ख्रिस्ती जीवन
बहिणी यहोवाच्या सेवेत आणखी काय काय करू शकतात?
प्रचाराच्या कामात बहिणींचा खूप मोठा वाटा आहे. (स्तो ६८:११) त्या बरेच बायबल अभ्यास चालवतात आणि पायनियर सेवा करणाऱ्यांमध्येही बहिणींची संख्या सगळ्यात जास्त आहे. शिवाय, आपल्या हजारो बहिणी बेथेल सेवेत, मिशनरी सेवेत, बांधकाम आणि भाषांतर विभागात मेहनत घेत आहेत. मजबूत विश्वास असणाऱ्या बहिणी आपल्या कुटुंबापुढे एक चांगलं उदाहरण मांडतात आणि मंडळीलाही प्रोत्साहन देतात. (नीत १४:१) मंडळीत बहिणी, सहाय्यक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करू शकत नसल्या तरी त्या वेगवेगळ्या मार्गांनी मंडळीला मदत करू शकतात. ते कसं?
देवाला आवडणारे गुण वाढवून—१ती ३:११; १पेत्र ३:३-६
मंडळीतल्या तरुण आणि नवीन बहिणींना मदत करून—तीत २:३-५
प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती शिकून आणि आपली सेवा वाढवून
नवीन भाषा शिकून
जास्त गरज असलेल्या भागात सेवा करून
बेथेल सेवेचा अर्ज भरून किंवा बांधकामाच्या कामात मदत करून
सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरून
‘प्रभूमध्ये भरपूर कष्ट करणाऱ्या स्त्रिया’ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
या प्रत्येक बहिणीकडून तुम्हाला काय प्रोत्साहन मिळालं?