वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ७
  • यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • “जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • बेल्जियम शाखेतलं बायबल संग्रहालय देवाचं वचन टिकवून ठेवायच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतं
    आणखी विषय
  • यहोवाचे वचन कधीही टळत नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ७

ख्रिस्ती जीवन

यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करतो

एक इस्राएली आपल्या मुलासोबत दाराच्या चौकटीवर रक्‍त लावत आहे.

पहिलं वल्हांडण ही एक फार महत्त्वाची घटना होती. त्या रात्री, इजिप्तमधले सगळे पहिले जन्मलेले मरण पावले. हे पाहून फारो मोशेला म्हणाला: “तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्‍वराची सेवा करा.” (निर्ग १२:३१) त्या रात्री यहोवाने हे दाखवून दिलं, की तो नेहमी आपल्या लोकांचं रक्षण करतो.

आजही यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करत आहे. यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक इतिहास पाहिला तर ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. आणि आपल्या जागतिक मुख्यालयात, “यहोवाच्या नावासाठी निवडलेले लोक” असं शीर्षक असलेल्या एका संग्रहालयातही हीच गोष्ट दाखवण्यात आली आहे.

वॉरविक संग्रहालयांना भेट: “यहोवाच्या नावासाठी निवडलेले लोक”  हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन’ याचं पोस्टर आणि काही स्लाईड.

    बायबलवर विश्‍वास मजबूत करण्यासाठी १९१४ पासून बायबल विद्यार्थ्यांनी कोणत्या एका नवीन साधनाचा वापर करायला सुरुवात केली? आणि ते किती परिणामकारक ठरलं?

  • १९१८ मध्ये अटक करून तुरुंगात टाकण्यात आलेल्या भावांचे फोटो.

    १९१६ आणि १९१८ मध्ये यहोवाच्या लोकांवर कोणत्या परीक्षा आल्या? आणि यहोवा आपल्या संघटनेचं मार्गदर्शन करत आहे हे त्या वेळी कशावरून दिसून आलं?

  • म्युझियमच्या एका दालनात आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगात टाकण्यात आलेल्यांची चित्रं आहेत. दारांतून आत गेल्यावर नंदनवनाची चित्रं असलेली एक खोली आहे.

    विरोधाचा सामना करावा लागला तरीही यहोवाचे लोक कशा प्रकारे विश्‍वासात खंबीर राहिले?

  • म्युझियमच्या एका दालनात १९३० आणि १९४० या दशकांत कशा प्रकारे प्रचार केला जायचा हे दाखवलं आहे.

    १९३५ मध्ये यहोवाच्या लोकांना कोणती नवीन समज मिळाली आणि याचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला?

  • तुम्ही या संग्रहालयाला भेट दिली असेल, तर तिथे पाहिलेल्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला खात्री पटली की यहोवा आज आपल्या लोकांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करत आहे?

या संग्रहालयाला भेट देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे जाणून घेण्यासाठी jw.org® वर आमच्याविषयी या टॅबवर क्लिक करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा