जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
६-१२ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब १३-१४
“माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?”
प्रदीर्घ जीवनासाठी आपली खटपट
जीवनाच्या अल्पतेवरील हा विचार सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेला असला तरी आज फक्त मूठभर लोकच तो मान्य करणार नाहीत. अल्पकाळचे तारुण्य आणि नंतर म्हातारपण व मृत्यू अशा जीवनात लोकांना कधीच समाधान मिळालेले नाही. यामुळे संपूर्ण इतिहासभरात मानवाने त्याचे आयुष्यमान वाढवण्यासाठी अनेकाविध पद्धतींचे प्रयोग करून पाहिले आहेत.
ईयोबाच्या काळात इजिप्शियन लोक आपले तारुण्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्राण्यांचे अंडकोष खात असत; हा त्यांचा प्रयत्न निरर्थक ठरला. आयुष्यमान वाढवू शकणारे एक अमृत तयार करण्याचा मध्ययुगीन काळातील रसायनशास्त्राचा प्रमुख उद्देश होता. अनेक रसायनशास्त्रज्ज्ञांचा विश्वास होता, की कृत्रिमरीत्या बनवलेल्या सोन्यामुळे अमर जीवन प्राप्त होऊ शकते व सोन्याच्या थाळीत जेवल्याने आयुष्यमान वाढू शकते. प्राचीन चिनी ताऊ लोकांना वाटायचे, की मनन करण्याद्वारे, श्वसन व्यायामांद्वारे व योग्य आहाराद्वारे शरीराचे रसायनशास्त्र बदलता येते व अमरत्व प्राप्त करता येते.
स्पॅनिश शोधक हुआन पॉन्स दे लेऑनने तारुण्याच्या झऱ्याचा अथक शोध केला होता. हर्मिपूस रेडिवीवूस नावाच्या आपल्या पुस्तकात १८ व्या शतकातील एका डॉक्टरने, वसंत ऋतूत तरुण कुमारिकांना एका लहानशा खोलीत ठेवायचे आणि बाटल्यांमध्ये त्यांचा श्वास भरायचा व नंतर त्या श्वासाचा आयुष्यमान वाढवण्याचे औषध म्हणून वापर करायचा, असे सुचवले. परंतु, यांतील एकही पद्धत यशस्वी ठरली नाही.
तोडून टाकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटेल का?
लबानोनमध्ये वाढणाऱ्या गंधसरूच्या रुबाबदार वृक्षापुढे जैतुनाचं वाकडं-तिकडं, पिळवटलेलं झाड कदाचित फार देखणं दिसणार नाही. पण जैतुनाच्या झाडाचा एक आश्चर्यकारक गुणधर्म म्हणजे, अतिशय खडतर परिस्थितीतही हे झाड टिकून राहतं. काही झाडं तर जवळजवळ १,००० वर्षं जुनी आहेत. जैतुनाच्या झाडाची मुळं जमिनीखाली दूरवर पसरत जातात; आणि झाडाचं खोड जरी नष्ट झालं तरीही या झाडाला जगवलं जाऊ शकतं. झाडाची मुळं शाबूत असल्यास त्याला पुन्हा पालवी फुटण्याची आशा असते.
देवाचा विश्वासू सेवक ईयोब याला खात्री होती, की जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याला पुन्हा जीवन मिळेल. (ईयो. १४:१३-१५) आपल्याला पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य देवाजवळ आहे या गोष्टीवर असलेला विश्वास व्यक्त करण्यासाठी ईयोबानं एका झाडाचं उदाहरण दिलं. कदाचित, त्याच्या मनात जैतुनाचं झाड असावं. तो म्हणाला: “झाडाला देखील आशा असते. ते कापून टाकले तरी पुन्हा फुटते.” दुष्काळानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सुकलेल्या जैतुनाच्या झाडाचा बुंधा जणू पुन्हा जिवंत होतो आणि “एखाद्या नव्या रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात व पालवी फुटू लागते.”—ईयो. १४:७-९, सुबोधभाषांतर
“तुला उत्कंठा लागेल”
ईयोबाने काढलेल्या उद्गारांवरून आपण, यहोवा किती प्रेमळ आहे हा धडा शिकतो. ईयोबाप्रमाणे जे लोक स्वतःला देवाच्या हवाली करतात, त्याच्या दृष्टीत योग्य लोक बनण्याकरता जे त्याला घडवू व आकार लावू देतात अशा लोकांबद्दल त्याला जास्त आपुलकी वाटते. (यशया ६४:८) यहोवाचे विश्वासू सेवक त्याच्यासाठी मौल्यवान खजिन्याप्रमाणे आहेत. त्याची सेवा विश्वासूपणे करत असताना मरण पावलेल्या सेवकांना पुन्हा जिवंत करण्याची त्याला “उत्कंठा” लागली आहे. “उत्कंठा” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ, ‘मनापासून असलेली अगदी उत्कट इच्छा’ असा होतो, असे एक विद्वान म्हणतात. होय, यहोवा आपल्या सेवकांना फक्त लक्षातच ठेवत नाही तर त्यांना पुन्हा जीवन देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ १९१
राख
एखाद्या महत्त्वाच्या नसलेल्या किंवा किंमत नसलेल्या गोष्टीला सूचित करण्यासाठी राखेची उपमा दिली आहे. उदाहरणार्थ, अब्राहामने स्वतःबद्दल यहोवाला बोलताना असं म्हटलं, “मी धूळ आणि राख” आहे. (उत्प १८:२७; यश ४४:२०; ईयो ३०:१९ सुद्धा पाहा.) आणि ईयोबने त्याचं खोटं सांत्वन करणाऱ्यांच्या शब्दांना “राखेची सुवचनं” असं म्हटलं.—ईयो १३:१२, तळटीप.
१३-१९ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब १५-१७
“इतरांचं सांत्वन करताना अलीफजसारखं वागू नका”
टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २६ ¶४-५
गलत सोच का विरोध कीजिए!
अपने तीनों भाषणों में एलीपज ने यह विचार पेश किया कि परमेश्वर जल्लाद है और उसके सेवक चाहे जितना भी जतन कर लें, वे कभी उसे खुश नहीं कर पाएँगे। एलीपज ने अय्यूब से कहा: “देख, वह अपने सेवकों पर भरोसा नहीं रखता, और अपने स्वर्गदूतों को मूर्ख ठहराता है।” (अय्यूब ४:१८) उसने परमेश्वर के बारे में बाद में कहा: “वह अपने पवित्रों पर भी विश्वास नहीं करता, और स्वर्ग भी उसकी दृष्टि में निर्मल नहीं है।” (अय्यूब १५:१५) उसने पूछा: “क्या तेरे धर्मी होने से सर्वशक्तिमान सुख पा सकता है?” (अय्यूब २२:३) एलीपज के इस विचार से बिलदद भी सहमत था, तभी उसने कहा: “देख, [परमेश्वर की] दृष्टि में चन्द्रमा भी अन्धेरा ठहरता, और तारे भी निर्मल नहीं ठहरते।”—अय्यूब २५:५.
हमें खबरदार रहना होगा कि कहीं हम इस तरह की सोच रखने न लगें। वरना हमें यह लगेगा कि परमेश्वर हमसे हद-से-ज़्यादा की माँग करता है। ऐसी सोच यहोवा के साथ हमारे रिश्ते को खतरे में डाल सकती है। इसके अलावा, ज़रा सोचिए अगर हम ऐसी सोच को अपना लेते हैं तो अनुशासन मिलने पर हम कैसा रवैया दिखाएँगे? हम नम्रता से अनुशासन कबूल करने के बजाय शायद मन-ही-मन “यहोवा से चिढ़ने” लगें और उसके लिए अपने दिल में नाराज़गी पालें। (नीतिवचन १९:३) इससे परमेश्वर के साथ हमारा रिश्ता टूट सकता है!
येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?
१६ आपलं दयाळूपणाचं बोलणं: आपल्या मनातील दयाळूपणाच्या भावनेमुळे, मनानं खचलेल्यांना “धीर” देण्याची आपल्याला आपोआपच प्रेरणा मिळेल. (१ थेस्सलनी. ५:१४) अशा लोकांना आपल्या बोलण्याद्वारे आपण धीर कसा देऊ शकतो? आपल्याला त्यांची मनापासून काळजी वाटते हे आपण त्यांना सांगू शकतो. तसंच, आपण त्यांची प्रशंसा करू शकतो. त्यांच्या चांगल्या गुणांकडे व कौशल्यांकडे आपण त्यांचं लक्ष वेधू शकतो. शिवाय, ‘यहोवा देवानं तुम्हाला सत्य जाणून घ्यायला मदत केली, त्याअर्थी नक्कीच त्याचं तुमच्यावर प्रेम आहे,’ अशी आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. (योहा. ६:४४) जे दुःखी किंवा अगदी निराश आहेत त्यांची यहोवाला काळजी आहे आणि तो त्यांना कधीही विसरणार नाही असं सांगण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. (स्तो. ३४:१८) सांत्वनासाठी आसूसलेल्यांना आपल्या प्रेमळ शब्दांमुळे खूप दिलासा मिळू शकतो.—नीति. १६:२४.
आध्यात्मिक रत्नं
ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
७:९, १०; १०:२१; १६:२२—ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता असे या विधानांवरून सूचित होते का? ही विधाने ईयोबाच्या जवळच्या भविष्याविषयी आहेत. मग त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होतो? एक शक्यता ही असावी, की जर त्याचा मृत्यू झालाच तर त्याच्याबरोबरचे कोणी त्याला पाहू शकणार नाहीत. त्यांच्या दृष्टीत तो आपल्या घरीही पुन्हा जाणार नाही किंवा देवाचा नियुक्त समय येईपर्यंत त्याला कसलीच आशा राहणार नाही. ईयोबाला कदाचित असेही म्हणायचे असेल, की शिओलमध्ये गेलेला मनुष्य स्वतःहून बाहेर येऊ शकत नाही. ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्वास होता हे ईयोब १४:१३-१५ वचनांवरून साफ दिसते.
२०-२६ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब १८-१९
“तुमच्यासोबत उपासना करणाऱ्यांना कधीच एकटं सोडू नका”
येशूचे अश्रूसुद्धा खूप काही शिकवून जातात!
९ तुम्ही शोक करणाऱ्यांचं सांत्वन आणि त्यांची मदत करू शकता. मार्था आणि मरीयासोबत येशू फक्त रडला नाही, तर त्याने त्यांचं धीराने ऐकलं आणि त्यांना सांत्वनही दिलं. आपणही तेच करू शकतो. ऑस्ट्रेलियातल्या एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणारा डॅन नावाचा एक भाऊ म्हणतो: “माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी खूप एकटा पडलो. मला आधाराची गरज होती. त्या काळात मंडळीतल्या भाऊबहिणींनी मला खूप धीर दिला. मी त्यांच्यासमोर माझं मन हलकं करायचो आणि रडायचो, तेव्हा त्यांनी मला समजून घेतलं. काही वेळा मला माझी रोजची कामं करायलासुद्धा जमत नव्हतं. तेव्हा भाऊबहिणींनी मला माझी कार धुवायला, दुकानातून गरजेच्या गोष्टी आणायला, जेवण बनवायला आणि यांसारख्या इतर गोष्टी करायला मदत केली. ते माझ्यासोबत प्रार्थनासुद्धा करायचे. ‘दुःखाच्या प्रसंगात’ ते माझ्यासाठी खऱ्या मित्रांसारखे आणि भावांसारखे होते.”—नीति. १७:१७.
आपली जवळची व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा . . .
१६ बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना आधार देत राहा. अशा वेळी खासकरून त्यांना तुमच्या प्रेमाची आणि धीराची खूप गरज असते. (इब्री १०:२४, २५) कारण काहींना असं जाणवलं आहे, की कधीकधी मंडळीतले काही जण त्यांच्याशी बोलायचंच सोडून देतात, जणू काय त्यांनासुद्धा बहिष्कृत करण्यात आलं आहे. पण आपण असं कधीच करू नये. ज्यांचे आईवडील यहोवाला सोडून गेले आहेत, त्या मुलांना खासकरून प्रोत्साहनाची आणि धीराची खूप गरज असते. मरीयाच्या पतीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि ते कुटुंबाला सोडून गेले त्या वेळी मंडळीतल्या भाऊबहिणींनी तिला कशी मदत केली त्याबद्दल ती म्हणते: “काही भाऊबहीण आमच्या घरी यायचे. ते आमच्यासाठी जेवण बनवायचे आणि मला कौटुंबिक उपासना घ्यायला मदत करायचे. त्यांनी माझं दुःख समजून घेतलं. आणि ते माझ्यासोबत रडायचे. लोक जेव्हा माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवायचे तेव्हा ते माझ्या बाजूने बोलायचे. त्यांनी खरंच मला खूप धीर दिला.”—रोम. १२:१३, १५.
टेहळणी बुरूज९१ ५/१ १४ ¶२०
तुम्ही देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत आहात का?
२० पूर्वीचा देखरेखा किंवा उपाध्य सेवकाला दूर करण्यात आल्यामुळे किंवा त्याने स्वेच्छेने ते त्यागल्यामुळे किती उद्विग्नता वाटली असेल याविषयीची जाण वडीलवर्गाने राखण्यास हवी. तो बहिष्कृत केलेला नाही, पण वडीलांना हे दिसते की तो निराश झालेला आहे तर अशावेळी त्यांनी प्रेमळपणे त्याला आध्यात्मिक साहाय्य द्यावे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) त्याची मंडळीत गरज आहे याची जाणीव करून देण्यात त्यांनी त्याला मदत करावी. जरी सूचना देण्याची गरज भासली होती तरी नम्र व कृतज्ञता प्रदर्शित करणाऱ्या माणसाला मंडळीत सेवेचे हक्क प्रदान करण्यात दीर्घ काळ लागणार नाही.
आध्यात्मिक रत्नं
प्रेमाच्या शब्दातील सामर्थ्य
तथापि, जेव्हा स्वतः ईयोबाला धैर्याची आवश्यकता होती तेव्हा अलीफज आणि त्याच्या सोबत्यांनी प्रेमाचे शब्द व्यक्त केले नाहीत. गुप्ततेत काहीतरी अपराध केल्यामुळे त्याच्यावर हे संकट आले, अशाप्रकारचा दोषारोप त्यांनी ईयोबावर केला. (ईयोब ४:८) द इंटरप्रीटर्स बायबल विवेचन देते: “ईयोबाला मनुष्याकडून मनःपूर्वक दयेची गरज होती. परंतु त्याला ‘सत्य’ आणि साचेबंद धार्मिक सांप्रदाय ऐकण्यास मिळाले.” अलीफज आणि त्याच्या सोबत्यांचे भाष्य ऐकल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ईयोबाला आक्रोश करण्यास भाग पाडण्यात आले: “तुम्ही कोठवर माझ्या जिवास दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?”—ईयोब १९:२.
आपण, आपल्या अविचारी आणि अव्हेलनात्मक शब्दांमुळे देवाच्या सहउपासकांना दुःखामुळे आक्रोश करावयास लावू नये. (पडताळा अनुवाद २४:१५.) बायबलचे नीतीसूत्र असा इशारा देते: “तुम्ही जे बोलाल त्याद्वारे जीवन वाचविले जाते अथवा नाश केले जाते; म्हणून तुमच्या शब्दांमुळे होणाऱ्या परिणामांचा स्वीकार तुम्ही केलाच पाहिजे.”—नीतीसूत्रे १८:२१, टीईव्ही.
२७ नोव्हेंबर–३ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब २०-२१
“धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही”
तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का?
१२ येशूने जे म्हटले त्यावरून, देवविषयक बाबतीत श्रीमंत होणे हे, स्वतःसाठी द्रव्यसंचय करणे अथवा आर्थिकरीत्या श्रीमंत होणे याच्याविरुद्ध आहे. त्यामुळे, येशू असे म्हणू इच्छित होता, की जीवनातील आपली मुख्य चिंता, भौतिक मालमत्ता मिळवणे किंवा आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा आनंद लुटणे, ही नसावी. उलट, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी वाढवण्यासाठी किंवा आणखी बळकट करण्यासाठी आपण आपल्या संपत्तीचा उपयोग केला पाहिजे. असे केल्याने आपण निश्चितच देवविषयक बाबतीत श्रीमंत होऊ शकू. का? कारण यामुळे अनेक आशीर्वादांसाठी मार्ग खुला होतो. बायबल आपल्याला असे सांगते: “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.
आध्यात्मिक रत्नं
सैतान आणि त्याच्या कार्यांवर विजय मिळवणे
१९ देवाचा सेवक, ईयोब याला सैतानाने अलीफज आणि सोफर यांच्याद्वारे कळविलेल्या ‘विचारलहरीशी’ झगडावे लागले, हे आस्थेचे आहे. (ईयोब ४:१३-१८; २०:२, ३) ईयोबाच्या मनाला पीडित करणाऱ्या ‘संकटांबद्दल त्याच्या मर्यादेबाहेर बोलण्यामुळे’ त्याला “खेद” झाला. (ईयोब ६:२-४; ३०:१५, १६) अलीहूने ईयोबाचे शांतपणे ऐकून घेतले आणि सर्व गोष्टींविषयी यहोवाचा सर्वज्ञ दृष्टिकोन पाहण्यास मनापासून मदत केली. अशाचप्रकारे, आज समजदार वडील जण पीडित लोकांवर अधिक “दबाव” न टाकण्याद्वारे त्यांची काळजी करत असल्याचे दाखवतील. उलटपक्षी, अलीहूप्रमाणे, ते धीराने त्यांचे ऐकतात आणि नंतर देवाच्या वचनाच्या सांत्वनदायक तेलाचा वापर करतात. (ईयोब ३३:१-३, ७; याकोब ५:१३-१५) या कारणास्तव, खऱ्या वा काल्पनिक आघातामुळे ज्यांच्या भावना त्रस्त होतात अथवा जे ईयोबाप्रमाणे ‘स्वप्ने . . . व दृष्टांताने घाबरे केल्यामुळे’ विचलित होतात अशांना मंडळीत आरामदायक शास्त्रवचनीय सांत्वन मिळू शकते.—ईयोब ७:१४; याकोब ४:७.
४-१० डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब २२-२४
“माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”
टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २७ ¶१-३
गलत सोच का विरोध कीजिए!
परमेश्वर बहुत कठोर है, इस विचार से मिलता-जुलता एक और विचार यह है कि वह हम इंसानों को बिलकुल बेकार समझता है। एलीपज अपने तीसरे भाषण में यह सवाल करता है: “क्या पुरुष से ईश्वर को लाभ पहुंच सकता है? जो बुद्धिमान है, वह अपने ही लाभ का कारण होता है।” (अय्यूब २२:२) एलीपज के कहने का मतलब था कि परमेश्वर की नज़र में इंसान किसी लायक नहीं है। उसी तरह बिलदद ने यह दलील पेश की: “मनुष्य ईश्वर की दृष्टि में धर्मी क्योंकर ठहर सकता है? और जो स्त्री से उत्पन्न हुआ है वह क्योंकर निर्मल हो सकता है?” (अय्यूब २५:४) उनके कहने का यह मतलब था कि एक मामूली-सा इंसान अय्यूब, परमेश्वर की नज़रों में धर्मी ठहरने की सोच भी कैसे सकता था?
निराश करनेवाली भावनाएँ आज कुछ लोगों को आ घेरती हैं। इसके लिए कई बातें ज़िम्मेदार हो सकती हैं जैसे, उनकी परवरिश, ज़िंदगी के तनाव, या जाति-भेद का शिकार होना। इसके अलावा, शैतान और उसकी दुष्टात्माएँ भी इंसान के आत्म-सम्मान को कुचलने की कोशिश करती हैं, क्योंकि ऐसा करने में उन्हें मज़ा आता है। अगर वे किसी इंसान को यकीन दिला दें कि सर्वशक्तिमान परमेश्वर को खुश करना नामुमकिन है, तो वह निराश होकर बड़ी आसानी से हार मान सकता है। देखते-ही-देखते ऐसा इंसान सच्चाई से बहक सकता है, और यह भी हो सकता है कि वह अपने आपको जीवित परमेश्वर से दूर कर ले।—इब्रानियों २:१; ३:१२.
ढलती उम्र और खराब सेहत की वजह से हम राज्य की सेवा में शायद उतना न कर पाएँ जितना हम अपनी जवानी में करते थे। यह समझना हमारे लिए बेहद ज़रूरी है कि शैतान और उसकी दुष्टात्माएँ हमें यह महसूस कराना चाहती हैं कि हम यहोवा की सेवा में जो भी करते हैं, उससे वह खुश नहीं होता। हमें इस तरह की सोच का विरोध करना चाहिए।
समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा
त्याच्या तीन साथीदारांनी, ईश्वरी बुद्धिचा वापर करण्याऐवजी व्यक्तिगत कल्पना व्यक्त करून ईयोबाला नाउमेद केले. अलीफजने तर असेही म्हटले, की ‘देवाला आपल्या सेवकांवर भरवसा नाही’ व यहोवाला ईयोब धार्मिक होता की नव्हता याचे महत्त्व नव्हते. (ईयोब ४:१८; २२:२, ३) याहूनही अधिक निरूत्साहित करणाऱ्या—किंवा अधिक असत्य—शेऱ्यांविषयीची कल्पना देखील करवत नाही! यहोवाने नंतर अलीफज आणि त्याच्या साथीदारांना या दुर्भाषणाबद्दल धमकावले यात काही आश्चर्य नाही. तो म्हणाला: ‘मजविषयी तुम्ही यथार्थ बोलला नाहीत.’ (ईयोब ४२:७) परंतु सर्वात हानीकारक विधान कालांतराने यायचे होते.
टेहळणी बुरूज०३ ४/१५ १४-१५ ¶१०-१२
यहोवाचे मन आनंदित करणारे तरुण
१० बायबलच्या अहवालातून दिसून येते त्याप्रमाणे, सैतानाने केवळ ईयोबाच्याच नव्हे तर देवाची सेवा करणाऱ्या सर्वांच्या एकनिष्ठतेबद्दल शंका घेतली, आणि यात तुमचाही समावेश आहे. किंबहुना, सर्वसामान्य मानवजातीबद्दल बोलताना सैतानाने यहोवाला असे म्हटले: “मनुष्य [फक्त ईयोब नव्हे, तर कोणीही] आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) या महत्त्वाच्या वादविषयात तुम्हाला आपली भूमिका दिसते का? नीतिसूत्रे २७:११ यात सूचित केल्याप्रमाणे यहोवा असे म्हणत आहे की तुम्ही त्याला काही देऊ शकता—अर्थात त्याची थट्टा करणाऱ्या सैतानाला उत्तर देण्याकरता एक आधार. कल्पना करा, सबंध विश्वाचा सार्वभौम तुम्हाला इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या वादविषयावर तुमचे वैयक्तिक उत्तर देण्याचे आवाहन करत आहे. ही तुमच्याकरता किती अद्भुत जबाबदारी आणि एक विशेषाधिकार आहे! यहोवा तुमच्याकडून जी अपेक्षा करतो ती तुम्ही पूर्ण करू शकता का? ईयोबाने केली. (ईयोब २:९, १०) त्याचप्रकारे येशूने आणि इतिहासातील इतर असंख्य जणांनी यहोवाची अपेक्षा पूर्ण केली; यात अनेक तरुणही सामील आहेत. (फिलिप्पैकर २:८; प्रकटीकरण ६:९) तुम्हीसुद्धा हेच करू शकता. पण विसरू नका, याबाबतीत तुम्ही दोन्ही पक्षात कदापि सामील होऊ शकत नाही. तुमच्या वागणुकीवरून तुम्ही दाखवाल की तुम्ही सैतानाच्या थट्टेला पाठिंबा देत आहात की यहोवाच्या प्रत्युत्तराला. तुम्ही कोणाचा पक्ष घ्याल?
यहोवाला तुमची काळजी आहे!
११ तुम्ही काय निवड करता यामुळे यहोवाला खरोखरच काही फरक पडतो का? आजपर्यंत ज्या असंख्य लोकांनी विश्वासूपणे सेवा केली आहे त्यांची उदाहरणे सैतानाला प्रत्युत्तर देण्याकरता पुरेशी नाहीत का? दियाबलाने असा दावा केला होता, की कोणीही यहोवाची सेवा प्रेमापोटी करत नाही, आणि त्याचा हा दावा खोटा असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे यात शंका नाही. तरीसुद्धा, यहोवाची इच्छा आहे की सार्वभौमत्वाच्या वादविषयात तुम्ही त्याचा पक्ष घ्यावा कारण त्याला व्यक्तिगतपणे तुमची काळजी आहे. येशूने म्हटले: “ह्या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.”—मत्तय १८:१४.
१२ यावरून हेच स्पष्ट होते की तुम्ही कोणता मार्ग निवडता याविषयी यहोवा देवाला आस्था आहे. केवळ आस्थाच नाही तर तुमच्या निर्णयांचा त्याच्यावर प्रभाव पडतो. बायबल स्पष्टपणे सांगते की यहोवाला भावना आहेत आणि मनुष्यांच्या चांगल्या अथवा वाईट कृत्यांमुळे त्याच्या भावनांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जेव्हा इस्राएल लोकांनी वारंवार विद्रोह केला तेव्हा यहोवाला “दुःख” झाले. (स्तोत्र ७८:४०, ४१) नोहाच्या काळातील जलप्रलयानंतर, “मानवांची दुष्टाई फार” झाली तेव्हा यहोवाच्या “चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६) याचा काय अर्थ होतो यावर विचार करा. तुम्ही चुकीचा मार्ग निवडल्यास, तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याला दुःखी होण्यास भाग पाडू शकता. पण याचा अर्थ देव भावनाविवश किंवा दुबळ्या मनाचा आहे असा नाही. उलट, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या कल्याणाची त्याला काळजी आहे. दुसरीकडे पाहता, जेव्हा तुम्ही योग्य ते करता तेव्हा यहोवाचे मन आनंदित होते. केवळ सैतानाला प्रत्युत्तर देता आल्यामुळे नव्हे तर आता तो तुम्हाला प्रतिफळ देऊ शकतो यामुळेही तो आनंदित होतो. आणि तो खरोखर तुम्हाला प्रतिफळ देऊ इच्छितो! (इब्री लोकांस ११:६) यहोवा देव किती प्रेमळ पिता आहे.
आध्यात्मिक रत्नं
आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा
यहोवा देवाने विश्वाची निर्मिती कशी साध्य केली त्याचा विचार करा. “संध्याकाळ झाली व सकाळ झाली” या शब्दांद्वारे यहोवाने प्रत्येक निर्मितीकाळ वेगळा केला. (उत्पत्ति १:५, ८, १३, १९, २३, ३१) प्रत्येक निर्मिती काळाच्या सुरवातीला, त्या दिवसासाठी त्याचे काय उद्दिष्ट आहे हे त्याला स्पष्टपणे माहीत होते. अशारितीने सर्व काही निर्माण करण्याचा आपला उद्देश देवाने पूर्ण केला. (प्रकटीकरण ४:११) कुलपिता ईयोब याने यहोवाविषयी म्हटले: “त्याच्या जिवाने जे इच्छिले तेच तो करतो.” (ईयोब २३:१३, पं.र.भा.) “आपण केलेले सर्व” पाहून यहोवाला किती समाधान वाटले असावे; सर्व काही पाहिल्यानंतर त्याने “फार चांगले आहे,” अशी पावती दिली.—उत्पत्ति १:३१.
आपली ध्येये पूर्ण होण्याकरता, आपल्यामध्येही तशी तीव्र इच्छा असली पाहिजे. अशी तीव्र इच्छा आपण कशी निर्माण करू शकतो? पृथ्वी, आधी निराकार व पडीक होती तेव्हासुद्धा यहोवा शेवटला परिणाम पाहू शकत होता—अंतराळात त्याचे गौरव व त्याचा आदर करणारे एक देखणे रत्न तो पाहू शकत होता! तसेच, आपणही शेवटल्या परिणामावर आणि ध्येय साध्य केल्यानंतर मिळणाऱ्या लाभांवर मनन करण्याद्वारे आपले विशिष्ट ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा आपल्यात निर्माण करू शकतो. १९ वर्षीय टोनीचा असाच अनुभव आहे. पश्चिम युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला त्याने दिलेली भेट तो कधीच विसरू शकला नाही. तेव्हापासून त्याच्या मनात सतत हाच प्रश्न घोळत राहिला, ‘अशा ठिकाणी राहून काम करण्याचा अनुभव कसा असावा?’ टोनीने या शक्यतेवर विचार करण्याचे थांबवले नाही तर तो ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत राहिला. अनेक वर्षांनंतर शाखा दफ्तरात काम करण्यासाठी त्याने भरलेला अर्ज स्वीकारण्यात आला तेव्हा त्याला किती आनंद झाला!
११-१७ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब २५-२७
“एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही”
इन्साइट-१ १२१० ¶४
एकनिष्ठा
ईयोब. बायबलमध्ये ईयोबबद्दल म्हटलंय, की तो “सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा होता. तो देवाला भिऊन वागायचा आणि वाईट गोष्टींचा द्वेष करायचा.” (ईयो १:१) सैतानाने ईयोबवर असा आरोप लावला, की तो स्वार्थी हेतूने देवाची सेवा करत आहे. त्याने त्याच्या एकनिष्ठेवर प्रश्न उभा केला. म्हणून देवाने सैतानाला ईयोबच्या एकनिष्ठेची परीक्षा घेऊ दिली. या परीक्षेत ईयोबला आपली धनसंपत्ती आणि मुलं गमवावी लागली. (ईयो १:६–२:३) यानंतर सैतानाने ईयोबवर असाही आरोप लावला की तो आपल्या जीवासाठी सगळं काही सोडायला तयार होईल. (ईयो २:४, ५) ईयोबने या परीक्षेच्या काळात आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली आणि आपलं नीतिमत्त्व सोडलं नाही. त्याला अतिशय किळसवाणा आजार झाला होता. तसंच त्याच्या पत्नीने आणि त्याच्या मित्रांनीसुद्धा त्याच्याशी बोलताना देवाच्या स्तरांना चुकीच्या पद्धतीने मांडलं. पण तरीही ईयोबने आपली एकनिष्ठा सोडली नाही. त्याने म्हटलं, “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही! मी नेहमी नीतीने चालीन, मी नीती सोडणार नाही; मी जिवंत असेपर्यंत, माझं मन मला दोषी ठरवणार नाही.” (ईयो २७:५, ६) यावरून सैतान खोटा असल्याचं सिद्ध झालं. तसंच ईयोब शेवटपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला आणि खरेपणाने वागला.
खरेपणा टिकवून ठेवा!
३ देवाचे सेवक खरेपणा कसा दाखवतात? देवावर अतूट आणि पूर्ण मनाने प्रेम करण्याद्वारे ते खरेपणा दाखवतात. आणि यामुळे ते नेहमी अशी कार्य करतात ज्यामुळे देवाचं मन आनंदित होईल. ‘खरेपणा’ या शब्दासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ संपूर्ण, निर्दोष किंवा चांगल्या स्थितीत असणं असा होतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोक यहोवाला प्राणी अर्पण करायचे. नियमानुसार त्यांना असा प्राणी अर्पण करायचा होता ज्यात कोणताच दोष नव्हता. (लेवी. २२:२१, २२) आंधळे, लंगडे किंवा एखाद्या प्राण्याला कान नसेल, तर असे प्राणी त्यांनी अर्पण करू नये अशी त्यांना आज्ञा देण्यात आली होती. तो प्राणी संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असणं यहोवासाठी खूप महत्त्वाचं होतं. (मला. १:६-९) संपूर्ण आणि निर्दोष हे पैलू यहोवासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, जसं की फळ, पुस्तक किंवा एखादं साधन, आणि जर ते फळ सडलेलं असलं, त्या पुस्तकात काही पानं नसले, किंवा त्या साधनात काही भाग नसले, तर तुम्ही ते घेणार का? नक्कीच नाही! आपल्याला ती वस्तू अगदी पूर्ण, काहीही दोष नसलेली आणि चांगली हवी असते. त्याच प्रकारे, यहोवाला वाटतं की त्याच्यासाठी असलेलं आपलं प्रेम आणि खरेपणा संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असायला हवा.
४ मग खरेपणा बाळगण्यासाठी आपण परिपूर्ण असलं पाहिजे असा याचा अर्थ होतो का? आपल्यात खूप दोष आहेत आणि आपल्या हातून बऱ्याच चुका होतात असं आपल्याला वाटू शकतं. पण खरेपणा बाळगण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. आपण याची दोन कारणं पाहू या. पहिलं, यहोवा आपल्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करत नाही. बायबल सांगतं: “हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) आपण अपरिपूर्ण, पापी मानव आहोत हे त्याला माहीत आहे आणि तो आपल्याला उदार मनाने क्षमा करतो. (स्तो. ८६:५) दुसरं, यहोवा आपल्या मर्यादा जाणतो आणि आपण जितकं करू शकतो त्यापलीकडे तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (स्तोत्र १०३:१२-१४ वाचा.) मग आपण कोणत्या अर्थाने त्याच्या नजरेत संपूर्ण आणि निर्दोष आहोत?
५ यहोवाच्या सेवकांसाठी प्रेम ही खरेपणाची गुरुकिल्ली आहे. देवासाठी असलेलं आपलं प्रेम आणि स्वर्गात राहणाऱ्या आपल्या पित्यासाठी असलेली आपली एकनिष्ठ भक्ती ही संपूर्ण आणि निर्दोष असायला हवी. परीक्षेतही जेव्हा हे प्रेम बदलत नाही, अटळ राहतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपल्यात खरेपणा आहे. (१ इति. २८:९; मत्त. २२:३७) लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन साक्षीदारांचा पुन्हा एकदा विचार करा. त्या परिस्थितींत ते तसं का वागले? त्या तरुण मुलीला शाळेत मजा करायला आवडत नव्हतं का किंवा प्रचारात असलेल्या त्या तरुणाला स्वतःची थट्टा करून घ्यायची होती का? किंवा त्या कुटुंबप्रमुखाला आपली नोकरी गमवायची होती म्हणून तो तसा वागला का? मुळीच नाही! याउलट, यहोवाचे स्तर नीतिमान आहेत हे त्यांना माहीत आहे. तसंच, स्वर्गात राहणाऱ्या आपल्या पित्याचं मन आनंदित करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. त्यांचं यहोवावर प्रेम असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी ते त्याचा विचार करतात. असं करण्याद्वारे ते आपला खरेपणा दाखवतात.
आध्यात्मिक रत्नं
देवाच्या वचनांनुसार सुसंघटित
३ यहोवाने जी सृष्टी बनवली आहे त्याचं जवळून परीक्षण केल्यास आपल्याला हे कळून येतं की यहोवा हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे. बायबल आपल्याला सांगतं, “परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.” (नीति. ३:१९) आजही या विश्वात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मानवांना अजूनही माहीत नाहीत. बायबल सांगतं, यहोवाने बनवलेल्या सृष्टीची “केवळ चाहूल” मानवांच्या कानी पडली आहे. (ईयो. २६:१४) भौतिक विश्वातील ज्या-ज्या गोष्टींचा अभ्यास मानवांनी केला त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे या संपूर्ण विश्वात अव्यवस्था किंचितही दिसून येत नाही. (स्तो. ८:३, ४) अवकाशात लाखो-करोडो तारे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपआपल्या मार्गावरून फिरत आहेत. तसंच आपल्या सौरमालेचा विचार करा, सूर्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहांना जणू त्यांचा मार्ग नेमून दिला आहे, अगदी अशा प्रकारे ते सूर्याभोवती फिरत आहेत. फक्त यहोवा देवामुळेच, तारे आणि ग्रहांमध्ये दिसून येणारी ही अद्भुत व्यवस्था शक्य आहे. यहोवाने ज्या प्रकारे “बुद्धिचातुर्याने आकाश” व पृथ्वीची निर्मिती केली आहे त्यावर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण त्याची स्तुती व उपासना करण्यास, तसंच त्याला एकनिष्ठ राहण्यास प्रेरित होतो.—स्तो. १३६:१, ५-९.
१८-२४ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब २८-२९
“तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?”
गरजवंतांना प्रेमदया दाखवा
१९ आपण विचारात घेतलेले बायबलमधील वृत्तान्त आणखी एका वस्तुस्थितीवर जोर देतात; ती अशी की प्रेमदया अशा व्यक्तींना दाखवली जावी ज्यांना गरज आहे आणि जे ती गरज पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. अब्राहामला त्याचा वंश पुढे चालवण्याकरता बथुवेलच्या सहकार्याची गरज होती. आपला मृतदेह कनानला नेण्याकरता याकोबाला योसेफाच्या मदतीची गरज होती. आणि एक वारस उत्पन्न करण्याकरता नामीला रूथच्या मदतीची गरज होती. या मदतीशिवाय अब्राहाम, याकोब किंवा नामी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते. त्याचप्रकारे आजही प्रेमदया खासकरून गरजवंतांना दाखवली जावी. (नीतिसूत्रे १९:१७) आपण कुलपिता ईयोब याचे अनुकरण केले पाहिजे ज्याने “करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित” यांच्यावर तसेच ‘नाश होण्याच्या लागास आलेल्यावर’ दया केली. ईयोबाने “विधवेचे मन [देखील] आनंदित” केले आणि तो ‘आंधळ्यास नेत्र व लंगड्यास पाय’ असाही झाला.—ईयोब २९:१२-१५.
इन्साइट-१ ६५५ ¶१०
कपडे, पोषाख
बायबलमध्ये, एखाद्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी किंवा तिच्या कृत्यांबद्दल सांगण्यासाठी कपड्यांचा लाक्षणिकपणे वापर करण्यात आलाय. उदाहरणार्थ, एखाद्याच्या विशिष्ट पोषाखावरून किंवा खास पेहरावावरून तो कोणत्या संघटनेचा आहे किंवा तो कोणत्या चळवळीत सहभागी आहे, हे ओळखून येतं. त्याचप्रमाणे, बायबलमध्ये लाक्षणिकपणे कपड्यांचा उल्लेख एखाद्याची ओळख करून देण्यासाठी करण्यात आलाय. म्हणजे एखाद्याने काय निर्धार केलाय आणि त्यानुसार तो काय काम करतो हे सांगण्यासाठी करण्यात आलाय.—मत्त २२:११, १२; प्रक १६:१४, १५.
टेहळणी बुरूज०९-E २/१ १५ ¶३-४
नाव का महत्त्वाचं आहे?
जन्म झाल्यानंतर आपलं नाव काय असेल हे आपण स्वतः ठरवू शकत नाही. पण इतरांच्या नजरेत आपण कसं नाव कमवणार हे आपल्या हातात आहे. (नीतिवचनं २०:११) स्वतःला विचारा: ‘जर येशू आणि प्रेषितांना माझं नाव ठेवायची संधी देण्यात आली असती, तर त्यांनी माझं नाव काय ठेवलं असतं? माझे ठळक गुण दाखवणारं किंवा माझा नावलौकिक कसा आहे हे सांगणारं कोणतं नाव त्यांनी मला दिलं असतं?’
या प्रश्नांवर आपण खूप खोलवर विचार केला पाहिजे. का? बुद्धिमान राजा शलमोलने लिहिलं, “भरपूर धनसंपत्तीपेक्षा चांगलं नाव . . . मिळवणं बरं!” (नीतिवचनं २२:१) समाजात आपलं एक चांगलं नाव असणं खूप मोलाची गोष्ट आहे. पण देवाच्या नजरेत आपलं चांगलं नाव असणं हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते कायम टिकून राहतं. आपण असं का म्हणू शकतो? कारण देवाने आपल्याला असं अभिवचन दिलंय, की जे त्याची भीती बाळगतात त्यांचं नाव तो ‘स्मरणाच्या पुस्तकात’ लिहील आणि त्यांना सार्वकालिक जीवनाचं बक्षीस देईल.—मलाखी ३:१६; प्रकटीकरण ३:५; २०:१२-१५.
आध्यात्मिक रत्नं
सावध राहा!०० ७/८ २६ ¶३
हसा नि ठणठणीत राहा!
हसल्याने खरेच काही फरक पडतो का? जरा आठवा, तुमच्या समोर आलेल्या व्यक्तीचा हसरा चेहरा पाहून तुम्हाला कधी दिलासा मिळाल्यासारखे किंवा मनातली भीती दूर झाल्यासारखे वाटले का? किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून भीती किंवा आपण त्याला नापसंत आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली होती का? हो ना? पाहिलंत, हसल्याने केवढा फरक होतो ते. हा परिणाम हसणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याला पाहणाऱ्या व्यक्तीवरही होतो. बायबलमधील ईयोब या व्यक्तीने आपल्या शत्रुंविषयी असे म्हटले: “ते विश्वासहीन होत असत तेव्हा मी त्यांच्याकडे हास्यमुख करीत असे, आणि माझे मुखतेज ते उतरीत नसत.” (ईयोब २९:२४) ईयोबच्या चेहऱ्यावरील “मुखतेज” म्हणजे त्याचा आनंदी किंवा हसरा चेहरा असावा.
२५-३१ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | ईयोब ३०-३१
“ईयोब नैतिक रीत्या शुद्ध राहिला”
निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!
८ डोळ्यांची वासना व देहाची वासना यांचा खऱ्या ख्रिश्चनांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे आपण जे काही पाहतो व ज्याची मनोकामना करतो त्यांसंबंधी स्वतःला शिस्त लावण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते. (१ करिंथ. ९:२५, २७; १ योहान २:१५-१७ वाचा.) आपली दृष्टी व मनोकामना यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे याची नीतिमान पुरुष ईयोब याला जाणीव होती. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयो. ३१:१) एखाद्या स्त्रीला वाईट हेतूने स्पर्श करणे तर दूरच, पण तसा विचारसुद्धा तो आपल्या मनात घोळू देणार नव्हता. अनैतिक विचारांपासून आपण आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे यावर भर देताना येशूने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो [“पाहत राहतो,” NW] त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्त. ५:२८.
“पुढील परिणामाचा” विचार करा
तेव्हा, अशा अनैतिक मार्गावर पहिले पाऊल टाकण्याआधी स्वतःला विचारा: ‘हा रस्ता मला कुठं घेऊन जाईल?’ थोडे थांबून तुम्ही ‘पुढील परिणामांचा’ नुसता विचार जरी केला तरी, तुम्ही गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या मार्गावर पाऊल टाकणार नाही. जे या दिशाफलकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात त्यांना, एड्स, गुप्तरोग, नको असलेले गर्भारपण, गर्भपात, बिघडलेला नातेसंबंध, दोषी विवेक, या सर्व गोष्टी भोगाव्या लागतात. अनैतिक मार्गावर चालणाऱ्यांचे काय होईल त्याविषयी प्रेषित पौलाने स्पष्टपणे असे म्हटले: “ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—१ करिंथकर ६:९, १०.
टेहळणी बुरूज१० ११/१५ ५-६ ¶१५-१६
मुलांनो—देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चाला
१५ तुम्हाला काय वाटते? देवाप्रती असलेल्या तुमच्या एकनिष्ठेची परीक्षा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता केव्हा असते? तुम्ही चारचौघांत असता तेव्हा, की एकटे असता तेव्हा? शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी असताना तुम्ही सहसा संभाव्य आध्यात्मिक धोक्यांचा प्रतिकार करण्यास जागरूक असता. पण, एखाद्या विरंगुळ्याच्या क्षणी तुम्ही अगदी निवांत असता तेव्हा तुमच्या नैतिक स्तरांवर हल्ला होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते.
१६ तुम्ही एकटे असता तेव्हादेखील यहोवाच्या आज्ञांचे पालन का केले पाहिजे? एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या: तुम्ही एकतर यहोवाच्या भावना दुखावू शकता किंवा त्याचे मन आनंदित करू शकता. (उत्प. ६:५, ६; नीति. २७:११) तुमच्या प्रत्येक कृतीचा यहोवावर परिणाम होतो कारण त्याला “तुमची काळजी” आहे. (१ पेत्र ५:७) देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्या आज्ञांकडे लक्ष द्यावे अशी त्याची इच्छा आहे. (यश. ४८:१७, १८) प्राचीन इस्राएल राष्ट्रातील यहोवाच्या काही सेवकांनी देवाच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्याचे मन खूप दुखावले. (स्तो. ७८:४०, ४१) याउलट, दानीएल संदेष्ट्याविषयी यहोवाच्या मनात अतीव प्रेम दाटून आले. म्हणूनच, देवाच्या एका दूताने त्याला ‘परमप्रिय पुरुष’ असे म्हटले. (दानी. १०:११) दानीएलाविषयी देवाला असे का वाटले? कारण दानीएल केवळ चारचौघांतच नव्हे, तर एकटा असतानादेखील देवाला एकनिष्ठ राहिला.—दानीएल ६:१० वाचा.
आध्यात्मिक रत्नं
टेहळणी बुरूज०५-HI ११/१५ ११ ¶३
प्यार से सुनने की कला
अय्यूब के दोस्तों ने कम-से-कम दस बार उसकी बात काफी देर तक सुनी थी। फिर भी अय्यूब ने अपने दिल का दर्द ज़ाहिर करते हुए कहा: “भला होता कि मेरा कोई सुननेवाला होता!” (अय्यूब ३१:३५) अय्यूब ने ऐसा क्यों कहा? क्योंकि उन दोस्तों का सुनना और न सुनना एक बराबर था, अय्यूब को उनसे कोई तसल्ली नहीं मिली। उन्होंने अय्यूब की भावनाओं का बिलकुल लिहाज़ नहीं किया, ना ही उन्हें समझने की कोशिश की। बेशक, उनके दिल में अय्यूब के लिए ज़रा भी हमदर्दी नहीं थी। मगर प्रेरित पतरस हमें सलाह देता है: “सब के सब एक मन और कृपामय [“हमदर्द,” हिन्दुस्तानी बाइबल] और भाईचारे की प्रीति रखनेवाले, और करुणामय, और नम्र बनो।” (१ पतरस ३:८) हम दूसरों के साथ हमदर्दी कैसे दिखा सकते हैं? एक तरीका है, उनकी भावनाओं का लिहाज़ करना और उन्हें समझने की कोशिश करना। उनकी खातिर अपनी परवाह ज़ाहिर करने के लिए हम कुछ ऐसा कह सकते हैं, जैसे “इस बात से ज़रूर आपको बहुत दुःख हुआ होगा” या “इस गलतफहमी से ज़रूर आपको बुरा लगा होगा।” अपनी परवाह दिखाने का एक और तरीका है, उनकी बात को अपने शब्दों में दोहराना। ऐसा करना दिखाएगा कि हम उनकी बात समझ रहे हैं। तो प्यार से सुनने का मतलब न सिर्फ सामनेवाले के शब्दों पर ध्यान देना है, बल्कि शब्दों के पीछे छिपी भावनाओं को भी समझना है।