ख्रिस्ती जीवन
अंत जवळ येत असताना यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निश्चय करा
हे का महत्त्वाचं: लवकरच काही विलक्षण घटना घडणार आहेत. त्या वेळी आपल्याला धैर्य दाखवण्याची आणि यहोवावर भरवसा ठेवण्याची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज असेल. खोट्या धर्मांच्या नाशाने मोठ्या संकटाची सुरुवात होईल. (मत्त २४:२१; प्रक १७:१६, १७) सगळीकडे गोंधळ माजलेला असेल. अशा परिस्थितीत कदाचित आपल्याला न्यायदंडाचा कठोर संदेश लोकांना सांगावा लागेल. (प्रक १६:२१) यासोबतच, मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करेल. (यहे ३८:१०-१२, १४-१६) मग यहोवा आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाचं युद्ध’ सुरू करेल. (प्रक १६:१४, १६) भविष्यात होणार असलेल्या या घटनांसाठी आपण आपलं धैर्य कसं वाढवू शकतो? त्यासाठी, आज आपल्या विश्वासाची परीक्षा होते, तेव्हा आपण यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केला पाहिजे.
हे कसं करावं:
यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांचं धैर्याने समर्थन करा.—यश ५:२०.
ख्रिस्ती भाऊबहिणींसोबत उपासना करायचं सोडू नका.—इब्री १०:२४, २५.
यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं लगेच पालन करा.—इब्री १३:१७.
यहोवाने पूर्वीच्या काळात आपल्या लोकांना कसं वाचवलं यावर मनन करा.—२पेत्र २:९.
यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्यावर भरवसा ठेवा.—स्तो ११२:७, ८.
भविष्यातील घटनांसाठी धैर्य उत्पन्न करण्याची गरज—निवडक भाग हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
एका मंडळीच्या काही प्रचारकांना दुसऱ्या मंडळीत जायला सांगण्यात आलं, तेव्हा आज्ञा पाळण्याच्या बाबतीत त्यांची कशी परीक्षा झाली?
धैर्याचा आज्ञा पाळण्याशी काय संबंध आहे?
हर्मगिदोन येईल तेव्हा आपल्याला धैर्याची गरज का असेल?
भविष्यातल्या घटनांचा धैर्याने सामना करण्यासाठी आतापासूनच तयारी करा
यहोवा आपल्याला वाचवू शकतो या गोष्टीवर आपला विश्वास, बायबलमधल्या कोणत्या अहवालामुळे मजबूत होतो?—२इत २०:१-२४.