वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. ५
  • तरूणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरूणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • माझ्या जिवलग स्नेह्‍याने स्थलांतर का केले?
    सावध राहा!—१९९७
  • यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • यहोवा तुझे मित्र कोण?
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. ५
एक तरूण बांधव मन लावून वैयक्‍तिक अभ्यास करत आहे.

ख्रिस्ती जीवन

तरुणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का?

तुम्ही कसा मित्र निवडाल? तुम्ही कदाचित असा मित्र निवडाल जो तुम्हाला कधीही सोडणार नाही, नेहमी तुमची काळजी घेईल आणि तुमची मदत करायला कधीही तयार असेल. यहोवा अगदी अशाच प्रकारची व्यक्‍ती आहे. (निर्ग ३४:६; प्रेका १४:१७) जेव्हा तुम्ही त्याला प्रार्थना करता तेव्हा तो तुमचं ऐकतो. तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तो मदत करायला नेहमी तयार असतो. (स्तो १८:१९, ३५) तुमच्याकडून चूक झाली तरी तो ती माफ करतो. (१यो १:९) यहोवापेक्षा आणखी चांगला मित्र कोणी असूच शकत नाही!

तुम्ही यहोवाचे मित्र कसे बनू शकता? तो कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे माहीत करून घेण्यासाठी बायबल वाचा. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट त्याला सांगा. (स्तो ६२:८; १४२:२) यहोवासाठी जे महत्त्वाचं आहे ते तुमच्यासाठीही महत्त्वाचं आहे हे दाखवा. जसं की, त्याचा मुलगा, त्याचं राज्यं, आणि भविष्यासाठी त्याने दिलेली वचनं. त्याच्याबद्दल इतरांना सांगा. (अनु ३२:३) तुम्ही जर यहोवाशी पक्की मैत्री केली तर तो कायमचा तुमचा मित्र बनून राहिल.—स्तो ७३:२५, २६, २८.

तरुणांनो—“परमेश्‍वर किती चांगला आहे  याचा अनुभव घेऊन पाहा,” हा व्हिडिओ बघा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा’ या व्हिडिओमधलं एक दृष्य. वैयक्‍तिक अभ्यास सुरू करण्याआधी प्रार्थना करताना एक तरूण बहीण.

    समर्पण करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता?

  • ‘परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा’ या व्हिडिओमधलं एक दृष्य. एक बांधव एका व्यक्‍तीला केरेन सा भाषेमध्ये वचन दाखवत आहे.

    मंडळीच्या भाऊबहिणींच्या मदतीने तुम्ही यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे कशी करू शकता?

  • ‘परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा’ या व्हिडिओमधलं एक दृष्य. वृद्ध भाऊबहिणींबद्दल कदर असलेला एक तरूण, एका वृद्ध बांधवाला सेवाकार्यात मदत करत आहे.

    सेवाकार्यात भाग घेतल्यामुळे यहोवाशी तुमचं नातं आणखी मजबूत कसं होऊ शकतं?

  • ‘परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा’ या व्हिडिओमधलं एक दृष्य. घरापासून दोन तास पायी चालत जाऊन एक बहीण एका मुखबधिर मुलीसोबत बायबल अभ्यास करते.

    यहोवासोबत असलेली आपली मैत्री कायम टिकून राहू शकते!

    तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी यहोवाची सेवा करू शकता?

  • यहोवाबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा