१५-२१ जून
उत्पत्ति ४८-५०
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“वृद्धांकडून बरंच काही शिकता येतं”: (१० मि.)
उत्प ४८:२१, २२—देवाचे लोक भविष्यात कनान देश काबीज करतील, या गोष्टीवर याकोबचा विश्वास होता (इन्साइट-१ पृ. १२४६ परि. ८)
उत्प ४९:१—मृत्यूच्या वेळी याकोबने केलेल्या भविष्यवाणीवरून त्याचा भक्कम विश्वास दिसून येतो (इन्साइट-२ पृ. २०६ परि. १)
उत्प ५०:२४, २५—यहोवाने दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होतील यावर योसेफचा भरवसा होता (टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. २८ परि. १०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प ४९:१९—याकोबने गादविषयी केलेली भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज०४ ६/१ पृ. १५ परि. ४-५)
उत्प ४९:२७—याकोबने बन्यामीनविषयी केलेली भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली? (इन्साइट-१ पृ. २८९ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४९:८-२६ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: साक्ष देताना प्रचारक एकमेकांना कशी मदत करतात? या प्रचारकांप्रमाणेच आपणही जे बोलतो त्याबद्दल आपल्याला खात्री आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?
पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक द्या आणि अध्याय ९ मधून बायबल अभ्यास सुरू करत असल्याचं दाखवा. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
“अनुभवी भाऊबहिणींकडून तुम्ही काय शिकू शकता?”: (१५ मि.) चर्चा. आपल्या कामावर बंदी असतानाही एकता टिकवून ठेवणं हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ४४-४६ आणि भाग ८ ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २६ आणि प्रार्थना