देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १७-१८
नम्र वडील इतरांना प्रशिक्षण देतात आणि जबाबदाऱ्या सोपवतात
नम्रता, प्रेम आणि दूरदृष्टी दाखवणारे अनुभवी भाऊ, तरुण भावांना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवतात. हे ते कसं करू शकतात?
जे जास्त जबाबदारी घेऊ शकतील अशा भावांना निवडा
एखादं काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना स्पष्टपणे सांगा
काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे, साधनं किंवा इतर मदत त्यांना द्या
काम कसं चाललं आहे याची वेळोवेळी विचारपूस करा आणि शिकणाऱ्या भावाबद्दल भरवसा व्यक्त करा
स्वतःला विचारा, ‘मला कोणत्या जबाबदाऱ्या इतरांना सोपवता येतील?’