देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ६-७
“मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”
इजिप्तवर पीडा आणण्याआधी आणि इस्राएली लोकांना गुलामगिरीतून सोडवण्याआधी, यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं की तो लवकरच काय करणार आहे. यहोवाने त्यांना सांगितलं, की त्यांनी पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं अशा रितीने ते त्याचं सामर्थ्य पाहतील. आणि यहोवा कोण आहे हे इजिप्तच्या लोकांना कळून येईल. देवाने सांगितलेल्या या गोष्टी पूर्ण झाल्या तेव्हा इस्राएली लोकांचा विश्वास मजबूत झाला. आणि यामुळे इजिप्तच्या लोकांप्रमाणे उपासना न करण्याचा त्यांचा निश्चय आणखी पक्का झाला.
यहोवाने भविष्यासाठी दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होतील, यावर तुमचा विश्वास या अहवालामुळे कसा मजबूत होतो?