देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४८-५०
वृद्धांकडून बरंच काही शिकता येतं
या शेवटल्या काळात यहोवाने कोणत्या ‘अद्भुत गोष्टी’ केल्या आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा वृद्ध भाऊबहिणींच्या तोंडून ऐकायला मिळतो. त्यामुळे यहोवा आणि त्याच्या अभिवचनांवरचा आपला भरवसा आणखी मजबूत होतो. (स्तो ७१:१७, १८) म्हणून मंडळीत वृद्ध भाऊबहीण असणं एक आशीर्वादच आहे. जर तुमच्याही मंडळीत असे भाऊबहीण असतील तर त्यांना खाली दिलेल्या गोष्टी नक्की विचारा:
यहोवाची सेवा करत असताना त्यांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याने त्यांना कशी मदत केली आहे?
त्यांनी या काळात राज्य प्रचारकांच्या संख्येत कशा प्रकारे वाढ होत असल्याचं पाहिलं आहे?
बायबल सत्यांबद्दलची आपली समज जेव्हा आणखी स्पष्ट झाली तेव्हा त्यांना कसं वाटलं होतं?
यहोवाच्या संघटनेत त्यांनी कोणकोणत्या सुधारणा होताना पाहिल्या आहेत?