देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १३-१४
“स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा”
यहोवा आपल्या लोकांचं तारण करताना त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्याशी प्रेमाने वागतो. इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणताना, त्याने त्या सर्वांबद्दल प्रेम आणि काळजी कशी दाखवली?
त्याने त्यांना सैन्यांच्या तुकड्यांप्रमाणे सुव्यस्थितपणे बाहेर आणलं.—निर्ग १३:१८
त्याने त्यांचं मार्गदर्शन आणि संरक्षण केलं.—निर्ग १४:१९, २०.
त्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, आपल्या सर्व लोकांची सुटका केली.—निर्ग १४:२९, ३०.
मोठं संकट जवळ येत असताना तुम्ही कोणती खात्री बाळगू शकता?—यश ३०:१५