वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr20 ऑक्टोबर पृ. १-२
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
  • उपशिर्षक
  • २६ ऑक्टोबर—१ नोव्हेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
mwbr20 ऑक्टोबर पृ. १-२

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

२६ ऑक्टोबर—१ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  निर्गम ३७-३८

“निवासमंडपातल्या वेदी आणि खऱ्‍या उपासनेत त्यांची भूमिका”

इन्साइट-१ पृ. ११९५

धूप

निवासमंडपासाठी वापरला जाणारा धूप हा इस्राएली लोकांनी दान म्हणून दिलेल्या महागड्या वस्तूंपासून बनवला जायचा. (निर्ग २५:१,२,६; ३५:४, ५, ८, २७-२९) यहोवा देवाने मोशेला चार पदार्थांचे मिश्रण करून तो धूप बनवायला सांगितला होता. त्याने मोशेला म्हटलं: “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी; ही सर्व समभाग घ्यावी; आणि गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे; त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातल्या ज्या कोशापुढे मी तूला दर्शन देत जाईल त्यात ठेवावे. ते तुम्ही परमपवित्र लेखावे.” तो धूप किती पवित्र आणि खास होता हे समजवण्यासाठी यहोवाने त्यांना म्हटलं: “कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”— निर्ग ३०:३४-३८; ३७:२९

इन्साइट-१ पृ. ८२ परि. १

वेदी

निवासमंडपातल्या वेदी. यहोवाने सूचना दिल्याप्रमाणे निवासमंडपात दोन वेद्या बांधण्यात आल्या होत्या. होमबलीची वेदी (जिला “पितळी वेदी” असंही म्हटलं जायचं [निर्ग ३९:३९]) बाभळीच्या लाकडापासून बनवलेली एक पोकळ पेटी होती. ती खालच्या किंवा वरच्या बाजूने झाकलेली नव्हती. तिची लांबी आणि रूंदी २.२ मी. (७.३ फूट) तर उंची १.३ मी. (४.४ फूट) इतकी होती. वेदीच्या चारही कोपऱ्‍यांना शिंगं होती. वेदी सगळ्या बाजूंनी पितळेने मढवलेली होती. वेदीसाठी एक पितळेची जाळीही बनवण्यात आली होती. ती जाळी वेदीच्या आत लावली जायची. तिला वेदीच्या “कंगोऱ्‍याच्या खाली” म्हणजे वेदीच्या मध्यभागी लावलं जायचं. “ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यत होती.” जाळीच्या चारही कोपऱ्‍यांजवळ कड्या बनवण्यात आल्या होत्या. वेदी उचलण्यासाठी पितळेने मढवलेले बाभळीच्या लाकडाचे दांडे त्यात घातले जायचे. जाळी आत बसवण्यासाठी वेदीला खाचा बनवण्यात आल्या होत्या. वेदी उचलण्यासाठी बनवण्यात आलेल्या कड्या बाहेरच्या बाजूला होत्या. काही विद्वानांच्या मते त्या कड्या वेदीच्या दोन्ही बाजूला होत्या, तर काहींच्या मते त्या जाळीच्या दोन्ही बाजूला होत्या. वेदीवरची राख उचलण्यासाठी हंड्या आणि फावडी वापरली जायची. प्राण्यांचं रक्‍त कटोऱ्‍यांमध्ये जमा केलं जायचं. आणि मांसासाठी काटे वापरले जायचे. या सर्व वस्तू आणि अग्नीपात्र पितळेचं होतं.—निर्ग २७:१-८; ३८:१-७, ३०; गण ४:१४.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ३६

बाभळीचं लाकूड

बाभळीच्या लाकडाची साल काळी आणि खडबडीत असते. तिचं लाकूड कडक आणि वजनदार असतं. बाभळीच्या लाकडाच्या रेषा एकदम जवळजवळ आणि सूक्ष्म असतात व त्याला किड लागत नाही. या सर्व गोष्टींमुळे आणि वाळवंटात ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे बाभळीचं लाकूड निवासमंडप आणि त्यातल्या वस्तू बनवण्यासाठी सर्वात चांगलं होतं. बाभळीच्या लाकडाचा वापर, कराराचा कोष (निर्ग २५:१०; ३७:१), समक्षतेच्या भाकरीचा मेज (निर्ग २५:२३; ३७:१०), वेदी (निर्ग २७:१; ३७:२५; ३८:१), दांडे (निर्ग २५:१३,२८; २७:६; ३०:५; ३७:४, १५, २८; ३८:६), पडद्यासाठी असलेले खांब (निर्ग २६:३२, ३७; ३६:३६), लाकडाच्या उभ्या फळ्या (निर्ग २६:१५; ३६:२०) आणि त्या जोडण्यासाठी अडसर (निर्ग २६:२६; ३६:३१) या गोष्टी बनवण्यासाठी करण्यात आला.

टेहळणी बुरूज१५-E ४/१ पृ. १५ परि. ४

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन काळातले आरसे आपल्या काळातल्या आरशांसारखे काचेचे नव्हते. ते सहसा कांस्य किंवा कधीकधी तांबं, सोनं, चांदी अशा धातूंना चकचकीत करून त्यांच्यापासून बनवले जायचे. या आरशांचा उल्लेख बायबलमध्ये पहिल्यांदा निवासमंडपाचं बांधकाम करण्याच्या वेळी करण्यात आला आहे.—निर्गम ३८:८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा