जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
१-७ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ४४-४५
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ८१३
कपडे फाडणं
यहुदी लोकांमध्ये आणि पूर्वेकडच्या काही राष्ट्रांमध्ये आपली वस्त्रं फाडून दुःख व्यक्त करण्याची रीत होती. खासकरून जवळच्या नातेवाइकाच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर लोक अशा प्रकारे दुःख व्यक्त करायचे. अशा प्रकारे दुःख व्यक्त करताना एक व्यक्ती आपले कपडे पूर्णपणे फाडण्याऐवजी फक्त छातीपर्यंत फाडायची.
इजिप्तमध्ये जेव्हा बन्यामीनवर चोरीचा आरोप लावण्यात आला तेव्हा योसेफच्या भावांनी आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी याच प्रकारे आपली वस्त्रं फाडली.—उत्प ४४:१३.
८-१४ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ४६-४७
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. २२० परि. १
वृत्ती आणि हावभाव
मृत व्यक्तीचे डोळे हाताने झाकणे. यहोवाने याकोबला म्हटलं: “योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकेल.” (उत्प ४६:४) इथे यहोवाला हे सुचवायचं होतं, की याकोबच्या मृत्यूनंतर योसेफ त्याचे डोळे झाकेल. त्या काळात ही जबाबदारी सहसा कुटुंबातल्या मोठ्या मुलाची असायची. त्यामुळे एका अर्थाने यहोवाने याकोबला हे सुचवलं की पुढे ज्येष्ठ पुत्राचा हक्क योसेफकडे जाईल.—१इत ५:२.
अभ्यासासाठी माहिती-प्रेका ७:१४, nwtsty
एकूण ७५ लोक: इजिप्तमधल्या याकोबच्या कुटुंबातल्या सदस्यांची संख्या ७५ आहे असं स्तेफनने सांगितलं. पण असं दिसतं की ही संख्या त्याने इब्री शास्त्रवचनांमधून घेतलेली नाही. कारण इब्री शास्त्रवचनांच्या मॅसोरेटिक लिखांणात ही संख्या सापडत नाही. उत्प ४६:२६ म्हणतं, की “याकोबाच्या वंशातली जी माणसे मिसरात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज सहासष्ट जण होती.” आणि २७ व्या वचनात म्हटलं आहे, की “याकोबाच्या घराण्यातले मिसर देशांत सत्तर जण होते.” इथे लोकांची दोन वेगवेगळ्या पद्धतींने मोजणी करण्यात आली आहे. पहिल्या ठिकाणी फक्त याकोबच्या वंशजांची संख्या सांगण्यात आली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी इजिप्तमध्ये आलेल्या लोकांची एकूण संख्या सांगण्यात आली आहे. निर्ग १:५ आणि अनु १०:२२ मध्येसुद्धा याकोबच्या वंशजांची संख्या “सत्तर” असल्याचं सांगितलं आहे. पण स्तेफन ज्या ७५ लोकांबद्दल सांगत आहे, त्यामध्ये याकोबच्या कुटुंबातले इतर सदस्यसुद्धा असण्याची शक्यता आहे. तसंच, योसेफची मुलं, मनश्शे आणि एफ्राईम यांच्या मुलांचा आणि नातवंडांचाही यामध्ये समावेश असावा, असं काहींचं मत आहे. पण त्यांचा उल्लेख फक्त सेप्टुअजिंट भाषांतरात उत्प ४६:२० मध्ये आढळतो. इतर काही जण असं म्हणतात की या संख्येत कदाचित योसेफच्या सुनांचाही समावेश असावा, जो उत्प ४६:२६ मध्ये गाळण्यात आला आहे. त्यामुळेच कदाचित कुटुंबातल्या सदस्यांची एकूण संख्या “७५” आहे असं स्तेफनने सांगितलं असावं. स्तेफनने ही संख्या कोणत्या प्राचीन अहवालातून घेतली, हे आज सांगता येणार नाही. पण याकोबच्या वंशजांच्या संख्येतील हा फरक, मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे होता हे स्पष्ट आहे.
१५-२१ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति ४८-५०
“वृद्धांकडून बरंच काही शिकता येतं”
इन्साइट-१ पृ. १२४६ परि. ८
याकोब
मृत्यूच्या आधी याकोबने आपल्या नातवंडांना म्हणजेच योसेफच्या मुलांना आशीर्वाद दिला. आणि देवाच्या प्रेरणेने मोठा मुलगा मनश्शे याच्यापेक्षा धाकटा मुलगा एफ्राईम श्रेष्ठ होईल असं म्हटलं. मग ज्येष्ठत्वाचा दुप्पट वाटा मिळवणाऱ्या योसेफला त्याने म्हटलं: “मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तरवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.” (उत्प ४८:१-२२; १इत ५:१) हे खरं आहे की याकोबने हमोरच्या मुलांकडून शेखेमजवळ जमिनीचा एक भाग विकत घेतला होता. पण हा भाग त्याने लढाई करून नाही तर रीतसर विकत घेतला होता. (उत्प ३३:१९, २०) त्यामुळे तो या ठिकाणी, या जमिनीबद्दल बोलत नव्हता तर भविष्यात त्यांचे वंशज युद्ध करून जो कनान देश काबीज करणार होते, त्याबद्दल बोलत होता. ही गोष्ट याकोबची एक भविष्यवाणीच होती, जी पुढे जाऊन पूर्ण होणार होती. पण, योसेफसोबत बोलताना याकोबने ही गोष्ट जणू घडूनच गेली आहे, अशा प्रकारे मांडली आहे. यावरून भविष्यात होणाऱ्या या गोष्टीवर याकोबचा भक्कम विश्वास होता हे दिसून येतं.
इन्साइट-२ पृ. २०६ परि. १
शेवटले दिवस
मृत्यूच्या वेळी याकोबने केलेली भविष्यवाणी. याकोबने म्हटलं, की “तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो.” (उत्प ४९:१) या ठिकाणी, तो भविष्यातल्या अशा काळाबद्दल बोलत होता जेव्हा त्याचे शब्द पूर्ण व्हायला सुरुवात होणार होती. जवळपास २०० वर्षांआधी यहोवाने अब्राहामला म्हणजे याकोबच्या आजोबांना सांगितलं होतं, की त्याच्या संततीचा ४०० वर्षांपर्यंत छळ केला जाईल. (उत्प १५:१३) त्यामुळे याकोब या ठिकाणी ज्या ‘पुढील काळाबद्दल’ बोलत होता, तो काळ, ही ४०० वर्षं संपल्यानंतर सुरू होणार होता. हीच भविष्यवाणी ‘देवाच्या इस्राएलवर’ म्हणजे लाक्षणिक इस्राएलवर एका अर्थाने पूर्ण होणार होती.—गल ६:१६; रोम ९:६.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. २८९ परि. २
बन्यामीन
बन्यामीनचे वंशज युद्धकलेत किती तरबेज असतील हे याकोबने आपल्या मृत्यूच्या आधी केलेल्या भविष्यावाणीतून दिसून येतं. त्याने आपल्या प्रिय पुत्राबद्दल असं म्हटलं, “बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकेल, सायंकाळी लुटीचे वाटे करेल.” (उत्प ४९:२७) बन्यामीनच्या वंशाचे लोक उजव्या आणि डाव्या हाताने गोफण चालवण्यात खूप माहीर होते. त्यांचा नेम एक ‘केसभरसुद्धा’ चुकत नव्हता. (शास २०:१६; १इत १२:२) अन्यायी राजा एग्लोनचा वध करणारा शास्ता एहूदसुद्धा बन्यामीन वंशाचा होता आणि तो डावरा होता. (शास ३:१५-२१) तसंच, हेसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की “सकाळी” म्हणजेच इस्राएल राज्याच्या उदयाला, बन्यामीन वंशातूनच पहिला राजा निवडण्यात आला. तो किशचा मुलगा शौल होता, ज्याने पलिष्ट्यांच्या विरुद्ध जबरदस्त लढा दिला होता. (१शमु ९:१५-१७, २१) आणि “सायंकाळी” म्हणजे इस्राएल राष्ट्राच्या अस्तालासुद्धा याच वंशातून असणाऱ्या एस्तर राणीने आणि मर्दखयने पारसच्या सत्तेखाली असणाऱ्या इस्राएली लोकांना वाचवलं होतं.—एस्ते २:५-७.
२२-२८ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम १-३
आध्यात्मिक रत्नं शोधा
अवेक!०४ ४/८ पृ. ६ परि. ५
मोशे—खरीखुरी व्यक्ती की काल्पनिक व्यक्ती?
इजिप्तच्या राजकन्येने एका मुलाला दत्तक घेण्याची कल्पना खूपच काल्पनिक आहे असं म्हणता येईल का? नाही. कारण इजिप्तच्या लोकांचा असा धार्मिक विश्वास होता, की स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर इतरांना दया दाखवणं गरजेचं आहे. दत्तक घेण्याच्या बाबतीत पुरातत्त्व शास्त्रज्ञ जॉईस टिलडेसली असं म्हणतात, की “इजिप्तमधल्या स्त्रियांनासुद्धा पुरुषांसारखेच हक्क होते. निदान लेखी स्वरूपात तरी त्यांना पुरुषांइतकाच न्यायिक आणि आर्थिक गोष्टींमध्ये अधिकार होता. त्यामुळे दत्तक घेण्याचा हक्कसुद्धा त्यांना असावा.” दत्तक घेतलेल्यांची यादी असलेल्या एका प्राचीन पपायरसच्या कागदावर इजिप्तमधल्या एका स्त्रीने आपल्या दासांना दत्तक घेतल्याची नोंदसुद्धा सापडली आहे. तसंच, मोशेच्या आईला दाई म्हणून वापरण्याच्या बाबतीत, द अँकर बायबल डिक्शनरी असं म्हणते, की “बाळाला दूध पाजण्यासाठी मोशेच्या खऱ्या आईला वेतन देण्याची गोष्ट . . . प्राचीन मेसोपटेम्या इथे असलेल्या दत्तक घेण्याच्या तरतुदींशी मिळती-जुळती आहे.”
२९ जून–५ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम ४-५
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. १२ परि. ५
यहोवा
‘जाणणं’ किंवा ओळखणं म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची माहिती असणं. पण या शब्दांचा नेहमीच असा अर्थ घेता येणार नाही. उदाहरणार्थ, एके प्रसंगी मूर्ख नाबालने म्हटलं की “दावीद कोण?” याचा अर्थ तो दावीदला ओळखत नव्हता असं नाही, तर उलट त्याला असं म्हणायचं होतं की “मला सांगणारा तो कोण, की मी त्याचं ऐकू?” (१शमु २५:९-११; २शमु ८:१३) त्याचप्रमाणे फारोनेसुद्धा मोशेला म्हटलं, की “हा कोण परमेश्वर [यहोवा] की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला [यहोवाला] जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.” (निर्ग ५:१, २) या ठिकाणी फारोला असं म्हणायचं होतं, की तो यहोवाला जरी नावाने ओळखत असला तरी तो एक खरा देव म्हणून त्याला मानत नव्हता. किंवा इजिप्तच्या राजावर आणि त्याच्या सत्तेवर यहोवाचा कोणताही अधिकार आहे, असं त्याला वाटत नव्हतं. किंवा मग, मोशे आणि अहरोन सांगत आहेत त्याप्रमाणे आपली इच्छा इजिप्तवर लादण्याची ताकद यहोवामध्ये नाही असं त्याला म्हणायचं होतं. पण आता अशी एक वेळ येणार होती, की इस्राएली लोकांसोबतच फारो आणि संपूर्ण इजिप्तलासुद्धा यहोवाच्या नावाचा खरा अर्थ आणि त्या नावामागची व्यक्ती कोण आहे हे समजणार होतं.