देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३३-३४
यहोवाचे आकर्षक गुण
मोशेला यहोवाचे गुण चागंल्या प्रकारे माहित असल्यामुळे तो इस्राएली लोकांसोबत वागताना धीर दाखवू शकला. आपणही यहोवाच्या गुणांबद्दल खोलवर माहिती घेतली, तर आपल्या भाऊबहिणींशी आपल्याला दयाळूपणे वागता येईल.
“दयाळू व कृपाळू”: प्रेमळ आईवडील जशी आपल्या मुलांची काळजी घेतात तसंच, यहोवाही आपल्या उपासकांवर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो.
“मंदक्रोध”: यहोवा त्याच्या सेवकांसोबत धीराने वागतो. तो त्यांच्या चुकांसाठी त्यांना लगेच शिक्षा करत नाही तर त्या सुधारण्यासाठी त्यांना वेळ देतो.
‘दयेचा सागर’: यहोवाचं त्याच्या लोकांवर एकनिष्ठ प्रेम आहे आणि त्याचं हे प्रेम कधीच कमी होत नाही.
स्वतःला विचारा, ‘मी दया आणि कृपा या यहोवाच्या गुणांचं अनुकरण कसं करू शकतो?’