वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr20 नोव्हेंबर पृ. १-३
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
  • उपशिर्षक
  • २-८ नोव्हेंबर
  • ९-१५ नोव्हेंबर
  • १६-२२ नोव्हेंबर
  • २३-२९ नोव्हेंबर
  • ३० नोव्हेंबर–६ डिसेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
mwbr20 नोव्हेंबर पृ. १-३

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

२-८ नोव्हेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा:

इन्साइट-२ पृ. ८८४ परि. ३

तहशाची कातडी

इस्राएली लोकांना कशी मिळाली.  तहश किंवा सील हा समृद्री प्राणी आर्क्टिक किंवा अंटार्क्टिक प्रदेशात पाहायला मिळतो. पण सीलच्या काही जाती उष्ण वातावरणातसुद्धा राहतात. बायबल काळात हे प्राणी भूमध्य समुद्रात आणि तांबड्या समुद्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असावेत. १८३२ च्या कॅलमेट्‌स डिक्शनरी ऑफ द होली बायबल,  इंग्रजी आवृत्ती (पृ. १३९) या पुस्तकानुसार, “लाल समुद्र आणि सीनायच्या आसपास असलेल्या छोट्या-छोट्या द्वीपांवर सील पाहायला मिळतात.”

प्राचीन इजिप्तचे लोक व्यापार करण्यासाठी तांबड्या समुद्राचा वापर करायचे. तसंच, भूमध्य सागराच्या प्रदेशातूनही सामनाची देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे इजिप्तच्या लोकांना तहशाची कातडी सहजपणे मिळाली असावी. इस्राएली लोकांकडेही त्यावेळी तहशाची कातडी असावी. जेव्हा त्यांनी इजिप्त सोडलं तेव्हा त्यांनी इतर मौल्यवान वस्तूंसोबत इजिप्तच्या लोकांकडून आणखी तहशाची कातडी मिळवली असेल.​—निर्ग १२:३५, ३६.

९-१५ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |   लेवीय१-३

“बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?”

इन्साइट-२ पृ. ५२५

अर्पण

होमार्पण.  होमार्पण एक असं अर्पण होतं ज्यात संपूर्ण प्राणी यहोवाला दिला जायचा आणि त्याचा कोणताही भाग राखून ठेवला जात नव्हता. (शास ११:३०,३१, ३९, ४० तुलना करा.) सहसा होमार्पणासोबत पापार्पणही दिलं जायचं. होमार्पण करणारी व्यक्‍ती जणू यहोवाला तिचे पापार्पण कबूल करण्याची विनंती करायची. येशूनेही होमार्पणाप्रमाणे स्वतःला पूर्णपणे यहोवाला अर्पण केलं.

इन्साइट-२ ५२८ परि. ४

अर्पण

अन्‍नार्पण.  अन्‍नार्पण हे शांती-अर्पण, होमार्पण आणि पापार्पण यांच्यासोबत दिलं जायचं. तसंच, पहिलं पीकही अन्‍नार्पण म्हणून दिलं जायचं. कधी कधी फक्‍त अन्‍नार्पणच दिलं जायचं. (निर्ग २९:४०-४२; लेवी २३:१०-१३, १५-१८; गण १५:८, ९, २२-२४; २८: ९, १०, २०, २६-२८; अध्या. २९) यहोवाने आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि भरभराट दिली आहे हे दाखवण्यासाठी एक व्यक्‍ती अन्‍नार्पण द्यायची.

१६-२२ नोव्हेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ११३० परि. २

पवित्रता

प्राणी आणि उपज.  यहोवासाठी राखून ठेवलेल्या सर्व गोष्टी पवित्र होत्या. त्यांना कोणीही कमी लेखायचं नव्हतं आणि गैरवापर करून त्यांचा अनादर करायचा नव्हता. दशमांशबद्दल असलेल्या नियमावरून आपल्याला हे दिसून येतं. समजा, एखाद्याने दशमांश देण्यासाठी धान्याचा काही भाग वेगळा ठेवला. आणि त्याने किंवा त्याच्या घरातल्या एखाद्या व्यक्‍तीने स्वयंपाकासाठी नकळत त्याचा वापर केला, तर त्या व्यक्‍तीने देवाच्या पवित्र गोष्टींचा आदर करण्याचा नियम मोडल्यामुळे तिला दोषी ठरवलं जायचं. यावरून दिसून येतं की यहोवासाठी राखून ठेवलेल्या सर्व पवित्र गोष्टींना खूप आदर दिला जायचा.—लेवी ५:१४-१६.

२३-२९ नोव्हेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ८३३ परि. १

आग

उपासना मंडप आणि मंदिरात असलेली आग.  वेदीवर जळत असलेली आग देवाने चमत्कार करून लावली असा विश्‍वास बरेच यहुदी लोक करतात. पण हे बायबलमध्ये दिलेल्या माहितीच्या विरोधात आहे. यहोवाने मोशेला आधीच आज्ञा दिली होती की अहरोनच्या मुलांनी वेदीवर बलिदान ठेवण्याआधी “वेदीवर आग पेटवावी आणि आगीवर लाकडं रचून ठेवावीत.” (लेवी १:७, ८.) अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून नियुक्‍त केल्यानंतर बलिदानं दिली गेली. त्यानंतर यहोवाने उपासना मंडपावर असलेल्या ढगातून आग पाठवून वेदीवर असलेल्या बलिदानाला भस्म केलं. यावरून कळतं की यहोवाने चमत्कार करून वेदीवर असलेल्या लाकडांना आग लावली नव्हती तर त्याने ‘वेदीवर असलेले होमार्पणाचे आणि चरबीचे तुकडे भस्म’ करण्यासाठी आग पाठवली होती. अशा प्रकारे, वेदीवर असलेली आग याजकांनी लावली होती आणि बलिदानाला भस्म करण्यासाठी यहोवाने आग पाठवली होती.—लेवी ८:१४-९:२४.

ऑल स्क्रिप्चर  पृ. २७ परि. १५

बायबलमधलं तिसरं पुस्तक—लेवीय

१५ (३) पापार्पण हे नकळत किंवा चुकून झालेल्या पापांसाठी दिलं जायचं. होमार्पण आणि शांती-अर्पण हे स्वेच्छेने दिलं जायचं. पण पापार्पण देणं हे एखाद्याच्या इच्छेवर अवलंबून नव्हतं तर ते पाप केलेल्या व्यक्‍तीला द्यावंच लागायचं.—लेवी ४:१-३५; ६:२४-३०.

३० नोव्हेंबर–६ डिसेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं   |   लेवीय८-९

“यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा”

इन्साइट-१ पृ. १२०७

याजकांची नियुक्‍ती

मोशेने नादाब, अबीहू, इलाजार आणि इथामार यांना अंगणात असलेल्या तांब्याच्या भांड्याजवळ अंघोळ घातली. (किंवा त्याने त्यांना अंघोळ करायची आज्ञा दिली.) त्याने अहरोनला महायाजकाचे कपडे घातले. (गण ३:२, ३) अहरोनला हा खास पोशाख देण्यात आला आणि तो त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या जबाबदारीला सूचित करत होता. मोशेने उपासना मंडपाचा आणि त्यातल्या सर्व वस्तूंचा, होमपर्णाच्या वेदीचा, तसंच तांब्याच्या मोठ्या भांड्याचा व त्याच्यासोबत असलेल्या इतर भांड्यांचा अभिषेक केला. अशा प्रकारे या सर्व गोष्टींना पवित्र केलं गेलं आणि त्यांचा वापर आता फक्‍त यहोवाच्या सेवेसाठी केला जाणार होता. शेवटी मोशेने अहरोनच्या डोक्यावर तेल ओतून त्याचा अभिषेक केला.—लेवी ८: ६-१२; निर्ग ३०: २२-३३; स्तो १३३:२.

इन्साइट-१ पृ. १२०८ परि. ८

याजकांची नियुक्‍ती

याजक म्हणून नियुक्‍त झाल्यावर आठव्या दिवशी अहरोन आणि त्याच्या मुलांनी (मोशेशिवाय) पहिल्यांदा याजकाचं काम सुरू केलं. त्यांनी इस्राएली राष्ट्रासाठी प्रायश्‍चित्ताचं बलिदान दिलं. इस्राएली लोक जन्मत:च अपरिपूर्ण होते. शिवाय त्यांनी सोन्याचं वासरू बनवून आज्ञा मोडल्यामुळेही त्यांना शुद्ध करणं गरजेचं होतं. इस्राएली लोकांनी सोन्याच्या वासराची उपासना केल्यामुळे यहोवाला खूप दु:ख झालं होतं. (लेवी ९:१-७; निर्ग ३२:१-१०) या नवीन नियुक्‍त झालेल्या याजकांनी पहिल्यांदा बलिदान दिल्यानंतर यहोवाने त्यांना आपली स्वीकृती दाखवली. त्याने उपसना मंडपाच्या वर असलेल्या ढगातून अग्नी पाठवला आणि वेदीवरचं बलिदान भस्म केलं.—लेवी ९:२३, २४.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. ४३७ परि. ३

मोशे

इस्राएली लोकांसोबत करार करण्यासाठी देवाने मोशेला मध्यस्थ नेमलं होतं. ही जबाबदारी नव्या कराराचा मध्यस्थ असलेल्या येशूशिवाय इतर कोणत्याही व्यक्‍तीला देण्यात आली नव्हती. मोशेने कराराचे सर्व नियम लोकांना वाचून दाखवले. मग लोकांनी त्याला उत्तर दिलं, “यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्याच्या आज्ञा पाळू.” (निर्ग २४:३-८; इब्री ९:१९) मोशे कराराचा मध्यस्त असल्यामुळे त्याने कराराच्या पुस्तकावर बलिदानाचं रक्‍त शिंपडलं (हा करार यहोवा आणि त्याच्या लोकांमधला होता). तसंच त्याने यहोवाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उपासना मंडपाच्या बांधकामाची आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर भांड्यांना बनवण्याच्या कामाचीही देखरेख केली. त्याचबरोबर मोशेने याजकांना नियुक्‍त केलं. त्याने उपासना मंडपाचा आणि महायाजक असलेल्या अहरोनचा खास तयार केलेल्या तेलाने अभिषेक केला. तसंच, मोशेच्याच देखरेखीखाली नवीनच नियुक्‍त केलेल्या याजकांनी पहिल्यांदा आपली जबाबदारी हातात घेतली.—निर्ग अध्या. २५-२९; लेवी अध्या. ८, ९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा