोबर मुलांना देखील का पाठवून देण्यात आले? मुले जर मागे राहिली असती तर पाठवून दिलेल्या स्त्रिया त्यांच्या आठवणीने निश्‍चितच पुन्हा आल्या असत्या. शिवाय, लहान मुलांना सहसा आपल्या आईची गरज असते.

२४-३० जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या १-२

“मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली”

टेहळणी बुरूज०८ २/१५ ३ ¶५

यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवा

५ कधीकधी आपल्याला देवाच्या मदतीसाठी मनातल्या मनात पटकन्‌ प्रार्थना करावी लागते. पर्शियाचा राजा अर्तहशश्‍त याने एकदा आपला प्यालेबरदार नहेम्या याचा चेहरा पडलेला पाहिला. राजाने त्याला विचारले: “तुझी विनंति काय आहे?” नहेम्याने लगेच ‘स्वर्गाच्या देवाला प्रार्थना’ केली. त्याला मनातल्या मनात अगदी मोजक्या शब्दांत प्रार्थना करावी लागली. तरीपण, देवाने त्याची प्रार्थना ऐकली म्हणता येईल कारण नहेम्याला जेरूसलेमच्या भिंती बांधण्याकरता राजाने मदत दिली. (नेहम्या २:१-८ वाचा.) होय, मनातल्या मनात केलेली प्रार्थनासुद्धा प्रभावी ठरू शकते.

सेवा स्कूल १७८ ¶१

नोट्‌स बार-बार देखे बिना बात करना

अगर अचानक ऐसे हालात पैदा हों, जब आपसे अपने विश्‍वासों के बारे में समझाने के लिए कहा जाएगा, तब असरदार तरीके से बात करने में क्या बात आपकी मदद कर सकती है? ऐसे में वही कीजिए जो नहेमायाह ने किया था। जब राजा अर्तक्षत्र ने उससे एक सवाल पूछा, तो उसने जवाब देने से पहले मन-ही-मन प्रार्थना की। (नहे. २:४) प्रार्थना के बाद, मन में फौरन एक आउटलाइन तैयार कीजिए। आउटलाइन में आप खासकर इन बुनियादी बातों पर ध्यान दे सकते हैं: (१) ऐसे एक या दो मुद्दे चुनिए जो बात समझाने के लिए ज़रूरी हैं। (आप चाहें तो “चर्चा के लिए बाइबल विषय” में दिए मुद्दे चुन सकते हैं।) (२) यह तय कीजिए कि आप उन मुद्दों का सबूत देने के लिए कौन-सी आयतें इस्तेमाल करेंगे। (३) सोचिए कि आप किस तरह कुशलता से अपनी बात कहना शुरू करेंगे ताकि सवाल पूछनेवाला सुनने को तैयार हो। इसके बाद, अपनी बात शुरू कीजिए।

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज८६-E २/१५ २५

खऱ्‍या उपासनेचा विजय होतो

नाही, यरुशलेम शहराच्या वाईट स्थितीबद्दल नहेम्या खरंतर फार आधीपासून “रात्रंदिवस” प्रार्थना करत होता. (नहे. १:४, ६) मग, जेव्हा त्याला यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधायची आपली इच्छा अर्तहशश्‍त राजासमोर व्यक्‍त करायची संधी अचानक मिळाली, तेव्हा त्याने पुन्हा आधीसारखीच प्रार्थना केली. त्या वेळी यहोवाने राजाचं मन वळवलं आणि राजाने नहेम्याला यरुशलेमला जायची आणि त्या शहराच्या भिंती पुन्हा बांधायची परवानगी दिली.

आपण काय शिकतो:  नहेम्याने मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली. आपल्यालाही जेव्हा मोठे निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा आपणही वारंवार यहोवाला ‘प्रार्थना करत राहिलं’ पाहिजे. आणि यहोवाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलं पाहिजे.—रोमकर १२:१२.

३१ जुलै–६ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या ३-४

“अंगमेहनतीचं काम करायला तुम्हाला कमीपणा वाटतो का?”

टेहळणी बुरूज०६ २/१ १० ¶१

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

३:५, २७. तकोवाच्या “महाजनांना” जशी लाज वाटली तसे खऱ्‍या उपासनेच्या संबंधाने हातांनी कराव्या लागणाऱ्‍या कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटू नये. उलट, आपण त्या साधारण तकोवाकरांचे अनुकरण करू शकतो जे स्वेच्छेने काम करण्यास पुढे आले.

टेहळणी बुरूज१९.१० २३ ¶११

यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो?

११ याच्या बऱ्‍याच शतकांनतर, यरुशलेमची भिंत दुरुस्त करण्यात आली तेव्हा यहोवाने त्या कामात इतर लोकांसोबत शल्लूमच्या मुलींचाही उपयोग केला. (नहे. २:२०; ३:१२) त्यांचे वडील अधिकाराच्या पदावर असले, तरी त्या मुली हे कठीण आणि धोक्याचं काम करायला तयार होत्या. (नहे. ४:१५-१८) त्या मुली तकोवाच्या प्रतिष्ठित पुरुषांसारख्या नव्हत्या जे “आपल्या मानेवर . . . कामाचे जू” घ्यायला तयार नव्हते. (नहे. ३:५) यरुशलेमच्या भिंतीचं बांधकाम फक्‍त ५२ दिवसांत पूर्ण झाल्यामुळे शल्लूमच्या मुली किती आनंदित झाल्या असतील याचा जरा विचार करा! (नहे. ६:१५) आज आपल्या काळातही बऱ्‍याच बहिणींना स्वेच्छेने एका खास प्रकारची पवित्र सेवा करण्यात आनंद मिळतो. ती सेवा म्हणजे, यहोवाच्या कामासाठी समर्पित केलेल्या इमारतींचं बांधकाम आणि दुरुस्तीचं काम. या बहिणींचं कौशल्य, उत्साह आणि विश्‍वासूपणा या गोष्टींमुळेच हे काम यशस्वी होऊ शकतं.

टेहळणी बुरूज०४ ८/१ १८ ¶१६

श्रेष्ठपणाबद्दल ख्रिस्तासारखा दृष्टिकोन विकसित करणे

१६ तरुण आणि वृद्ध अशा सर्व ख्रिश्‍चनांनी, श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंडळीत, विविध कामे असतात. एखादे क्षुल्लक वाटणारे काम करायला लावल्यावर कधीही रागावू नका. (१ शमुवेल २५:४१; २ राजे ३:११) पालकांनो, तुमच्या मुलांना आणि किशोरवयीनांना राज्य सभागृहात, संमेलनात किंवा अधिवेशन ठिकाणी कोणतीही नेमणूक दिल्यास ती आनंदाने पार पाडण्याचे उत्तेजन तुम्ही देता का? तुम्हाला लहानसहान कामे करताना ते पाहतात का? यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सध्या सेवा करणाऱ्‍या एका बांधवाला आपल्या पालकांचे उदाहरण आठवते. ते म्हणतात: “राज्य सभागृहात किंवा अधिवेशन ठिकाणी ते ज्या पद्धतीनं स्वच्छतेचं काम करायचे त्यावरून ते काम त्यांना महत्त्वाचं वाटतं हे मला कळत होतं. मंडळीच्या किंवा बांधवांच्या भल्यासाठी असलेली कामं, मग ती कितीही क्षुल्लक वाटत असली तरी, ती करण्यासाठी सहसा ते पुढं यायचे. या मनोवृत्तीमुळे इथं बेथेलमध्ये कसलीही नेमणूक स्वीकारायला मला मदत मिळाली आहे.”

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ २/१ ९ ¶१

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

४:१७, १८—एक मनुष्य केवळ एकाच हाताने पुनःबांधकाम करणे कसे शक्य आहे? भार वाहणाऱ्‍यांसाठी असे करणे सोपे असावे. भार एकदा त्यांच्या डोक्यावर किंवा खांद्यावर ठेवल्यावर ते तो आपल्या एका हाताने सांभाळून “दुसऱ्‍या हातात शस्त्रे धारण करीत.” ज्या लोकांना दोन्ही हातांनी काम करावे लागत होते ते “आपल्या कमरेस तरवार लावून [काम] करीत.” शत्रूने जर त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांना त्यांच्याविरुद्ध लढावे लागत होते.

७-१३ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या ५-७

“नहेम्याने सेवा करवून घेतली नाही, त्याने स्वतः सेवा केली”

टेहळणी बुरूज०२ ११/१ २७ ¶३

खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे पूर्वी आणि आता

परंतु नहेम्याने केवळ आपला वेळ आणि नियोजन करण्याचे कौशल्यच या कामात वापरले नाही. तर, खऱ्‍या उपासनेसाठी त्याने आपल्या पैशाचा देखील वापर केला. स्वतःच्या खिशातील पैसे खर्चून त्याने आपल्या यहुदी बांधवांना दास्यत्वातून सोडवले. त्याने बिना व्याजाने पैसे उधार दिले. राज्यपाल या नात्याने त्याला यहुदी लोकांकडून पैसे गोळा करण्याचा हक्क होता तरीसुद्धा त्याने तसे करून त्यांच्यावर ‘बोजा लादला’ नाही. उलट, ‘दीडशे यहूदी व शास्ते, आणि त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक त्यांच्याकडे येत तेहि त्यांच्या पंक्‍तीला असत.’ आपल्या पाहुण्यांसाठी तो ‘दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे आणि पांखरे शिजवीत.’ याशिवाय, दहा दिवसांतून एकदा तो “सर्व जातीचा द्राक्षारसहि” त्यांना देत असे—आणि हे सर्वकाही तो स्वखर्चाने करत असे!—नहेम्या ५:८, १०, १४-१८.

टेहळणी बुरूज१६.०९ ६ ¶१६

“तुझे हात गळू देऊ नको”

१६ यहोवाच्या मदतीमुळे नहेम्या आणि यहुदी लोकांच्या हाताला बळकटी मिळाली. त्यांनी यरुशलेमची भिंत फक्‍त ५२ दिवसांत बांधून तयार केली! (नहे. २:१८; ६:१५, १६) पण, जेव्हा इतर जण भिंत बांधण्याचं काम करत होते तेव्हा नहेम्या फक्‍त त्यांच्यावर देखरेख करत बसला नाही, तर त्याने स्वतःही भिंत बांधण्याच्या कामात हातभार लावला. (नहे. ५:१६) आज मंडळीतील बरेच वडील राज्य सभागृहाच्या बांधकामात किंवा त्यांच्या दुरुस्तीच्या आणि साफसफाईच्या कामात सहभाग घेऊन नहेम्याचं अनुकरण करतात. हे प्रेमळ ख्रिस्ती वडील तणावाखाली असलेल्या बंधुभगिनींना भेट देऊन आणि त्यांच्यासोबत सेवाकार्य करण्याद्वारे त्यांना उत्तेजन देतात.—यशया ३५:३, ४ वाचा.

टेहळणी बुरूज०० २/१ ३२ ¶३

यहोवा कोणत्या अर्थाने तुम्हाला स्मरणात ठेवील?

बायबलमध्ये, देव ‘स्मरणात ठेवतो किंवा आठवणीत ठेवतो,’ हा वाक्यांश आपल्याला पुष्कळ वेळा वाचायला मिळतो. त्याचा अर्थ देव सकारात्मक कार्य करतो असा होतो. उदाहरणार्थ, १५० दिवस संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली होती तेव्हा ‘देवाला नोहाची आठवण झाली आणि त्याने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले.’ (उत्पत्ति ८:१) या घटनेच्या अनेक शतकांनंतर, फिलिस्टाईन लोकांनी शमशोनाचे डोळे फोडले आणि त्याला साखळदंडानी बांधून ठेवले तेव्हा त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “परमेश्‍वरा [यहोवा], कृपया माझी आठवण कर. . . . फक्‍त ह्‍या वेळेस.” मग, देवाने कोणत्या अर्थाने त्याची आठवण केली? बायबलचा वृत्तान्त आपल्याला सांगतो, की देवाने त्याला अलौकिक सामर्थ्य देऊन त्याची आठवण केली आणि त्यामुळेच तो देवाच्या शत्रूंना धडा शिकवू शकला. (शास्ते १६:२८-३०) नहेम्याच्या बाबतीतही हेच घडले. यहोवाने त्याचे प्रयत्न आशीर्वादित करून त्याचे स्मरण केले आणि जेरुसलेममध्ये खऱ्‍या उपासनेची पुनःस्थापना झाली.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०७ ७/१ ३० ¶१५

‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’

१५ तिसऱ्‍यांदा, नहेम्याच्या शत्रूंनी नहेम्याला देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने, त्याचा विश्‍वासघात करण्यासाठी शमाया नावाच्या एका इस्राएली मनुष्याचा उपयोग केला. शमाया नहेम्याला म्हणाला: “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्‍यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील.” शमायाने असे भासवले जणू नहेम्याचा जीव धोक्यात आहे आणि मंदिरात लपून बसल्यास तो आपला जीव वाचवू शकतो. पण नहेम्या हा याजक नव्हता. देवाच्या मंदिरात लपणे हे त्याच्याकरता एक पाप ठरले असते. आपला जीव वाचवण्याकरता देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास नहेम्या तयार होता का? नहेम्याने असे उत्तर दिले: “मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.” नहेम्या या सापळ्यातही का अडकला नाही? कारण शमाया हा त्याच्यासारखाच इस्राएली असला तरी, “देवाने त्यांस पाठविले नाही” हे त्याला माहीत होते. त्याला पक्की खात्री होती की एका खऱ्‍या संदेष्ट्याने कधीही त्याला देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा सल्ला दिला नसता. पुन्हा एकदा नहेम्याने त्या दुष्ट विरोधकांना स्वतःवर विजय मिळवू दिला नाही. त्यानंतर काही काळातच तो असे वृत्त देऊ शकला की “अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्‍न दिवसांच्या आत कोट बांधून झाला.”—नहेम्या ६:१०-१५; गणना १:५१; १८:७.

१४-२० ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या ८-९

“यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो”

टेहळणी बुरूज१३ १०/१५ २१ ¶२

एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे

२ या खास सभेच्या एका महिन्याआधी यहुद्यांनी जेरूसलेमच्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. (नहे. ६:१५) त्यांनी हे काम अवघ्या ५२ दिवसांत पूर्ण केले होते. मग, पुढील महिन्याच्या म्हणजेच तिशरी या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते सर्व एका सार्वजनिक चौकात एकत्र आले; आणि तेथे एज्रा व इतर लेव्यांनी लोकांना देवाचे नियमशास्त्र वाचून दाखवले व त्याचा अर्थ समजावून सांगितला. सबंध कुटुंबे, इतकेच काय तर लहान मुलेदेखील पहाटेपासून दुपारपर्यंत तेथे उभी राहून ऐकत होती. त्या इस्राएली लोकांनी आपल्याकरता किती सुंदर उदाहरण मांडले! आज आपण राज्य सभागृहात आरामशीर बसून सभांचा आनंद घेऊ शकतो. तरीसुद्धा, कधीकधी आपले लक्ष भरकटते आणि सभा सुरू असताना आपण इतर गोष्टींचा विचार करू लागतो. पण त्या इस्राएली लोकांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ऐकलेल्या गोष्टींवर विचार केला. आतापर्यंत आपण देवाच्या नियमशास्त्राचे पालन करत नव्हतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते अक्षरशः रडू लागले.—नहे. ८:१-९.

टेहळणी बुरूज०७ ८/१ १७ ¶९-१०

तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहाल का?

९ आनंद ही, हर्ष व समाधानाची स्थिती आहे. यहोवा “आनंदी देव” आहे. (१ तीमथ्य १:११, NW; स्तोत्र १०४:३१) पुत्राला त्याची इच्छा पूर्ण करण्यास आनंद वाटतो. (स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:७-९) आणि यहोवाविषयीचा ‘आनंद आपला आश्रयदुर्ग’ आहे.—नहेम्या ८:१०.

१० कष्ट, दुःख किंवा छळ होत असूनही आपण जेव्हा देवाची इच्छा पूर्ण करतो तेव्हा देवाकडून मिळणाऱ्‍या आनंदामुळे आपल्याला अत्यंत समाधान मिळते. ‘देवाविषयीच्या ज्ञानामुळे’ अवर्णनीय आनंद मिळतो. (नीतिसूत्रे २:१-५) देवाविषयीचे आणि येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे अचूक ज्ञान व त्यांच्यावरील आपला विश्‍वास या गोष्टींच्या आधारावर आपण देवाबरोबर आनंदी नातेसंबंध जोडतो. (१ योहान २:१, २) एकमात्र खऱ्‍या बंधूसमाजाचा भाग बनणे देखील आणखी एक आनंदाचे कारण आहे. (सफन्या ३:९; हाग्गय २:७) आपल्याला मिळालेली राज्य आशा आणि सुवार्ता घोषित करण्याचा महान सुहक्क यांच्यामुळे देखील आपण आनंदी होतो. (मत्तय ६:९, १०; २४:१४) तसेच, सार्वकालिक जीवनाच्या आशेमुळेसुद्धा आपण हर्षित होतो. (योहान १७:३) आपल्यासमोर इतकी अद्‌भुत आशा असताना आपल्याला “अत्यानंद” झाला पाहिजे.—अनुवाद १६:१५.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ १४५ ¶२

अरामी

नहेम्या ८:८ मध्ये म्हटलंय: “ते पुस्तकातून, म्हणजेच खऱ्‍या देवाच्या नियमशास्त्रातून वाचत राहिले. त्यांनी ते लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि वाचलेल्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला. अशा रितीने, जे वाचलं जात होतं, ते समजून घेण्यासाठी त्यांनी लोकांना मदत केली.” बाबेलमध्ये असताना इब्री भाषा बोलणाऱ्‍या इस्राएली लोकांनी कदाचित दररोजच्या जीवनात अरामी भाषा वापरायला सुरू केली असेल. त्यामुळे इथे “समजावून सांगितला” किंवा “अर्थ स्पष्ट केला” असं जे म्हटलंय ते कदाचित इब्री शास्त्रवचनांचा अरामी भाषेत सारांश सांगणं असू शकतं. तसंच, ज्यांना इब्री भाषा समजत होती त्यांना वाचलेल्या भागाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी त्यातल्या बारीकसारीक गोष्टी स्पष्ट करून सागणं, असासुद्धा याचा अर्थ होऊ शकतो.

२१-२७ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या १०-११

“यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले”

टेहळणी बुरूज९८ १०/१५ २२ ¶१३

आपल्या नावासारखेच जेरुसलेम

१३ नहेम्याच्या दिवसांत ‘दृढ करारावर’ मोहर लावण्यात आली तेव्हा देवाचे हे प्राचीन काळातील लोक जरुसलेमच्या तटबंदीचे समर्पण करण्याच्या तयारीत होते. पण अद्यापही एका अत्यावश्‍यक गोष्टीकडे लक्ष देण्याचे बाकी होते. आता जेरुसलेम १२ वेशींच्या तटबंदीमुळे पूर्णपणे सुरक्षित तर होते, पण तेथे म्हणावे तितके लोक अद्यापही नव्हते. काही इस्राएली लोक तेथे वास्तव्यास असले तरी, त्या ‘विस्तीर्ण व मोठ्या नगराच्या’ मानाने ‘त्यात थोडे लोक होते.’ (नहेम्या ७:४) ही समस्या सोडवण्यासाठी ‘दर दहातल्या एकाने पवित्र नगर येरुशलेम येथे राहावे’ म्हणून या लोकांनी ‘चिठ्या टाकल्या.’ असे करण्यास अनेक लोकांनी मोठ्या आनंदाने आपली सहमती दर्शवली त्यामुळे “जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांस लोकांनी धन्य म्हटले.” (नहेम्या ११:१, २) प्रौढ ख्रिश्‍चनांच्या मदतीची जेथे अधिक आवश्‍यकता आहे तेथे जाण्यास शक्य असलेल्या प्रौढ ख्रिश्‍चनांकरता हे किती उत्तम उदाहरण!

टेहळणी बुरूज८६ २/१५ २६

खऱ्‍या उपासनेचा विजय होतो

वारशाने मिळालेली मालमत्ता आणि आपलं राहतं ठिकाण सोडून यरुशलेमला जाऊन राहणं इस्राएली लोकांसाठी सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना बरेच त्याग आणि बरीच तडजोड करावी लागली असेल. तसंच यरुशलेम शहरात जाऊन राहणं सुरक्षित नव्हतं. त्या ठिकाणी बरेच धोके होते. पण असं असूनही काही इस्राएली लोक स्वच्छेने तिथं जायला तयार झाले, तेव्हा इतरांनी त्यांची नक्कीच प्रशंसा केली असेल आणि यहोवाकडे अशी प्रार्थना असेल की त्याने त्यांचे हे त्याग लक्षात घेऊन त्यांना आशीर्वाद द्यावा.

टेहळणी बुरूज१६.०४ ८ ¶१५

विश्‍वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

१५ यहोवाला आपलं जीवन समर्पित करताना, नेहमी त्याची इच्छा पूर्ण करत राहण्याचं वचन आपण त्याला दिलं होतं. आणि हे वचन पूर्ण करणं नेहमीच सोपं असणार नाही याची जाणीवही आपल्याला होती. तर मग, आपल्याला न आवडणारं असं एखादं काम दिलं जातं, तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? अशा वेळी जर आपण आपल्या भावनांवर मात केली आणि देवाची आज्ञा पाळली, तर आपण दिलेल्या वचनानुसार वागत आहोत हे दिसून येईल. काही त्याग करणं कदाचित आपल्यासाठी कठीण असेल. पण, त्याच्या तुलनेत यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद आपल्यासाठी जास्त मोलाचे असतात. (मला. ३:१०) इफ्ताहाच्या मुलीबद्दल काय? आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाबद्दल तिची काय प्रतिक्रिया होती?

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ २/१ ११ ¶१

नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे

१०:३४—लोकांना लाकडाचे अर्पण देण्याचा नियम का देण्यात आला होता? लाकडाचे अर्पण देण्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात काही सांगण्यात आले नव्हते. अर्पणांसाठी लाकडांची अत्यंत गरज असल्यामुळे लोकांनी लाकडे आणावीत असा नियम निघाला असावा. वेदीवर अर्पणे जाळण्याकरता खूप लाकडांची आवश्‍यकता होती. परंतु, गैर इस्राएली मंदिर सेवक म्हणून काम करणारे पुरेसे नेथीनीमही नव्हते. त्यामुळे, लाकडाचा पुरवठा सतत चालू राहील म्हणून चिठ्या टाकण्यात आल्या.

२८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | नहेम्या १२-१३

“योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा”

इन्साइट-१ ९५ ¶५

अम्मोनी लोक

मंदिराच्या परिसरातून तोबीयाचं सामान बाहेर फेकल्यावर अनुवाद २३:३-६ मध्ये दिलेला देवाचा नियम वाचण्यात आला आणि त्याप्रमाणे काम करण्यात आलं. तिथे यहोवाने स्पष्टपणे सांगितलं होतं, की “कोणत्याही अम्मोनी किंवा मवाबी माणसाने खऱ्‍या देवाच्या मंडळीत कधीही येऊ नये” (नहे १३:१-३) जवळपास हजार वर्षांपूर्वी हा नियम घालून देण्यात आला होता. कारण इस्राएली लोक जेव्हा वचन दिलेल्या देशाच्या जवळ होते तेव्हा अम्मोनी आणि मवाबी लोकांनी त्यांना मदत केली नव्हती. त्यामुळे त्यांना दिलेल्या या आज्ञेचा असा अर्थ होता, की अम्मोनी आणि मवाबी लोक इस्राएल राष्ट्राचा भाग बनू शकणार नव्हते. आणि त्यामुळे इस्राएली लोकांना देशाचे रहिवासी म्हणून मिळत असलेले हक्क आणि फायदे त्यांना मिळू शकत नव्हते. पण याचा अर्थ असा नव्हता, की अम्मोनी आणि मवाबी लोक इस्राएली लोकांशी संगत करू शकत नव्हते. किंवा त्यांच्यात राहून देवाच्या लोकांना मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा आनंद घेऊ शकत नव्हते. याचं एक उदाहरण म्हणजे दावीदच्या प्रमुख योद्ध्यांपैकी एक असलेला सेलक आणि मवाबी रूथ.—रूथ १:४, १६-१८.

टेहळणी बुरूज१३ ८/१५ ४ ¶५-६

तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे

५ नहेम्या १३:४-९ वाचा. आज आपल्या अवतीभोवती अनेक वाईट प्रभाव असल्यामुळे पवित्र राहणे इतके सोपे नाही. एल्याशीब आणि तोबिया यांचे उदाहरण विचारात घ्या. एल्याशीब महायाजक होता, तर तोबिया एक अम्मोनी होता जो बहुधा पारसाच्या राजासाठी काम करत असावा. नहेम्या जेरूसलेमच्या तटांची पुनर्बांधणी करत होता तेव्हा तोबियाने आणि त्याच्या सोबत्यांनी त्याचा विरोध केला होता. (नहे. २:१०) नियमशास्त्रानुसार, अम्मोनी लोक मंदिरात येऊ शकत नव्हते. (अनु. २३:३) असे असताना महायाजकाने तोबियासारख्या मनुष्याला मंदिरातील एका कोठडीत का राहू दिले?

६ तोबिया हा एल्याशिबाचा जवळचा मित्र बनला होता. तोबिया आणि त्याचा मुलगा योहानान यांनी यहुदी स्त्रियांशी लग्न केले होते आणि अनेक यहुदी लोक तोबियाची खूप वाहवा करायचे. (नहे. ६:१७-१९) एल्याशिबाचा नातवांपैकी एकाने सनबल्लटाच्या मुलीशी लग्न केले होते. सनबल्लट हा शोमरोनाचा अधिपती असून तोबियाचा खास मित्र होता. (नहे. १३:२८) या नातेसंबंधांमुळेच महायाजक एल्याशीब कदाचित, गैरयहुदी व विरोधक असलेल्या तोबियाच्या प्रभावाखाली आला असावा. पण, नहेम्याने तोबियाचे सर्व सामान मंदिरातील कोठडीतून बाहेर फेकण्याद्वारे यहोवाप्रती एकनिष्ठा प्रदर्शित केली.

टेहळणी बुरूज९६ ३/१५ १६ ¶६

एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे

६ यहोवा देवाशी आपण एकनिष्ठ असल्यास, जे त्याचे शत्रू आहेत अशा सर्वांसोबत मैत्री करण्याचे आपण टाळू. म्हणूनच शिष्य याकोबाने लिहिले: “अहो, अविश्‍वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) राजा दावीदाने, “तुझा द्वेष करणाऱ्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्‍यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करितो; मी त्यांना आपले शत्रू मानितो,” असे म्हणून त्याच्या एकनिष्ठेचा पुरावा दिला त्याप्रमाणे आपणही एकनिष्ठा प्रदर्शित केली पाहिजे. (स्तोत्र १३९:२१, २२) जाणूनबुजून पाप करणाऱ्‍यांबरोबर आपण नातेसंबंध ठेवू इच्छित नाही कारण आपल्या आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीत साम्य नसते. व्यक्‍तीच्या रूपाने असो किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून असो, यहोवाच्या अशा कोणत्याही शत्रूंसोबत नातेसंबंध ठेवण्यापासून देवासोबतची एकनिष्ठा आपल्याला दूर ठेवणार नाही का?

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ ४५२ ¶९

संगीत

मंदिरात गीत गाऊन यहोवाची स्तुती करणं ही एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. हे कशावरून म्हणता येईल? शास्त्रवचनांत गायकांचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच, गायकांना आपल्या या जबाबदारीकडे पूर्ण लक्ष देता यावं म्हणून “त्यांना दुसरी कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती.” (१इत ९:३३) नंतर जेव्हा इस्राएली लोक बाबेलमधून परतले तेव्हासुद्धा त्यांच्या गटाचा वेगळा उल्लेख करण्यात आला. यावरून कळतं, की लेव्यांमध्ये गायकांचा एक खास गट होता. (एज २:४०, ४१) तसंच, पर्शियाचा राजा अर्तहशश्‍त यानेसुद्धा इतर खास गटांसोबतच गायकांनाही ‘कर, खंडणी किंवा जकात’ भरण्यापासून सूट दिली होती. (एज ७:२४) पुढे राजाने एक फर्मान काढून या गायकांच्या ‘दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्था’ केली. खरंतर, अर्तहशश्‍त राजाकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून एज्रानेच हे फर्मान काढलं असावं. (नहे ११:२३; एज ७:१८-२६) आणि म्हणूनच, सगळे गायक लेवी वंशातले असले तरी एक खास गट म्हणून बायबलमध्ये त्यांचा वेगळा उल्लेख करण्यात आला आहे.—नहे ७:१; १३:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा