वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. ११
  • यहोवाची सेवा करायचं निवडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची सेवा करायचं निवडा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • बाप्तिस्मा—एक महत्त्वाचं ध्येय!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बाप्तिस्मा—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. ११
एक वळणदार रस्ता आहे. या रस्त्याची तुलना यहोवाच्या सेवेशी केली आहे. रस्त्याच्या कडेला लावलेली चिन्हं बायबल विद्यार्थ्याने प्रगती करत असताना घेतलेल्या पावलांना सूचित करतात. १. बायबल अभ्यास २. सभांची उपस्थिती ३. प्रचारकार्य आणि ४. बाप्तिस्मा.

बाप्तिस्म्याच्या वाटेवर तुमचा प्रवास कुठपर्यंत झाला आहे?

ख्रिस्ती जीवन

यहोवाची सेवा करायचं निवडा

तुम्ही एक तरुण बाप्तिस्मारहित प्रचारक आहात का? तुमचा बायबल अभ्यास चालू आहे का आणि बाप्तिस्मा घ्यायची तुमची इच्छा आहे का? पण बाप्तिस्मा घेणं का गरजेचं आहे? समर्पण आणि बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला यहोवासोबत मैत्री करता येते. (स्तो ९१:१) त्यामुळे आपला जीव वाचू शकतो. (१पेत्र ३:२१) हा निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोणती पाऊलं उचलू शकता?

तुम्ही जे शिकत आहात तेच सत्य आहे, याबद्दल स्वतःला खात्री पटवून द्या. एखाद्या गोष्टीविषयी शंका असेल तर त्याबद्दल रिसर्च करा. (रोम १२:२) तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायची गरज आहे का, ते तपासून पाहा. आणि असतील तर ते बदल करा. कारण यामुळे यहोवा खूश होईल. (नीत २७:११; इफि ४:२३, २४) शिवाय, मदतीसाठी त्याला प्रार्थना करा. मग तो तुम्हाला त्याची पवित्र शक्‍ती देऊन योग्य ते बदल करायला मदत करेल. (१पेत्र ५:१०, ११) यहोवाला खूश करण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घ्याल, ती कधीच वाया जाणार नाही. यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळेल, तो दुसऱ्‍या कशातूनही मिळणार नाही!—स्तो १६:११.

बाप्तिस्म्याचा मार्ग  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बाप्तिस्मा घेण्यासाठी काहींना कोणत्या काही समस्यांना तोंड द्यावं लागलं?

  • यहोवाला जीवन समर्पित करण्यासाठी तुम्ही आपला विश्‍वास कसा वाढवू शकता?

  • काहींना बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य ते बदल करायला कोणत्या गोष्टीने मदत केली?

  • जे यहोवाची सेवा करायचं निवडतात, त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

  • समर्पणाचा आणि बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो?

बाप्तिस्म्याच्या भाषणानंतर वक्‍ता बाप्तिस्म्याच्या उमेदवारांना उभं राहायला सांगतो आणि पुढे दिलेल्या दोन प्रश्‍नांची उत्तर मोठ्या आवाजात द्यायला सांगतो:

तुम्ही तुमच्या पापांबद्दल खरा पश्‍चात्ताप करून यहोवा देवाला तुमचं जीवन सर्मपित केलं आहे का, आणि यहोवा देव येशू ख्रिस्ताद्वारे सर्वांचा उद्धार करणार आहे, या गोष्टीचा स्वीकार केला आहे का?

बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला एक यहोवाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाईल आणि तुम्ही यहोवाच्या संघटनेचा भाग बनाल, याची तुम्हाला जाणीव आहे का?

तुम्ही दिलेल्या स्पष्ट आणि होकारार्थी उत्तरांवरून हे “जाहीर” होतं, की तुम्हा सर्व बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांनी येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे आणि मनापासून यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे.—रोम १०:९, १०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा