वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. ३
  • तुम्ही तयार आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही तयार आहात का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • ‘शेवटच्या दिवसांमध्ये’ विपत्तींचा सामना करण्यासाठी तयार राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • एखाद्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यास तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२००७
  • संकटाच्या परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. ३
एक कुटुंब इमर्जन्सी किट तयार करत असताना

ख्रिस्ती जीवन

तुम्ही तयार आहात का?

तुमच्या भागात एखादी नैसर्गिक विपत्ती आली तर तिला तोंड द्यायला तुम्ही तयार आहात का? भूकंप, चक्रीवादळ, वणवा आणि पूरासारखी संकटं आपल्यावर अचानक येऊ शकतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं. यासोबतच, अतिरेकी हल्ले, सामाजिक तणावाचं वातावरण आणि साथीच्या रोगांसारख्या गोष्टीसुद्धा अचानक केव्हाही आणि कुठेही निर्माण होऊ शकतात. (उप ९:११) त्यामुळे आपण राहतो त्या ठिकाणी या गोष्टी कधीच होणार नाहीत, असा विचार आपण करू नये.

तेव्हा, संकटांचा सामना करायचा असेल तर आपल्यातल्या प्रत्येकाने योग्य ती पावलं उचलून, आधीच तयारी केली पाहिजे. (नीत २२:३) हे खरं आहे, की अशा प्रकारची संकटं येतात तेव्हा आपली संघटना आपल्याला काही प्रमाणात मदत पुरवते. पण म्हणून अशा गोष्टींसाठी आपल्याला तयारी करायची काहीच गरज नाही, असा याचा अर्थ होत नाही.—गल ६:५, तळटीप.

नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एक बांधव बायबल वाचन करून विपत्तीच्या काळासाठी स्वतःला आध्यात्मिक रित्या तयार करत आहे.

    यहोवासोबत असलेल्या घनिष्ठ नातेसंबंधामुळे विपत्तीच्या काळात तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

  • इमर्जन्सी बॅग, संपर्क माहिती आणि मोबाईल.

    विपत्तीच्या काळात खालील गोष्टी करणं का महत्त्वाचं आहे?

    • • विपत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतर मंडळीतल्या वडिलांच्या संपर्कात राहणं.

    • • इमर्जन्सी किट तयार ठेवणं.—सजग होइए!१७.५ पृ. ६

    • • आपल्या भागात कोणत्या प्रकारची संकटं येऊ शकतात याचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीत काय करता येईल यावर चर्चा करणं.

  • कोलाज: विपत्तीच्या काळात इतरांना मदत करण्याचे मार्ग. १. एक बांधव प्रार्थना करत असताना. २. मदत कार्यात काही स्वयंसेवक काम करत असताना. ३. राज्य सभागृहात एक बांधव दानपेटीत दान टाकत असताना.

    कोणत्या तीन मार्गांनी आपण विपत्तीग्रस्त लोकांना मदत करू शकतो?

तुम्ही  स्वयंसेवक म्हणून काम करू शकता का?

विपत्ती मदतकार्यात स्वयंसेवकांची आज खूप गरज आहे. जर तुम्हाला स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल तर लगेच तुमच्या मंडळीतल्या वडिलांना कळवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा