देवाचे नाव (ठळक अक्षरांत) प्राचीन बायबल हस्तलिखितांमध्ये आहे
बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
देवाला नाव आहे का?
लोक काय म्हणतात काही म्हणतात, देवाला नाव नाही, तर काही त्याला ‘देव’ किंवा ‘प्रभू’ असंही म्हणतात. देवाला बरीच नावं आहेत असंही काहींचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं?
बायबलमध्ये काय सांगितलं आहे
“ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.
बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?
देवाला जरी अनेक पदव्या असल्या तरी त्याने स्वतःला एकच नाव दिलं आहे.—निर्गम ३:१५. पं.र.भा.
देव आपल्या समजण्याच्या पलीकडे नाही; त्याची इच्छा आहे की आपण त्याला ओळखावं.—प्रेषितांची कृत्ये १७:२७.
देवाचे नाव जाणून घेणं ही त्याच्याशी मैत्री करण्याची पहिली पायरी आहे.—याकोब ४:८.
देवाचे नाव वापरणे चुकीचे आहे का?
तुम्हाला काय वाटतं?
हो
नाही
प्रत्येकावर अवलंबून आहे
बायबलमध्ये काय सांगितलं आहे
“तुझा देव परमेश्वर [यहोवा] याचे नाव व्यर्थ घेऊ नको.” (निर्गम २०:७) जेव्हा देवाच्या नावाचा अनादर केला जातो तेव्हा त्याचं नाव व्यर्थपणे घेतल्यासारखं होईल.—यिर्मया २९:९.
बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?
येशूला देवाचे नाव माहीत होत आणि त्याने देवाच्या नावाचा वापरसुद्धा केला.—योहान १७:२५, २६.
आपण देवाला नावाने हाक मारावी यासाठी देव आपल्याला आर्जवतो.—स्तोत्र १०५:१.
लोकांनी देवाचे नाव विसरावं यासाठी त्याचे शत्रू प्रयत्न करतात.—यिर्मया २३:२७. (wp16-E No. 3)