वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. ३
  • पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. ३
पालक मुलांकडून स्वतःचं सरंक्षण कसं करायचं, याचा सराव करून घेत आहेत आणि मुलं चुकीच्या गोष्टींसाठी ‘नाही!’ असं हाताने दाखवत आहेत.

ख्रिस्ती जीवन

पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा

आपण अशा जगात राहतो, जिथं चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हटलं जातं. (यश ५:२०) काही लोक अशा गोष्टी करतात ज्या गोष्टींची यहोवाला घृणा वाटते. जसं की पुरूष, पुरुषांसोबत आणि स्त्रिया, स्त्रियांसोबत लैगिंक संबध ठेवतात. शाळेत असणारी मुलं किंवा इतर जण तुमच्या मुलांवरही वाईट कामं करायचा दबाव आणू शकतात. मग अशा प्रकारच्या दबावांचा सामना यशस्वीपणे करायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता?

यासाठी मुलांना यहोवाच्या नजरेत काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, ते शिकवलं पाहिजे. (लेवी १८:३) मुलांचं वय लक्षात घेऊन, त्यांना हळूहळू या गोष्टीची माहिती द्या, की बायबल योग्य लैगिंक संबंधाबद्दल काय म्हणतं. (अनु ६:७) स्वतःला विचारा: ‘मी माझ्या मुलांना याबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल शिकवलं आहे का? जसं की, प्रेम व्यक्‍त करायची कोणती पद्धत योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे? संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे घालणं का महत्त्वाचं आहे? इतरांनी आपल्या शरीराला पाहणं किंवा अयोग्य पद्धतीने स्पर्श करणं का चुकीचं आहे? जर कोणी आपल्या मुलांना अश्‍लील चित्रं दाखवली किंवा यहोवाला आवडत नाही असं काहीतरी करायला सांगितलं, तर अशा वेळी काय केलं पाहिजे हे माझ्या मुलांना माहीत आहे का?’ मुलांना आधीच या गोष्टींबद्दल माहिती दिल्यामुळे त्यांना पुढे येणारे धोके टाळता येतील. (नीत २७:१२; उप ७:१२) अशा प्रकारे मुलांना प्रशिक्षण दिल्यामुळे तुम्ही हे दाखवून देता, की मुलं ही यहोवाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे.—स्तो १२७:३.

टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांचं उत्तर द्या:

  • टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एक आई आपल्या मुलासोबत ‘तुमच्या मुलांचं रक्षण करा’ हा व्हिडिओ बघत आहे.

    आपल्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती द्यायला काही पालकांना संकोच का वाटतो?

  • टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. पालक आपल्या मुलांसोबत ‘महान शिक्षक से सीखिए’ या आणि इतर प्रकाशनांमधून चर्चा करत आहेत.

    पालकांनी आपल्या मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” का वाढवलं पाहिजे?—इफि ६:४

  • टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. आफ्रिकेत असलेले पालक आपल्या मुलांसोबत बायबल वचनांवर चर्चा करत आहेत.

    माहितीमुळे संरक्षण होतं

    संघटनेने पुरवलेल्या कोणत्या साहित्यांचा वापर करून पालक आपल्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती देऊ शकतात?—टेहळणी बुरूज१९.०५ १२ वरील चौकट

  • आपली मुलं मोठ्या समस्येत अडकण्याआधीच आपण त्यांच्याशी या विषयावर नियमितपणे बोलणं का गरजेचं आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा