ख्रिस्ती जीवन
JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
आजच्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी लागणारं मार्गदर्शन आपल्याला देवाच्या वचनात सापडतं. (२ती ३:१, १६, १७) पण कधीकधी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत बायबलची नेमकी कोणती तत्त्वं लागू होतात हे आपल्याला लगेच कळत नाही. कदाचित तुम्ही मुलांना कसं वाढवावं याबद्दल मार्गदर्शन शोधत असाल. किंवा तुम्ही तरुण असाल आणि ख्रिस्ती तरुणांना येणाऱ्या समस्यांचा सामना कसा करावा यावरची माहिती शोधत असाल. किंवा, आपल्या जोडीदाराला गमवल्यामुळे तुम्ही दुःखी असाल. या आणि यांसारख्या बऱ्याच परिस्थितींत लागू होणारी विशिष्ट बायबल तत्त्वं jw.org वर दिलेल्या साहित्यात सापडतील.—नीत २:३-६.
सगळ्यात आधी jw.org च्या होम पेजवर बायबलच्या शिकवणी या टॅबवर क्लिक करा. (चित्र १ पाहा.) मग लिस्टमधून तुम्हाला आवडणारा विषय निवडा. किंवा लायब्ररी > लेखमालिका सिलेक्ट करा आणि मग तुमच्या आवडीचा विषय निवडा. (चित्र २ पाहा.) JW लायब्ररीa ॲपवरसुद्धा तुम्हाला हे विषय पाहायला मिळतील. jw.org वर किंवा JW लायब्ररी ॲपवर तुम्ही वेगवेगळ्या विषयांबद्दल कोणती माहिती उपलब्ध आहे ते पाहू शकता. आणखी एक पर्याय म्हणजे, jw.org वर असलेल्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या आवडीचा विषय टाकून तुम्ही माहिती शोधू शकता.
सर्च बॉक्समध्ये खाली दिलेले विषय टाका आणि तिथे दाखवलेल्या लेखांपैकी तुम्हाला कोणते वाचायला आवडतील ते लिहा.
मुलांचं संगोपन
तरुणांमध्ये नैराश्य
जोडीदाराचा मृत्यू
a काही लेखमालिकांमधले सगळे लेख सध्या फक्त jw.org वर उपलब्ध आहेत.