देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ८-९
गर्विष्ठ फारोने नकळत देवाचा उद्देश पूर्ण करायला मदत केली
इजिप्तचे फारो स्वतःला देव समजायचे. म्हणूनच, मोशेच्या काळात राज्य करत असलेला गर्विष्ठ फारो, मोशे आणि अहरोन यांचं, तसंच त्याच्या स्वतःच्या दरबारातल्या ज्योतिष्यांचंही ऐकून घ्यायला तयार नव्हता.
तुम्हाला कोणी काही सूचना दिल्या, तर तुम्ही त्यांचं ऐकता का? किंवा तुम्ही स्वतःत सुधारणा करावी म्हणून कोणी सल्ला दिला तर तुम्ही तो स्वीकारता का? की आपलंच नेहमी बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं? “गर्वामुळे नाश ओढवतो,” असं बायबल सांगतं. (नीत १६:१८, सुबोध भाषांतर) खरंच, गर्वापासून दूर राहणं किती महत्त्वाचं आहे!