देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३६-३७
योसेफला आपल्या भावांचा द्वेष सहन करावा लागतो
अयोग्य प्रकारच्या ईर्ष्येमुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात, हे योसेफच्या गोष्टीतून कळतं. अशा प्रकारची ईर्ष्या जर आपल्या मनात निर्माण होत असेल, तर तिला लगेच आळा घालणं का गरजेचं आहे, हे दाखवणारी कारणं खाली दिली आहेत. तेव्हा या कारणांच्या आणि त्यांना जुळणाऱ्या वचनांच्या जोड्या लावा.
वचन
कारण
हेवा करणारे लोक देवाच्या राज्याचे वारस होऊ शकत नाहीत
ईर्ष्यमुळे मंडळीची शांती आणि एकता भंग होते
ईर्ष्येमुळे शारीरिक हानी होते
ईर्ष्येमुळे इतरांमधल्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत
कोणत्या गोष्टींमुळे आपल्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण होऊ शकते?